रविवार, २५ डिसेंबर, २०२२

बेरकी चंद्र आहे साक्षीला.

 ||श्री||

मागील लेख:- लाभ हानी.

बेरकी चंद्र आहे साक्षीला.😉


Yogesh Daithankar, Paris Jyotish Karyalay, 9370112655

नमस्कार,

आज मी जी कुंडली देणार आहे त्याचे परिणाम अजून आले नाही व माझ्या पर्यंत येण्याची शक्यता नाही. त्या मुळे कुंडली संदर्भात मुलभूत चर्चा करु या.

दोन तरुणी ऑफिस मध्ये आल्या. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. आम्ही दोघी मावस बहिणी आहेत असे त्यांनी सांगितले. जिचे प्रश्न होते तिची जन्मवेळ नव्हती, त्या मुळे प्रश्नकुंडली मांडणे क्रमप्राप्त होते.

१९/१२/२०२२, १७:२४:०४, नाशिक (७३/४८/१०E, २०/०२/२३N)

प्रश्न कुंडली वरून मी सहसा एकाच प्रश्नाचे उत्तर देतो. तिचे तीन प्रश्न होते त्यांचे विषय होते १)शिक्षण २)विवाह ३)नोकरी. तर कोणत्या प्रश्नाचे उत्तर कुंडली वरून द्यायला हवे होते? रविवारी या वरचे माझे मत मांडेल.

शुभदिन

è १)शिक्षण कोर्स बदला बाबत.

२)विवाह?

३)नोकरी करावी का?

कुंडली वरून कोणत्या प्रश्नाचे उत्तर देता येईल ते पाहू त्यासाठी चंद्राचे काय म्हणणे आहे ते पाहू.

चंद्र – ५/३,

न.स्वा. राहू – ११ (मं- १२/१२,७)

श – ९/९,१०

आता तीन प्रश्न आहेत. चंद्र त्या पैकी ज्याचा निर्देश करतो तो प्रश्न महत्वाचा. प्रथम प्रत्येक प्रश्नाचे कार्येश बघू. पहिला प्रश्नाचा विषय शिक्षण आहे त्याचे भाव ४,९,११. चंद्र ११ चा कार्येश आहे. दुसरा प्रश्न विवाहाचा आहे त्याचे भाव २,७,११ पैकी चंद्र ७,११ चा कार्येश आहे. तिसरा प्रश्न नोकरीचा त्याचे भाव आहेत २,६,१०,११ पैकी चंद्र १०,११ चा कार्येश आहे. म्हणजे चंद्र तिन्ही प्रश्न निर्देशित करत आहे. मी तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली. 

नंतर मनात विचार आला कि जातकाचा खरा प्रश्न काय असावा बर? प्रचलना प्रमाणे आपण चंद्राची साक्ष तर घेतली पण हा चंद्र बेरकी निघाला, राहुच्या नक्षत्रात आहे ना. तो तिघांकडेही बोटे दाखवून मोकळा झाला. अश्या वेळी काय करावे? हे कुठे वाचनात नाही आले व शिकतांनाही कुणी सांगितले नाही. शिक्षणात, वाचनात हेच आले कि विचारलेल्या प्रश्ना संबंधित भाव जर चंद्र दर्शवित असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्न कुंडली वरून द्यावे. इथे चंद्र तिन्ही प्रश्न दर्शवित होता म्हणून तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली खरे पण त्यातीलही कोणता प्रश्न खरा आहे? हि टिकटिक डोक्यात चालू झाली. जातकाचे म्हणणे होते कि मला या तिन्ही प्रश्नांबाबत जाणून घ्यायचे आहे. जन्मकुंडली असती तर ठीक होते. असो तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. 

तिच्या मनातला प्रबळ प्रश्न कोणता? या वर मी ते गेल्यावर विचार करू लागलो. मी परत चंद्राचे कार्येशत्व व प्रश्नांचे कार्येश भाव तपासू लागलो. या वेळी मी विरोधी भाव तपासायचे ठरवले. मी विचार केला कि ज्या विषया संबंधित विरोधी भाव चंद्र दर्शवित नसेल तो प्रश्न प्रबळ मानू. मला तर हेच सुचले. प्रश्नांचे जे विरोधी भाव आहे त्या पैकी चंद्र पहिल्या प्रश्नातील ३,१० चा कार्येश आहे. दुसऱ्या प्रश्नातील १० चा कार्येश आहे तर तिसऱ्या प्रश्नातील ५,९ चा कार्येश आहे. आल लक्षात मी या चंद्राला बेरकी का म्हणालो ? पण मीही हटलो नाही. तेवढ्यात मला एक सुचले कि प्रश्न विषया संबंधित मुख्य भावा कडे मोर्चा वळवू या. शिक्षणासाठी ४ मुख्य आहे. चंद्र चतुर्थाचा कार्येश नाही. विवाहा साठी ७ मुख्य आहे. चंद्र ७ चा कार्येश आहे. नोकरी साठी मी ६ मुख्य धरला. चंद्र ६ चा कार्येश नाही. अखेर चंद्रा कडून मनात काय आहे ते नेमके समजले तर. ज्योतिष शास्त्रातील चंद्र हा स्त्री ग्रह आहे गुपित पोटात जास्त वेळ कसा ठेवणार? जातकाने जे तीन प्रश्न विचारले त्या तिन्ही प्रश्नात ११ भाव कार्येश होतो, त्यामुळे ११ भाव येथे निर्णायक ठरू शकत नाही असे मला वाटते. हा, एकच प्रश्न असता तर मग ठीक होते कि ११ भाव आहे म्हणून इच्छापूर्ती होईल.

