|| श्री ||
स्कीझोफ्रेनिया आणि कुंडली भाग-१.
मागील लेख :- कोविड उपचार केंद्र सुरु होईल का?
प्रसाद
कुलकर्णी, २७/११/२०२०, ७:३१ AM वाजता·
Shezophreniya
मानसिक
आजर दिवसेंदिवस पसरत आहे या मध्ये व्यक्तीला भास होणे /कानात आवाज ऐकू येणे इत्यादी
गोष्टी दिसून येतात.
आजारासाठी पत्रिकेत कोणते योग असू शकतात.
शास्त्रात
हा आजार controll करण्यासाठी
काय उपाय असतात का?
१)Vikas Kulkarni:- mazya bhavachi patrika
pathu ka. Tyala 1978
pasun tras aahe.
Yogesh Daithankar हा जुळ्या पैकी एक आहे. जन्मतारीख ११_१२june १९६१ मध्यरात्री उजाडता सोमवार १२:४५ जन्म वेळ. जन्म स्थळ म्हसवड. रास वृषभ लग्न कुंभ. मानसिक रुग्ण या मध्ये चिडणे सगळ्या घराला त्रास देणे टीव्ही फोडणे. कपडे कागद पत्रे जाळणे. Smoking. सतत लक्ष वेधून घेण्यासाठी घरातल्यांना त्रास देणे.
è वरील जन्मटिपणानुसार म्हसवड, ता-दहीवाडी, जी-सातारा (स्थानांश-17°38'17.0"N 74°47'06.2"E), लाहिरी अयनांश २३/१८/१२ घेवून कुंभ
लग्न २८/२३/२४ वर येते. जुळ्या भावंडापैकी एकाची असल्याने दोघांचीही कुंडली नजरे
खाली असावी. एका कमेंट मध्ये श्री.विकास कुलकर्णी यांनी दुसऱ्या जुळ्या भावंडाचे
मीन लग्न असल्याचे म्हटले आहे. जुळ्या मधील लहानाचे मीन लग्न येण्या साठी कमीत कमी
दोघात ६ मी. अंतर हवे. (आत्ताच त्यांनी कमेंट करून जुळ्यातील लहाण्याची जन्मवेळ १:३०
सांगितली आहे.) जुळ्या भावंडांचा षष्ठांशकुंडली वरून विचार केला जातो. पण येथे
मुळात दोघांचे जन्मलग्न वेगळे आल्याने. प्रथम त्यावर नजर टाकतो. त्या अगोदर श्री.प्रसादजींच्या पोष्ट वर
माझे मांडलेले मत डकवतो.
श्री.प्रसाद कुलकर्णी
जी
आपल्या कडे हा विषय
अतिंद्रिय शक्तींशी जोडला गेला आहे. याला आपण आजार समजत नाही. त्यामुळे पुरातन
कुंडली शास्त्रात या वर चर्चा असेल असे वाटत नाही.
अघोरी विद्या/ स्मशान
विद्या यात याची चर्चा दिमून येते. कर्ण पिशाच वश करून त्याच्या कडून एखादया
व्यक्तीची इतंभूत माहिती घेणे या भविष्य प्रकाराच्या रसाळ कथा पसरलेल्या दिसतात.
हि साधना करतांना अर्धवट माहिती आधारे किंवा काही चुक झाल्याने किंवा कालांतराने
वयोमानाने किंवा इतर कारणाने साधकाची शक्ती हीन झाल्यावर हे कर्ण पिशाच त्याच्या
कानात निरंतर बडबड करत राहते जे सहन न होऊन साधक मनोरूग्न होतो. साधारण अस्या
आशयाची चर्चा रंगत असते. आता या गोष्टी अंधश्रद्धेत गणल्या जातात .
हा आजार धरून जर कुंडलीत
विश्लेषण करायचे असेल तर मला वाटते राहूचI विचार सर्व प्रथम
व्हावा. भास याचे कारकत्व राहू कडे जाते. मानसिक विकार असल्याने अर्थातच चंद्र
आला. षष्ट, अष्टम स्थान संबंध, त्याच बरोबर गुढत्वाचा
दुसरा कारक नेपच्यून यात आलाच. अधुनिक शास्त्राच्या दृष्टीने मेंदूतील केमीकल
लोच्या मुळे हे घडते त्यामुळे प्रथम स्थान व मंगळ विचारत घ्यावेत.
वरिल ग्रहयोगाचे ग्रंथ
संदर्भ नाहीत कारण विचाराअंती तर्काने जे सुचले ते मांडले आहे. असो अशी एखादी केस
आहे का ? असेल तर डिटेल्स द्या. तपासून पाहू.
शुभरात्र
स्कीझोफ्रेनिया उतारवयात
होत असला तरी या आजाराची सुरवात वयाच्या तिशीत होते असे निरीक्षण आहे. जातकास हा अजार
तर १९७८ पासून म्हणजे १७ व्या वर्षा पासूनच आहे. राहू महादशा,भूक्तीत गुरु विदशेत १६/४/१९७८
ते २६/०८/१९७८ दरम्यान झाला असावा असा कयास आहे. या कालावधीत किंवा याच्या आसपास
एखाद्या कौटुंबिक घटनेच्या आघाताने असे झाले असावे असे वाटते. श्री.विकास
कुलकर्णीं या वर टिपण्णी करतीलच. जमल्यास दुसऱ्या भागात सौ.पल्लवी देशमुख अय्यर
यांनी दिलेल्या जन्मटिपणावर परीक्षण करायचा विचार आहे. बघू कसे जमते ते. धन्यवाद.🙏
पुढील लेख लवकरच......



