रविवार, १७ जुलै, २०२२

जीवन दोर

 || श्री ||

मागील लेख :- बंडात बंडाळी?


   जीवन दोर



मना प्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते |

कुठेतरी मी उभाच होतो कुठे तरी दैव नेत होते ||

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही |

उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते? कवी सुरेश भट.


रात्री उशिरा माझा एक ज्योतिष सहपाठी माझ्या कार्यालयात आला. आदीच खूप उशीर झालेला होता मी निघालोच होतो पण तो आला कि थोडी तरी चर्चां आम्ही करत असू म्हणून थांबलो. बहुधा त्याच्या ओळखीतल्या कुणाच्या तरी मुलीचे टिपण दिले. “साधारण ४ महिन्या पासून तब्येतीच्या तक्रारी वाढल्या. सारखी आजारी पडू लागली. केस गळू लागले, शरीरात रक्तस्त्राव होऊ लागला. रक्ताच्या कर्करोगाचे निदान काही दिवसांपूर्वी झाले असून उशीर झाल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. बरी होण्याची आशा डॉक्टर देत आहेत. आजारातून बरी होईल ना? केव्हा?” रात्र झालेली असल्या मुळे बहुधा आम्ही खूप चर्चा केली नसावी कारण मी त्याला जे उत्तर दिले ते खालील प्रमाणे त्रोटक नमूद करून ठवलेले होते.  

रुलिंग मध्ये शीघ्रगती ग्रह असल्याने फार दिवस आशा करता येणार नाही. रविचे तुलेतून भ्रमण १७/१० ते १६/११ त्रासदायक जाईल. वृषभेतून चंद्राच्या नक्षत्रातून भ्रमण २४/५/२०१६ ते ०७/६/२०१६ मृत्यू देवू शकते.


०२/१०/२०१५ रात्री २१:४८:४८, नाशिक येथे वरील प्रश्न मी पाहिला होता. उत्तर हुकले होते पण चुकले नव्हते. या मुलीचा मृत्यू ०५/१०/२०१५ सका.११:०० वाजता झाला. फार दिवस आशा करता येणार नाही असे म्हटले असले तरी घटना इतक्या लवकर म्हणजे तीन दिवसात घडेल असे वाटले नव्हते. रुलिंग मध्ये शीघ्रगती ग्रह असल्याने रवी ऐवजी चंद्राचे भ्रमण बघायला हवे होते. मृत्यू वेळी चंद्र मिथुनेत गुरुच्या पुनर्वसू नक्षत्रात व्दितीय चरणात (७:३४ ते १३:४८) होता. प्रश्नवेळी गुरु शुक्र युक्त होता पण बुध? रवि किंवा चंद्र दोघांचेही रुलिंग जमत नाही. प्रश्न वेळी वृषभ लग्न उदित असून चंद्र लग्नात होता. त्यावेळी चंद्र अंशाने सर्वाधिक असल्याने तो कोणाशी योग करणार नव्हता. लग्नाचेच काय सर्व भाव संधीचेही अंश चंद्रा पेक्षा कमी होते. लग्नेश शुक्र अष्टमेश गुरु व व्ययेश मंगळ युक्त चतुर्थात होता हि धोक्याची घंटा होती. गुरु शुक्र युती २४ दिवसांनी होती या हि दृष्टीने घटाना लवकर घडली.



या मुलीचा जन्म ०८/०२/२०००, पहाटे १:४५, नाशिक येथील आहे. 


कर्करोग का? - लग्नेश/षष्ठेश मंगळाचे पंचमेश/मारकेश गुरूशी षष्ठ पंचमातून राशीपरिवर्तन. लग्नेश मंगळ कर्क नवमांशी व्ययात षष्ठातील जन्मअष्टमेश बुधाच्या दृष्टीत. नवमांशात षष्ठावर मंगळ, गुरु, राहूची दृष्टी. रक्ताचा कारक मंगळ, कर्करोगाचा कारक गुरु यांच्या राशी परिवर्तना मुळे रक्ताचा कर्करोग झाला. कर्करास हि राहू मुळे दुषित आहे व शुभग्रह दृष्टी विरहित आहे.


