शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

परीक्षाकेंद्र बदलून मिळेल का?

 ||श्री||

मागील लेख :- मकर संक्रमण – २०२३.    

परीक्षाकेंद्र बदलून मिळेल का?



 केस स्टडी नंबर 1

नमस्कार! प्रश्न दिनांक -- 17 फेब्रु 2023, वेळ -- सकाळी 7:15, डोंबीवली .

एका व्यक्तीने मला एक प्रश्न फोनवर विचारला. त्याच्या मुलाच्या 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी सेंटर वेगळेच काॅलेज आलय. सेंटर बदलून मिळण्याकरता अर्ज काॅलेज मार्फत पुढे बोर्डाकडे पाठवला आहे. तर ..... सेंटर बदलून मीळेल का? प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला हो किंवा नाही इतकेच उत्तर अपेक्षीत होते.

काय झाले असेल ?? ( फिडबॅक आला आहे.) उत्तर 26 फेब्रु 2023 ला जाहीर करेन .  

➡️नमस्कार. आपला समूह नवीन जागेत स्थलांतरित झाला आहे. नवीन जागेवर पहिल्याच केस स्टडी वर सर्व सदस्यांचे स्वागत आहे. चाळीतून एखाद्या ब्लॉग मध्ये स्थलांतरित झाल्याचा फील येतो कि नाही? चाळीत कसे सर्व सर्वात मिसळून असतात तर फ्लॅट संस्कृतीत आपण आपल्या फ्लॅट मध्ये, तसेच आपण whatsapp रुपी इचाळीतून Facebook रुपी इफ्लॅट मध्ये आलो आहोत नाही का? whatsapp म्हणजे चाळी प्रमाणे आहे. पहिल्या मजल्या वरील २ नंबरच्या खोलीतील सुख दुखाच्या बाता तिसऱ्या मजल्या वरील १५ नंबरच्या खोलीत चालतात तसे whatsapp मध्ये एखाद्या पोष्ट वरील कमेंट भलत्याच पोष्ट खाली येते. Facebook वर कस पोष्ट वरील कमेंट त्याच पोस्ट खाली दिसतील, गोष्टी त्या त्या फ्लॅटच्या आत.

आणि काय योगायोग समूह स्थलांतरित झाला आणि पहिली केस स्टडीही स्थानबदालाची आली. तर मंडळी मला वाटलं नव्हत कि पहिल्या सामन्यात सलामीला मला उतरायला मिळेल, पण माझ भाग्य आणि पोस्ट टाकून तीन दिवस होऊनही अजून कोणीही कमेंट केली नाही. मला वाटत पोस्टवर विचार करून कमेंट करण्या साठी १५ दिवसाची मुदत ठेवावी, निदान दहा दिवस तरी. महीना संपत असल्याने ह्या पोस्टची मुदत २८ तारखे पर्यंत ठेवावी अशी सूचना मांडत आहे.

प्रश्नाकडे वळूया. घटनोत्तर प्रश्न आहे पण आपल्याला मात्र घटनेपूर्व बिंदू पासून विचार करायचा आहे. घडलेली घटना गुलदस्त्यात आहे आणि गुलदस्त्यात काय आहे त्याचा आपल्याला अंदाज लावायचा आहे. या साठी जातका कडून पोष्टकर्ताने होरारी नंबर घेतला होता का? असल्यास पोस्ट एडीट करून द्यावा.



