गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

काळवेळेचे गणित चुकते कसे ?- १/५.

||श्री||

काळवेळेचे गणित चुकते कसे ?

या विषयावरील अगोदरचे चार भाग वाचण्यासाठी कृपया पुढे दिलेल्या भागावर क्लिक करा.






पुढे चालू  भाग ५.....




      
           पारंपारिक ज्योतिषात बाधक, मारक स्थानांना जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व कृष्णमुर्ती पध्दतीतही आहेच. पारंपारिक मध्ये स्थानांपेक्षा त्यांच्या स्वामींना पुष्कळसे जास्त महत्व आहे. के.पी.मध्ये भावेश महत्वाचा कार्येश होईलच असे नाही. १,५,९(स्थिरराशी सोडून),११(चरराशी सोडून) हि स्थाने आयुष्य वर्धक असतात. लग्नाचा सब जर १,५,९,११ स्थानांचा कार्येश असेल तर दीर्घायुष्य (६६ च्या पुढे), तो जर २,७,६,८,१२ व बाधक स्थानांचा कार्येश असेल तर अल्पायुष्य (३३ वर्षा पर्यंत), किंवा वरील वर्धक व मारक दोन्हींचा कार्येश असेल तर मध्यायुष्य (३३ ते ६६) असेल.


आता विचाराधीन कुंडलीत काय येतेय बघुयात. नवमस्थान हे येथे बाधकस्थान आहे. लग्नाचा सब शनी १,५ व २,८,१२ म्हणजे तारक व मारक दोन्ही स्थानांचा कार्येश आहे त्यामुळे ३३ ते ६६ वयवर्षे हा मध्यायू आयुर्दाय यानुसार येतो. घडलेली घटना व सब ने दिलेला आयुर्दाय या वरून जन्मवेळ बरोबर असावी कारण गुरु आणि बुध दोघेही हाच आयुर्दाय देतात म्हणून “असावी” असे म्हणालो. सब शनी हा प्लुटो युतीत असल्याने व हि युती अष्टमात असल्याने आयुर्दाय मध्यायुच्या तोंडाशी येवून ठेपला. पण दशा गोचरचा सिग्नल मिळाल्या शिवाय घटना घडत नाही. त्यामुळे वरील कालखंडातील दशा प्रथम पाहू. 
        मध्यायू दरम्यान गुरु दशा शनी भुक्ती शुक्र विदशा ते बुध दशा बुध भुक्ती शनी विदशा होती. या दरम्यान गुरुदशा १२ वर्षे १० मास भोग्य होती, शनी दशा पूर्ण १९ वर्षे तर बुधदशा २ वर्षे २ मास भोग्य होती. गुरु २,९ शनी २,८,१२ व बुध २,८,१२ असे मारक कार्येशत्व आहे. यात मृत्यूस्थानाचे कार्येशत्व शनी व बुधा कडे आहे. म्हणजे कदाचित गुरु वगळला गेला असता. फोरस्टेप नुसार कार्येशत्व घेतले नाही तर गुरुही अष्टमाचा कार्येश होतो. मग चतुर्थस्थानाची मदत घेतली गेली असती. चतुर्थस्थान आयुर्दाय विचारात अंतकाळ दर्शवितो. शनी, बुध चतुर्थाचे कार्येश आहेत गुरुही होतो पण तो दृष्टी संबंधाने होत असल्याने शनी, बुध या बाबतीत बलवान ठरतात. तुम्ही म्हणाल सर्व भाव आलेच पाहिजे असे काही नाही. दशा अंतर्दशा विदशा साखळीत ते जुळवायचे असतात. बरोबर आहे तुमचे. आपण काळवेळेचे गणित चुकते कसे? या दृष्टीने तपासत आहोत म्हणून असे लिहित आहे. कल्पना करा समजा या विषयी विचारणा करण्यासाठी ज्यावेळी व्याधीचे निदान झाले त्यावेळी साधारणत: गुरु महादशा गुरु अंतर्दशेत जर कुणी ज्योतिषाकडे गेले असते किंवा त्यावेळी ग्रुपवर हा प्रश्न विचारला गेला असता तर, व जन्मकुंडली वरून भाकीत करायचे असते तर.... तर केवळ जो ग्रह जास्त मारक भाव दाखवतो त्याची दशा निवडली असती असे जरी केले नसते तरी गुरु बाहेर नक्कीच झाला असता. शनी आणि बुध पैकी निवड करतांना शनी प्रबळ ठरला असता. शनीच्या नक्षत्रात ग्रह नसल्याने तो ८ व १२ चा प्रथम दर्जाचा कार्येश आहे तर तो राहूच्या नक्षत्रात असल्याने ४ चा प्रथम दर्जाचा कार्येश आहे. म्हणजे शनी मोक्षत्रिकोणाचा प्रथम दर्जाचा कार्येश असल्याने व बुध मारक,बाधक भावांचा प्रथमदर्जाचा कार्येश होत नसल्याने शनी महादशेवर शिक्कामोर्तब झाला असता.



             जातकाचा मृत्यू गुरु दशा बुध भुक्ती शनी विदशेत झाला आहे. आता गुरु दशाच का? गुरूला गोचर सहाय्यक झाली असेल का कसे ते पुढे गोचरीत पाहूच. कुंडलीचे निरीक्षण काय सांगते? तर तिघांपैकी केवळ गुरूच बाधक स्थानाचा प्रथमदर्जाचा कार्येश होतो आहे कारण त्याच्या नक्षत्रात ग्रह नाही. शनीचा मारक दर्जा आपण बघितला. तरीही शनी अंतर्दशा मारक न ठरता बुध ठरली. आता गोचर बघायला हवे. त्या आधी ग्रहांचे गोचरी साठीचे फक्त मारक कार्येशत्व बघू. येथे आपल्या मदतीला शासकग्रह नाहीत. म्हणून हे करावे लागेल.
र – २,७,९                  चं – ६                   मं – 
बु –                                         गु – २,९                 शु – ६
श – २,४,८,१२               रा – २                   के – ९


गुरु मध्ये शनी भुक्ती ९/४/२०१४ ते २०/१०/२०१६ होती. या दरम्यान शनी विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा (१५/९/२०१६ ला ज्येष्ठा मध्ये) या नक्षत्रात होता. पैकी विशाखा व अनुराधाच आपल्या उपयोगाचे. २० जुलै २०१४ पर्यंत, १५ मार्च ते ३ ऑगष्ट २०१५, २६ मार्च ते १४ ऑगष्ट २०१६ शनी वक्री असल्याने बाद होईल. गुरु ९ डिसें.२०१४ ते ८ एप्रिल.२०१५, ९ जाने. ते १० मे २०१६ दरम्यान वक्री असल्याने हा काळ बाद होईल. आता शनी अंतर्दशेत तीन कालखंड मिळतात ज्यांचा आपल्याला विचार करावा लागेल.

१)    २१/७/२०१४ ते ८/१२/२०१४ यातील २१ जुलै ते २ सप्टें.२०१४ दरम्यान गुरु पुष्य नक्षत्रात होता म्हणजे मारक काळ होता. या दरम्यान शनी विदशा होती जी मारक होती.
२)     ४/८/२०१५ ते ८/१/२०१६ यातील ४/८ ते १३/९/२०१५ दरम्यान गुरु मघा मध्ये होता म्हणजे मारक नक्षत्रातून होता. ८/८ ते १३/९/२०१५ दरम्यान रवी विदशा होती. १६ ते ३० ऑगष्ट २०१५ दरम्यान रवी ही मघा नक्षत्रात होता. म्हणजे रवी विदशा मारक ठरू शकली असती. २७/११/२०१५ ते ८/१/२०१६ दरम्यान गुरु उत्तरा नक्षत्रात होता. हे ही मारक आहे. या दरम्यान चंद्र व मंगळ विदशा होती. दोघेही फक्त ६ या मारक भावाचे कार्येश आहे. या भावाचा विचार आजारपणासाठी होतो म्हणून हा काळ सोडता येईल. सोडलाच पाहिजे असे नाही.
३)    १५/८/२०१६ ते १४/९/२०१६ या दरम्यान गुरु उत्तरा नक्षत्रातच होता आणि त्याचीच विदशा होती. हा ही काळ मारक होता. 