पुढील लेख:- मृत्यूयोग 

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

लाभ हानी

 ||श्री||

मागील लेख:- खंडग्रास सूर्यग्रहण, नाशिक – २०२२

लाभ हानी



नमस्कार🙏

२८/११/२०२२, दु.३:२७:२५ नाशिक (२०°/०२'/२३" N, ७३°/४७'/१०" E)  ला खालील प्रश्न विचारला गेला.

"२९/९/२०२२ ला एका Vendor website  कडून फोन आला. आमच्या कडे ग्राहक असून तुम्ही सदस्यत्व घेतल्यास तुम्हाला ग्राहक देवू. असे अनेक फोन येत असतात त्यामुळे स्वारस्य दाखवले नाही. साधारण दोन महिने झाले त्यांचे मधून मधून फोन येतात. मीही त्यांच्या वेबसाईटवर दोनतीन वेळा डोकावून बघीतले. वेबसाईट बऱ्या पैकी आश्वासक वाटली. तर व्यवहार फायदाचा होईल का?"

è मेष लग्न, लाभेश दशमेश शनि दशमात, लग्नेश वक्री मंगल धनात, धनेश अष्टमात रवि युक्त बुध युतीत लग्नेश मंगळाच्या दृष्टीत. भाग्येश व्ययेश गुरु व्ययात. कुंडली तर उत्तम आहे. मं,चं,श,चं या शासकग्राहात गुरु मात्र नाही. चंद्र गुरु लाभ योग, चंद्र मंगळ नवपंचम योग आहे. केमदृम होतो आहे पण चंद्र हा शनि युक्त असल्याने केमदृम भंग होतो आहे. आता एखादा दुसरा कुयोग असायचाच. Think Positive. व्यवहार करायला हरकत नाही. 




..... ..०४/१२/२०२२, १७:३६:२६ ता.क.à चंद्राचा दशमेश, लाभेश शनिशी इत्थशाल योग दशमात आहे. लग्नेश दशमेश अंशात्मक नवपंचमयोग धन दशमातून आहे. इतके चांगले योग असल्याने कुंडली पाहून मग पैसे भरले. पण फसवणूकच झाली आहे. आता पर्यंत तरी त्यांच्या कडून व्यवसाय मिळाला नाही. उडवाउडवीची उत्तरे देतात. दोनच ग्राहक दिले तेही नकली. फोन बंद, whatsApp chat, इमेल ला उत्तर नाही. या बाबत Vendor website ला सांगितले पण त्यांनी ग्राहकांचा पाठपुरावा केलेला दिसला नाही. वेबसाईटने स्वत:हून रोज ग्राहाकांचा डेटा देने अपेक्षित असतांना त्यांना फोन केल्या शिवाय ते डेटा देत नसत. त्यांची सेवा निराशजनक असल्याचे त्यांना सांगून खडसावले असता. दुसऱ्या दिवशी ५/६ ग्राहक दिले पण अगोदर प्रमाणेच ग्राहक whatsApp chat, इमेल ला उत्तरे देत नसत. बरेच जन फोन उचलत नसत किंवा फोन बंद असे. दोनचार जनांशी संपर्क झाला तर आम्ही अशी कोणती मागनी नोंदवली नव्हती. आम्हाला वेबसाईट माहित नाही म्हणाले. वेबसाईट वाले आता फोन टाळायला लागले. माझे सदस्यत्व रद्द करा व परतावा द्या असा मेसेज वेबसाईटवर केला. अर्थात याला उत्तर आले नाही. फोन केल्यावर उचलला नाही पण उद्या डेटा देतो असा मेसेज केला. दुसऱ्या दिवशी ७ एक ग्राहक दिले पण पहिल्या सारखाच अनुभव. एक दोघांनी स्वारस्य दाखवले पण त्यांना अगोदर पैसे भरायला सांगितले तर गायब झाले. याचा अर्थ वेबसाईट नकली ग्राहक देत आहे. Vendor website कडे पैसे परत मागितले तर त्यांनी देण्यास नकार दिला. 