प्रथम शिरस्त्या प्रमाणे चंद्राची साक्ष काढूया. कुंभ लग्नावर प्रश्न केला गेला आहे व चंद्र लाभात असून षष्ठेश आहे. शिक्षणा साठी कार्येशत्वात लाभ स्थान येते तर स्पर्धा परीक्षे साठी षष्ठ भाव. दोन्ही येथे आहे पण जातकाचा मुलगा जी परीक्षा देतोय ती स्पर्धा परीक्षा नाहीये त्या मुळे षष्ठभाव आपल्या उपयोगाचा नाही. लाभस्थान येथे आपल्याला इच्छापूर्ती पुरताच घ्यावा लागेल, कारण प्रश्न शिक्षण क्षेत्रातील असला तरी तो परीक्षा केंद्र म्हणजे स्थाना विषयी आहे म्हणून चतुर्थ भाव चंद्र दाखवत असेल तर तो साक्षीदार म्हणून आपल्या कामाचा. चंद्राचा नक्षत्रस्वामी शुक्र चतुर्थेश आहे. चंद्राचा सब राहू तृतीयभावारंभी आहे त्यामुळे चंद्र तृतीयेचा बलवान कार्येश होत आहे. सब राहू असल्याने गडबड घोटाळया मुळे केंद्र बदलले गेले आहे. चंद्र येथे जातकाच्या मनाचा आरसा म्हणून पाहतो आहोत. त्यामुळे हा जो परीक्षा केंद्र बदलाचा घोळ झाला आहे तो बोर्डा पेक्षा जातका (जातक/मुलगा किंवा महाविद्यालयाच्या कारकून) कडून परीक्षा फॉर्म भरतांना झाला असण्याची दाट शक्यता आहे.



चतुर्थाचा सब जर ४ चा बलवान कार्येश होत असेल तर जातकाला अपेक्षित केंद्र मिळेल पण जर तो ३,९,१२ चा कार्येश होत असेल तर परीक्षा केंद्र बदलेलच राहील. पंचमस्थान म्हणजे मिथुन लग्न घेवू. येथे चतुर्थाचा सब राहू आहे. राहूचा राशीस्वामी मंगळ व्ययात तर त्याचा नक्षत्रस्वामी शुक्र व्ययेश असून नवमात आहे. राहू चतुर्थाचा कार्येश होत नाही. फोरस्टेप ने पाहिले तर गुरूची चतुर्थावर दृष्टी आहे. चला चतुर्थाशी काही तरी संबंध तर आला. पण हा कमकुवत संबंध आहे जरी राहू मुख्य तृतीयाचा कार्येश नसला तरी. शिवाय प्रश्न बलवान स्थिर लग्नावर विचारला गेला आहे. त्या मुळे चतुर्थाचा सब परीक्षा केंद्र बदलून द्यायला फारसा उत्सुक नाही असे माझे मत आहे.

मग निदान इच्छापूर्ती तरी होईल का? बघूया. आता चंद्र लाभाचा कार्येश जातक व त्याचा मुलगा दोन्ही कडून होतो आहे. म्हणजे केंद्र बदलून मिळावे हि दोघांचीही इच्छा आहे. त्यामुळे नेमकी कुणाची इच्छापूर्ती पहावी हा संभ्रम आहेच. प्रथम जातकाची इच्छापूर्ती होते का पाहू. येथे लाभाचा सब गुरु प्रथमाचा कार्येश आहे पण चतुर्थांचा नाही. मुलाचा लाभाचा सब रवि प्रथमाचा कार्येश नाही. या प्रकरणात दोघांचाही लाभाचा सब इच्छापूर्ती दाखवायला हवा तसे होत नाहीये.

आता शेवटचे दशा काय दर्शविते ते पाहू. आपल्याला सूक्ष्मदशा विचारात घ्यावी लागेल. कारण घटना घडण्या साठी फार काळ उपलब्ध नाही. परीक्षेचे टाईम टेबल जाहीर झाले असावे. या बाबतीत बरचसे व्यवस्थापनही झालेले असावे. शुक्र महादशेत राहू अंतर्दशेत गुरु विदशेत शुक्र सूक्ष्मदशा ११ दिवस म्हणजे २८ फेब्रु. पर्यंत आहे. शुक्र व त्याचा नक्षत्रस्वामी गुरु दोघेही व्दिस्वभाव राशीत आहेत व शुक्र नवमात आहे त्यामुळे सूक्ष्मदशाही केंद्र बदलेल दर्शविते.

