शुक्रवार, ३१ मे, २०२४

लाटेवर स्वार कि लाटेवर मात ?

 

||श्री||

मागील लेख:- बघ माझी आठवण येते का? भाग-२

 

लोकसभा मतदान नाशिकला २० मे रोजी झालेलं आहे. ४ जूनला निकाल आहे. आपल्या कडे अध्यक्षीय पद्धत नसली तरी श्री.मोदी पंतप्रधानपदी या लक्षावर गेल्या काही निवडणुका पार पडत आहे व त्यात भाजपाला यश हि आलेलं आहे. त्याची पुनरावृत्ती होणार कि नाही? या वर अनेक ज्योतिर्विदांनीही मते मांडलेली आहेत. मी त्यावर माझे मत मांडत नाहीये कारण ‘येणार तर मोदीच’ याचा इतका प्रचार झाला आहे कि जनमानसावर या प्रचाराचा असलेला प्रभाव पुसण्यात विरोधी पुरेसे यशस्वी झाले असे वाटत नाही. नेहरू, गांधी घराण्या नंतर सध्या मोदी लाट आहे. आपली सांसदीय निवडणूक प्रक्रिया काहीही असली तरी एखाद्या नेत्याची लाट असली कि त्या पक्षाचे उमेदवार त्या लाटेवर निवडून येण्याची शक्यता असते हे नेहरू, गांधी, मोदी लाटेने या पूर्वीच सिद्ध केलेले आहे. तरीही सर्वचे सर्व उमेदवार काही लाटेवर स्वार होऊन निवडून येत नाही हे हि खरे. काही लाटेवर मात करून निवडून येतात. मी माझ्या नाशिक मतदार संघातील उमेदवार लाटेवर स्वार होऊन निवडून येणार कि लाटेवर मात करून निवडून येणार हे ज्योतिष मार्गाने चाचपडण्याचे ठरवले. सोशल मिडीया वरील बेभरोसे जन्मटिपण घेवून त्या वरून भाकीत करण्यापेक्षा होरारी नंबर वरून भकित करणे मला जास्त श्रेयस्कर वाटले. उमेदवार तर बरेच आहेत पण सगळ्यांचा विचार करण्या पेक्षा ज्यांची चर्चा आहे त्यांचाच विचार केला आहे. त्यामुळे चार उमेदवारांचा विचार मी येथे केला आहे. सुविधेसाठी मेष लग्न कुंडली देत आहे.



२७/०५/२०२४,१७:५१:१७, होरारी नं- २११ श्री.हेमंत गोडसे. कुंभ लग्न ४/५३’/२०” वर आहे. हे NDA चे उमेदवार असल्याने यांचा विचार प्रथम केला. षष्ठाचा सब शनि मार्गी गुरुच्या नक्षत्रात आहे. शनि- १/१२ न.स्वा. गुरु- ३, सब बुध- ... न.स्वा. शुक्र- ३/४,९  षष्ठाचा सब शनि ६,१०,११ पैकी कार्येश नाही. म्हणजे सदर उमेदवार निवडून न येण्याची शक्यता आहे. व्ययाचा सब शनि प्रतीस्पर्धीस अनुकूल ४,१२ चा बलवान कार्येश असल्याने प्रतीस्पर्धी उमेदवारांपैकी कुणी निवडून येवू शकतो.

२७/०५/२०२४,१८:११:२७ होरारी नं- १०१ श्री.राजाभाई वाजे. सिंह लग्न २५/५३’/२०” वर आहे. महाआघाडीच्या या उमेदवाराची जास्त चर्चा होती. षष्ठाचा सब गुरु रविच्या नक्षत्री आहे. गुरु- --, न.स्वा. रवि- ९, सब बुध- ९, न.स्वा. शुक्र- ९/३,१० सब गुरु ६,१०,११ पैकी १० चा बलवान कार्येश आहे. म्हणजे सदर उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. व्ययाचा सब गुरूच आहे तो ४,५,१२ पैकी बलवान कार्येश नाही. खरे तर चुरस या पहिल्या दोघा उमेदवारां मध्ये असल्याने व या उमेदवाराच्या षष्ठाच्या व व्ययाच्या सबने स्पष्ट निर्देश केले असल्याने पुढे काही पहाण्याची आवश्यकता नव्हती पण चार उमेदवारांची नावे मनात असल्याने पाहून घेवू.

२७/०५/२०२४,१८:२२:३९, होरारी नं- १० श्री.शांतीगिरीजी महाराज. मेष लग्न १३/२०’/००” वर आहे. षष्ठाचा सब बुध मार्गी शुक्राच्या नक्षत्री आहे. बुध- ... न.स्वा. शुक्र- १/२,, सब शनि- ११ न.स्वा.गुरु- १. सब बुध ११ चा बलवान कार्येश आहे. उमेदवार तर एकच निवडून येईल ना?  इथेही व्ययाचा सब बुधच आहे तो ४,५,१२ पैकी बलवान कार्येश नाही. व्ययाचा सब कार्येश असता तर सोपे झाले असते.       

२७/०५/२०२४,१८:५५:२५, होरारी नं- ७१ श्री.सिद्धेश्वरानंद महाराज. कर्क लग्न ११/००’/००” वर आहे. षष्ठाचा सब बुध- -- न.स्वा.शुक्र- १०,११/४ सब शनि- ८/७ न.स्वा.गुरु- १०. सब बुध १०,११ चा बलवान कार्येश असल्याने सदर जातक निवडून येण्याची शक्यता आहे. व्ययाचा सब शनि- ८/७ न.स्वा.गुरु- १०. सब बुध- -- न.स्वा.शुक्र- १०,११/४. व्ययाचा सब शनि ४ चा बलवान कार्येश आहे. म्हणजे प्रतिस्पर्धीही तुल्यबळ आहे आणि चवथ्या पायरीवर व्ययाचा सब ४ चा कार्येश आहे. यश मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.  

नंबर १ चा उमेदवार येथील ज्योतिष गणने नुसार अपयशी ठरण्याची शक्यता आहे. नंबर ४ च्या उमेदवाराचा व्ययाचा सब ४ चा बलवान कार्येश असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कुंडलीवर अवलंबून आहे व इतर दोन उमेदवारांच्या कुंडलीत यशाची शक्यता अधिक असल्याने नंबर ४ स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आता नंबर २ व ३ चा विचार करू. नंबर २ चा षष्ठाचा सब गुरु असून तो रवि सारख्या सत्ताकारक ग्रहाच्या नक्षत्री आहे तर नंबर ३ चा सब बुधा सारखा ग्रह असल्याने या मुद्यावर नंबर २ बाजी मारत आहे. दुसरा मुद्दा असा कि नंबर २ चा षष्ठाचा सब १० चा बलवान कार्येश चवथ्या पायरीवर आहे तर नंबर ३ चा षष्ठाचा सब ११ सारख्या महत्वाच्या भावाचा बलवान कार्येश असला तरी तो तिसऱ्या पायरीवर आहे. त्यामुळे मला इथेही नंबर २ बाजी मारत आहे असे वाटते आहे. बघुया घोडा मैदान जवळ आहे.

निष्कर्ष :- महाआघाडीचे उमेदवार श्री.राजाभाई वाजे निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.

पुढील लेख:- हार पळवला.