उपचय स्थानांपैकी ३,६ ची मालकी बुधा कडे तर १०,११ ची मालकी शनी कडे आहे. शनि उत्तम परिस्थितीत आहे. बुध अस्तंगत आहे तो दुसऱ्या दिवशी उदित होणार होता. चूक सापडली प्रश्न व्यवसायाचा होता. उपचय स्थानांचा स्वामी व व्यवसायाचा एक कारक बुध अष्टमात अस्तंगत आणि रवि पंचमेश आहे. हा विचार त्यावेळी करून पैसे भरायला नको होते. लग्नेश धनात आहे व धनेश धनाला पाहतो आहे हा चांगला योग वाटला. पण व्यवसायाचा कारक बुध हा उपचयस्थानांचे व्ययेशांनी युक्त अष्टमात आहे, पैकी तृतीयाचा व्ययेश शुक्र युतीत आहे. धनेश अष्टमेश राशी परिवर्तन हा दैन्य योग झाला. लग्नेश धनात असण्या पेक्षा हा प्रभावी ठरला म्हणायचे तर. व्ययातील भाग्येश, व्ययेश गुरूची अष्टमावरील दृष्टी देखील तारक ठरली नाही कारण अष्टमातील त्रिकूटावर दिप्तांश दृष्टी नाही. व्ययेश गुरु व्ययात हा गुंतवणुकीस चांगला योग वाटला होता. गुरु असल्याने गुंतवणूक सुरक्षीत वाटली. एकतर हा गुरु मांदी युक्त आहे व मांदी बुध दिप्तांश नवपंचमयोग आहे. बुध हा विपत नक्षत्रात आहे. व्यवसायाचे स्थान सप्तम हे ही निर्दोष नाही. सप्तमात केतू आहे, व्यवसाय मिळणारच नव्हता. हंsssss हा विचार त्यावेळी करायला हवा होता. (Think positive ना! मग घ्या आता.) दशमेश, लाभेश बलवान शनिच्या सप्तमावरील दृष्टीला भाळलो. आणि हि दृष्टी तरी कुठे दिप्तांश आहे, ना सप्तम बिंदू वर ना सप्तमस्थ केतू वर. बलवान असला तरी शेवटी तो पापग्रह आहे. सप्तमावर शुभ ग्रहांची दृष्टी नाही हि खचितच चांगली गोष्ट नाही. दुर्लक्ष करायला नको होते. आता बसा हात चोळीत. बैल गेला नि झोपा केला.   

१०/१२/२०२२, १५:२० ता.क.à वेबसाईट ने पेमेंट एका payment solution app च्या माध्यमातून घेतले होते. ४ डिसे.२०२२, १४:३४ ला Razorpay या payment app ला मेल करून ‘सदर वेबसाईट ने तुमचे app वापरून पेमेंट स्वीकारले होते आणि ती ठरल्या प्रमाणे सर्विस देत नाही.’ अशी तक्रार केली होती. सोबत वेबसाईट बरोबर झालेल्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट व व्यवहाराच्या वेळी Razorpay कडून पावती मिळाली होती त्याचा नंबर सुद्धा दिला. चक्क याची Razorpay कंपनीने दखल घेतली. त्यांनी लगेच १५:५३ ला मेलला उत्तर दिले कि “Greetings from Razorpay. We request you to kindly provide us with your contact number and a convenient time when we may call you regarding your query raised and assist you further. We are getting this checked with our concerned team and would request you kindly provide us with some time. We have raised a dispute with the merchant and we’re checking this at our end and would request you provide us 21 days to provide the best resolution from our end.” हे उत्तर जातकाने ७ तारखेला पाहिले त्यांना नंबर दिला. त्यांनी ७ तारखेला दु. २:५२ ला फोन केला. फोन उचलल्यावर समोरून काही बोलणे ऐकू आले नाही. तांत्रिक दोष असेल म्हणून जातकाने दोन तीन वेळा फोन केले पण समोरून कुणी बोलले नाही. मात्र १० तारखेला दु.३:२० ला परत त्यांचा फोन आला व तुमच्या खात्यात आम्ही परतावा जमा करत आहोत असे सांगितले. दहा दिवसात तो तुमच्या खात्यात जमा होईल. ४/५ दिवसांनी बघितले तर परतावा १० तारखेलाच जमा झाला होता. एकंदर गुंतवणूक सुरक्षित राहिली. व्यवसायीक लाभ झाला नाही पण आर्थिक नुकसान झाले नाही.

हलक में हाथ डालके निकाला...... असा काही डायलॉग असतो ना बॉलीवूड चित्रपटात तसे हे झाले. Vendor website ने पैसे घस्यात घातले होते पण थर्ड पार्टी पेमेंट अॅप ने त्यांची प्रतिष्ठा, विश्वासाहर्ता जपण्यासाठी ते त्यांच्या कडून काढून दिले. पेमेंट अॅप म्हणू शकले असते कि तुमचा व्यवहार आहे. आमचे काम तुमच्या खात्यातून पैसे त्यांच्या खात्यात जमा करणे आहे. Vendor website हे पैसे का पचवू शकली नाही? तर त्यांचा लग्नेश शुक्र जरी लाभेश रवि युक्त असला व शुक्र अस्तंगत नसला तरी ते व्ययेश बुधाने युक्त आहे. या उलट जातकाचा लाभेश हा दशमात स्वगृही आहे. वास्तविक असा अनुभव या प्रकरणात यायला नको होता, कारण परस्परांच्या धनेशांचे राशी परिवर्तन आहे. शिवाय दुसरी गोष्ट अशी कि एकाचा धनस्वामी हा दुसऱ्याचा लग्नेश आहे. या उपर Vendor website चा दशमेश हा जातकाच्या दशमेशाशी युती करायला जात आहे. हे दोन्ही योग हे परस्परांना परस्परां कडून अर्थप्राप्ती व व्यवसाय मिळणे दर्शवितात. दोघांचे लग्नेश, धनेश राशिपरीवर्तन, दृष्टीपरिवर्तनात आहे, मात्र तरीही असे घडले नाही ?

