||श्री||
मागील लेख :- बघ माझी आठवण येते का? भाग-१.
बघ माझी आठवण येते का? भाग- २
“जा सिमरन जी ले अपनी जिंदगी|” अस म्हणणारा प्रियेशीचा बाप सगळ्यांच्याच नशिबी नसतो. केवळ एका व्यक्ती मुळे दोन प्रेमी जीवांची कायमची ताटातुट झाली.
शशीच्या या विचारांमुळे म्हणा किंवा नशीब म्हणा पण पुन्हा एकदा जातकाचा हिरमोड झाला. प्रेमाच्या विफलते नंतर साधारण १० महिन्यांनी म्हणजे २२/०१/२०२३ च्या आसपास ३३ व्या वर्षी शशीचा विवाह ठरला, ज्याचा उल्लेख वरती केला आहे. या वेळी शनि म.द. चंद्र भुक्ती शुक्र विदशा ११/१२/२०२२ ते १७/०३/२०२३ दरम्यान होती. यांचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच, मिश्र कार्येशत्व आहे. त्यामुळे ज्या दिशेने प्रयत्न झाले तसे फळ मिळाले. (अजून सुक्ष्म पहायचे असेल तर राहू सुक्ष्मदशा १४ ते २९ जाने. दरम्यान होती.) १२/०६/२०२३ हा शनि म.द. मंगळ अ.द. राहू विदाशेतील (९ मे ते ९ जुलै २०२३) मुहूर्त ठरला. मंगळाचे हि ४,५,८,१०,११ असे मिश्र कार्येशत्व आहे, तसेच राहूचे १,२,५,६,१०,११. मुहूर्त गाठण्या अगोदरच विघ्न आले.
याच राहुच्या विदशेत २२ मे ला शशीच्या वधूचा त्याला फोन आला कि “तू वेगळे घर घे, आपण स्वतंत्र राहू नाहीतर मी एका वर्षात घटस्फोट घेईल.” अरे हे काय वागण झाले? पसंती देण्या आगोदर तुम्ही एकमेकांना भेटला होतात तेव्हाच हे का बोलली नाही कि मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. विवाह ठरवून गोष्टी इतक्या पुढे गेल्यावर हि मुलगी असे बोलते आहे. अजून लग्नघटीपात्र भरले नाही तोच घटस्फोटाच्या धमक्या? लग्नाला होकार देण्यापूर्वी भेटीत तू तुझ्या आपेक्षा का सांगितल्या नाहीत कि या मुलीला दुसरे एखादे उजवे स्थळ आले ज्याचा हिला लोभ सुटला. २७/२८ मे ला बैठक होऊन या वर पडदा पडला खरा व ठरल्या प्रमाणे विवाह पार पाडायचे ठरले पण परत एकदा अपमान नाट्याने डोके वर काढले.
या वेळीही वधूचे पिताच कारणीभूत झाले. २
जूनला विवाहविधी विषयी विहिणी विहिणीचे फोन वर बोलणे चालू असतांना होणारे सासरे
काही तरी अपमानजनक बोलून गेले आणि ३ जून ला जातकाने शेवटी ९ दिवसांवर आलेला विवाह एकदाचा
मोडला. दशानाथांचे मिश्र कार्येशत्व दोन्ही अनुभवाला आले. प्रयत्न अनुकूलते साठी
असतांना विरोधी कार्येशत्व कार्यरत कसे झाले? याला कारण जातकाच्या मनात असलेली
वासना, विकृती तर कारणीभूत नाही झाली? शशीला आता असे वाटते कि माझे प्रेम मला परत
मिळणार असावे म्हणून नियतीने हा विवाह मोडला. तिचा संसार कसा चालू आहे? तिला काही
मुलबाळ आहे का? याविषयी शशीला काहीच माहित नाही असे तो म्हणत होता. ज्युलीच्या
लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. त्या वेळी बाकी सर्व पाठींबा देत असतांना एका
व्यक्तीचा विरोध मोडून विवाह करू शकले नाही. ती त्या वेळी दोन्ही कुटुंबाचा
पाठींबा असतांना वडिलांचा दबाव, दहशतीवर मात करू शकली नाही आणि आता जातक हि
अभिलाषा बाळगतो आहे कि ती माझ्या जीवनात परत येईल. तिचा घटस्फोट वगैरे होण्याची
काही शक्यता आहे का? हे अनैतिक आहे. यात काहीच दोष नसलेला तिचा पती, जर संतती असेल
तर ती यांची होरपळ का करायची? तिच्या वैवाहिक जीवनात काही समस्या यावी आणि तिने
माझ्या कडे परत यावे किंवा विवाहबाह्य संबंध ठेवावे अशी कल्पना देखील करणे हे
निर्मळ प्रेमाचे लक्षण खचित नाही. टिव्ह, ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म वरील मालिकांचा
प्रभाव हा. विफल प्रेमाचे दु:ख स्वत: श्रीकृष्णांनी देखील पचवले ना? श्रीराधेच्या
विवाहा नंतर ते फिरून तिच्या जीवनात गेले नाही कि न तिचे अकल्याण चिंतिले.
काही वर्षांपूर्वी ‘गारवा’ नावाचा मराठी कविता अधिक गाण्यांचा एक अल्बम खूप लोकप्रिय झाला होता. त्यातील एक गाणे या स्थितीवर चपलख बसते. सोबत त्याची लिंक देवून विराम घेतो.
पुढील लेख:- लाटेवर स्वार कि लाटेवर मात?



