गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

विवाह झाला का? प्रकरण -२

 || श्री||


मागील लेख- जन्मवेळ शुद्धीचा गुंता. भाग-२


विवाह झाला का? प्रकरण-२





शिवराम काजरेकर, प्रशासक, फक्त केपी ॲस्ट्रॉलॉजी समूह,  ६ सप्टेंबर रोजी ११:०८ AM वाजता  ·

प्रश्न-1, ग्रूपवरील काही सदस्यांच्या मागणीनुसार-

जातक-पुरुष, जन्मदिनांक-26/04/1984, जन्मवेळ-12:32 दुपारी, जन्मस्थळ- अवळेगाव, ता-कुडाळ, 16°06'54.0"N, 73°45'13.7"E.

या व्यक्तीचा विवाह झाला आहे का?

उत्तर ‘हो’ असेल तर केव्हा? व विवाहाचे स्वरूप- प्रेम प्रकरण वगैरे. विवाह वेळ सहा महिने मागेपुढे आली तरी चालेल.

उत्तर ‘नाही’ असेल तर विवाह केव्हा होईल? फक्त दशा अंतर्दशा विदशा सांगितल्या तरी पुरेसे आहे.

 

समुहा वरील या प्रश्नावर मी जो विचार केला आहे तो येथे मांडत आहे.


èसप्तमाचा सब राहू हा लाभात आहे, पण फोरस्टेप नुसार राहू लाभाचा कार्येश होत नाही. फोरस्टेप नुसार राहू १,८,९ या भावांचा कार्येश होतो आहे. म्हणजे राहू विवाह दर्शक प्रमुख भावांचा कार्येश होत नाही. असे असले तरी पूरक भावांपैकी ८ चा कार्येश होतो आहे तर रजिस्टर विवाह दर्शक भावांपैकी ९ चा कार्येश होतो आहे. अनुकूल दशा, गोचर असेल तर हा राहू प्रयत्नांना फळ देवू शकतो. राहूचा सब शुक्राच्या नक्षत्रात आहे. राहू विवाह कारक शुक्राशी संबंधित आहे व चंद्राच्या नक्षत्रात असल्याने वक्रत्वाचा संबंध नाही. वय वर्षे १८ ते ३७ दरम्यान शनीची महादशा आहे. सध्या वय ३६ वर्षे ४ मास आहे. शनि ६,९ चा कार्येश आहे. म्हणजे महादशानाथ स्पष्टपणे हिरवा कंदील दाखवत नाही. त्या मुळे शनि महादशेत विवाह होणे अवघड आहे खरे. शनि स्वत:लाच त्याचा नक्षत्रस्वामी व सब गुरुच्या माध्यमातून ७ चे दुय्यम कार्येशत्व देतो आहे. आता हि ‘तेढी उंगली घी निकाल देगी?’ अगर देगी तो ‘घी देखा, बडगा नाही देखा’ असे होण्याची शक्यता आहे.

शनी महादशेत बुध अंतर्दशे पासून विवाह योग्य काल सुरु झाला. बुध ५,११ केतू ७,११ चंद्र ११, मंगळ ११, गुरु ११ असे चारपदरी बलवान कार्येशत्व आहे. यातील चंद्राची अंतर्दशा मला जास्त योग्य वाटते चंद्र लाभातील राहूच्या नक्षत्रात आहे (व दशानाथ सप्तमेशाच्या राशीत). शनीच्या महादशेत चंद्राची अंतर्दशा १०/०२/२०१३ ते ११/०९/२०१४ (वय २८ व ९ मा ते ३० व ४ मा) आहे. ७ महिन्याचा हा कालावधी आहे. विदशा तो अजून कमी करेल. शनि महादशा ७ चे दुय्यम कार्येशत्वाची आहे. म्हणून ७ चे बलवान कार्येशत्व दर्शवणारी केतूची विदशा जी ०५/०४/२०१४ ते ०९/०५/२०१४ दरम्यान आहे ती निवडू.

अनुमान:- उपलब्ध जन्मटिपणा नुसार कुंडलीचा सप्तमाचा सब राहू फारसा अनुकूल नाही, त्यातच शनि महादशाही तितकी अनुकूल नाही. त्या मुळे विवाह होणे अवघड आहे बाबा. प्रयत्नवादाला पूरक, दुय्यम कार्यशत्वाचा आधार घेत जर विवाह झाला असेल तर ०५/०४/२०१४ ते ०९/०५/२०१४ दरम्यान ३० व्या वर्षी झाला असावा. 🙏 

पुढील लेख:- कोविड उपचार केंद्र सुरु होईल का?