दशा म्हणाल तर चंद्र महादशेत राहू अंतर्दशेत केतू विदशा १३ नोव्हें. ते १५ डिसें. २०२२ दरम्यान होती ज्यात या घडामोडी घडल्या. चंद्र दशमात स्वनक्षत्री असून दशमेश युक्त आहे, म्हणजे तो व्यवसायास अनुकूल आहे. राहू चा राशीस्वामी मंगळ धनस्थानात असून राहू धनेश शुक्राच्या नक्षत्रात आहे, म्हणजे राहू धनार्जनास पोषक आहे. केतू चा राशीस्वामी अष्टमात आहे मात्र नक्षत्रस्वामी राहू असल्याने तसा तो धनार्जनास अनुकूल म्हणता येईल नाही का? ठीक आहे जावूद्या केतू सोडून देवू. पुढील विदशानाथ शुक्र अष्टमात असला तरी धनेश धनाला पाहतो आहे, हा संरक्षक योग झाला. त्याचा नक्षत्रस्वामी बुध हा उपचयस्थानांचा स्वामी आहे. शुक्रही अनुकूल आहे. मग जातक जर केतू विदशा संपे पर्यंत म्हणजे १५ डिसेंबर पर्यंत थांबला असता तर त्या नंतर Vendor website कडून जातकाला व्यवसाय मिळाला असता?...... 

पुढील लेख:- बेरकी चंद्र आहे साक्षिला.

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

खंडग्रास सूर्यग्रहण २०२२

 || श्री ||

मागील लेख :- जन्मवेळ निश्चिती -१ Rectification of Birth


खंडग्रास सूर्यग्रहण, नाशिक – २०२२



è नाशिकला ग्रहण मीनलग्न १४/४२/५२ उदित असतांना लागले आहे. अयनांश – लाहिरी २४/०९/३५. नाशिकची सिंह राशीच्या तृतीयात ग्रहण होते तर ग्रहणलग्न अष्टमात. ग्रहण तुळेत राहुच्या स्वाती नक्षत्रात धनु नवमांशात झाले. नाशिकची दुसरी रास वृश्चिकहि येते पण सिंहस्था मुळे सिंह रास प्रचलित आहे. वृश्चीकेच्या व्ययात ग्रहण होत असल्याने जास्त त्रास दायक ठरण्याचा संभव आहे. ग्रहण कुंडलीत शकटयोग झाल्याने एकंदरीत जागतिक स्तरावर आर्थिक मंदीची जी भाकिते अर्थतज्ञां कडून वर्तवली गेली त्याची पुष्टी हा योग करत आहे. भारताची मकर रास धरली तर तृतीय दशमातून हा योग होत असल्याने सत्ता वर्तुळातील स्त्रियांच्या दृष्टीने चांगला नाही. त्यांचा फारसा प्रभाव, चमक या काळात दिसून येणार नाही. त्यांची प्रतिष्ठा, पद यांना ग्रहण लागते आहे. भारताच्या अर्थमंत्री महिला असल्याने जरा चिंतेची बाब आहे पण हे मकर राशी नुसार गृहीतक आहे. भारताची धनु/मकर/मीन या तिन राशी पैकी विविध तज्ञ विचार करत असतात. असो आपण नाशिक वरून भारत व जागतिक कडे वळत आहोत माघारी नाशिकला येवू.     

ग्रहणाचा प्रभाव ६ महिने गृहीत धरला जातो पण लगतच्या पौर्णिमेला लगेच चंद्र ग्रहण आल्याने या सूर्यग्रहणाचा प्रभाव कितपत दिसेल या बाबत साशंकता आहे. नाशिक करीता संपर्क साधने, दळणवळण संबंधित व्यवसाय/धंदे ग्रहणाने प्रभावित होण्याची शक्यता आहे. मोठ्या/भीषण अपघाताची शक्यता असेल. खास करून स्त्रियांनी वाहन चालवतांना/प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. वृश्चिकेचा स्वामी स्वस्थानापासून अष्टमात असल्याने अपघातात मनुष्यहानीचा संकेत हे ग्रहण देते. वृश्चिक चतुर्थात येत असल्याने रिअलइस्टेट क्षेत्रात मात्र उलाढाली वाढतील, या क्षेत्रात तेजी संभवते. नाशिकला जलसाठ्याची वर्षाची बेगमी झाली असली तरी जलसाठ्यांची काळजी/सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. अपघाताने अथवा निष्काळजीपणा मुळे जलसाठ्याची हानी संभवते. जलाशी संबंधित स्थापत्य दुर्घटना होऊ शकते. रवि लग्नेश व चंद्र व्ययेश असल्याने उद्योगधंदे/कारखाने यांचे चक्र मंदावण्याची शक्यता असेल. सराकारी तिजोरीत भर पडेल त्यात जास्त वाटा रिअलइस्टेट क्षेत्राचा असू शकतो. वैवाहिक संस्थेत मात्र निराशजनक स्थिती संभवते. वैधव्य/विधुरत्व, घटस्फोट यांचे प्रमाण वाढू शकते. वैवाहीकते बाबतीत, सामाजिक संबंधा बाबतीत एखादी गूढ, चमत्कारी घटना संभवते. महानगर पालिकेची निवडणूक प्रालंबीत आहे या काळत जर ती झाली तर विद्यामान सत्तारूढ पक्ष फारसा प्रभाव पाडू शकणार नाही तुलनेत विरोधी पक्ष चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तारत नाशिकला आशा आहे पण स्त्री उमेदवाराचा या काळात अशाभंग होऊ शकतो. आता होणारे चंद्रग्रहण यात काय काय ढवळा ढवळ करतो, उलथापालथ करतो ते बघावे लागेल.

