बुधवार, २२ मार्च, २०२३

सारस्वतांच्या कुंडल्या.

||श्री||

मागील लेख:- जुळ्यांचे ग्रहयोग.

सारस्वतांच्या कुंडल्या.



 

*हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*

नूतन शालिवाहन शके १९४५ शोभन नाम संवत्सर आपल्याला सुख समृद्धि आयु: आरोग्य संपन्न जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि आमची शुभेच्छा. सूर्य आपल्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुध्दीची, गुरु गौरवाची, शुक्र कोमल वाणीची, शनि आनंदाची, राहु बाहुबलाची, आणि केतु आपल्या कुलाची वाढ करो.

🙏🙏 ज्योतिष पंडीत योगेशशास्त्री दैठणकर आणि परिवार. 🙏🙏

ज्योतिष अभ्यासकांसाठी दोन पत्रिका दोन्हीत, कुंभ रास शततारका नक्षत्र. तृतीयेश, दशमेश पंचमात. इतर योग

पत्रिका १ मधे हर्षल - शुक्र लाभयोग, गुरु-नेपच्यून नवपंचम, रवि-मंगळ नवपंचम

पत्रिका २ - चंद्र-शुक्र लाभ,  नेपच्यून-  शुक्र नवपंचम, कार्यक्षेत्र आणि त्यासंबंधीत विवेचन अपेक्षित.



è एका समुहात एका ज्योतिर्विदांनी वरील पोस्ट केली होती. त्यांनी दोन कुंडल्या दिल्या होत्या पण दोन्ही कुंडल्याचे जन्मटीपण दिले नव्हते तर कुंडल्यांचे फोटो टाकले होते तेही ठोकळा कुंडल्यांचे. ग्रहांचे, भावांचे अंश देखील नव्हते. अभ्यासा साठी कुंडल्या टाकतांना नाव वगैरे ची गरज नसते पण वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यासक असल्याने सुक्ष्मतेसाठी  आपआपल्या पद्धतीने कुंडली बनवण्यासाठी जन्मटिपण देणे आवश्यक असते. एका सदस्यांनी विचारणा केल्यावर त्यांनी स्पष्टग्रह दिले पण स्पष्टभाव मात्र दिले नाही. भावचलीताचे अनेक प्रकार आहेत. इतर काही घटक अभ्यासायचे म्हटले तरी त्यासाठी जन्मटिपण लागते. कदाचित त्यांना Blind Chart म्हणून त्या अभ्यासकां समोर ठेवायच्या असतील. आपल्याला हव्या त्या गोष्टी त्यांना सारख सारख विचरात बसण्या पेक्षा दिलेल्या माहितीच्या आधारे साधारण अंदाज बांधण्याचे मी ठरवले. तसेही दशा इ. बघण्याची आवश्यकता नव्हती कारण कार्यक्षेत्रात नेमके काय कधी घडले असावे हे काही सांगायचे नव्हते तर कार्यक्षेत्र आणि त्यासंबंधीत विवेचन अपेक्षित होते. त्या नुसार कुंडल्या बघून मी खालील उत्तर दिले.



“दोन्ही कुंडल्या कला क्षेत्राशी संबंधित असाव्यात. दोन्ही कुंडल्या लेखक, कवी या कार्य क्षेत्राच्या वाटतात. दोन्ही कुंडल्याच्या व्यक्ती या बौद्धीक क्षेत्रात कार्यरत असाव्यात. शिक्षण क्षेत्राशी दोघांचाही संबंध आला असावा.

कुंडली क्र.१- लेखन क्षेत्रा बरोबरच ही व्यक्ती सरकारी अधिकारी किंवा राजकारणी असावी. लेखन प्रामुख्याने क्रांतीकारी, सामरीक स्वरूपाचे असावे. धार्मिक / अध्यात्मिक क्षेत्रात लेखन केले असण्याची शक्यता आहे. या व्यक्तीच्या अंगी विविध कला गुण असावेत. दुसरे असे की न्युज मेडीयात सक्रीय असण्याचा संभव आहे किंवा चित्रपट क्षेत्रात.

