|| श्री ||
पितृपक्ष – २०१९
नमस्कार, उद्या दि. १४/९/२०१९ शनिवार पासून सुरु
होणाऱ्या पितृपक्ष (महालय) नाशिक येथील श्राध्द तिथी व श्राध्द काळ देत आहे.
जमल्यास इतर काही गावांचेही देण्याचा प्रयत्न करेल.
प्रतिपदा (पहिली तिथी) – १४/९/२०१९ शनिवार – दु १:४४
ते ४:०९
व्दितीया (दुसरी तिथी) – १५/९/२०१९ रविवार – दु.१:४३
ते ४:०८
१६/९/२०१९ सोमवार – दु १:४३
ते २:३६
श्राद्धासाठी तिथी ज्या दिवसी अपराण्ह काळी जास्त
मानाने असेल तेव्हा घेतली जाते. पण जर एकाच तिथीला अधिक जणांचे श्राध्द येत असेल
तर एकाच कर्त्याने दोन पेक्षा अधिक जनांचे श्राध्द करू नये. व्दितीया आणि तृतीया
तिथी दोन दिवस आली आहे. या तिथीला उर्वरित दोन जनांचे (व्दितीया/तृतीया) श्राध्द
घालता येईल.
तृतीया (तिसरी तिथी) – १६/९/२०१९ सोमवार – दु. २:३६
ते ४:०८
१७/९/२०१९ मंगळवार – दु. १:४२
ते ४:०७
चतुर्थी (चवथी तिथी) – १८/९/२०१९ बुधवार – दु. १:४२
ते ४:०६
भरणी श्राध्द – या वर्षी भरणी श्राध्द १८/९/२०१९
बुधवार रोजी आहे. ज्यांच्या घरात एखाद्या मृत व्यक्तीचे वर्षश्राध्द झाले असून
वर्षंश्राद्धा नंतरचे हे पहिलेच पक्षश्राध्द असेल अस्या मृत व्यक्तीचे पक्षश्राध्द
हे तिथीने न करता या दिवशी करावे.
पंचमी (पाचवी तिथी) – १९/९/२०१९ गुरुवार – दु.१:४१
ते ४:०६
अविवाहितांचे श्राध्द – विवाह न होताच मृत
झालेल्या (स्त्री/पुरुष) व्यक्तीचे पक्षश्राध्द ती कोणत्याही तिथीला मृत झालेली
असली तरी त्याचे श्राध्द पितृपक्षात पंचमीला केले जाते.
षष्टी (सहावी तिथी) – २०/९/२०१९ शुक्रवार – दु.१:४१
ते ४:०५
सप्तमी (सातवी तिथी) -२१/९/२०१९ शनिवार – दु. १:४०
ते ४:०४
अष्टमी (आठवी तिथी) – २२/९/२०१ रविवार – दु. १:४०
ते ४:०३
नवमी (नववी तिथी) – २३/९/२०१९ सोमवार – दु. १:४०
ते ४:०३
अविधवा नवमी – ज्या स्त्रिया सवाष्ण म्हणजे
पतीच्या अगोदर मृत झाल्या त्या कोणत्याही तिथीला मृत झाल्या असल्या तरी त्यांचे श्राध्द
पितृपक्षात नवमीला केले जाते. श्राद्धाला सवाष्ण स्त्रीला (सुवासिनी) भोजन दिले
जाते. यात एक मत असे आहे कि सवाष्ण मृत स्त्रीचे श्राध्द नवमीला तो पर्यंतच घालावे
जो पर्यंत तिचा पती जिवंत आहे. पतीच्या मृत्यू नंतर तिच्या तिथीला किंवा पतीच्या
तिथीला दोघांचेही श्राद्ध घालावे.
दशमी (दहावी तिथी) – २४/९/२०१९ मंगळवार – दु. १:३९
ते ४:०२
एकादशी (आकरावी तिथी) – २५/९/२०१९ बुधवार – दु. १:३९
ते २:०९
व्दादशी (बारावी तिथी) – २५/९/२०१९ बुधवार – दु.
२:०९ ते ४:०१
त्रयोदशी (तेरावी तिथी) – २६/९/२०१९ गुरुवार – दु.
१:३८ ते ४:०१
बाळभोळानी तेरस – लहान मुल कोणत्याही तिथीला मृत
झाले असल्यास त्याचे श्राध्द पितृपक्षात त्रयोदशीला घालावे. यात ब्राम्हण भोजन न
देता काकबली (कावळ्यांना घास) दिला जातो. या तिथीला किती वया पर्यंतचे मुलाचे
श्राध्द घालावे या विषयी संशोधन करावे लागेल. पण मला वाटते साधारण ११ वर्षा पर्यंत
धरावे.
चतुर्दशी (चौदावी तिथी) – २७/९/२०१९ शुक्रवार –
दु. १:३८ ते ४:००
घातचतुर्दशी – अपघातात मृत झालेले, शस्त्राने
मृत झालेले (युद्ध, खून इ.) यांचे श्राध्द पितृपक्षात चतुर्दशीला घातले जाते.
सर्वपित्री – २८/९/२०१९ शनिवार – १:३७ ते ३:५९