पुढील लेख:- लाभ हानी.  


रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

भाद्रपदातील श्री गौरी/महालक्ष्मी?

 

||श्री||

भाद्रपदातील श्री गौरी/महालक्ष्मी?


एका समुहावर श्री गौरी/महालक्ष्मी या भाद्रपदातील त्रि दिवसीय उत्सवा बाबत एक शंका विचारली गेली होती. शंका साधारण अशी होती कि “गौरी ला माप ओलांडून आत आणतात पण माप तर सासरी गेल्यावर ओलांडतात, गौरी तर माहेरवाशीन असतात?” आता हे माप ओलांडण्याचा प्रकार (श्री गौरी/महालक्ष्मी) कुठे, कधी पासून केला जातो या बाबत मला तर काही माहिती नाही. पण समुहात गौरी/महालक्ष्मी या बाबतही काही मते व्यक्त केली गेली. यावर मी केलेला विचार पुढे देत आहे. निश्चित असा निष्कर्ष काढता येत नाही.   

श्री गौरी/महालक्ष्मी या बाबत संभ्रम आहे. काही गौरी म्हणतात तर काही महालक्ष्मी म्हणतात. श्री पार्वतीचे एक नाव गौरी आहे म्हणून काहीजण याचा संबंध पार्वतीशी जोडून श्री गणेशाला घेवून जाण्यासाठी येतात असे म्हणतात. पण मग दोन मुर्त्या का? पार्वती तर एकच आहे. शिवाय मग सर्वांकडेच मूळ नक्षत्री गौरी बरोबर गणेश विसर्जन व्हायला हवे. कारण गणेशाला घेवून जाण्यासाठी गौरी येते तर सोबत न्यायला हवे. तसे तर सार्वत्रिक होत नाहीये.

 

महालक्ष्मी नावावरून श्री विष्णू पत्नी श्री लक्ष्मीशी संबंध जोडला जातो. परत मग दोन मुर्त्या का? तर येथे असा तर्क दिला जातो कि लक्ष्मीची जेष्ठ बहिण अलक्ष्मी अश्या दोघी असतात. पण अलक्ष्मीची पूजा केली जात नाही. श्री विष्णूनी त्यांना दिलेल्या वरदानाची जी कथा मला माहित आहे त्या नुसार या सणाचा संबंध नाही. श्री विष्णूंनी अलक्ष्मीला फक्त रविवारी पिंपळवृक्षात वास करण्याचे वरदान दिले. त्या वारी श्री विष्णू पिंपळवृक्षात वास करत नाहीत. रविवारी जो पिंपळाची पूजा करेल त्याच्या घरी अलक्ष्मीला वास करण्याचे वरदान दिले. लक्ष्मी व अलक्ष्मी दोघी एकाच वेळी एका ठिकाणी वास करत नाही. त्यामुळे या महालक्ष्मी म्हणजे या दोघी बहिणी नसाव्यात. पण काहींचे असे म्हणणे पडले कि “अलक्ष्मीला ची कुणी पुजा करत नाही पण विष्णुने अलक्ष्मीला दिलेल्या वचनाप्रमाणे या वरील तीन नक्षत्रावर आगमन, पुजा व विसर्जन केले जाते. अलक्ष्मीला तीन च दिवस विष्णुने दिलेत. नंतर वर्षभर नाही.”

काहीजन तिसरे असे सांगतात कि या गौरी/महालक्ष्मी  म्हणजे श्री गणेशाच्या बहिणी आहेत. पद्मपुराना नुसार श्री गणेशाला एका बहिण आहे जी त्यांच्या पेक्षा मोठी व श्री कुमारस्वामी पेक्षा लहान आहे. तिचे नाव 'अशोक सुंदरी' आहे. श्री गणेशांच्या अन्य दोन बहिणींचा उल्लेख मिळतो. ज्योती देवी व मनसा देवी. कार्तिकस्वामी, अशोक सुंदरी,  अय्यपा, ज्योती देवी (ज्वालादेवी), मनसा देवी व गणेश असा श्रीशिव संतती क्रम काही ठिकाणी सांगितला जातो. आता या तिघींपैकी कोणत्या दोघींची तीन दिवस गौरी/महालक्ष्मी म्हणून पूजा केली जाते याचा काही संदर्भ अजून तरी मला मिळाल नाही.  