कुंडली क्र.-२ हि व्यक्ती सुद्धा लेखना सोबत नोकरीही करत असावी. ही व्यक्ती भाषांतरकार / अनुवादक असावी. शोकांतिका, आत्मचरित्रकार स्वरूपाचे लेखन केले असावे.

शुभरात्र.”

याचे तीन एक दिवसांनी त्यांनी उत्तर सांगितले ते असे Yogesh Daithankar सर, पत्रिका नंबर २ कवी मंगेश पाडगावकर यांची आहे. त्यांच्यबद्दल अधिक काय सांगायचे?

तर पत्रिका १ माझी स्वतः ची आहे. माझे ही एक पुस्तक प्रकाशित आहे, नियमीत ब्लाँग लेखन ज्यात एक धार्मिक विषयावर वाहिलेला ब्लाँग, एक साहित्यिक ब्लॉग आहे. मी स्वतः एका स्टिल कंपनीत एक्पोर्ट मॅनेजर आहे. इथे प्रतिक्रिया दिलेल्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.”

आता मी जे अंदाज वर्तवले ते कसे ते सांगतो. प्रथम पोष्ट कर्ताने “दोन्हीत, कुंभ रास शततारका नक्षत्र. तृतीयेश, दशमेश पंचमात.” हे सांगितले होतेच. कुंभरास असल्याने दोन्ही जातक बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणार हा प्रार्थमिक स्वरूपाचा अंदाज बांधला. पंचमस्थान हे कला गुणांचे स्थान आहे. तृतीय स्थानावरून लेखनाचा विचार होतो. दशमस्थान हे अधिकार, कर्म यांचे स्थान आहे. यांचा संबंध पंचमाशी आला त्यामुळे लेखक आहेत असा होरा मी बांधला. या योगात शुक्राचा संबंध येत असल्याने ते कवी असावेत असे मला वाटले. कुंडली क्र. १ मध्ये तृतीयेश शुक्र पंचमात आहे तर कुंडली क्र.२ मध्ये तृतीयात शुक्र आहे. हे झाले प्रत्ययास आलेले अंदाज. दोघांचाही शिक्षणक्षेत्राशी संबंध आला असावा हे मला वाटले कारण शैक्षणिक स्थाने ४,९ मुळे. पहिल्या कुंडलीत चतुर्थेश नवमेश मंगळ दशमात आहे आणि असाच काहीसा योग दुसऱ्या कुंडलीत झाला आहे. येथे चतुर्थेश नवमेश शुक्र आहे जो नवम या विद्या स्थानाला पाहतो आहे. पहिल्या जातकाचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध आल्याचे काही त्यांनी सांगितले नाही पण दुसऱ्या कुंडलीचे जातक काही काळ प्राध्यापक होते. पहिल्या कुंडलीत कदाचित भावचालीतात मंगळ सरकला असावा. स्पष्ट भाव किंवा जन्मटिपण नसल्याने हे पाहता आले नाही.    

कुंडली क्र.१- लेखन क्षेत्रा बरोबरच ही व्यक्ती सरकारी अधिकारी किंवा राजकारणी असावी. अधिकार देणारा मंगळ दशमात आहे. नोकरीचे स्थान षष्ठात शासनाचा कारक रवि आहे तर षष्ठेश शनि षष्ठाला पाहतो आहे. यामुळे हे विधान केले. जातक सरकारी नोकरीत नाही पण अधिकार पदावर आहे, जातक एका स्टिल कंपनीत एक्पोर्ट मॅनेजर आहे. एक्पोर्ट मॅनेजर कारण षष्ठेश शनि व्ययात आहे. तृतीयातील राहू राजकारणी व्यक्तिमत्व घडवतो म्हणून तसा अंदाज केला पण तसे काही आजून तरी नाही. लेखन प्रामुख्याने क्रांतीकारी, सामरीक स्वरूपाचे असावे. तृतीयेश मंगळ असल्याने असे विधान केले. धार्मिक / अध्यात्मिक क्षेत्रात लेखन केले असण्याची शक्यता आहे. हेही विधान बरोबर आले आहे. एकतर नवमात केतू तृतीयेश शुक्राच्या नक्षत्रात व स्वामी मंगळाची शुक्रावर दृष्टी. न्युज मेडीयात सक्रीय असण्याचा संभव आहे किंवा चित्रपट क्षेत्रात. तृतीयेश बुध शुक्र युक्त असल्याने बातमी क्षेत्र तर तृतीयातील राहू शुक्राच्या राशीत व स्वामी शुक्र पंचमात असल्याने चित्रपट क्षेत्राचा अंदाज केला. हे अंदाज प्रत्ययास आले नाहीत.  

