सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

कोविड उपचार केंद्र सुरु होईल का?

 || श्री ||

मागील लेख:-विवाह झाला का? प्रकरण -२


कोविड उपचार केंद्र सुरु होईल का?



ज्योतिष समुहावर एक कुट प्रश्न विचारला गेला होता. त्याचा जो काही निष्कर्ष मी काढला होता. तो प्रत्ययास आला. या साठी मी कृष्णमूर्ती पद्धतीचा अवलंब केला होता. प्रथम प्रश्न काय विचारण्यात आला व समुहावर मी दिलेले उत्तर देतो. तसेच वास्तवात काय घडले याचे जी उत्तर प्रश्न कर्ताने दिले तेही देतो.


 २१ ऑक्टोबर रोजी ३:२७ PM वाजता  ·

Quiz - 2

👉 सदर प्रश्न प्रश्नकुंडली मांडून सोडवायचा आहे.

👉 प्रश्न दिनांक /वेळ - 05/09/2020,  23:06:33 (रात्रौ 11:06:33)

👉 स्थान – कळंब, जिल्हा उस्मानाबाद. 76 E 02' 00", 18 N 35' 00"

👉 अयनांश (मी वापरलेले) - लाहिरी

प्रश्न 1) 👉 माझ्या स्वतः च्या शाळेच्या इमारतीमध्ये Covid Center सुरू करण्याच्या विचारात आहे. त्यात यश येईल का? ते यशस्वी रित्या चालेल का?

टिप = सदर प्रश्न निर्णयाप्रत आलेला आहे. आपल्या नियमावली प्रमाणे आजपासून 8 व्या दिवशी प्रश्नाबाबत झालेला निर्णय जाहीर करू.


या वर मी दिलेल्या उत्तराचा स्क्रीन शॉट देत आहे.👇



प्रश्न कर्त्यांनी खालील प्रमाणे उत्तर दिले आहे. याचा स्क्रीन शॉट एका फ्रेम मध्ये येत नसल्याने कॉपी पेस्ट करत आहे.

 

२९/१०/२०२० - 

जातकाने प्रश्न विचारला त्यावेळी त्यांचे शाब्दिक बोलणे महानगरपालिकेसोबत सुरू झाले होते. ते रात्री 11 च्या सुमारास. रात्रीतून त्यांनी लेखी प्रस्ताव तयार करून मनपाला दिला. दुसऱ्या दिवशी त्याला संमती मिळाली देखील. पण सिरीयस पेशंट साठीचे हॉस्पिटल असा विचार तूर्तास मनपाने केला नाही तर विलगीकरण आणि primary आणि medium condition मधील पेशंटसाठीचे सेन्टर अशा स्वरूपात परवानगी मिळत होती. त्यावेळी पुढच्या प्रोसेस साठी अजून 2-3 दिवस मनपाला लागणार होते.

*

पण त्याच 3 दिवसात जातकाच्या आईकडील आज्जीचे कोरोनाने निधन झाले. तो ही परिवार त्याच गल्लीत होता. आणखी 6 जण positive होते. स्वतः जातक सुद्धा पाॅझिटीव्ह. शिवाय त्यांचे सहकारी सुद्धा पॉझिटीव्ह निघाले. आणि त्यांचा हॉस्पिटलचा प्लॅन त्यांना रद्द करावा लागला.

*

पण मनपाची पूर्ण संमती मिळाली होती. आर्थिक नियोजनसुद्धा झाले होते. पण घरात असे प्रॉब्लेम झाल्याने जातकाने तो विचार सोडून दिला. आणि आता इथून पुढे पुनर्विचार होऊ शकणार नाही. कारण त्यामानाने कोरोनाचा प्रभाव कमी कमी होत आहे


तसे मी दिलेले उत्तर बरोबर आले असे म्हणता येईल, पण शाळेला परवाना मिळेल का? यावर मी विचार केला नाही. कारण शासनाने याही अगोदर विलीगीकरण केंद्र म्हणून शाळांचा बऱ्याच ठिकाणी वापर केला होता. असो उत्तर शत प्रतिशत बरोबर नाही असे म्हणायाचे असेल तर सहर्ष स्वीकार आहे.


आता ज्या प्रश्नाचा विचार त्या वेळी केला नव्हता त्या बाबत पाहू. तृतीयाचा सब लाभाचा कार्येश असता परवाना मिळतो. येथे तृतीयाचा सब राहू असून त्याचा नक्षत्रस्वामी मंगळा मुळे तो लाभाचा कार्येश होतो आहे त्यामुळे परवानगी मिळाली. पण हा मंगळ व्ययभावारंभी असल्याने परवानगी मिळूनही उपयोग झाला नाही.

पुढील लेख:- स्कीझोफ्रेनिया आणि कुंडली भाग-१. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा