पितृपक्ष - २०२२

 ||श्री||



पितृपक्ष - २०२२


नमस्कार,

यंदा शके १९४४ ला पितृपक्ष हा दिनांक १०/०९/२०२२, शनिवार ला सुरु होत आहे. श्राद्धासाठी तिथी ज्या दिवसी अपराण्ह काळी जास्त मानाने असेल तेव्हा घेतली जाते. पण जर एकाच तिथीला अधिक जनांचे श्राध्द येत असेल तर एकाच कर्त्याने दोन पेक्षा अधिक जनांचे श्राध्द करू नये. सप्तमी व अष्टमीचे पक्षश्राद्ध दोन दिवस आले आहेत त्यामुळे या तिथीला जर कोणा कडे दोन पेक्षा अधिक जनांचे श्राद्ध असेल तर विभागून करता येईल. दोन पेक्षा जास्त नसेल तर ज्या दिवशी श्राद्ध तिथी अपराण्ह काळी जास्त मानाने असेल त्या दिवशी करावे. इतर तिथीला दोन पेक्षा जास्त श्राद्ध असेल तर अष्टमी, अमावश्या या तिथींना किंवा व्यतिपात योग असेल तेव्हा करावे. अष्टमीचे श्राद्ध दोन दिवस आले आहे हे अगोदर सांगितले आहेच. व्यतिपात योग १८ सप्टें. ला सकाळी ०६:३३ ते १९ सप्टें.ला सकाळी ०७:२८ दरम्यान आहे म्हणजे १८ तारखेला रविवारी अष्टमी श्राद्धाला आहे.


पोर्णिमा श्राद्ध पोर्णिमेला मृत व्यक्तीचे श्राद्ध १४,१८,२२,२५ या पैकी कोणत्याही तारखेला घालावे असे दाते पंचांगात दिले आहे.

 

भरणी श्राध्द – या वर्षी भरणी श्राध्द १४/९/२०२२, बुधवार रोजी आहे. ज्यांच्या घरात एखाद्या मृत व्यक्तीचे वर्षश्राध्द झाले असून वर्षंश्राद्धा नंतरचे हे पहिलेच पक्षश्राध्द असेल अश्या मृत व्यक्तीचे पक्षश्राध्द हे तिथीने न करता या दिवशी करावे.


अविवाहितांचे श्राध्द – विवाह न होताच मृत झालेल्या (स्त्री/पुरुष) व्यक्तीचे पक्षश्राध्द ती कोणत्याही तिथीला मृत झालेली असली तरी त्याचे श्राध्द पितृपक्षात पंचमीला केले जाते. १४/०९/२०२२, बुधवारी अविवाहितांचे श्राद्ध आहे.


अविधवा नवमी – ज्या स्त्रिया सवाष्ण म्हणजे पतीच्या अगोदर मृत झाल्या त्या कोणत्याही तिथीला मृत झाल्या असल्या तरी त्यांचे श्राध्द पितृपक्षात नवमीला केले जाते. श्राद्धाला सवाष्ण स्त्रीला (सुवासिनी) भोजन दिले जाते. यात एक मत असे आहे कि सवाष्ण मृत स्त्रीचे श्राध्द नवमीला तो पर्यंतच घालावे जो पर्यंत तिचा पती जिवंत आहे. पतीच्या मृत्यू नंतर तिच्या तिथीला किंवा पतीच्या तिथीला दोघांचेही श्राद्ध घालावे. या वर्षी १९/०९/२०२२ सोमवारी अविधवा नवमी आहे.


बाळभोळानी तेरस – लहान मुल कोणत्याही तिथीला मृत झाले असल्यास त्याचे श्राध्द पितृपक्षात त्रयोदशीला घालावे. यात ब्राम्हण भोजन न देता काकबली (कावळ्यांना घास) दिला जातो. या तिथीला किती वया पर्यंतचे मुलाचे श्राध्द घालावे या विषयी संशोधन करावे लागेल. पण मला वाटते साधारण ११ वर्षा पर्यंत धरावे. २३/०९/२०२२ शुक्रवारी बाळभोळानी तेरस आहे.