कुंडली क्र.-२ हि व्यक्ती सुद्धा लेखना सोबत नोकरीही करत असावी. षष्ठेश लग्नी व त्यावर शनिची दृष्टी यामुळे जातक नोकरी करत असावा असे वाटले. या प्रमाणे जातकाने काही काळ नोकरी केली आहे. पोष्टकर्ता म्हणतात त्या प्रमाणे हि कुंडली कवी मंगेश पाडगावकर यांची असल्याने त्यांच्यबद्दल अधिक काय सांगायचे? विपुल, चतुरस्त्र लेखन त्यांनी केले आहे. मुख्यत: काव्य, गीते लिहिली. कारण गुरु युक्त शुक्र तृतीयात. तृतीयेश पंचमात स्वनक्षत्रि. (दोन्ही कुंडल्यात तृतीयेश स्वनक्षत्रि आहे.) ही व्यक्ती भाषांतरकार / अनुवादक असावी. असे वाटले कारण हेच शुक्र गुरु युक्त. या प्रमाणे अनुवाद असलेली त्यांची दोन तीन पुस्तके आहेत. शोकांतिका, आत्मचरित्रकार स्वरूपाचे लेखन केले असावे. लग्नेश शनिची लग्न व चंद्रावर दृष्टी असल्याने असा कयास केला. आता त्यांचे विपुल साहित्य असल्याने असेलही एखादे दोन शोकांतिका किंवा शोककाव्य/गीत. अरे हो एक अतिशय लोकप्रिय उदाहरण तर नक्कीच देवू शकतो. दोनतीन पिढ्यांतील प्रेमविरही वीरांनी शून्यात डोळे लावून हे गीत ऐकले असेल ते म्हणजे ‘भातुकलीच्या खेळा मधले राजा आणिक राणी……….’

पुढील लेख:- आकांक्षा-जन्मवेळ संशोधन. 

    

 

शुक्रवार, १० मार्च, २०२३

जुळ्यांचे ग्रहयोग

 

||श्री||

मागील लेख :- चूक भूल देणे घेणे – १

जुळ्यांचे ग्रहयोग



ऐश्वर्या राय, चंद्रचूड सिंग, शाहरुख खान, प्रिया गील अभिनित ‘जोश’ या चित्रपटात जुळ्या भाऊ बहिणीची कथा आहे, ज्याचे पोस्टर वर दिले आहे. तसे तर जुळ्यांची कथा असलेले बरेच चित्रपट आहेत. मग याच चित्रपटाची आज आठवण येण्याचे कारण काय? आज आपण जुळ्या भावंडांची कुंडली अभ्यासणार आहोत. इतर चित्रपटात जुळे दाखवतांना एकतर दोघे भाऊ दाखवतात किंवा बहिणी. या चित्रपटात भाऊ बहिण जुळे दाखवले आहेत आणि आजचा विषय असलेले जुळे हे भाऊ बहिण आहेत म्हणून हा चित्रपट आठवला.

भाऊ - ११/१०/१९९०, सायं ७:३०, बहिण - ११/१०/१९९०, सायं ७:३५,  अक्षांश - २०°/३३'/३१" (उ) रेखांश - ७४°/३१'/१७" (पु)


दोघात ५ मिनिटांचे अंतर आहे. भावाच्या सप्तमाचा सब मंगळ तर बहिणीच्या सप्तमाचा सब गुरु आहे. भावाला बुध महादशा ०३/११/२०३० पर्यंत आहे तर बहिणीला बुध महादशा १३/१०/२०३० पर्यंत आहे. भावाला मंगळ अंतर्दशा ०२/०५/२०२३ पर्यंत आहे तर बहिणीला मंगळ अंतर्दशा ११/०४/२०२३ पर्यंत आहे. भावाला शुक्र विदशा १३/०१ ते १४/०३/२०२३ पर्यंत आहे तर बहिणीला शुक्र विदशा २३/१२/२०२२ ते २१/०२/२०२३ पर्यंत होती. महादशानाथ बुध सप्तमेश व कारक शुक्राच्या युतीत आहे. अंतर्दशानाथ मंगळ व्दितीयात कारक शुक्राच्या राशीत आहे. तर विदशानाथ शुक्र सप्तमेश आहे. 