मृत्यू १६ व्या वर्षी झाला आहे त्यामुळे अल्पायु ठरली. बालारीष्ट ८ वर्षा पर्यंत किंवा फार तर फार १२ व्या वर्षा पर्यंत असतो. चंद्र चतुर्थात पापग्रह मध्यात व बुध चतुर्थात हे बालारीष्ट योग कुंडलीत आहेत. लग्नेश कोणात असला तरी शुभग्रह दृष्ट नाही, लग्नावरही शुभग्रह दृष्टी नाही तसेच लग्नेश स्थित राशीचा स्वामी गुरु हि शुभग्रह दृष्ट नाही हा अल्पायु झाला. अष्टमेश बुध केंद्रात असून लग्नेश मंगळा पेक्षा बलवान आहे. लग्नेश मंगळ मित्र राशीत पंचमात असला तरी नीच नवमांशी आहे. अष्टमेश बुध चतुर्थ केंद्रात मित्र राशीत असून मित्र नवमांशी आहे. बुध शनीच्या कुंभेत असून मकर नवमांशी आहे. शनी बुध परममित्र आहेत. लग्नेश मंगळही परममित्र गुरुच्या मीन राशीत आहे पण नीच नवमांशी असल्याने तुलनेत बलहीन आहे.  अष्टमेश लग्नेशा पेक्षा बलवान हा अल्पायुयोग झाला. जोडीला लग्नेश मंगळ शनि बुधाच्या पापमध्यात आहे तर अष्टमेश बुध रवी मंगळाच्या पापमध्यात. दोघांवरही शुभग्रह दृष्टी नाही.


अल्पायु योगात तिसरी महादशा मृत्यूदायक ठरू शकते. पण मृत्यू समयी तर शनि दशा भूक्तीत केतू विदशा २२ ऑग. ते २५ आक्टों. २०१५ दरम्यान होती. म्हणजे त्रास बुध विदशेत सुरु झाला, बुध अष्टमेश आहे. शनि महादशा दुसरी आहे. प्रश्न काळी शनि शासक ग्रहात नव्हता. जरी शनिची प्रश्न लग्नावर सप्तम दृष्टी असली तरी ती भावदृष्टी होती. त्याच्याच दशा भूक्तीत घटना घडण्या एवढी बलवान दृष्टी नव्हती. केतू हि शासक ग्रहात नव्हता. जन्मकुंडली नुसार मात्र दशेचा कार्यकारण भाव लावता येतो. दशा भुक्तीनाथ शनि मोक्ष त्रिकोणातील चतुर्थेश व अष्टमा पासून अष्टम तृतीयेश आहे. शनि षष्ठात व्ययेश शुक्राच्या नक्षत्री आहे त्याची अष्टम, व्ययावर दृष्टी आहे. ज्या विदशेत जातकास त्रास सुरु झाला तो बुध अष्टमेश असून चतुर्थात शनिच्या राशीत राहुच्या नक्षत्रात म्हणजे पाप संबंधात आहे. मृत्यू समयीचा विदशानाथ केतू तृतीयात नेपच्यून युतीत शनिच्या दशम भावदृष्टीत.  

लग्नाच्या ६४ व्या नवमांशातून व लग्नेश स्थित नवमांशाच्या त्रिकोणातून शनि चे भ्रमण मृत्यूदायक झाले. चंद्राच्या अष्टमातून राहू व लग्नअष्टमेश बुधाचे भ्रमण होते. पण हा योग अंशात्मक असावा म्हणजे चंद्र २१ अंशावर आहे तर गोचर राहू, बुधाचे भ्रमण २१ अंशा वर हवे होते, तसे ते नाहीये. स्थिर आत्माकारक रविच्या ६४ व्या नवमांश त्रिकोणातून, लग्नाच्या ६४ व्या नवमांश त्रिकोणातून व लग्नेश मंगळाच्या ७२ व्या नवमांश त्रिकोणातून शनीचे भ्रमण मृत्यू दायक ठरले.

पुढील लेख लवकरच.......