|| श्री ||
मुख्यमंत्री कोण ?
२०१९ महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक
झाल्यावर निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे ज्योतिष ग्रुपवर या संबंधी विचाराला
गेलेल्या प्रश्नावर कुंडलीचे विश्लेषण केले. त्यात काल जे काही लिहिले त्यातील कॉग्रेस
शिवसेना या वर काल रात्री भाष्य केले व आज महाराष्ट्र कॉग्रेसचे पदाधिकारी
सोनियाजींना या संदर्भात भेटायला दिल्लीला गेल्याची बातमी आली, तर शिवसेनेचे श्री.संजय राऊत राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा श्री.पवार साहेबांना भेटायला गेल्याची बातमी आली. बाकी काय होते ते बघूच.
घटना घडल्यावर लिहित आहात असे म्हणू नये म्हणून त्या पोस्टची लिंक सोबत देत आहेच.
https://www.facebook.com/groups/npastrogroup/permalink/447241409248620/?app=fbl
मी केलेले कालचे सकाळचे व रात्रीचे दोन्ही विश्लेषण जसेच्या तसे येथे ब्लॉगवर देत
आहेच.
प्रश्न कुंडली —भा ज प की शिवसेनेचा
मुख्य मंत्री येणार? ता.३०/१०/१९ वेळ – सका. ११/१५ . जाणकारांनी उत्तर द्यावे.
पोस्टमध्ये स्थान दिलेले नाही पण
त्यांनीच पोस्ट केलेले कुंडलीचे फोटो येथे देत आहे.
विद्यामान सत्ताधारी दशमा वरून पाहतात
त्या मुळे बुध व मंगळ हे श्री.फडणवीस यांचे प्रतिनिधी होत, तर मित्रपक्ष लाभावरून पाहतात त्यामुळे
शुक्र व रवि श्री.ठाकरेचे प्रतिनिधी होतील.
राजग्रह चंद्र, रवि दोघही निचभंग राजयोगात आहेत. त्या
मुळेच सत्ताधाऱ्यांना निर्भेळ यश उपभोगता येत नाहीए. लोकनेते व घराणेशाही
दोघांनाही संघर्ष, कष्ट यातून काळी कड़ा असलेले यश लाभेल. मित्रपक्षांचे प्रतिनिधींचे
इर्शरफ योग त्यांच्यात ज्या काही वाटाघाटी व्हायच्या त्या झाल्याचे दर्शवितात तर
विरोधीपक्षाचे प्रतिनिधीशी इत्थशाल मित्रपक्ष विरोधी पक्षाला अजमावत असल्याचा
द्योतक आहे.
दशेमश बुध त्याच्या तृतियात स्थिरराशीत
व बुध मंगळ राशीपरिवर्तन असल्याने तो अधिक बलवान होतो त्यामुळे श्री.फडणवीस याची
नुसती खुर्ची स्थिर नाहीतर त्यांचे अधिकार व सत्ता सुद्धा प्रभावशाली राहतील ते
नुसते नावाचे मुख्यमंत्री असणार नाहीत तर त्यांची हूकूमत, पकड ही राहील. शनि मंगळ दृष्टिपरिर्वतन
त्यांना तापदायक ठरेल तो दिर्घकाल त्यांच्या कार्यशक्तिला कमकुवत करत राहील.
वादावादी, तीव्रमतभेद, विरोध राहील युतीतील, स्वपक्षीयां कडून त्यांना अस्थिर
करण्याचे प्रसंग येतील.
लाभातील रवी उत्तम असला तरी निचभंग
योगात आहे तुलनेत मंगळ बलवान ठरेल.
लाभेशाला विशेष काही बलवत्ता नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा दावा त्यांना
सोडावा लागेल. परंतू तरीही काही महत्वाची खाते, पदे त्यांना मिळतील अर्थ, महसुल, बांधकाम,गृहमंत्री या सारखी धनाशी संबंधीत खाती
ते पटकावतील.
शुभदिन
प्रश्नकुंडली ही मुख्यमंत्री कोण? या साठी असल्याने इतर गोष्टींचा जरूरी
पुरताच वापर करावा असे मला वाटते. या नुसार माझ्या अगोदर च्या कमेंटमध्ये
मित्र/सहेयागी पक्षाचा विचार लाभा वरून म्हटले त्या ऐवजी दशमाच्या लाभा वरून
म्हणजे अष्टमावरून जास्त संयुक्तीक होईल असे आता वाटते.
तसा विचार करूनही फारसा फरक पडत नाहीये
कारण शिवसेनेचा प्रतिनिधी केवळ चंद्र होईल. विरोधीपक्ष काँग्रेसचा प्रतिनिधी गुरू
तर (वरील न्यायाने ) राष्ट्रवादीचा प्रतीनीधी शनि होईल.
एक शनि सोडला तर बाकी प्रतिनिधी स्थिर
राशीत आहेत. गुरूशी सर्वप्रथम योग चंद्र करत असल्याने शिवसेना सर्वप्रथम
जाहिररित्या काँग्रेसशी संपर्क करण्याची शक्यता भासते. गुरू बुधाच्या नक्षत्रात
स्वनवमांशी आहे पण चंद्र शनिच्या नक्षत्रात तुल नवमांशी असल्याने त्याचा दशमाशी
संबंध येत नसल्याने शिवसेनेला मुख्यमंत्री पदापासून दुर रहावे लागेल.
विचाराधीन कुंडली नुसार श्री.फडणवीस
यांचे प्रतिनिधीत्व करणारे ग्रह सर्वात बलवान आहेत. दशमाशी संबंध असलेला अजून एक
ग्रह शनि आहे व तो राष्द्रवादीचा प्रतिनिधी आहे. त्याच्या नैसर्गीक स्वभावधर्मा
नुसार मुत्सद्दीपणाने, संयमाने, कुटनीतीने तो भाजपावर अंकुश ठेवण्याचा संभवितपणा करू शकतो. तो छुपा
पाठिंबा देवू शकतो. शनि मंगळ दृष्टि परिवर्तन, शनि द्विस्वभाव राशीत असल्याने व
मंगळाची घाव घालण्याची वृत्ती पहाता जर दुसरे समिकरण जुळून येणार असेल तर
श्री.फडणवीस आघाडीला बरोबर घेण्यापेक्षा विरोधी आघाड़ी फोडण्यावर भर देतील
मुख्यत्वे राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची शक्यता जास्त असेल. दशमातील मंगळ त्यांचे
Man in action हे
रूप दाखवयला उत्सुक आहे. दशमेश बुध शनिच्या नक्षत्रात सिंह या स्थिर राजराशी
नवमांशी आहे या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
शुभरात्र.
ता.क.(४/११/२०१९) - शिवसेनेला महत्वाची 'अर्थ'पूर्ण खाती दिली जातील असे भाकीत ३१/१०/२०१९ गुरुवारी केले होते ते हि बहुदा प्रत्ययास येतेय. या विषयी आज ४/११/२०१९ सोमवारच्या महाराष्ट्र टाईम मध्ये आलेली बातमी.
ता.क.(४/११/२०१९) - शिवसेनेला महत्वाची 'अर्थ'पूर्ण खाती दिली जातील असे भाकीत ३१/१०/२०१९ गुरुवारी केले होते ते हि बहुदा प्रत्ययास येतेय. या विषयी आज ४/११/२०१९ सोमवारच्या महाराष्ट्र टाईम मध्ये आलेली बातमी.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा