||श्री||
मागील लेख:- आकांक्षा-जन्मवेळ संशोधन.
घटस्फोट केव्हा?
घटस्फोट हवा आहे केव्हा होईल? १७/१०/२०२२, १८:०७:०५, पंढरपूर. केपी नं-०९.
घटस्फोट तर झाला आहे. मागील ७ महिन्या पूर्वीचा प्रश्न आहे. घटस्फोट केव्हा
झाला? तारीख किंवा आठवड्या जवळ पोहचता आल्यास उत्तम.
५ दिवसांनी उत्तर जाहीर करीन.
घटना घडली
आहे ते तर सांगितले आहे. असे नाही कि घटस्फोट मिळेल का नाही? आपल्याला फक्त घटना केव्हा घडली ते शोधायचे आहे.
बघुया प्रयत्न करून. प्रश्न मेष लग्न १°/३१’/३४” वर
असतांना विचारला गेला आहे. जातका कडून होरारी नंबर घेतला गेला होता तो सुद्धा मेष लग्नाचाच
आहे पण ११°/२६’/४०” वर.
क्षेत्र एकच आले त्यामुळे कुंडली बोलकी असणार आहेच. त्या प्रमाणे सप्तमस्थान
बिघडलेले आहे. पाप संबंध जास्त आहे, शुभ संबंध नाही. सप्तमेश शुभग्रह शुक्र असला
तरी तो षष्ठात नीच राशीत असल्याने येथे शुभ नाही. सप्तमात पापग्रह रवि, केतू, तर
पापग्रह शनिची सप्तमावर दृष्टी. अर्थात घटस्फोट झाला आहे हि माहिती आपल्याला दिली
गेली आहे आणि जातकाचा प्रश्नही घटस्फोट केव्हा? असा स्वच्छ आहे. त्यामुळे हे ग्रहयोग
जातकाच्या प्रश्नाच्या दृष्टीने तितकेसे विचारनीय नाही. हे योग निदर्शनास आणून
देण्याचे कारण एवढेच कि आधी म्हटल्या प्रमाणे कुंडली विचारलेल्या प्रश्नाचे ढळढळीत
स्वरूप आहे. कालपुरुष कोणतेही आढेवेढे न घेता भविष्य दर्शनाचे कवाडे खुली करण्यास
सिद्ध आहे हे जाणवते आहे. कालपुरुषाची ग्रहलिपी वाचतांना आपण कमी नको पडायला म्हणजे
मिळवले.
प्रश्नवेळे पासून ०५/०४/२०२९ पर्यंत गुरु महादशा
भुक्त आहे. गुरु ६,१०,१२ व ३ चा कार्येश आहे. म्हणजे महादशानाथ घटस्फोट द्यायला कुठलीही
खळखळ करत नाहीये. तो ११ चा बलवान कार्येश आहे पण जातकाची इच्छा काडीमोडची आहे. इथे
तो जातकाची इच्छापूर्ती करायला तयार आहे असा अर्थ घ्यावा. (घटस्फोट झाला आहे हे
माहित आहे म्हणून, अन्यथा गुरु वैवाहिक सुखाचाही कार्येश धरला असता.) गुरु महादशेत
शुक्र अंतर्दशा १७/१०/२०२३ पर्यंत म्हणजे पूर्ण एक वर्ष आहे. घटस्फोट ७ महिन्यात
झाला म्हणजे अंतर्दशा त्यासाठी अनुकूल असणार तरी पण आपण तपासून पाहू. शुक्र २,८,१०
चा बलवान कार्येश आहे. तो १० चा कार्येश आहे हे महत्वाचे. शुक्राचा नक्षत्रस्वामी
मंगळ आहे त्याची दशमावर दिप्तांश दृष्टी आहे. आता महत्वाचा भाग शुक्र अंतर्दशेत
गुरु, शनि, बुध, केतू या विदशा भुक्त आहेत.
कधी कधी माहिती देखील निर्धास्त करून चुका घडवते.
घटस्फोट झालाय आणि ७ महिन्यात झाला हि माहिती कळाल्याने महादशानाथ गुरु स्वत:
वक्री असून शिवाय वक्री शनीच्या नक्षत्रात आहे या कडे आपण ढुंकून सुद्धा पाहिले
नाही. नियमाने बरका, असा दशानाथ घटना घडू देत नाही. पण घटना तर घडली आहे. याचा
अर्थ घटना गुरु, शनि मार्गी झाल्यावर घडली आहे. गुरु २४ नोव्हे. ला मार्गी झाला तर
शनि तत्पूर्वी २२ ऑक्टों. ला मार्गी झाला. गुरु विदशेत घटना घडली नाही हे निश्चित.
२४ नोव्हें. नंतर घटस्फोट द्यायला शुक्राला अडचन आहे. त्याला मंगळ अडकाठी करतो
आहे. मंगळ ३० ऑक्टों. २०२२ ला वक्री झाला ते १३ जाने. २०२३ ला तो मार्गी झाला.