निष्कर्ष :- परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही.🙏

पुढील लेख:- चूक भूल देणे घेणे - १

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

मकर संक्रमण - २०२३

||श्री||

मागील लेख:- हेडी लॅमर (Hedy Lamarr) 

मकर संक्रमण २०२३


यंदा रविचा मकरेत प्रवेश मंदवासरे, पौष कृ. सप्तमी शके १९४४ ला ३३ घटी ४० पळे समयी होता. काहींना नाही समजलेना? म्हणजे शनिवारी १४ जानेवारी २०२३ ला रात्री ०८:४४ वाजता होता. मी महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने संक्रमण कुंडली तपासणार आहे. त्यामुळे कुंडलीची निर्मिती विधान भवन, मुंबई (१८°/५५’/३४.६३”, ७२°/४९’/२७.९१”) या स्थळाची करणार आहे. याचे परिणाम मी पौष कृ. सप्तमी ते माघ कृ. सप्तमी दरम्यान गृहीत धरणार आहे. जागतिक दिनदर्शिके नुसार याचे परिणाम १४ जाने. ते १३ फेब्रु. दरम्यान गृहीत धरत आहे. बरेचजन मकर संक्रांतीचा परिणाम तीन मास धरतात. लेख लिहित असे पर्यंत म्हणजे १ फेब्रु. पर्यंत अर्धा महिना संपला आहे. पण आज एका माजी विद्यार्थिनीने या विषयी विचारणा केली म्हणून मी हा लेख लिहित आहे त्यामुळे इतक्या उशिरा लिहिला गेला. एक अभ्यास म्हणून लिहित आहे. लाहिरी अयनांश २४°/०९’/४७” घेतले आहेत.

°/७’ सिंह लग्न मेष नवमांशाची कुंडली आहे. महाराष्ट्राच्या धनु राशीच्या भाग्यात हे संक्रमण लग्न आलेले आहे. महाराष्ट्रासाठी मकर संक्रांती शुभ आहे असे म्हणता येईल. दशमात मंगळ आहे. मंगळ, त्याचा राशी स्वामी व नक्षत्र स्वामी हे तिघेही त्रिकोणात आहेत. त्यामुळे सत्ता पालटाची जी भीती काही ज्योतिर्विदांनी व्यक्त केली आहे ती निदान महाराष्ट्रासाठी तरी फलित होईल असे वाटत नाही. उलट विरोधी पक्षातील काही महिला नेत्या सत्तापक्षला बळ देण्याची शक्यता आहे. प्रशासनाची पकड चांगली असेल. लग्नेश रवि षष्ठात शनि, शुक्र युक्त आहे. अंशात्मक योग नाहीयेत किंवा होण्याचा संभवही नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील कुण्याही सक्रीय राजकारणी व्यक्तीच्या आरोग्या विषयी काही फार मोठे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. १४ जाने. ते १३ फेब्रु. या दरम्यान महाराष्ट्रातील चाकरमाने नोकरदार वर्गासाठी काही चांगले निर्णय घेतले जाऊ शकतात. नोकरभर्ती होऊ शकते. संरक्षण क्षेत्रातील व्यक्तींचे राजकीय व्यक्ती/ प्रजेशी काही संघर्ष, तणाव निर्माण होऊ शकतो. व्ययेश चंद्र धनात असल्याने या काळात परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पंचमेश गुरु अष्टमात स्वराशीत आहे. शेअर मार्केट सध्या अडचणीत आहे. ८ तारखेला मार्केट मध्ये सुधारणा होईल असे वाटते. तत्पूर्वी ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान शेअर मार्केट क्रॅश होऊ शकते, निदान मंदी राहू शकते. याचा विचार करता अदानी प्रकरणात ६ फेब्रु. पर्यंत दिलासा मिळणार नाही असे वाटते. 

पुढील लेख:- परीक्षाकेंद्र बदलून मिळेल का?