             गुरु दशा शनी अंतर्दशेत मारक ठरू शकेल असा काळ होता तरीही वेळ आली नाही, आणि जेव्हा वेळ आली तेव्हा याच शनीची विदशा होती बुध अंतर्दशेत. गुरु बुधाच्या सब मध्ये असल्याने त्याने बुधा कडे व बुध शनीच्या सब मध्ये असल्याने त्याने शनी कडे कार्य सोपवले असे काही असेल का? असो त्या वेळेचे गोचर बघून कुंडलीचे परीक्षण थांबवू या. शनी मूळ नक्षत्रातून भ्रमण करत होता. केतू नवमाचा कार्येश आहे. गुरु विशाखा या स्वनक्षत्रात होता तो २,९ भाव कार्यन्वित करतो तर बुध हस्त या नक्षत्रात होता म्हणजे षष्ठ कार्यन्वित होता. गोचर शनी गुरुच्या (२,९) सब मध्ये तर गोचर गुरु शुक्राच्या (६) सब मध्ये होता. वरती आपण शनी भूक्तीत चंद्र, मंगळाची विदशा तो केवळ षष्ठ या मारक भावाचा कार्येश असल्याने सोडायचा विचार केला पण येथे तो आलाच. समजा प्रश्न विचारला गेला असता व शासक ग्रह घेतले गेले असते आणि ते गुरु,शनी,बुधच आले असते तरी दशेचा क्रम वरील शनी अंतर्दशेचा अनुभव पाहून हाच (गुरु-बुध-शनी) आला असता असे खात्रीने सांगू शकु?

              कृष्णमुर्ती पध्दतीत गोचरीत असा विचार केला जात नाही पण या कुंडलीच्या निरीक्षणात आलेली गोष्ट नमूद करतो इतकेच. ती अशी की शनी मारक ठरला पण त्याच्या अंतर्दशेत नाही, कारण त्याची अंतर्दशा होती तेव्हा गोचर शनी १ नोव्हे. २०१४ पासून भुक्ती संपे पर्यंत म्हणजे जवळपास दोन वर्षे वृश्चिकेत होता. शनी लग्न व अष्टम दोन्ही स्थानांचा सब आहे व कार्येशही. धनुत आल्यावर त्याची दृष्टी लग्न व आष्टम दोन्ही स्थानांवर आली इतर घटक अनुकूल होतेच. असो ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो हि प्रार्थना.




             लिहिता लिहिता पाच भाग झाले. आपण पोष्ट वाचल्या बद्दल  आपले आभार. ही पोस्ट करे पर्यंत तरी इथे ब्लॉग वर कमेंट आल्या नाहीत आपणही या कुंडलीचे निरीक्षण केले असेलच. आपल्या आभ्यासपूर्ण कमेंटची वाट पाहतोय. याच पध्दतीने अजून एक केस स्टडी करायचा मानस आहे, ह्याच विषयावर.





गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

काळवेळेचे गणित चुकते कसे?-१/४.

 || श्री ||

काळवेळेचे गणित चुकते कसे ?

भाग -४ 

आधीच्या तीन भागात आपण काही वेगवेगळ्या पध्दतीने एका कुंडलीच्या आयुर्दाया विषयी काय निष्कर्ष येतात ते पहिले. ते भाग वाचण्यासाठी खाली त्यावर क्लिक केल्यास पोस्ट वाचता येईल.




