सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१८

घर वापसी.




घर वापसी 

साधारण ४५/५० च्या एका गृहस्थांना घेवून माझ्या कडे नेहमी येणारी एक महिला आली. ते गृहस्थ त्यांचे नातेवाईक होते. ग्रामीण वेशभूषा असलेले, त्यांचा चेहरा खूपच म्लान झालेला. दोघेही बसले. महिलेने त्यांना बोलायची खून केली. पण ते काही बोलले नाही कसल्या तरी चिंतेत, खिन्न्तेमुळे ते बोलत नाहीत हे दिसत होते. त्या महिलेनेच सुरवात केली. त्यांची ओळख करून दिली चार दिवसांपूर्वी (५जुन) त्यांचा २१ वर्षाचा मुलगा घरातून सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान कामासाठी बाहेर पडला ते घरी परतलाच नाही. तो घरी परत केव्हा येईल? ०९/०६/२०१५ रात्री ८:५१:०४ नाशिक प्रश्नकुंडली मांडली. 






संतती बाबत प्रश्न असल्याने पंचम भाव लग्नी घेतला आहे. नियम- प्रथमाचा सब मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात असून चतुर्थाचा कार्येश असता व्यक्ती परत घरी येते. फोरस्टेप पद्धतीचे सर्व ग्रहांचे कार्येशत्व पुढे देत आहे.




प्रथमाचा सब रवी मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात आहे, पण तो चातुर्थाचा कार्येश नाही. म्हणून मग दुसरा नियम आजमावून बघायचे ठरवले. वडील स्वत: आले होते. म्हणून प्रश्नलग्नावरून पहायचे ठरवले. नियम - लाभाचा सब संबंधित भावाचा कार्येश असता भेट होईल. आता मूळ धनु लग्नाचा विचार करावा लागेल. त्यानुसार लाभाचा (वरील कुंडलीत सप्तमाचा) सब गुरु हा पंचमाचा (वरील कुंडलीत प्रथमाचा) कार्येश असता वडील मुलाची भेट होईल. त्या नुसार गुरु हा प्रथमाचा सब असल्याने भेट होईल.   


आता केव्हा ते पाहावे लागेल. प्रश्नलग्न व्दिस्वभाव आहे. व्दिस्वभाव लग्नावर दशा, गोचरी प्रमाणे केलेला कालनिर्णय चुकण्याचा संभव असतो. म्हणून मी पारंपारिक प्रमाणे कालनिर्णय करण्याचे ठरवले. चंद्र कुंभेत होता व दुसऱ्याच दिवशी तो मीनेत म्हणजे प्रश्नलग्नाच्या चतुर्थात येणार होता म्हणून मी पुढील दोन दिवसात मुलगा भेटेल अस सांगितले. गुरु कर्केत असल्याने पाण्याच्या आसपास सापडेल असे सांगितले. त्यांना नेमके स्थळ हवे होते. ते सांगण्यास मी असमर्थ आहे असे सांगितले व मुलगा अंध नक्षत्रावर गायब झाला असल्याने जेथून गेला तेथून पूर्व दिशेला बघावे असे सांगितले.

११ जूनला ती महिला माझ्या कार्यालया वरून जातांना भेटली व तिने सांगितले कि तुम्ही म्हटल्या प्रमाणे कालच (१० जून) मुलगा सापडला. तो नदी पुलावर बसलेला त्यांच्या नातेवाईकाल दिसला व ते त्याला त्यांच्या घरी घेवून गेले व मुलाच्या वडिलांना तसा फोन केला. त्याच्या जवळ असलेले शेतमजुरांना वाटायचे पंदराहजार रुपये नव्हते. त्याच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. मला संमोहित करून नेल्याचे मुलाचे म्हणणे होते त्यामुळे नेमके काय झाले ते आठवत नाही. मुलगा धरणगाव येथून गायब झाला होता व तेथून ६० कि.मी. दूर साधारण पूर्व, अग्नेय दिशे दरम्यान जामनेरला पुलावर त्यांचे तेथील एक नातेवाईक मोटारगाडी वरून जात असतांना त्यांना हा दिसला. ईश्वर, गुरुजन व ज्योतिष विद्येचा हा महिमा. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा