शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

काका पुतणे लढत.

 

||श्री||

मागील लेख:- विधानसभा - २०२४ नाशिक.

काका पुतणे लढत.


१९/११/२०२४, २०:३८, केपी नं-५८. अजित पवार VS योगेंद्र पवार लढतीत श्री. अजित पवार यशस्वी होतील का?

जातकाने एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारलेला आहे. जातक ना त्यांच्या मतदार संघात आहे ना काही हितसंबंध आहेत. काही दिवसा पूर्वीही त्यांनी या बाबत पृच्छा केली होती. मी घरी निघायच्या बेतात असतांना त्यांनी पुन्हा एकवार फोन केला. हा प्रश्न मेदनिय पद्धतीने बघता येणार नाही. कारण जातकाने प्रश्न विचारतांना या दोघांच्या लढतीत कोण विजयी होईल अश्या स्वरूपाचा विचारला होता. त्यामुळे हा वैयक्तिक प्रश्न झाला. पण भावातभाव पध्दतीने हि पाहायला गोंधळ होत होता कारण जातकाचे त्यांच्याशी काही नाते संबंधही नाही. अनेक केपी ज्योतिर्विद क्रिकेट सामने, निवडणुका आदी प्रश्न पाहत. मला उशीर हि होत होता म्हणून पूर्व ज्योतीर्विदांच्या पाऊलावर पाऊल ठेवून सब वरून झटपट परिक्षण करून त्यांना त्रोटक उत्तर कळवले. आज सवडीने जरा विस्तृत विश्लेषण करून सगळ्यांसाठी अनुमान जाहीर करत आहे. त्यांना खाजगीत उत्तर पाठऊन जर खरे ठरले तर मग स्क्रीनशॉट टाकून मी आधीच सांगितले होते असे  म्हणजे “जंगल मे मोर नाचा किसने देखा” अस म्हणण्याची अलोचकांना संधी देणे. जर भाकीत केले आहेच तर वर्तुळातील दोनचार जणांना पाठवण्यात व खरे झाले तर अचूकतेचा दावा करण्यात काय अर्थ नाही का? म्हणून आज इतर कामे बाजूला ठेवून पोष्ट करत आहे उद्याच्या निकाला पूर्वी. अनेक ज्योतिर्विद भाकीत आधीच जाहीर करत आहे भाकीत खरे ठरो अथवा चुको त्यांचे अभिनंदन. असो मुद्द्या कडे वळूया.     

शासकग्रह – बु, गु, बु, मं. शासक ग्रहात गुरु असल्याने जातकास अपेक्षीत उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. षष्ठाचा सब मंगळ आहे. मंगळ ६ चा बलवान कार्येश आहे. लाभाचा सब गुरु ११ चा बलवान कार्येश आहे. सब श्री. अजित पवार विजयी होतील हे दर्शवित आहे. व्ययाचा सब मंगळ व पंचमाचा सब गुरु आहे. गुरु ११ व १२ दोन्हीचा कार्येश असल्याने तो निर्णायक मत देत नाहीये. व्ययाचा सब मात्र श्री. योगेंद्र पवार यांना अपयश देतो आहे. या लढतीत अजून कोणी आहे का? ते माहित नाही. जातकाने हि दोनच नावे सांगितली. काका-पुतणे असल्याने हि प्रतिष्ठेची लढाई आहे. लग्नेश बुध व सप्तमेश गुरु यांच्यात असलेला अंशात्मक प्रतियोग याचे प्रतिक आहे. बुध शत्रू राशीत तर गुरु परमशत्रू राशीत आहे. पण गुरु शुक्र राशीपरिवर्तनाचे बळ व दुसरे वक्रत्वाचे बळ गुरूला प्राप्त आहे. त्यामुळे मुरलेल्या श्री.अजित पवारांना हि लढत तितकी सहज जाईल असे वाटत नाही. या जागेचा वाद कोर्टात जाण्याची शक्यता आहे. बुध, गुरु, शनि हे तीन ग्रह भावारंभी आहेत. भाग्येश शनिची लाभ व तृतीया वरील दृष्टी बलवान आहे. शनि हा श्री.अजित पवारांचा भाग्येश असला तरी तो श्री.योगेंद्र पवारांचा पराक्रमेश आहे. श्री.अजित पवारांचा पराक्रमेश रवि मित्र राशीत असला तरी शत्रूच्या नक्षत्री आहे. तर श्री.योगेंद्र पवारांचा पराक्रमेश शनि स्वराशीत असून मित्र राहुच्या नक्षत्री आहे. श्री.योगेंद्र पवार चांगले प्रदर्शन करतील असे वाटत आहे. पण भाग्याची साथ श्री.अजित पवारांना मिळणार आहे.      

अनुमान:- श्री. अजित पवार यशस्वी होतील.

पुढील लेख लवकरच.......

 

 

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

विधानसभा - २०२४ नाशिक.

||श्री||

मागील लेख:- हार पळवला.

