शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०२३

अष्टोत्तरी दशा

 

||श्री||

मागील लेख:- पूर्व संचित -१

अष्टोत्तरी दशा





काल एका ज्योतिष शिक्षक मित्राचा फोन आला होता. अष्टोत्तरी दशांचे सुत्रां विषयी विचारणा केली. आता विंशोत्तरी महादशाच वापरत असल्याने व मी ही कधी या अष्टोत्तरी दशा वापरल्याचे स्मरत नाही. त्यामुळे चटकन असे सूत्र कसे सांगू शकणार. दुपारी ४ ला चर्चा करू असे ठरले. पण ते विसरले. रात्री मला आठवण झाली. कुंडलीची भाषा ग्रंथात अष्टोत्तरी दशा विषयी काही नाही. ज्योतिष सोबती मध्ये सूत्र नाहीत, त्यात तक्ते दिलेत. तेही अंतर्दशा पर्यंतच. त्यांना विदशा पर्यंत हवे होते. या वर्षी ज्योतिष शास्त्री परिक्षेत निबंधा मध्ये या विषयी काही प्रश्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सूत्र वापरून शिकवायला हवे. म्हणून आधी त्रैराशीक पद्धतीने सूत्रे तयार केली. सर्वांच्या माहिती साठी ती सूत्रे उदाहरणा सहित येथे ब्लॉग वर देत आहे.  

अष्टोत्तरी दशा सूत्र.

१) अंतर्दशा महिन्यात = मxअ/९

२) विदशा दिवसात = (म x अ x वि x ३०) /९७२

२५/०८/२०२३ सका. ११:५४ चंद्र – ७/१८°/१०’/४६” जन्मत: भुक्त भोग्य अष्टोत्तरी महादशा काढून गुरु महादशेत शुक्र अंतर्दशेत चंद्र विदशा काढा?

è चंद्र जेष्ठा नक्षत्रात पहिल्या चरणात आहे. चंद्र अनुराधा, ज्येष्ठा, मूळ नक्षत्रात असता बुध अष्टोत्तरी महादशा असते. बुध महादशा १७ वर्षे आहे. एका नक्षत्रात ५ वर्षे ८ महिने. चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असल्याने अनुराधा नक्षत्राची ५ वर्षे ८ महिने भुक्त झाली. ज्येष्ठा नक्षत्राची व्याप्ती वृश्चिकेत १६/४० ते ३०/०० आहे.

चंद्र भुक्त अंशादी = चंद्र अंश, कला – ज्येष्ठा आरंभ

= १८/१०/४६ – १६/४०/०० =  ०१/३०/४६ = १.५१७८ अंश  

ज्येष्ठा भुक्त अष्टोत्तरी बुध महादशा = १३.३३३३ अंश ला  ---- ५.६६६७ वर्षे

                            तर १.५१७८ अंशा ला ---- ?

= १.५१७८ x ५.६६६७ / १३.३३३३ = ०.६४५१ वर्ष = ७ मास २२ दिवस

अष्टोत्तरी बुध महादशा भुक्त = भुक्त अनुराधा + भुक्त जेष्ठा

= ५ वर्षे ८ मास ०० दिवस + ० वर्ष ७ मास २२ दिवस

= ६ वर्षे ३ मास २२ दिवस 

ज्येष्ठा अष्टोत्तरी बुध महादशा भोग्य =  ५ वर्षे ८ मास ०० दिवस –   ० वर्ष ७ मास २२ दिवस

=  ५ वर्षे ० मास ०८ दिवस

अष्टोत्तरी बुध महादशा भोग्य = ज्येष्ठा भोग्य + मूळ भोग्य

= ५ वर्षे ० मास ०८ दिवस + ५ वर्षे ८ मास ०० दिवस

= १० वर्ष ०८ मास ०८ दिवस

अष्टोत्तरी बुध महादशा समाप्ती = जन्म तारीख + भोग्य महादशा

= २५/०८/२०२३ + ०८/०८/००१० = ०३/०५/२०३४

अष्टोत्तरी बुध महादशा समाप्ती = ०३/०५/२०३४

अष्टोत्तरीत बुधा नंतर शनि व मग गुरु महादशा येते. शनि महादशा १० वर्षे आहे व गुरु महादशा १९ वर्षे  

अष्टोत्तरी शनि महादशा समाप्ती = ०३/०५/२०४४

अष्टोत्तरी गुरु  महादशा समाप्ती = ०३/०५/२०६३

प्रथम गुरु महादशेत शुक्र अंतर्दशा काढू. त्या साठी गुरु महादशेत गुरु व राहू भुक्ती एकत्रित काढून घेवू, जो शुक्र अंतर्दशा आरंभ असेल.

=  गुरु म.द. x (गुरु भुक्ती + राहू भुक्ती) / ९

= १९ x (१९+१२) / ९ = १९ x ३१ / ९ = ५८९ / ९ = ६५.४४ महिने 

= ५ वर्षे ०५ मास १३ दिवस

शुक्र अंतर्दशा आरंभ = शनि म.द. समाप्ती + राहू अंतर्दशा समाप्ती

= ०३/०५/२०४४ + १३/०५/०००५ = १६/१०/२०४९

शुक्र अंतर्दशा आरंभ = १६/१०/२०४९

शुक्र अंतर्दशा = गुरु म.द x शुक्र अ.द. / ९ = १९ x २१ / ९ = ३९९/९

= ४४.३३ महिने = ३ वर्षे ८ मास १० दिवस

शुक्र अंतर्दशा समाप्ती = शुक्र अंतर्दशा आरंभ + शुक्र अंतर्दशा

= १६/१०/२०४९ + १०/०८/०००३ = २६/०६/२०५३

शुक्र अंतर्दशा समाप्ती  = २६/०६/२०५३.

गुरु महादशेत शुक्र अंतर्दशेत चंद्र विदशा काढायची आहे. त्या करता प्रथम शुक्र व रवि विदशा एकत्रित काढू.

 विदशा (दिवसात) = (म x अ x वि x ३०) /९७२

चंद्र विदशा आरंभ = गुरु म.द. x शुक्र अ.द. x (शुक्र वि.द. + रवि वि.द.) x ३० / ९७२ = १९ x २१ x (२१+६) x ३० / ९७२

= १९ x २१ x २७ x ३० / ९७२ = ३२३१९० / ९७२ = ३३३ दिवस = ११ मास ०३ दिवस

चंद्र विदशा आरंभ = शुक्र अंतर्दशा आरंभ + रवि विदशा समाप्ती.

= १६/१०/२०४९ + ०३/११/०००० = १९/०९/२०५०

चंद्र विदशा आरंभ = १९/०९/२०५०.

चंद्र विदशा = गुरु म.द. x शुक्र अ.द. x चंद्र वि.द. x ३ / ९७२  

= १९ x २१ x १५ x ३० / ९७२ = १७९५५० / ९७२ = १८५ दिवस

= ६ मास ५ दिवस

चंद्र विदशा समाप्ती = चंद्र विदशा आरंभ + चंद्र विदशा = १९/०९/२०५० + ०५/०६/०००० = २४/०३/२०५१.

चंद्र विदशा समाप्ती = २४/०३/२०५१.

पुढील लेख:- बघ माझी आठवण येते का? भाग-१.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा