सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

राष्ट्रशल्य


राष्ट्रशल्य


गुरुवारी १४/२/२०१९ दु.३:३७ ला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर भ्याड हल्ला केला. सर्व देशात संतापाची लाट उसळली. नेहमी प्रमाणे घटना घडल्यावर काही जन ज्योतिषांनी आधी भाकीत का केले नाही हे विचारू लागली. त्यावर चर्चा घडू लागल्या. पहिले गोष्ट म्हणजे वैयक्तिक ज्योतिष आणि सामुहिक ज्योतिष या स्वतंत्र शाखा आहेत हे लक्षात घ्यावे. त्याचे नियम वेगळे आहेत. सर्वांचा त्याचा अभ्यास असतोच असे नाही, आणि मुळात शास्त्राच्याही मर्यादा आहेत.


स्वतंत्र भारताची रास कर्क येते तर काही मेदनिय ज्योतिष तज्ञांच्या मते ती मकर आहे. माझा विचार असा आहे कि कर्क हि रास भारताच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण जी पाच वृत्ते आहेत त्यापैकी कर्क हे वृत्त भारतातून जाते. हे मलाही मान्य आहे की ब्रिटीश अधीपत्यातून मुक्त होण्यापूर्वीही भारत अस्तित्वात होता. भारत अभिजात आहे, पाकिस्ताना प्रमाणे तो नवजात नाही. त्या दृष्टीने मी म्हणत नाही तर कर्करेखे मुळे मला त्याचे महत्व वाटते. भारता साठी डोंगलाचे महत्व या साठी हि आहे. पद्मश्री डॉ. व्ही. एस. वाकणकर यांनी तर या आधारे शून्य रेखांश ग्रीनविच न मानता डोंगला मानावे असे सुचीत केले आहे. प्राचीन काळी हाच बिंदू उज्जैन (२३ ११’) येथे होता. आता तो सरकून डोंगला(२३३०’) मध्ये गेला आहे. म्हणून भारता साठी दोघांचाही (कर्क, मकर) विचार मेदनियेत व्हावा असे वाटते.

मंगळ हर्शल युतीचा हा दाहक परिणाम असे जवळ जवळ बहुतांशी ज्योतिषी म्हणातात. त्यात खोलात जावून साधारण दर दीड वर्षांनी हि युती होते मग आताच एवढी मोठी घटना का तर त्यांची समक्रांती असा महत्वाचा मुद्दा पुढे आला. त्याच बरोबर प्लुटो सहवासातील शनी शुक्र युती हि विचारात घ्यावी असे सुचवले गेले. या तीघातही समक्रांती योग आहे. या बरोबरच आजून मेदनिय मध्ये महत्व देण्यासारखे म्हणजे चेष्टाबलातील एक बल ‘ग्रहयुद्ध’. शनी शुक्रा मध्ये असे ग्रहयुद्ध सध्या आहे. शुक्र यात असल्याने ग्रहयुद्धात जय पराजयाचे जे नियम आहेत त्याला त्याच्या तेजस्विते मुळे शुक्र अपवाद ठरतो व तो नेहमी जयी ठरतो. यामुळे अर्थातच शनी पराजयी झाला. याचा फायदा हर्शल मंगळ युतीला झाला. कर्क रेखा काही फक्त भारतातूनच जात नाही ति ज्या ज्या देशातून जाते तिथे अशी फालीते न मिळता फक्त भारतातच अशी घटना का? असा प्रश्न उपस्थित केला जावू शकतो. त्याचा संबंध मी या ग्रहयुद्धाशी लावतो आहे.

मंगळ हर्शल युती मेषेत झाल्याने त्याची दृष्टी कर्केवर येते. त्या मुळे कर्कवृत्ता वरील देश त्याच्या टप्प्यात आले. कर्केचा स्वामी चंद्र मेदनियेत लोकमताचा कारक त्यामुळे लोकशाही देशावर त्याचा विघातक परिणाम जास्त संभवतो. आता हे ग्रहयुद्ध झाले कर्केच्या षष्ठात म्हणजे ज्यावरून संरक्षण क्षेत्राचा विचार होतो त्यात. त्याचा स्वामी गुरु स्वस्थानाच्या व्ययात मंगळाच्या अष्टम या घातक मारक दृष्टीत त्यामुळे संरक्षणक्षेत्राचे हे असे मोठे नुकसान झाले. मकर राशीच्या व्ययात हे ग्रहयुद्ध झाले आहे. मकरेचा स्वामी शनी पराजयी असल्याने हे रोखण्यात अपयश आले. पण मग ज्या संदर्भात हि घटना झाली त्या स्थानाचा संबंध मकर रास नुसार येत नाही. हा सर्व विचार करत असतांना असे सुचले कि ज्या प्रमाणे जातकात लग्न व रास असा दोन्हीचा विचार होतो तसे मेदनियेतही करावे का? म्हणजे भारताचे कर्क लग्न मकर रास घेवून?  

हुतात्म्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून लेखणीला विराम देतो.