||श्री||
विवाह
एका ज्योतिष अभ्यास समुहावर चर्चे साठी मी एका
कुंडली दिली होती व प्रश्न विचाराला होता.
नमस्कार, एक केस स्टडी
देत आहे. वैवाहिक जीवना विषयी भाष्य करायचे आहे. अर्थात या स्त्रीचा विवाह झाला
का? झाला असेल तर केव्हा? वैवाहिक जीवनात काही विशेष आहे का? मी हि कुंडली
०३/०१/२०१५ मध्ये पाहिली त्यामुळे तो पर्यंतचा काळ विचारात घ्यावा.
२९/०६/१९८२, १८:३८, ७३°/५०’/१९.५”, १९°/५६’/५६.९”
ज्या वेळी मी कुंडली पाहिली तो पर्यंत
या स्त्री जातकाचा विवाह झाला नव्हता. विवाह केव्हा होईल? हाच प्रश्न घेवून आले
होते. मी त्यावेळी गुरु महादशा चंद्र अंतर्दशा चंद्र विदशेत विवाह ठरण्याची शक्यता
आहे असे सांगितले होते. गुरु ७ चा तर चंद्र २ चा कार्येश होता. पण पुढे त्यांनी
काही संपर्क ठेवला नाही. पुढील आयुष्या बाबत काही माहिती नसल्याने मी प्रश्न पाहिला
तो पर्यंत काल मर्यादा दिली होती.
वैवाहिक जीवनात काही विशेष आहे का? असा
मी दुसरा प्रश्न केला होता. परंतु काही सदस्यांना वैवाहिक शब्दाचा विसर पडला असावा
व ओघात इतर गोष्टींकडे गेले ज्याची माहिती माझ्या कडे नाही. असे होऊ नये म्हणून मी
*वैवाहिक* हा शब्द वापराला होता. वैवाहिक जीवनात काही विशेष आहे का? हा प्रश्न या करता विचारला होता कि
जून २०१३ मध्ये या जातकाचा विवाह ठरला होता. सगळी तयारी झाली होती, कार्यालही बुक झाले
होते व त्या नंतर मुला कडच्यांनी विवाह मोडला. कारण नमूद करून ठेवायचे राहून गेले
व आता मला आठवत नाही. असो गुरु म.द. शुक्र अ.द. राहू वि.दशेत (३१ व्या वर्षी)
विवाह मोडला. गुरु जसा ७ चा कार्येश आहे तसा तो ६,१० या विरोधी भावांचा बलवान
कार्येश आहे. अंतर्दशानाथ शुक्राची रास लाभात येते पण त्याच बरोबर तोही ६,१० चा
बलवान कार्येश आहे. विदशानाथ राहुचेही असेच आहे. राहू सप्तमात आहे पण तोही ६,१० चा
बलवान कार्येश आहे.
या कुंडलीत सप्तमाचा सब चंद्र असून तो
मंगळाच्या नक्षत्रात आहे. चंद्रचा सब शनि व्दितीयेश आहे बाकी विरोधी कार्येशत्व
आहे. पारंपारिक मध्ये चंद्र, मंगळ सप्तमाशी संबंधित असता विवाह लवकर होतो म्हणजे
विलंब होत नाही असे विधान आहे. सध्या एक पोष्ट विविध ज्योतिष समुहात फिरते आहे
ज्यात काही केपी तील प्राथमिक बाबींवर शंका उपस्थित केली गेली आहे. गुरुवर्य
श्री.कृष्णमूर्तींनी ग्रहांचे कारकत्व विचारात घेतले नाही फक्त कार्येशत्वावर जोर
दिला या वर प्रश्नचिन्ह लावला गेला. केपीत ग्रह, राशीचे कारकत्व विचारात घेत नाही
असे नाही पण त्याला दुय्यम स्थान आहे तर भावांच्या कार्येशत्वाला प्राधान्य आहे.
येथे केवळ सप्तमाचा सब चंद्र आहे म्हणून त्याच्या कारकत्वानुसार जातक स्त्री आहे याचा विचार करून विवाह १९ ते २२ दरम्यान व्हायला हवा होता. विवाह ठरला तोच मुळी ३१ व्या वर्षी व तो हि मोडला. चंद्राला व्दितीयाचे कार्येशत्व त्याचा सब शनि कडून प्राप्त झाले आहे. या शनिच्या कारकत्वा नुसार विवाहास विलंब, अडथळे हे फलित येथे दिसून येते. सबचा होकार मिळाल्या नंतर दशा अंतर्दशाही अनुकूल हव्यात. येथे दशाही अनुकूल पेक्षा विरोधी भावांचे बलावान कार्येशत्व देत आहे.
