शनिवार, २९ जानेवारी, २०२२

दिल्ली टू गोवा

||श्री||


मागील लेख :- मकर संक्रमण २०२२ – नाशिक

 

दिल्ली टू गोवा




पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यातील एक गोवा राज्य जे महाराष्ट्राला जवळचे आहे. भारतातील सर्वात छोटे राज्य १९/१२/१९६१ ला गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाले. त्या वेळी गोवा, दमन, दिव हे एकत्रित केंद्रशासित प्रदेश होता. ३० मे १९८७ ला विभाजन होऊन गोवा भारताचे २५ वे राज्य झाले. गोवा विधानसभेच्या ४० जागा आहेत. २१ जागांचे बहुमत असणे आवश्यक आहे. १४ फेब्रुवारी २०२२ ला एकाच टप्यात मतदान होईल तर १० मार्च २०२२ ला मतमोजणी होईल. भाजपा, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, शिवसेना, कॉग्रेस, आप, तृणमुल, राष्ट्रवादी इ. प्रमुख पक्ष गोव्यात आहेत. गेली दहा वर्षे गोव्यात भाजपा चे सरकार आहे. २०१७ मध्ये भाजपाने गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व अपक्ष यांच्या सहाय्याने सरकार बनवले. मुख्यमंत्री श्री.मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यू नंतर मार्च २०१९ मध्ये डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री पदी विराजमान झाले व विश्वास दर्शक ठराव २० विरुद्ध १३ अस्या मतांनी जिंकले.  


१९ डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन तर ३० मे गोवा राज्य दिन आहेत. सध्याचे गोवा राज्य हे ३०/०५/१९८७ ला अस्तित्वात आल्याने त्या कुंडलीचा विचार करू. पणजी हि गोव्याची राजधानी असली तरी विधानभवन हे पणजीच्या बाहेर आहे. ते प्रथम पासूनच तेथे आहे कि नंतर तेथे गेले हे माहित नाही.  पण कुंडलीचा विचार करतांना हेच स्थानांश घेत आहे. 15°30'39.1"N, 73°50'12.3"मकर लग्न २७°/५९’/२९” वर असून चंद्र मिथुनेत ०८°/०५’/४२” वर होता.



आप व भाजपा वगळता इतर पक्षांनी आजून तरी (२७/१/२०२२ पर्यंत) आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. २७/०१/२०२२ रोजी जी प्रश्न कुंडली घेतली ती सिंह लग्नाची आहे, म्हणजे प्रश्न लग्न हे गोव्याच्या कुंडलीत अष्टमात पडले आहे. त्यामुळे हि निवडणूक गोव्यात तणाव निर्माण करेल. चंद्र चतुर्थात केतू युतीत आहे तर दशमात केवळ राहू आहे. चंद्र चतुर्थात असल्याने सामान्य जनतेचा कल विरोधी पक्षा कडे असेल. शनीच्या नक्षत्रातील नीच चंद्राची दशमावर दृष्टी हि विद्यमान सत्तारूढ पक्षाला हानी कारक आहे. त्यात दशमेश शुक्र पंचमात वक्री स्वस्थाना पासून अष्टमात पडल्याने भाजपाला नुकसान होण्याचा संभव असेल. शुक्र चतुर्थेश मंगळ युक्त असल्याने भाजपातील बंडाळीचा विरोधकांना फायदा होण्याचा संभव असेल. 



१४/०२/२०२२ ला एका टप्प्यात मतदान होणार आहे. तेव्हा गोव्याच्या कुंडलीत गोचर ग्रहयोग कसे आहेत ते पाहू. मकर लग्नाच्या या कुंडलीत दशमेश शुक्रच व चतुर्थेश मंगळच आहे. बुध शुक्र तो पावते मार्गी झालेले असणार आहेत. दशमात ग्रह नाही व चतुर्थात केवळ हर्षल आहे, तो बदल दर्शवितो. आप पार्टीने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करून खळबळ उडवली आहेच. या वेळी मुख्य लढत भाजपा आप होण्याची शक्यता दिसते. गोव्यात सत्तापरिवर्तनाचे संकेत मिळत आहेत. आप चांगली मुसंडी मारण्याची शक्यता आहे. दशमेश शुक्र व चतुर्थेश मंगळ युती व्ययात असल्याने विरोधी पक्षाची सरसी होण्याची शक्यता आहे. व्दिस्वभाव राशीत हि युती होत असल्याने स्पष्ट बहुमत दर्शवित नाही. शनीची दशम दृष्टी दशमावर असल्याने भाजपाला मतदान घटण्याची शक्यता आहे पण त्याच बरोबर गुरुचीही दृष्टी असल्याने फार नुकसान संभवत नाही.


