दिया जले जान जले
माझ्या समोर एक सत्तावीस वर्षाची तरुणी
बसली होती, मांडीवर दोन अडीच वर्षाचे मुल होते आणि माझे
मन मात्र ८०,७० च्या दशकाच्याही मागे गेले. मनचक्षु पुढे
त्या काळाच्या हिंदी मराठी कथानकातील नायिका होती. इतिहासात जमा झालेला वाटण्या
सारखा भूतकाळ वास्तवात माझ्या समोर होता. डोळ्या समोर ब्लॅक व्हाईट होण्या सारख
होते काय?
या तरुणीचा चार एक वर्षा पूर्वी
पारंपारिक विवाह झाला. विवाहा नंतर एकदोन महिन्यातच नवऱ्याचा खरा स्वभाव कळाला.
व्यसन, अरेरावी, हिला
तूच्छ लेखणे, हिच्या भावनांना किंमत न देणे. कधी हात उचलणे
इ. लाडात वाढलेला म्हणून दुर्लक्ष केले. रिती प्रमाणे मोठ्यांनी दोघांनाही समुजन
सांगितले. पण हे काहीच वाटणार नाही असे पुढे झाले. त्याने संतती साठीही घाई केली.
संतती झाल्यावर तर हिच्यावर आभाळच
कोसळले. अगदी निर्लज्जपणे त्याने कबुली दिली. त्याचे विवाहापूर्वी पासून
प्रेमसंबंध होते. "मी घरच्यांसाठी तुझ्याशी लग्न केले, त्याना नातवंड हवे होते. झाले आता." आता
हिला गुरा सारखा बडवायला लागला. हिच्या घरच्यांनी घटस्फोट चा विषय काढला. हि तयार
नाही व तो हि घटस्फोट द्यायला तयार नाही. अस्या परिस्थितीतही तिने मला जो प्रश्न
विचारला त्यामुळे मी भूतकाळात गेलो.
"काका माझ्या पतीचे विवाहबाह्य
संबंध केव्हा संपेल?"
प्रश्नकाल :- २१/४/२०१५, २१:१८:११, स्थळ
- नाशिक (७३/४८ पूर्व, २०/०२ उत्तर)
प्रश्नकुंडली असल्याने आपल्या
ग्रुपच्या रिती प्रमाणे गोपनियतेचा भंग होत नाही. मी दिलेले उत्तर बरोबर निघाले.
जातकाचे अजून काही या संबंधीत उपप्रश्न होते. त्यांचीहि उत्तरे बरोबर आलीत. पण
ग्रुपवर त्याची चर्चा योग्य नाही म्हणून देत नाही. एक उपप्रश्न देण्यासारखा आहे तो
म्हणजे सवत येईल का ? महिना अखेरी २८ आक्टों. ला माझे
विश्लेषण देईल. तो पर्यंत आपापल्या पद्धतीने विश्लेषणा सहित निष्कर्ष काढावेत.
प्रश्नकर्ती जातकाच्या पतीचे जातकाशी विवाह
होण्यापूर्वी पासून त्याचे एक प्रेमप्रकरण होते. प्रश्न जरी जातकाच्या वैवाहिक आयुष्या
संबंधात असला तरी जातकाने प्रश्न विचारतांना पतीचे प्रेमप्रकरण अस्या
शब्दात विचारला असल्याने व निदान त्या वेळी तरी जातकाचा कल विवाह संबंध संपुष्टात
आणन्या बाबत वाटला नाही म्हणून सप्तमस्थान लग्नी घेतले. अजून एक कारण असे कि उत्तर
पतीच्या प्रेमप्रकरणा बाबत द्यायचे होते. या केस बाबत मी ती त्या वेळी कशी सोडवली
होती ते व्यवस्थित लिहून ठेवले होते ते जसेच्या तसे त्यातील काही उपप्रश्न जाहीर
रीत्या चर्चा करण्या सारखे मला न वाटल्याने वगळून देत आहे. त्या वेळी हि केस मी
फोरस्टेपने बघितली होती. त्या वेळी प्रश्नकुंडलीचा आवाका सहा महिने / वर्ष इतकाच हा
विचार मी इतका काटेकोर पणे करत नसे.
सदर जातकाचे कुटुंबीय हे नित्य भेटीगाठीतले
असल्याने या बाबत काय झाले हे मला कळणार याची खात्री असल्याने मी टिपण ठेवले होते.
१३ कि १४ अक्टो.२०१८ ला ते मला म्हणाले कि सासरची मंडळी आज आली व आता ते गाव सोडून
शहरात आले असून तो शहरात नोकरीला लागला आहे. गावाकडे किडूकमाडूक सुद्धा ठेवले
नाही. मुलीला पाठवावे असे सासरच्यांचे म्हणणे आहे. मुलीचीही तयारी आहे. या वरून प्रकरण मिटवून ते स्थलांतरीत झाल्याचे दिसते. म्हणून
मी फाईल काढून पाहिली असता माझे अनुमान बरोबर आल्याचे दिसले. असो त्या वेळी ज्या
पद्धतीने, जसा विचार केला ते पुढे देत आहे.
सप्तमस्थान लग्नी घेतले आहे. प्रेम
प्रकरण संपुष्टात येण्यासाठी ४,६,९,१०,१२ या भावांचा विचार करावा लागेल. नवमभाव
मानहानी, अपकीर्ती दर्शविते. प्रथम प्रेमप्रकरण थांबेल का? सवत येईल का? या
प्रश्नाचा विचार करू. पंचमाचा सब ६/१२ भावांचा कार्येश असेल आणि बुधाशी संबंधित असल्यास
प्रेमप्रकरण असफल होते. येथे पंचमाचा सब शनी बुधाशी संबंधित नाही पण शनी प्रेमात
अपयश देणारा ग्रह आहे. मुळात तो वक्री असल्याने (स्वनक्षत्री आहे) प्रेमभंग
दाखवतो. शनी ६,९,१० चा कार्येश आहे. सप्तमाचा सब ५,९ चा कार्येश असून पंचमाचा सब
२,७,१० चा कार्येश असेल तर प्रेमाचे रुपांतर विवाहात होते. येथे सप्तमाचा सब शुक्र
मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून ९ चा कार्येश आहे पण पंचमाचा सब शनी प्रतिकूल आहे
हे आपण बघितले आहे. शिवाय शुक्र शनी दोघेही स्थिर राशीत आहेत त्या मुळे सवत
येणार नाही.
चंद्र १२ चा कार्येश असल्याने पती काढता पाय
घेईल. बुध ४,१२ चा कार्येश असल्याने गुरु अंतर न घेता बुध अंतरा घेवू. छायाग्रह
राहू ४,६,९,१०,१२ चा कार्येश असल्याने त्याची विदशा घेवू. १९/१०/२०१७ ते ४/१/२०१८ दरम्यान प्रकरण संपुष्टात येईल. प्रश्नलग्न स्थिर
असल्याने व रुलिंग मध्ये बुध असल्याने अजून एक कालावधी काढू. मंगल दशा राहू भुक्ती
बुध विदशा १७/१/२०२२ ते १३/३/२०२२ चा कालावधी येईल.
म्हणजे ६ वर्ष १० महिन्यांनी प्रकरण थांबलेले असेल.