घातचतुर्दशी – अपघातात मृत झालेले, शस्त्राने मृत झालेले (युद्ध, खून,फाशी इ.) यांचे श्राध्द पितृपक्षात चतुर्दशीला घातले जाते. मला वाटते आत्महत्या (जीवघात) करणाऱ्यांचेही याच दिवशी करावे. २४/०९/२०२२ शनिवारी घातचतुर्दशी आहे.


खाली नाशिक करीता श्राद्धतिथी काळ देत आहे. त्या नंतर इतर काही शहरांचे मोजक्या तिथींचे देत आहे.
   

प्रतिपदा – १०/०९/२०२२, शनिवार – दु. ०३:२९ ते ०४:१२.

व्दितीया – ११/०९/२०२२, रविवार – दु. ०१:४४ ते ०४:११.

तृतीया – १२/०९/२०२२, सोमवार – दु. ०१:४४ ते ०४:१०.

चतुर्थी – १३/०९/२०२२, मंगळवार – दु. ०१:४३ ते ०४:०९.

पंचमी – १४/०९/२०२२, बुधवार – दु. ०१:४३ ते ०४:०९. भरणी श्राध्द, अविवाहितांचे श्राध्द, पोर्णिमा श्राद्ध.

षष्ठी – १५/०९/२०२२, गुरुवार – दु. ०१:४२ ते ०४:०८.

सप्तमी – १६/०९/२०२२, शुक्रवार – दु. ०१:४२ ते ०४:०७.

      - १७/०९/२०२२, शनिवार – दु. ०१:४१ ते ०२:१५.

अष्टमी – १७/०९/२०२२, शनिवार – दु. ०२:१५ ते ०४:०६.

      - १८/०९/२०२२, रविवार – दु. ०१:४१ ते ०४:०६. व्यतिपात, पोर्णिमा श्राद्ध.

नवमी – १९/०९/२०२२, सोमवार – दु. ०१:४१ ते ०४:०६. अविधवा नवमी.

दशमी – २०/०९/२०२२, मंगळवार – दु. ०१:४० ते ०४:०५.

एकादशी – २१/०९/२०२२, बुधवार – दु. ०१:४० ते ०४:०४.

व्दादशी – २२/०९/२०२२, गुरुवार – दु. ०१:३९ ते ०४:०३. पोर्णिमा श्राद्ध.

त्रयोदशी – २३/०९/२०२२, शुक्रवार – दु. ०१:३९ ते ०४:०३. बाळभोळानी तेरस.

चतुर्दशी – २४/०९/२०२२, शनिवार – दु. ०१:३८ ते ०४:०२. घातचतुर्दशी.

अमावश्या – २५/०९/२०२२, रविवार – दु. ०१:३८ ते ०४:०१. सर्वपित्री, पोर्णिमा श्राद्ध.


इतर तिथींसाठी साधारण रकान्यातील वेळा वापरू शकतात.




||कल्याण अस्तु||


४ टिप्पण्या:

  1. भी मंगेश म्हसकर, मुंबई।
    मला आपल्या कडून थोडं आणि योग्य मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा करतो।
    माझे वडील ऐन कोराना काळात म्हणजे 30 एप्रिल 2020 रोजी निवर्तले। त्यांचा फक्त दशक्रिया हा विधी झाला आहे।
    माझी आई अगोदर गेली आणि तिचे आम्ही नवमी श्राद्ध करतो।
    ,🙏🏻

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्री. म्हसकरजी सुप्रभात
      वडील ज्या तिथीला गेले त्या तिथीला वडिल व आई दोघांचेही पक्ष श्राद्ध घालू शकता, हे शास्त्र संमत आहे. आता आईचे पक्षश्राद्ध नवमीला घालने आवश्यक नाही.

      हटवा