अशोक सुंदरी देवीची उत्पत्ती हि माता पार्वतीने संकल्पाने केली आहे. कल्पवृक्षाजवळ मुलीचा संकल्प केला असे कथा सांगते. अशोक सुंदरी स्वर्गाधिपती नहुषाची पत्नी व राजा ययातीची तथा शंभर कन्यांची माता आहे. ज्योतीदेवीची (ज्वालादेवी) उत्पत्ती भगवान शिवाच्या तिसऱ्या नेत्रातील दिव्य प्रकाशातून झाली. ज्योतीदेवीचा विवाह श्री सुर्यनारायण व देवी सरण्यू यांचा पुत्र नात्स्य याच्याशी झाला व यांना ‘सत्यवीर’ नावाचा पुत्र आहे. मनसादेवीचा जन्म भगवान शिवाच्या मस्तकातून झाला म्हणून मनसा नाव पडले तर कोणत्याही विषा पेक्षा या विषारी असल्याने ब्रम्हाने त्यांना विषहरी नाव दिले. मनसा देवीचा विवाह महर्षी जरत्कारूशी झाला व त्या ‘आस्तिक’ च्या माता आहेत. या आस्तिकानेच जनमेजयाच्या सर्पसत्रातून नागवंश वाचवला होता.

वरील तिन्ही तर्कापेक्षा मला असे वाटते कि कदाचित या महालक्ष्मी म्हणजे श्री गणेशाच्या दोन्ही पत्नी रिद्धी, सिद्धी तर नव्हे? पण मग क्वचितच काही ठिकाणी एकच मूर्ती पुजली जाते त्याच कसे करावे? बर या विचारला पुष्टी साठी काही पौराणिक संदर्भ मिळत नाहीये. बघू या अजून काही संदर्भ कुणा कडून येतोय का ते. या उत्सवाचे मुहूर्तासाठी खालील लिंक वर जावे. धन्यवाद.

 https://parisastrologer.blogspot.com/2022/08/31.html

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

श्री गौरी उत्सव.

 ||श्री||




१) श्री गौरी आवाहन:- अनुराधा नक्षत्रावर केले जाते.

०३/०९/२०२२ शनिवार, भाद्रपद शु.७ शके १९४४.

अ) सका.०७:५५ ते सका. ०९:२८.

ब) दु. १२:३४ ते दु. ०१:५५.

क) दु. ०१:५५ ते सायं. ०५:१२.

 

२) श्री गौरी पूजन:- ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते.

०४/०९/२०२२ रविवार, भाद्रपद शु.८ शके १९४४.

सका. ०७:५५ ते दु. १२:३३.


 

३) श्री गौरी विसर्जन:- मूळ नक्षत्रावर केले जाते.

०५/०९/२०२२ सोमवार, भाद्रपद शु.९ शके १९४४.

अ) सका.०९:२८ ते सका. ११:००.

ब) दु.०२:०५ ते दु. ०३:३८.




शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२

जन्मवेळ निश्चिती -१ Rectification of Birth

 ||श्री||

मागील लेख:- जीवन दोर


जन्मवेळ निश्चिती -१



ज्योतिषांना सरावा साठी व ज्ञान आजमावण्या साठी काही ज्योतिष विषयक समूहांवर केस स्टडी दिल्या जातात. अश्याच एका समुहात प्रशासकांनी एक केस स्टडी दिली आहे. त्याचा प्रश्न खाली देत आहे मग मी त्यावर केलेला विचार मांडत आहे. 

प्रशासक, ४ ऑगस्ट रोजी ८:१८ PM वाजता·

थोडी वेगळ्या प्रकारची केस स्टडी:

१. रेक्टिफिकेशन.

जातकाने दिलेली जन्मतारीख व वेळ खालील प्रमाणे:

२२. ०८. १९७७ रात्री १२.०० जन्मस्थळ: मानवत जि. परभणी. १९.१८  ७६.३०

मी जेव्हा रेक्टिफिकेशन साठी रुलिंग प्लॅनेट घेतले त्यावेळी ग्रहस्थिती खालील प्रमाणे:

दि. ०१.०८.२०२२ वेळ रात्री ११.०० चिपळूण.

L –मीन-गु, S- उत्तरा फा.-र, R-कन्या-बु, D-सोमवार-चं.         

IMP: प्रत्येक ज्योतिषाने हेच RP वापरावेत असं नाही. स्वतः ते जेव्हा रेक्टिफिकेशन करायला बसतील त्या वेळेचे रुलिंग प्लॅनेट घ्यावेत. तारीख आणि वेळ या दोघांचाही विचार करावा.

Clue: जातकाचे दोन विवाह झालेले आहेत. 

२. पहिल्या विवाहाचा शेवट कोणत्या प्रकारे झाला असेल?

आपल्याला घटनांचे कालावधी शोधावयाचे नाहीत. ज्ञात उत्तर येत्या १५ ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल.

उत्तरे कृष्णमूर्ती पद्धतीने आणि विश्लेषणा सहित अपेक्षित आहेत. सहभाग घेतलेल्या ज्योतिषांच्या सर्व पोस्ट या ग्रुप साठी Pre-Approve केल्या जातील.


è 19°17'54.6"N 76°29'37.2"E (19.298505, 76.493660) मानवतचे हे स्थानांश मी घेतले आहे. कृष्णमूर्ती पद्धतीने सोडवायचे बंधन आहे तेव्हा त्या पद्धतीनेच विचार करत आहे त्यामुळे अर्थातच अयनांश कृष्णमूर्तीचे २३°/२६’/५३” आहेत.  प्रथम दिलेल्या तारीख वेळेचा सप्तमाचा सब शासक ग्रहात आहे का? पाहुया कारण संदर्भ विवाहाचा आहे. सप्तमाचा सब शुक्र आहे जो वरती दिलेल्या शासक ग्रहात नाही. म्हणजे रेक्टिफिकेशनचा करणे योग्य आहे. स्वत:चे RP वापरायची मुभा दिली असली तरी मी दिलेले RP च वापरणार आहे. तारीख आणि वेळ दोन्हींचा विचार करायला सांगितला आहे. तारखेचे म्हणाल तर २१ ऑग ला पहाटे  ४:१९ ते २२ ऑग. ला पहाटे ३:०५ पर्यंत चंद्र वृश्चिकेत गुरुच्या विशाखा नक्षत्रात होता. अगोदरचा राहू किंवा नंतरचा शनि शासकग्रहात नाही. गुरु शासक ग्रहात आहे, त्यामुळे २१/२२ या तारखांचाच विचार करायचा आहे. जन्म मध्यरात्रीचा आहे त्यामुळे २२ तारखेवरच सध्या तरी शिक्कामोर्तब करावा लागेल. जन्मवेळेचेही रेक्टिफिकेशन करायचे आहे पण मी ते सप्तमाच्या सब वरून करणार आहे. तरी चंद्राच्या कोरुलर वरून तारखे साठी येथे प्रयत्न करीत आहे कारण रात्री १२ च्या काही मिनिट जरी अगोदर जन्म झाला असेल तर तारीख २१ धरावी लागेल. वृश्चिकेत गुरु च्या नक्षत्रात चंद्र, मंगल, राहू हे सब येतात पैकी मंगळ, राहू शासक ग्रहात नाही त्यामुळे चंद्राचा सब घ्यावा लागेल. चंद्र वृश्चिकेत गुरुच्या नक्षत्रात चंद्राच्या सब मध्ये २१ ऑग. ला रात्री ९:२४:३२ ते रात्री १०:२१:१९ दरम्यान होता या मुळे तारीख २१ घ्यावी लागेल. १९७७ चा जन्म आहे त्यामुळे येवढा दीड दोन तासाचा फरक आपेक्षित नाही. काही मिनिटे किंवा फार फार तर अर्धा तास. जातकाने किती ते कितीच्या दरम्यान जन्म असावा असे काही सांगितलेले नाही. जन्मगाव काही फार मोठे नाही त्या काळी जर जन्म घरी झाला असेल तर मग मात्र चंद्राचा सब चा काळ विचारात घेता येईल. या संशयाचा फायदा घेवून जन्म २१/०८/१९७७ ला रात्री ९:२४:३२ ते रात्री १०:२१:१९ दरम्यान झाला असावा असे गृहीत धरू या. मंगळाची शासक ग्रहातील रविवर दृष्टी आहे त्यामुळे त्याचा शासक ग्रहात समावेश करता येईल. चंद्र मंगळाच्या सब मध्ये रात्री १०:२१:१९ ते रात्री २३:४०:४६ दरम्यान होता. बाकी सप्तमाच्या सब वर सोपवू या.

२१ ला विविक्षित ठिकाणी रात्री ९:३८ ते ११:२१ दरम्यान मेष लग्न होते. १४ मिनिटांसाठी आपल्याला मीन लग्नाचाही विचार करावा लागेल पण जन्म वेळ मध्यरात्रीच्या जवळ घेण्यासाठी सध्या आपण मेष लग्नाचा विचार करू म्हणजे सप्तमात तूळ रास येईल. तुलेत मंगळ, राहू, गुरु चे नक्षत्र आहेत. गुरु शासक ग्रहात आहे. सप्तमात गुरुचे नक्षत्र रात्री १०:४५:३० ते ११:२१:२४ दरम्यान होते. ह्या वेळात चंद्र मंगळाच्या सब मध्ये होता. स्वत:च्या सब मधला चंद्र घ्यायचा म्हटले तर सप्तमभाव मंगळाच्या नक्षत्रात घ्यावा लागेल. मंगळ काही प्रमुख शासकग्रह नाही. ज्या भावाचा सब आपण निश्चित करतो आहोत त्यासाठी प्रमुख शासकग्रह उपलब्ध असतांना त्याला डावलून दुसऱ्या फळीतील ग्रहाचा विचार का करायचा? तारीख निश्चित करतांना आपण चंद्र गुरुच्या नक्षत्रात घेतला आहे.