अंतर्दशानाथ शुक्र मंगळाच्या नक्षत्रात असल्याने तो काही सोडचिठ्ठी देणार नाही आणि
गुरु मार्गी झाल्यावर शनि विदशा आहे. शनि सुद्धा मंगळाच्या नक्षत्रात असल्याने तो
हि हटून बसणार. शनि विदशा ०५/०४/२०२३ पर्यंत आहे. शनि १,६,१० चा कार्येश असल्याने न्यायाधीश
महाराजांचा फारकती वर शिक्कामोर्तब
करण्यावर कल आहे. पुढील बुधही विचारात घ्यावा लागेल. बुध ६,१०,१२ व ३ चा कार्येश
आहे. त्याच्या विदशेतील २१/०४/२०२३ पर्यंतचा काल विचाराधीन ठेवावा लागेल. शनिकडे
एक्का असल्याने सध्या बुधाचा विचार बाजूला ठेवू.
शनि विदशेतील १३ जाने. ते ५ एप्रिल २०२३ दरम्यानचा काळात
आपल्याला शक्यता तपासाव्या लागतील. सुक्ष्मदशेचा विचार करता येईल. शनि विदशेत
शुक्र ते गुरु सुक्ष्मदशा या काळात आहेत. १,३,६,१०,१२ भाव मिळालेत. सुक्ष्मदशा
आपल्याला ९ भाव देईल. वरील पैकी चंद्र एक असा आहे जो ९ भाव जोडतो आहे. चंद्र
सुक्ष्मदशा ३० जाने. ते ११ फेब्रु. दरम्यान होती. तरीही १२ दिवस आहे. पोष्टकर्त्याने
तारीख किंवा आठवड्या जवळ पोहचता येते का पहा म्हटले आहे. त्या दृष्टीने १२ दिवस
जास्त झाले. त्यासाठी इतर मार्ग वापरावे लागतील. जसे प्राणदशा, दशानाथांचे गोचर,
रविचे गोचर.
प्राणदशा मग बुधाची विचारात घ्यावी लागेल. बुधाचे कार्येशत्व आपण वरती पाहिलेच आहे शिवाय बुध होरारी नंबरचा सब हि आहे. ६ ते ८ फेब्रु. २०२३ दरम्यान बुध प्राणदशा होती. दशानाथांच्या गोचरी नुसार ३० जाने. ते १ फेब्रु. २०२३ दरम्यानचा काल येतो. यात चंद्राच्या गोचरीचा विचार केल्यास ३१/०१/२०२३ हि तारीख मिळते. प्रश्न वेळेची आणि होरारी नंबरची एकच लग्न कुंडली आल्याने शासकग्रहांचे मार्गदर्शन घ्यायला हरकत नाही. L – मं(रा), S - गु, R - बु, D - चं. रविचे गोचर पाहण्यासाठी शासकग्रहांची आपण मदत घेणार आहोत. आता येथे गुरु वक्री शानिच्या व चंद्र वक्री गुरुच्या नक्षत्रात असल्याने बाद होतील. आपल्या कडे मंगळ बुध आणि राहू हे तीन ग्रह आहेत. प्रश्नवेळी रवी तुलेत होता. तो मंगळाच्या वृश्चिकेत बुधाच्या ज्येष्ठा नक्षत्रात ३ ते १६ डिसेंबर २०२२ दरम्यान होता. १३ दिवसाचा हा काल आहे. या पद्धतीने गोचर राशी आणि नक्षत्रातुन पाहिले जाते. हा कालावधी कमी करायचा आहे तर उपनक्षत्रातुन पाहू. वृश्चिकेत बुधाच्या नक्षत्रातुन राहुच्या उपनक्षत्रातुन रवि १० ते १२ डिसेंबर दरम्यान होता. शासकग्रहात बुध असल्याने दुसरा अजून एक कालावधी काढावा लागेल. मेषेत बुध राहू चे नक्षत्र नाही. मिथुनेत मंगळाचे नक्षत्र आहे पण राहूचे उपनक्षत्र नाही. राहूचे नक्षत्र व मंगळाचे उपनक्षत्र आहे पण मुख्य बाब म्हणजे रवि मिथुनेत १४ जून नंतर जातो. पोष्टकर्त्याने घटना ७ महिन्या दरम्यान घडल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मिथुनेतील भ्रमण विचारात घेता येणार नाही. चर लग्न व चंद्र शासक ग्रहात असल्याने बुध ज्या दोन शक्यता दर्शवितो त्यातील पहिली शक्यता कार्यरत झाली असावी आणि हा विचार संयुक्तिक आहे. अगदीच हट्ट करायाचा झाला तर शनीच्या मकरेतील मंगळाच्या नक्षत्रात राहूच्या उपनक्षत्रातुन किंवा कुंभेतील राहूच्या नक्षत्रात मंगळाच्या उपनक्षत्रातुन भ्रमण विचारात घेता येईल. ६ ते ९ फेब्रु. ला रवि मकरेत तेथे असेल, तर कुंभेत ४,५ मार्चला असेल. ५ मार्चला शनिवार असल्याने ४ मार्च २०२३.
निष्कर्ष:- १) १० ते १२ डिसेंबर २०२२ किंवा ०४/०३/२०२३.
२) ३० जाने. ते १ फेब्रु. २०२३ दरम्यान. ३१/०१/२०२३.
३) ६ ते ८ फेब्रु. २०२३.
दोन दिवसांनी उत्तर जाहीर होईलच. बघुया तीन पैकी कुठले जवळपास पोहचते. धन्यवाद.
पुढील लेख:- जन्मवेळ निश्चिती-२.