१०/०३/२०२२ ला मतमोजणी आहे. या दिवशीही शुक्र मंगळ युती आहे पण लग्नात आहे. येथे शुक्र सुधारला आहे. या वेळी गोव्यात नवे समीकरण पुढे येवू शकते. विद्यमान सत्तारूढ व विरोधी यांच्यातील काही घटक एकत्र येवून सत्ता स्थापन करू शकतात. आप चा मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक आहे.
भाजपा, गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या पैकीशी ‘आप’ निवडणूकोत्तर आघाडी करून सत्तेत येवू शकते किंवा चतुर्थातील हर्षल व उच्चीचा मंगळ या मुळे अनपेक्षितपणे, धक्कादायकरीत्या जोरदार प्रदर्शन करीत ‘आप’ स्वबळावरही सत्तेत येवू शकते. 


पुढील लेख लवकरच.........

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

मकर संक्रमण २०२२ – नाशिक

 || श्री|| 


मागील लेख:- बोलकी कुंडली – १


मकर संक्रमण २०२२ – नाशिक


मेदनिय ज्योतिषात तसा मी क्वचितच लिखाण करतो. ज्योतिष वर्गात मेदनियाचे पाठ संपल्यावर नमुना कुंडलीचा अभ्यास करायचा होता. या वेळी जागतिक किंवा राष्ट्रीय पातळीवर बघण्या पेक्षा स्थानिक पातळीवर बघुया असे मनात आले आणि ते फारसे अवघड नाही कारण इथे सिंहस्थ मेळा भरत असल्याने नाशिकची सिंह रास सर्वमान्य आहे. मकर संक्रांती लगेचच असल्याने रविचे मकर संक्रमण अभ्यासासाठी घेतले. रवि निरायन मकरेत १४ जाने. २०२२ ला दु. २:२९ ला प्रवेश करतो आहे. या वेळी नाशिकला वृषभ लग्न ८ अंश १२ कला ३८ विकला वर उदित असणार आहे. नाशिकची सिंह रास असल्याने मकर संक्रमणाचे गोचर घेवून अभ्यास करायचे निश्चित केले. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी पर्यंतचा काल आपल्याला या वरून बघता येईल.

मंगळ १६ जाने. २०२२ पर्यंतच चतुर्थात असणार आहे. मंगळ केतू चतुर्थात असल्याने जमिनीचे वादविवाद/भांडणतंटे या काळात वाढण्याची शक्यता आहे. भूमी, वाहन, पाणी या वरून वादविवाद किंवा काही हिंसक घटना, स्फोटक घटना घडण्याची शक्यता आहे. आग, तोडफोड, गॅस सिलेंडरचा स्फोट इ. सारख्या घटनेमुळे नुकसान संभवते. पिकपाणी हातातून जाण्याचा संभव असेल. पंचमात शुक्र असल्याने या काळात नाशिक मध्ये मुलींचा जन्मदर वाढण्याचा संभव असेल. पंचमात शुक्र पाप मध्यात आल्याने हि धोक्याच सुचना आहे. कोरानाच्या पार्श्वभूमीवर विचार करता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका संभवतो. १४ जाने. ते १२ फेब्रु. २०२२ हा कालावधी नाशिकच्या दृष्टीने संवेदनशील राहील.

षष्ठात रवी शनि बुध प्लूटो हे चार ग्रह आहेत. त्यामुळे नाशिक मधील राजकारणातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. एखाद्या नेत्याच्या विरोधात वातावरण निर्माण होऊ शकते. सरकारी तिजोरीवर ताण येवू शकतो. एखादा घोटाळा उजेडात येण्याची शक्यता आहे. सप्तमात गुरु आल्याने व्यापारी वर्गाला चांगले दिवस असतील. पराकीयां बद्दल जनतेच्या मनात सौदार्ह्यपूर्ण भावना असतील. दुध, अन्न, भाजीपाल यात भेसळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता. दुषित, विषारी अन्ना मुळे मुले बाधित होऊ शकतात.

विद्यामान नाशिक महानगर पालिकेचा कार्यकाळ संपत आला आहे व फेब्रुवारी मध्ये निवडणुका होत्या.  १२ फेब्रुवारीच्या आत निवडणुका झाल्यास विद्यामान सत्ताधारी पक्षाला नुकसान होण्याचा संभव असेल. महापौर पद भूषविण्याची संधी पुन्हा एकदा महिलेला मिळू शकते. विरोधी पक्षाला फुटीचा सामना करावा लागू शकतो.

पुढील लेख:- दिल्ली टू गोवा.