||श्री||
जन्मवेळ शुद्धीचा गुंता. भाग - २
पारंपारिक मध्ये जन्मवेळ १६ मार्गांनी शुद्ध करता
येते असे म्हणतात ते सर्वच मला ज्ञात नाहीत. शनीपुत्र गुलिक,मांदी या वरून लग्न
शुद्धी केली जाते. सर्वच राशींचा उदयकाळ सारखा नाही तथापि मध्यमकाल २ तास घेतला
जातो. ज्या वेळी लग्न कोणते हा संभ्रम असेल त्या वेळी हि पद्धत चांगली आहे.
कृष्णमुर्ती प्रमाणे हि दैवाधारीत नाही तर गणिताधारीत आहे त्यामुळे यातून येणारा
निष्कर्ष सर्वांचा एकच येतो. (या बाबतीत पारंपारिक एकमत देते जे कृष्णमुर्तीत
नाही) इथेही मतभेद आहेत ते गणितातील मानका
बाबत. या वर स्वतंत्र पोष्ट लिहावी लागेल. तूर्त मी दिनाष्टांश पद्धतीने अष्टमभागारंभ
घेत मांदी वरून शुद्धी करत आहे. मांदी हा सूर्योदय ते सूर्योदय एकाच भावात स्थिर
असतो. लग्न अगर नवमांश लग्न यांच्या त्रिकोणात मांदी हवा असा
नियम आहे (फलदिपिका).
नवमांश लग्नाचाही विचार करता येणार असल्याने बरे नाहीतर मांदी स्थित राशीसह
केवळ तीन राशीच जन्मकालस मिळाल्या असत्या. नवमांशलग्नाच्या
त्रिकोणात मुळे प्रत्येक राशीचे मध्यमराशिउद्यमाना नुसार १३ मी.२० सेकंदाचे तीन
भाग म्हणजे एकंदर ४० मी. जन्मकाला साठी उपलब्ध होतात.
घेतलेल्या उदाहरणात मांदी धनुत ५ अंश ३८ कला २३
विकला आहे. मांदी च्या त्रिकोणात मेष, सिंह धनु या राशी येतात. जातकाने जो काळ
सांगितला आहे तो वृषभ लग्नात येतो व मांदी त्याच्या त्रिकोणात येत नाही. त्या मुळे
मेष जन्मलग्न घ्यावे लागेल. कृष्णमुर्ती मध्ये शासक ग्रहाने होणारा मतभेद,
अनिश्चितता इथे नाही. मेष लग्न उक्तदिनी पहाटे ३:१२ ते ४:५४ दरम्यान होते. आता असा
नवमांश घ्यावा लागेल जो जातकाने सांगितलेल्या वेळेच्या जवळ असेल म्हणजे धनु नवमांश
घ्यावा लागेल. धनु नवमांश ४:४२ ते ४:५४ दरम्यान (१२ मी.) होता. आता मी घेतलेल्या
मांदी मानका प्रमाणे कुणाही ज्योतिषाने कधीही या जातकाचे जन्मकाळ संशोधन केले तर यात बदल होईल
का? मानक तेच ठेवून कृष्णमुर्ती पद्धतीत असा ठामपणा आहे का?
यात अजून सूक्ष्म जाता येईल का? बघुया, पारंपारिक
मधली दुसरी एक पद्धत ‘जन्मलग्नाच्या लाभातील राशी खवेदांश
लग्न हवे.’ आपण मेष जन्मलग्न निश्चित केले आहे. मेषेत असे तीन खवेदांश मिळतात.
७/३० ते ८/१५, १६/३० ते १७/१५, २५/३० ते २६/१५. जातकाने सांगितलेल्या काळाच्या
जवळचा तिसरा खवेदांश येईल जो पहाटे ४:३७:४५ ते ४:४०:२६ दरम्यान (२मी.४१से.) होता. आता
कुणीही कधीही या प्रमाणे संशोधन केले तर वेळ बदलेल का?
या हून अधिक सूक्ष्म संशोधन करायचे असल्यास तो हि
मार्ग पारंपारिक मध्ये आहे तो म्हणजे प्राणपदा
वरून. ‘लग्न, चंद्र वा गुलिक यांच्या पैकी जो बलवान असेल
त्याच्या त्रीकोणामध्ये प्राणपद असतो.’ (ज्योतिष सोबती) तसा तो येत नसेल तर इष्टकाल
त्या प्रमाणात सुधारून घ्यावा. येथे अंशात्मक सुधार अपेक्षित आहे. आपण नष्टजाताकावर
काम करत आहोत म्हणून सरळ लग्ना वरून संशोधन करू. आपण ४:३७:४५ ते ४:४०:२६ दरम्यान
इथ पर्यंत पोहचलो आहोत. याचा मध्य ४:३९:०५ घेवू. या वेळेचे लग्न मेषेत २५/५२/२८
आहे. त्या दिवसी सूर्योदय ६:०२:२२ आहे म्हणजे इष्टकाल २२ता.३६मि.४३से. म्हणजे ५६
घाटी ३१ पळे ४८ प्रतीपळे येतो. ३३९२ पळे एकंदर इष्टकाल होतो. याला १५ ने भागले
असता भागाकार २२६ येतो. या भागाकाराला १२ ने परत भागले असता बाकी १० येते या राशी
झाल्या. १५ ने भागून जी बाकी राहिली ती २ ला २ ने गुणून येणारा गुणाकार ४ हे झाले
अंश.
स्पष्ट रवी १/१७/३६/३१ आहे तो वरील राशी अंशात मिळवायचा बेरीज येईल ११/२१/३६/३१. रवी स्थिर राशीत असल्याने यात ९ राशी मिळवायच्या म्हणजे प्राणपद धनुत २१/३६/३१ येतो. प्राणपद लग्नाच्या त्रिकोणात आहे पण अंशात्मक नाही तो अंशात्मक येण्या साठी इष्टकाळात सुधारणा करवी लागेल. प्राणपद लग्नांशा पेक्षा ४.२७ अंशाने कमी आहे म्हणजे या अंतराच्या निम्मे पळे (२.१३पळे) इष्टकाळात अधिक करावे लागतील. सुधारित इष्टकाळ ५६ घाटी ३३ पळे ५५ प्रतीपळे होईल. या नुसार जन्मवेळ पहाटे ४:३९:५६ येते. प्राणपदा वरून शुद्धी करतांना साधारणता अंशा पर्यत विचार केला जातो पण आपण या वरूनच कला विकला पर्यंत विचार केला त्या मुळे आलेल्या जन्मवेळे नुसार प्राणपदात परत अंतर येते जे परत गणित करून सुधारता येईल किवा इतका फरक क्षम्य करता येईल.