||श्री||
मागील
लेख:- श्री. एकनाथ शिंदे जन्मवेळ संशोधन.
चुकीला माफी नाही.
लग्न पहावे करून...असे उगाच म्हटले
नाही. काल काय आजही लग्न करणे म्हणजे काही सोपी बाब नाही, एक दिव्यच असते. काल आणि
आज मध्ये फार तर भूमिका अदलाबदल झाली असे म्हणता येईल. आज वरपक्षाचा वरचष्मा
राहिला नाही तर हळू हळू वधुपक्ष वरचढ होतो आहे.
श्री. अरुण खंडारे सरांनी
नाशिकला १ मे ला ज्योतिषसंमेलन घेतले होते. आम्ही काही वर्षा पासून फेसबुक मित्र
आहोत. या निमित्ताने त्यांची भेटही होईल म्हणून मी संमेलनात सहभागी झालो. त्यांनी अतिशय
चांगल्या प्रकारे संमेलन घेतले. संमेलनात एका अभ्यासकांनी एका महिलेचे ६ महिन्यात
दोन विवाह झाले असल्याचे सांगितले. दोन्ही पारंपारिक विवाह आहेत. वेळे अभावी
संमेलनात कुंडली अभ्यासासाठी घेता आली नाही. पण ६ महिन्यात दोन विवाह म्हणाल्याने
संभ्रममिश्रीत उत्सुकता होती म्हणून समुहात ती कुंडली चर्चेसाठी घेतली. त्या वेळी
कळाले कि ६ महिन्यात दोन विवाह नसून पहिल्या घटस्फोटा नंतर साधारण ६ महिन्यांनी
दुसरा विवाह झाला. पण दोन्ही वेळेस ‘चट मंगनी पट ब्याह फट विच्छेद’ असल्याने
अभ्यासमूल्य आहेच म्हणून हा प्रपंच. समुहात श्री. अरुण खंडारे सरांनी वैवाहिकसौख्य
नसण्याची कारणमिमांशा केलीच होती. त्या व्यतिरिक्त ग्रहयोगा अधारेच या बाबतीतील
जातकाच्या स्वभाव वैशिष्ट्याचा मुद्दा मी विचारात घेत आहे.
स्त्री २४/०२/१९९०, १६:३०, धुळे.
०२/०५/२०२५, १७;१७:४५ è सप्तमाचा सब गुरु शासक ग्रहात आहे. बु(के),
गु, बु(के), शु. त्यामुळे जन्मवेळ बरोबर आहे. जातकाचे आज वय ३५व २मा ८दि आहे.
सप्तमाचा सब गुरु मिथुनेत असून न.स्वा. राहू बुधाच्या दिप्तांश युतीत आहे. सब गुरु
२,११ पैकी ११ चा कार्येश आहे. त्यामुळे कुंडलीत अधिक विवाहाचे योग आहेत.
राहू महादशा २१व ५मा पर्यंत आहे.
सप्तमात शनिची रास, कारक शुक्र व शनि युती भावचलीतात षष्ठात असल्याने राहू महादशेत
विवाह होणे जरा कठीण वाटते, जरी राहू २,७ चा कार्येश असला तरी. राहू किंवा त्याचा नक्षत्रस्वामी
व्दिस्वभाव राशीत नाही पण राहू बुध युती मात्र आहे. राहू महादाशेचा विचार करायचाच
असला तर व्दिस्वभाव राशीत असलेल्या २१,२२ व्या वर्षी आलेल्या मंगळाच्या
अंतर्दाशेचा विचार करावा लागेल. परंतु मंगळ अनुकूल भावांचा बलवान कार्येश नाही.
३८ व्या वर्षाच्या मध्या पर्यंत गुरु
महादशा आहे. गुरुचे विवेचन वरती केले आहेच. गुरु अनुकूल ७,११ चा व विरोधी ६,१०,१२
चा कार्येश आहे. त्यामुळे गुरु दशेत दोन विवाह झाले असणार. इथ पर्यंत पोहचतो नाही
तोच समुहात खालील संदेश आला.
१७:४४ ता.क. à प्रथम विवाह २३/११/२०१९,
दु.१२:४०, नाशिक. १२/०१/२०२० नंतर सासरी गेलीच नाही. ५० दिवस फक्त नांदली. कोर्टात
केस दाखल – २१/०१/२०२१. नोंदणी – २२/०१/२०२१, निकाल – १३/०७/२०२१.
दुसरा विवाह – १९/०२/२०२२, दु.१२:१५,
नाशिक. फक्त १५ दिवस नांदली. नंतर व्यवसायामुळे शनिवार रविवार जाणे येणे केले. ०२/१०/२०२२
पासून पूर्ण विभक्त. दाखल – २१/०७/२०२३, नोंदणी – २१/०७/२०२३, निकाल – ११/०९/२०२३.
दोन्ही वेळेस जातकानेच
न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च केला.
पहिला विवाह २३/११/२०१९ (वय - २९व ८मा २९ दि) ला गुरु महादशेत शुक्र अ.द. शुक्र विदशेत झाला. शुक्र विदशा २०/०६/२०१९ ते २९/११/२०१९ दरम्यान होती. शुक्र २,७,११ या अनुकूल तर ६,१०,१२ या विरोधी भावांचा कार्येश आहे.
दुसरा विवाह (वय- ३१व ११मा २५दि) गुरु
म.द. रवि अ.द. रवि विदशेत (१८/०२/२०२२ ते ०४/०३/२०२२) झाला. विभक्त ०२/१०/२०२२ ते १९/१०/२०२२
केतू विदशा होती. केतू बुधाच्या नक्षत्री असून ७ व १,६,१०,१२ चा कार्येश आहे. घटना
दशासंधी मध्ये घडली आहे. बुध ७ व ६,१० चा कार्येश असून मंगळाच्या नक्षत्री आहे.
पहिल्या विवाहा वेळी फक्त ५० दिवस नांदली. ठीक आहे कि सप्तमाचा सब बहुविवाह दाखवतो पण फक्त ५० दिवसात काडीमोडीकडे वाटचाल, पुरे दोन महिने सुद्धा नाही. सप्तमेश शनि घटस्फोट दर्शवितो पण इतक्या जलद हलचाली करणाऱ्यातला तो नाही. सप्तमेश शनि चरागतीचा आहे हे एक कारण देता येईल पण चरागतीचा ग्रह शुक्रा प्रमाणे ऐश्वर्यदायक असतो. आपण विवाहा विषयी बघतो आहोत. शुक्र कारक आहे. शुक्र व शनि दोघेही वर्गोत्तम आहेत. सामान्यात: वैवाहिक सुख चांगले मिळायला हवे होते. पण दोन्ही वेळा अल्पावधीत विभक्त झाली. चरगतीच्या सप्तमेशा व्यतिरिक्त एक कारण अजून आहे ते म्हणजे मंगळ.
नाही मंगळ दोष नाही तर सप्तमेश शनि व मंगळ
दिप्तांश युती. मंगळाची घिसडघाई तर माहितीच आहे त्यात तोही चरागतीचा. मंगळ आणि
चरागती हे शनिला दट्टा देतायेत. शनि नकारात्मक असल्याने अल्पावधीत घटस्फोट झाले.
सप्तमभावही हर्षल रवि इ. च्या पापमध्यात आहे. सप्तमात पापग्रह आहे. सप्तमाचा
६,८,१२ शी संबंध असता वैवाहिक जीवन त्रासदायक असते. पारंपारिक नुसार दुसरा विवाह
नवमा वरून पाहतात. नवमावर षष्ठातील मंगळाची दृष्टी. नवमेश गुरु व्ययात शत्रूगृही
राहुच्या नक्षत्री. नवमांशात तो सुधारतो आहे पण जन्मकुंडलीत त्याच्या सप्तमात चार
पापग्रह आहेत. या व्यतिरिक्त जातकाचा स्वभाव. चंद्र कुंभेचा असला तरी अष्टमात
अमावास्या योगात. लग्नी केतू सारखा ग्रह. चंद्र मंगळाच्या नक्षत्री जातकाचा स्वभाव
चिडचिडा, कुरबूऱ्या असावा. त्यात कोदंड शनि तोही वर्गोत्तम त्यामुळे चुकीला(जातकाच्या
दृष्टीने) माफी नाही, लगेच डोक्यात तिडीक आणि तिरीमिरीत निर्णय. हि वृत्ती वैवाहिक
जीवनात घातक ठरली.


