||श्री||
बंडात बंडाळी ?
महाराष्ट्रात सध्या राजकीय सुंदोपसुंदी
चालू आहे. मविआ चे मुख्यमंत्री श्री.ठाकरे साहेबांनी राजीनाम देणार नाही बहुमत
सिद्ध करेल असे सांगितले. मुख्यमंत्री जरी बंडखोर आमदारांना चुचकारत असले तरी
खुद्द त्यांचे चिरंजीव व प्रवक्ते श्री.राऊत यांच्या वाक्तव्यांमुळे नाराजी अधिक वाढल्याचे
दिसून येते आहे. तसेच ते बंडखोरांमधील आमदार आमच्या संपर्कात असून मुंबईत येताच ते
आमच्या कडे परत येतील हे सांगत आहेत. याच आत्मविश्वासाच्या जोरावर मुख्यमंत्री
राजीनामा देत नसावेत पण दुसरीकडे ते बहुमत सिद्ध करा या आदेशा विरुद्ध कोर्टातही
गेले आहेत. त्यामुळे बंडखोरांमध्ये खरच
दुफाळी आहे का? असा संशय प्रजाजनांना आहे. तो हमने स्वयं
संज्ञान लेते हुये इसके लिये प्रश्न कुंडली निर्माण कि है|
२९/०६/२०२२, दु.१५:५४:१५ ला नाशिक मुक्कामी बंडखोरांमध्ये बंडखोरी होईल का? या साठी प्रश्नकुंडली मांडली.
तूळ लग्न मिथुन नवमांशाची कुंडली आहे. चर लग्न आहे त्यामुळे घटना आता वेगवान
घडणार आहेत, मंदावलेल्या पटकथेने वेग घ्यावा तसा. लग्नात केतू लग्नबिंदू जवळ आहे
तो मुख्यमंत्र्यांची सध्याची मानसिकता दर्शवित आहे जी आपल्याला माहित आहे ती
म्हणजे अलिप्तता, संपर्काचा अभाव. लग्नेश शुक्र अष्टमात व्ययेश बुध युक्त, शुक्र
बुध इशर्रफ हे दर्शवितो कि नुकसान अगोदारच झालेले आहे म्हणजे याचा आपण असा अर्थ काढू
शकतो कि झालेले नुकसान सध्यातरी भरून निघणार नाही म्हणजेच बंडखोर परत येण्याची आशा
नाही. परस्थिती दोन्ही बाजूने पहावी लागेल. दुसऱ्या गटात जर काही धुसफूस असेल तर त्याचा फायदा मिळू शकतो. बंडखोर गटाची ग्रहस्थिती काय कल दाखवते
ते पाहू. लग्ना पेक्षा सप्तमात ग्रहाधिक्य आहे. लग्न सप्तमात केतू राहू आले जे हे
दर्शवितात कि एकाच पक्षाचे दोन तुकडे. शिवसेनेचे विभाजन होणार हे तर आता काळ्या
दगडावरची रेष आहे हे स्पष्ट होते आहे. केतू राहू विभाजन दाखवत आहेत पक्षांतर नाही.
छत्रयोग देणारा राहू बंडखोरांचा प्रतिनिधी आहे कारण सप्तमबिंदूच्या सर्वात जवळ तो
आहे त्यामुळे सत्ता बंडखोरांच्या ताब्यात जाईल. याचा अर्थ असाही घेता येईल कि
शिवसेनेची जी ताकद आहे, सत्ता आहे ती बंडखोरांकडे जाईल आणि एकजुटी शिवाय हे शक्य
नाही त्या मुळे बंडात बंडखोरी होईल असे वाटत नाही निदान बंडावर परिणाम करेल इतकी
तरी नाही. बंडाला अजून शक्ती मिळणार आहे कारण साधारण महिन्याने ३१ जुलै ला राहू
हर्षल युती होत आहे. मुख्य म्हणजे सप्तमेश मंगळ सप्तमातच असून तो राहू हर्षलशी
इत्थशाल करत आहे. हि बलवत्ता व पुढे जाऊन प्राप्त होणारी विध्वंशक शक्ती यांचा
विचार करता बंडात बंडाळी होईल असे वाटत नाही. लग्नाचा लाभेश रवी हा नवमात म्हणजे
दूर आहे तर सप्तमाचा लाभेश शनि म्हणजे बंडखोरांचा मित्रपक्ष हा स्वस्थानी आहे
शिवाय वक्री आहे आणि त्याची दृष्टी सप्तमावर आहे विशेषत: सप्तमेश मंगळावर अंशात्मक
दृष्टी आहे त्यामुळे तो धोरणीपणा, कुटनीतीने त्यांना स्थिर करेल.
रवी चंद्र ३/२५ चे अंतर आहे म्हणजे तो अजून अमावश्या योगातून बाहेर आलेला
नाही. चंद्र दशमेश आहे तर रवि लाभेश शिवसेनेचे मित्रपक्ष म्हणजे सत्ता अजून त्यांच्या
प्रभावात आहे. दशमेश चंद्र हा जरा गोंधळात टाकतो आहे कारण तो लग्नाच्या त्रिकोणात
व मित्रपक्षाच्या युतीत आहे, त्यामुळे त्याचा कल जरी विद्यामान मुख्यमंत्री कडे
वाटत असला तरी चंद्र शुक्र व्दिर्दादर्शक हा अशुभ योग आहे. चंद्र फक्त केतुशी इत्थशाल
करत आहे. पण दशमेशाचा हा योग केतूच्या धर्माविरुद्ध आहे त्यामुळे या इत्थशालाला महत्व द्यावे कि २ जुलैला सायं ५:१५ नंतर होणाऱ्या चंद्र राहू या इशर्रफ योगाला
महत्व द्यावे? मी चंद्र राहू चा सप्तम दशमातून होणाऱ्या केंद्र योगाला महत्व देवून
या दिवशी सायंकाळी सत्ता विरोधांकडे जाईल असा अंदाज बांधत आहे.
अजय देवगणाच्या ‘फुल और कांटे’ मध्ये एक वाक्य आहे. अजय लहानपणा पासून वडिलांपासून
दूर असतो. पुढे अजयच्या वडिलांचा उजवा हात असलेला शंकर त्यांच्या साम्राज्यावर
अधिकार प्राप्त करण्यासाठी बंड करतो त्यावेळी निर्णायक क्षणी अजय शंकर वर मात करतो
तेव्हा तो म्हणतो “कुछ हुनर खून हि खून को शिखलाती है|” लग्नातील केतू व दशमेश
चंद्र यांच्यातील फक्त या एका शुभयोगावर या सुंदोपसुंदीत वरील वाक्याचा अनुभव येईल
का हो?
पुढील लेख लवकरच.....


.png)