महादशानाथ बुध फोर स्टेप प्रमाणे ७ चा कार्येश आहे. अंतर्दशानाथ मंगळ २,११ चा तर विदशानाथ शुक्र ७ चा कार्येश होतो आहे पण दुय्यम आहे. दोघाही भावंडांच्या कुंडलीत कार्येशत्व सारखेच आहे, त्यात बदल नाही. दशेत काही फरक आहे, पण घटनेच्या वेळी दोघांच्याही दशा विदशे पर्यंत सारख्या आहेत.

भावाचा विवाह वरील दशा काळात १६/०२/२०२३ रोजी ३३ व्या वर्षी झाला. बहिणीचा विवाह अजून झाला नाही. भावाचा विवाह झाला तो पण उशिराच झाला. पारंपारिक विवाह झाला आहे. व्यवहारातील कारणे काहीही असतील पण ज्योतिष दृष्ट्या काय कारणे आहेत ते पाहू. लग्न कुंडलीत काही फरक नाही. दोघांचेही बहुतांशी सारखेच योग आहेत. सप्तमेश व कारक शुक्र नीच अस्तंगत आहे. यात एक जमेची बाजू म्हणजे शुक्राचा नीचभंग बुध व गुरु कडून होत आहे. गुरु उच्चीचा असल्याने शुक्राचा नीचभंगाला बलवत्ता आहे. सप्तमेश त्याच्या व्ययात आहे. त्यावर शनीची नजर आहे. या बाबी दोघांच्याही कुंडलीत समान आहेत ज्या विवाह विरोध किंवा विलंबास कारण आहेत. शुक्राच्या बलवान नीचभंगामुळे विवाह झाला पण फक्त भावाचा झाला आहे बहिणीचा अजून नाही.

आता फरक पाहू. दोघांच्याही सप्तमात प्लुटो भावारंभा जवळ आहे. भावचलीत कुंडलीत तुम्ही पहाल तर बहिणीच्या कुंडलीत तो अधिक जवळ आहे. भावाची नवमांश कुंडली कन्यालग्नाची आहे. नवमांश लग्नेश बुध लग्न कुंडलीत उच्चीचा आहे. नवमांश सप्तमेश गुरु लग्न कुंडलीत उच्चीचा आहे. नवमांश लग्नेश बुध व कारक शुक्राचा नवमांश परिवर्तन योग आहे जो शुभ स्थानातून होत आहे. नवमांश लग्नेश नवमांशात भाग्यात आहे. तर बहिणीची नवमांश कुंडली तूळ लग्नाची आहे. येथेही नवमांश लग्नेश शुक्र नवमांशात भाग्यात आहे. पण नवमांश लग्नेश शुक्र लग्न कुंडलीत नीचभंगात आहे. नवमांश सप्तमेश मंगळ लग्न कुंडलीत शत्रूगृही आहे. कारक शुक्राचा येथे बुधाशी जो नवमांश परिवर्तन होत आहे त्यात अष्टमस्थान आले. नवमांश कुंडलीतही प्लुटो सप्तमात आहे. या मुळे भावाचा विवाह उशिरा का होईना झाला आहे पण बहिणीचा अजून रखडला आहे.

पुढील लेख:- सारस्वतांच्या कुंडल्या.

अभ्यास तर झाला. आता जरा विरुंगळा हि हवा ना? चला तर मग ज्या चित्रपटाची आपण आठवण केली त्यातीलच एक जरा हटके गाणे पाहू या. ‘क्या बोलती तू...’ प्रमाणेच हे हि गाण लोकप्रिय झाले होते. ‘अपुन बोला तू मेरी....’ सोबतच्या पोस्टरवर क्लिक करा तर मग.
 

रविवार, ५ मार्च, २०२३

चूक भूल देणे घेणे - १

 ||श्री||

मागील लेख:- परीक्षाकेंद्र बदलून मिळेल का?

चूक भूल देणे घेणे - १




मागच्या लेखात आपण एका घटनेवर विचार केला होता. खरे तर ती एक चाचणी होती जी एका ज्योतिष समुहात दिली होती. ती घटाना घडून गेली होती पण घटना काय घडली  ते न सांगता त्या संबंधी प्रश्न संबंधित ज्योतिषाला जेव्हा विचारला गेला तेवढीच माहिती देवून त्या वरून काय घडले असावे याचा अंदाज आपल्याला करायचा होता. आता ती चाचणी काय होती व मी त्यावर काय विचार केला ते आपणास वाचायचे असेल तर वरती जे ‘मागील लेख’ म्हणून लिहल आहे त्यावर क्लिक करून वाचता येईल. मी काढलेला निष्कर्ष चुकला आहे. चूक कुठे कुठे झाली यावर या लेखात विचार करणार आहे. प्रथम संबंधित ज्योतिषाने काय घडले ते सांगितले ते देतो. “सोमवारी (म्हणजे 20/02/2023 ला) या पालकांच्या हातात बोर्डाच संमती पत्रक पडले. परमीशन मीळाली.”

सुरवातीलाच कुंडलीची उपयोगिता तपासतांना मी चूक केली आहे. चंद्राचे कार्येशत्व तपासतांना प्रश्नलग्ना वरून तपासले आहे. जातकाने प्रश्न मुलाच्या बाबतीत विचाराला आहे. पुढे मी प्रश्नलग्ना वरून विचार न करता व्यक्ती सापेक्ष लग्ना वरून केला होता. उपयोगिता तपासतांना केला नाही हि एक चूक. चंद्र ३,४ चा कार्येश होतो आहे पण प्रश्नलग्ना नुसार. सापेक्ष लग्ना नुसार तो ३,४ चा कार्येश होत नाही.

‘चतुर्थाचा सब जर ४ चा बलवान कार्येश होत असेल तर जातकाला अपेक्षित केंद्र मिळेल पण जर तो ३,,१२ चा कार्येश होत असेल तर परीक्षा केंद्र बदलेलच राहील.’ स्वर्गीय गुरुवर्य श्री.कृष्णमूर्तींचा नियम मी नेमका उलटा वापरला. जातकाने प्रश्न ‘बदला’ बाबत विचारला होता. कुठून कुठे बदलून हवा होता या बाबत काही माहिती दिली नव्हती. मी असा विचार केला होता कि परिक्षाकेंद्र अधिवासा बाहेरचे मिळाले असावे व जातकाला ते स्थानीय हवे असावे. हा जास्तीचा विचारामुळे मी नियम असा वापरला होता. केंद्र बदलून मिळेल का? असा जातकाचा प्रश्न असल्याने ‘चतुर्थाचा सब ३,९,१२ चा कार्येश असेल तर केंद्र बदलून मिळेल.’ असा नियम वापरायला हवा होता, आणि या प्रमाणे चतुर्थाचा सब राहू ९,१२ चा कार्येश होता.

इच्छापूर्ती पाहतांना दोघांची पाहण्याची गरज नव्हती. प्रश्न जातकाने केला होता त्यामुळे त्याची इच्छापूर्ती झाली म्हणजेच मुलाचे काम झाले. अनावश्यक सखोलता हा दोष झाला. जातकाची इच्छापूर्ती होत होती, कारण प्रश्नलाभाचा सब गुरु प्रथमाचा कार्येश होता.

येथे सूक्ष्मदशाच फक्त विचारात घेणे बरोबर होते. सूक्ष्मदशानाथ शुक्र ९ चा कार्येश होता पण वर लिहिल्या प्रमाणे याचा उलट अर्थ मी घेतला. अभ्यास, वेगळा विचार या साठी अश्या चाचणीची आवश्यकता असते. येथे वेगळा विचार करता येतो कारण घटना घडून गेलेली असते. यातून अनुभव वाढतो. याचा फायदा प्रत्यक्ष जातकाचा प्रश्न सोडवतांना होतो. धन्यवाद.

पुढील लेख:- जुळ्यांचे ग्रहयोग