आता दशा तपासून पाहू. सामान्यत: मध्यायू योगात पाचवी महादशा मृत्युकारक असते असा समज आहे. पण केवळ पाचवी दशा म्हणून ती लगेच मारक ठरल्याचा अनुभव नाही. पाचवी दशा लग्नेश शनीची असल्याने तिचा विचार बाजूला ठेवू. लग्न दुर्बल असता, लग्नेश ६,८,१२ त राहू केतू युक्त असता, अष्टमेश बलवान असता लग्नेशाच्या दशेचा विचार करता येवू शकतो. अल्पमध्यायू (एप्रिल२०१५ ते एप्रिल २०२९) दरम्यान जातकाला गुरु महादशा शनी भुक्ती शुक्र विदशा ते शनी महादशा शनी भुक्ती केतू विदशा होती. शनी दशेचा विचार करून झाला आहे. आयुर्दायात दशा आली एवढया कारणा वरून ती मृत्यूदायक होत नाही. ती मारक, बाधक, त्रिषडायपतींशी संबंधित असेल तर फलदायक होते. ज्या दशेचा आपण विचार करतो आहोत तो गुरु नैसर्गिकरीत्या शुभत्वात श्रेष्ठ असून नैसर्गिक जीव कारक आहे. असे असतांनाही तो मृत्युदाता झाला, का? पराशरी नुसार व्दितीय स्थान हे सप्तमा पेक्षा प्रबळ मारक असते. हा मारकेश गुरु स्वत: त्रिषडायपतींपैकी असून त्रिषडायपती चंद्राशी अन्योन्यदृष्टी संबंध करतो आहे. या मुळे गुरु मृत्यूदाता ठरला.

         आता अंतर्दशा बघू. इथे शनी मृत्यूदायक का नाही ते आपण वरती पाहिले आहेच. घटने विषयी आपल्याला माहित आहे. अन्यथा इतरही अंतर्दशा आहेत ज्या मारक ठरू शकल्या असत्या, कदाचित त्यांची निवड आपण केली असती. अंतर्दशा निवडी विषयी उडुदाय प्रदीप मधील अंतर्दाशाध्यायातील एक श्लोक मार्गदर्शक आहे. 

  

अर्थ:- ज्या ग्रहांबरोबर दशानाथ संबंध करीत असेल किंवा जे ग्रह दशानाथासारखे समानधर्मी फळ देणारे असतील त्यांच्या अंतर्दशेमध्येच दशानाथ आपले फळ देतो. गुरु बरोबर चंद्र संबंध करतो आहे. रवी, मंगळ हे गुरु समानधर्मी म्हणता येतील कारण त्यांना मारकत्व आहे. असे असतांनाही गुरूने बुध अंतर्दशा निवडली. बुध गुरु हि समानधर्मी आहेतच. गोचरीचाही विचार व्हायचा अजून म्हणा. बुध अष्टमेश, खरेश आहे. बुध मारकेश रवी व मंगळा बरोबर सहावस्थान संबंध करतो आहे. या मुळे गुरूने बुधाची निवड केली असावी. या कुंडलीत सर्वात बलवान पापग्रह रवी आहे. समजा जर आगोदर विचार केलाच असता तर रवी अंतर्दशा निवडण्याची शक्यता अधिक होती.


गोचरीचा विचार करतांना आपल्याला काही उपग्रहांचा विचार करावा लागेल ते म्हणजे शनी पुत्र मांदी व गुलिक. मांदी- धनु ८/४२/५१, गुलिक- मकर ९/५०/३१ मृत्यू समयीचे गोचर कुंडली दिली आहे. शनी धनु राशीत होता. तो चंद्राच्या अष्टमातून भ्रमण करत असल्याने पनौती चालू होती. गोचर शनी व्ययेशाच्या नवमांशराशीतून तर अष्टमेश स्थीत राशीच्या त्रिकोणातून तसेच त्रीकस्थानेशांच्या बेरजेतून निर्माण होणाऱ्या बिंदू स्थित राशीतून भ्रमण करत होता. गुरुचे मला ज्ञात गोचर नियमा नुसार भ्रमण नाही. त्याचे लग्नेशस्थीत राशीतून व चंद्राच्या षष्ठातून भ्रमण होते. दुसरे अष्टमेशाच्या नवमांशरास व मांदीच्या नवमांश राशीच्या त्रिकोणातून गुरुचे भ्रमण होते. राहू केतू व्दितीय, व्दादशात असताही असा अनुभव येतो या नुसार केतू व्ययात आहे. रवी अष्टमातून गुलीकच्या त्रिकोणातून गोचर होता. गंडांतर काळात त्रीकस्थानातून पापग्रहाधीक्य भ्रमण धोक्याची घंटा समजावी.