विधानसभा - २०२४ नाशिक.


 

 

१६/११/२०२४, १८:४०:१७ नाशिक मध्ये भाजपाचे सीट येतील का?

प्रश्न स्थिर लग्न स्थिर नवमांशावर विचाराला गेला आहे. नाशिक मध्ये एकूण १५ विधानसभा मतदारसंघ येतात. आपण नाशिक शहरा करता प्रश्न पाहत आहोत. नाशिक शहरात ३ विधानसभेच्या जागा आहेत. नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अश्या त्या जागा आहेत. २०१९ मध्ये या तिन्ही जागा भाजपा कडे होत्या. नाशिक पूर्व – श्री. राहुल ढिकले. नाशिक मध्य – सौ.देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम – सौ.सीमा हिरे विजेते झाले होते. या वेळीही महायुती कडून तिन्ही जागा भाजपाच लढणार आहेत. भाजपाने तिन्ही जागी पूर्व विजते उमेदवारच दिले आहेत काहीही बदल केलेला नाही. महाविकास आघाडीने नाशिक पूर्व मधून श्री.गणेश गीते (शरद पवार गट), नाशिक मध्य – श्री.वसंत गीते (ठाकरे गट) तर नाशिक पश्चिम – श्री.सुधाकर बडगुजर (ठाकरे गट) असे उमेदवार दिले आहेत. प्रश्न स्थिर लग्न स्थिर नवमांशावर विचारला गेला आहे हे आपण पाहिले आहेच. दशमेश शनि दशमात स्वत:च्या स्थिर राशीत आहे. नाशिक मध्ये भाकरी फिरणार नसल्याचे संकेत हे योग देत आहे. शनि कालच मार्गी झालेला आहे. हा शनि महायुतीला मोठे स्मरणीय यश देवू शकतो पण हा शनि पापकर्तरीत असल्याने त्याची बलवत्ता कमी होत आहे. त्यामुळे सहयोगी पक्षांचा हवा तसा सहयोग मिळणार नाही.

विरोधी पक्ष फारसा बलवान नाही. रवि मित्र राशीत असला तरी त्याने अगदी नुकताच राशी प्रवेश केला आहे. राशीस्वामी मंगळाचा निचभंग बलवान चंद्रा कडून व शनि कडून होतो आहे. रविच्या अंशात्मक प्रतियोगातील वक्री हर्शल मुळे जनतेच्या अचानक फिरलेल्या लहरी चा फटका काही विरोधकाना बसू शकतो. चतुर्थ स्थानही पापकर्तरीत आहे. दशमाच्या पापकर्तरी पेक्षा चतुर्थाची पापकर्तरी तर अधिक धारदार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील लढत दोन्ही बाजूच्या घटकपक्षांच्या स्वबळावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. बघुया, पुढच्या शनिवारी उमेदवारां बरोबर आपल्या भाकीताचाही निकाल लागणार आहे. भाकितात एक उणीव आहे ती म्हणजे उमेदवारांच्या वैयक्तिक कुंडल्या अभ्यासल्या नाहीयेत.

 


 


षष्ठाचा व लाभाचा सब राहू मार्गी शनिच्या नक्षत्री व शुक्राच्या सब मध्ये आहे. शुक्र केतूच्या नक्षत्री. राहू चवथ्या पायरीवर विरोधकांना अनुकूल ५ चा बलवान कार्येश होतो आहे. राहू लाभात असला व त्याचा सब शुक्र षष्ठेश असला तरी हे कार्येशत्व बलवान नाही. सब राहू प्रतिस्पर्धी विजयी होणार असल्याचे संकेत देत आहे. व्ययाचा व पंचमाचा सब गुरु वक्री असला तरी तो मार्गी मंगळाच्या नक्षत्री व राहुच्या सब मध्ये आहे. गुरु विरोधकांना अनुकूल भावांचा तसेच पूर्व निर्वाचित उमेदवारांना अनुकूल भावांचा बलवान कार्येश नाही. गुरुचा नक्षत्रस्वामी मंगळाची षष्ठावर अंशात्मक चतुर्थ दृष्टी असल्याने हि बलवान दृष्टी मानली जाईल. सब गुरु प्रतीस्पर्धींना अनुकूल नाही मात्र पूर्व निर्वाचीतांना सेफ पॅसेज देत आहे. या वरून असे अनुमान काढता येईल कि तुंबळ लढाई होईल व पूर्व निर्वाचित यशस्वी होतील पण चमत्कार वगैरे होणार नाही. दोन्ही बाजूंचे पारंपारिक किंवा अपेक्षीत मतदार दान दुसऱ्याच्या झोळीत टाकतील, पण हे दोन्ही बाजूंनी होणार असल्याने अटीताटीच्या सामन्यात पूर्व निर्वाचित बाजी मारून गड राखण्यात यशस्वी होतील.

पुढील लेख:-लवकरच...........