सप्तमभाव गुरुच्या नक्षत्रातील सब निवडतांना शासक ग्रहातील बुध चंद्र पैकी विचारात घ्यावे लागतील कारण रवि वक्री शनीच्या नक्षत्रात आहे. बुधाचा सब रात्री १०:५९:१५ ते ११:०६:०१ दरम्यान होता तर चंद्राचा सब ११:१९:२२ ते ११:२३:२७ दरम्यान होता. सप्तमाचा सब बुध कि चंद्र? जन्मवेळ आपण सप्तमाच्या सब वरून निश्चित करीत आहोत. सप्तमा संबंधी एक घटना आपल्यला सांगितली गेली आहे ती म्हणजे जातकाचे दोन विवाह झाले आहेत. या घटने वरून आपल्याला बुध कि चंद्र याचे उत्तर मिळेल. नियम असा आहे कि ‘सप्तमाचा सब बुध किंवा सब वा त्याचा नक्षत्र स्वामी व्दिस्वभाव राशीत असेल तर बहु विवाह होतात.’ झाले तर मग सप्तमाचा सब बुध आहे हे निश्चित कारण जातकाचे दोन विवाह झालेले आहेत नाही का? पण थांबा घाई नको. इथे जरा भूलभुलैया आहे. जन्म वेळी चंद्र जरी मंगळाच्या स्थिर राशीत असाला तरी त्याचा नक्षत्रस्वामी गुरु हा बुधाच्या मिथुन या व्दिस्वभाव राशीत आहे. म्हणजे चंद्राचा बुध व व्दिस्वभावरास दोन्हींशी संबंध आहे. आता आली का पंचाईत? परत आपण बुध कि चंद्र? इथेच आलो. ठीक आहे आता आपण असे करुया कि या पैकी जो व्दितीयाचा कार्येश असेल त्याची निवड करूयात. मूळ केपिचा विचार केला तर चंद्र सप्तमाचा सब होईल कारण त्याचा नक्षत्र स्वामी गुरु व्दितीयात आहे तर बुधाचा नक्षत्र स्वामी रवि व सब सुद्धा रविच असल्याने तो व्दितीयाचा कार्येश होत नाही. पण मी फोर स्टेप चा विचार करतो. या नुसार बुधाच्या चवथ्या पायरीवरील केतू मुळे बुध व्दितीयाचा कार्येश होतो तर चंद्र गुरुच्या नक्षत्रात व मंगळाच्या सब मध्ये असल्याने तो दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या पायरीवर व्दितीयाचा कार्येश होतो. ओहो! परत बुध कि चंद्र? आता इथे आपल्याला जो दुसरा प्रश्न विचारला आहे “पहिल्या विवाहाचा शेवट कोणत्या प्रकारे झाला असेल?  तो न विचारता ती माहिती दिली असती तर बुध कि चंद्र? या वर पडदा पडला असता. जर जातकाने घटस्फोट दिला असेल तर बुध व जर पहिल्या पत्नीचा प्रसूती समयी / शल्यक्रिये दरम्यान / घातपात / अपघाताने मृत्यू झाला असेल तर चंद्र असा निर्णय घेता आला असता. हंsssss असो तर बुधा पेक्षा चंद्र व्दितीय विवाहाचे जास्त बलवान संकेत देत असल्याने मी हा निर्णय घेत आहे कि सप्तमाचा सब चंद्र आहे म्हणजे जन्मवेळ २१ ऑग.१९७७ ला रात्री ११:१९:२२ ते ११:२३:२७ दरम्यान आहे.

सप्तमाचा नक्षत्रस्वामी, सब हे निश्चित झाले आता सब सब निश्चित करून अधिक सूक्ष्म जन्मवेळ काढू. गुरु, चंद्राचा वापर झालेला असल्याने अर्थातच सप्तमाचा सब सब बुध घ्यावा लागेल दुसारा पर्यायच नाही. आता गंमत अशी होतीये कि सब सब बुधाचा घेतला तर सप्तमातील रास बदलते अर्थात लग्न बदलते. तुळेत चंद्राच्या नक्षत्रात शनि पर्यंतचेच सब सब येतात बुधाचा सब सब वृश्चिकेत जातो. शासकग्रहांशी बांधिलकी राखायची असेल तर मार्ग नाही. आपण रेक्टिफिकेशन सप्तमाच्या सब वरून करतो आहोत तो बदलत नाहीये व अंदाजे जन्मवेळे पासून फार दूर जात नाहीये त्यामुळे हे योग्य राहील. जन्मवेळ येईल २१ ऑग.१९७७ ला रात्री ११:२१:४५. वृषभ लग्न वृश्चिक रास येईल. आता जन्म लग्न बदलले असल्याने (आपण अगोदर कार्येशत्व हे मेष लग्ना नुसार काढले होते.) आता परत सप्तमाचा सब चंद्राचे कार्येशत्व वृषभ लग्ना नुसार काढूया. चंद्र गुरु च्या नक्षत्रात मंगळाच्या सब मध्ये आहे यात बदल नाही. लग्न बदलले तरीही सप्तमाचा सब चंद्र २,,,९ या भावांचा बलवान कार्येश आहे जो व्दितीय विवाह दाखवतो.  सप्तमाचा सब चंद्र घेतला असल्याने दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहेच पण हा तर्क आहे. वास्तवात काय घडले ते कळेलच. कळाले कि कळलेल कळवेळ, खाली कमेंट करेलच. Rectification of Birth हे तर्क व तांत्रिक बाब आहे आणि आपल्याला जी माहिती पुरवली गेली तिचा वापर करत त्या परिघात सविस्तर लिहिले आहे. नंतर जातकाच्या जीवनातील इतर घटने आधारे जर हि जन्मवेळ चुकीची ठरत/ठरवत असेल तर ती आपली चूक नाही. ती अन्य इतर माहिती अगोदर देणे आवश्यक होते.  धन्यवाद

ता.क.- या केसेच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्ताने वेळेत दिले आहे पण इथे द्यायला मला उशीर झाला. त्याचा स्क्रीनशॉट येथे देत आहे.


पुढील लेख:- खंडग्रास सूर्यग्रहण, नाशिक – २०२२