येथे प्रश्न उपस्थित होऊ शकतो तो म्हणजे गोचर शनीची लग्नावर दृष्टी असतांनाही असे घडावे? (म्हणजे इथेही फसगत झाली असती. लग्नाच्या व्ययात शनी आल्यावर जन्मस्थ गुलिका वरून गोचर घेतले असते. या दरम्यान गुरुचे मांदी वरून भ्रमण असेल. म्हणजे गोचर जुळण्या सारखे होते.) एक योगायोग म्हणा हवे तर, शनीचे जन्मस्थ मांदी वरून भ्रमण होते, अगदी अंश कलात्मक. तपासल्यास दिसेल कि मृत्यू पूर्वी आदल्या दिवशी साधारण याच वेळे दरम्यान शनीचे  बरोबर मांदी वरून अधिक्रमण होते. मग एक दिवसाचा फरक? एक तर गोचर चंद्र मोक्ष त्रिकोणात यायचा होता व दुसरे म्हणजे सूक्ष्म गणितातील चूक असू शकते.
अष्टकवर्गा नुसार लग्नापासून शनी स्थित भावातील शुभ बिंदूंच्या बेरेजेला ७ ने गुणून २७ ने भागावे. बाकी इतक्या अश्विनी पासूनच्या नक्षत्रातून किंवा त्याच्या त्रिकोणातून रवी वा इतर पापग्रहांचे भ्रमण असलेल्या काळात मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते व आलेल्या भागाकार इतक्या वयात रोग,व्याधी होतात. या कुंडलीत बाकी ३ येते म्हणजे कृत्तिका नक्षत्र येईल. मृत्यू समयी त्याच्या नवमातून शनीचे भ्रमण होते पण भागाकार ६६ येतो उपलब्ध माहिती नुसार जातकाला व्याधी साधारण ३० च्या आसपास जडली. सर्वाष्टकात शनीला धनुत ३ बिंदू आहेत त्यामुळे शनीचे धनुतून भ्रमण कष्टप्रद असणार पण शनीला सर्वात कमी बिंदू मिथुनेत आहेत म्हणजे अजून साधारण १४ वर्षानंतर साडेसातीतील कालाचा विचार झाला असता. मृत्यू समयी रवी कन्येत तर मंगळ मकरेत होता दोघांना प्रत्येकी २ व ३ असे बिंदू म्हणजे कमीच होते हे खरे पण रविचे जरी सर्वाधिक कमी बिंदू असले तरी मंगळाचे सर्वाधिक कमी बिंदू १ मीनेत आहेत. शनी मिथुनेत, मंगळ मीनेत व रवि सिंह/कन्येत असे भ्रमण जुळत नाही. मृत्यू समयी तिघांचे कमी बिंदूतील राशीतून भ्रमण होतो एवढे एक झाले. 

आपण कुंडलीचा आयुष्य विचार काही पध्दतींनी केला. ग्रुप मध्ये कृष्णमुर्ती पध्दतीने विचार इतर सदस्यांकडून झालेला आहे पण तरीही इथे मी ब्लॉग वर लिहिण्याचा प्रयत्न करेल पुढील स्वतंत्र भागात, पण नक्की नाही. बघुया. धन्यवाद.