|| श्री ||
विवाह झाला का?
कट्टर ज्योतिष
अभ्यासकांचा समुहावर एक केस स्टडी दिली आहे जिचे उत्तर १५ दिवसात द्यायचे आहे. प्रश्न
खालील प्रमाणे आहे.
स्त्री. जन्मतारीख
-- 12 -- डीसेंबर – 1980, जन्मवेळ -- रात्री 9:10, जन्मस्थळ - श्यामबाजार , कलकत्ता
या
स्त्री चा विवाह झालेला आहे किंवा नाही? उत्तरात ज्योतीष शास्त्रीय कारणे
अपेक्षीत.
( उत्तर
15 जून ला जाहीर करेन. )
धन्यवाद !
प्रश्न
तसा साधा आहे, के.पी. नुसार सप्तमाचा सब तपासून चार पाच ओळीत उत्तर देता आले असते.
विवाह झाला असेल तर कधी? असा प्रश्न विचारला नसला तरी तो गृहीत धरून विचार केला.
पोष्ट वरील कमेंट म्हणून मजकूर जरा मोठा होत होता व तोडून देण्या पेक्षा ब्लॉग वर
लिहिणे श्रेयस्कर वाटले म्हणून येथे देत आहे. मी माझे विश्लेषण येथे देत आहे.
वास्तवात काय घडलय हे प्रश्न कर्ता नंतर सांगतीलच.
सप्तमाचा सब राहू शासक ग्रहात आहे. राहू २,७ चा कार्येश आहे त्यामुळे सबचा होकार आहे. राहू महादशा २४ व्या वर्षा पर्यंत होती. त्यामुळे या महादशेचा विचार करावा लागेल. गुरु महादशा २४ ते ४० वया दरम्यान होती म्हणजे यातीलही निदान काही भाग विवाह अनुकूल आहे. राहूचे विवाह अनुकूल कार्येशत्व आपण पाहिले आहे. गुरु सप्तमाचा बलवान तर व्दितीयाचा साधारण कार्येश आहे. राहू आणि गुरु दोघेही विवाह अनुकूल आहेत. आली का पंचायत आता. राहूच्या नक्षत्रात ग्रह नाही त्यामुळे तो गुरु पेक्षा बलवान ठरतो आहे शिवाय तो Nod आहे, पण त्याचा नक्षत्र स्वामी विवाह विरोधी आहे. चंद्र जो राहूचा राशी स्वामी आहे त्याच चंद्राच्या नक्षत्रात गुरु आहे. चंद्र विवाहाचे प्रमुख स्थान सप्तम भावारंभी आहे. चंद्राच्या परडीतील हा लाडू जातकाच्या मुखात टाकण्यासाठी या परडीची खेचाखेच राहू गुरु करतायेत. कोण करणार जातकाचे तोंड गोड? मी तर्काने काही तरी निर्णय करणार हे निश्चित पण वास्तविकता जाहीर झाल्यावर हे पाहणे उत्सुकतेचे असेल कि राहू त्याचा गड राखणार का? राशी स्वामीचे फळ देणार का?
राहू २,७,११ पैकी
चा प्रथम दर्जाचा कार्येश नाही गुरु सप्तमाचा आहे. शिवाय शनी सप्तमेश असल्याने
विवाहास विलंब दर्शवितो. राहूचा नक्षत्र स्वामी बुध शनीच्या नजरेच्या धाकात आहे.
गुरु शनी युती आहे. राहू व्ययात
असल्याने तो विवाहास विरोध करण्याची शक्यता आहे. त्यामुळे विलंब म्हणजे राहू
नंतरची गुरु दशा कार्य करेल असा माझा तर्क आहे.
व्दितीयाचा
प्रथम दर्जाचा कार्येश शुक्र याची अंतर्दशा मी निवडली कारण सप्तमाचा प्रथम दर्जाचा
कार्येश व्दितीयातील गुरुच्या नक्षत्रातील शुक्र व्दितीयाचा एकमेव प्रथम दर्जाचा
कार्येश आहे व विवाहाचा कारक आहे. विदशा रवीची घ्यायचा विचार होता कारण तो लाभाचा
कार्येश आहे पण तितक्यात माझे लक्ष मंगळाने वेधून घेतले. व्दितीयाचा प्रथम दर्जाचा
कार्येश लाभेश शुक्राच्या नक्षत्रातील मंगळ
लाभाचा एकमेव प्रथम दर्जाचा कार्येश आहे. मंगळ २,७,११ चा बलवान कार्येश आहे. म्हणजे
गुरु महादशा शुक्र भुक्ती मंगळ विदशेत वयाच्या ३२ व्या वर्षी १६ आक्टों. ते १२
डिसें. २०१२ दरम्यान विवाह झाला असण्याची शक्यता आहे. पण ५/१०/२०१२ ते ३१/१/२०१३
दरम्यान दशानाथ गुरु वक्री होता. लाभाचा
दुसरा बलवान कार्येश रवी (त्याची लाभावर दिप्तांश दृष्टी आहे.) त्याचा विचार करू.
गुरु म.द. शुक्र अ.द. रवी वी.द. ८ जून ते २७ जुलै २०१२ दरम्यान होती.
वि.क. – सप्तमाचा
सब राहू बुधाच्या नक्षत्रात असून २ चा कार्येश आहे. हा पुनर्विवाहाचा योग
दर्शवितो. त्यामुळे राहू महादशेत जरी विवाह झाला असेल तरी काही कारणाने विवाह
सौख्य नष्ट झाले असण्याची शक्यता आहे. राहू महादशा चंद्र अंतर्दशा मंगळ विदशा या
दृष्टीने परिणाम कारक वाटते.
जर असे आहे तर विवाह
अनुकूल इतर दशा कोणत्या त्याचा विचार करू या. विवाह योग्य काळात राहू व गुरु महादशा
होत्या हे आपण पहिलेच पाहिले आहे. राहू महादशेचा विचार आपण अगोदरच मागे टाकला आहे.
राहू प्रतिकूल भावां बरोबरच राहू २,७ चा कार्येश आहे. आपण केलेली राहू गुरु तुलना
थोडा वेळ बाजूला ठेवून विचार करू. राहू महादशेतील केतू अंतर्दशे पर्यंतचा काळ
कायदेशीर दृष्ट्या योग्य नसल्याने आपले काम थोडे सोपे झाले. १८ व्या वर्षाच्या
शेवटी शेवटी असलेली मंगळ विदशा मला योग्य वाटली, पण ३० जुलै ते २ ऑक्ट.१९९८ दरम्यान
असलेल्या या दशा काळ सामान्यात: आपल्या कडे विवाह अनुकूल मानला जात नाही म्हणून मी
परत रवी विदशे कडे वळालो. रवी विदशा १८ व्या वर्षी ६ मार्च ते २९ एप्रिल १९९८
दरम्यान होती. अजून एक समीकरण जुळते आहे. ते म्हणजे राहू म.द. रवी अ.द. शुक्र वि.द.
वयाच्या २१ व्या वर्षी ५/६ ते २९/७/२००१ या काळात होती. अजूनही काही अनुकूल दशा
मिळतील कारण या कुंडलीत बुध वगळता सर्व ग्रह २,७,११ पैकी कार्येश आहेत. पण इथे
थांबतो. इतर सदस्य कदाचित त्याचा विचार करतील.
निरीक्षण:- १८ व्या
वर्षी, २१ व्या वर्षी विवाह योग शक्यता दाखवते. परंतु सप्तमेश शनी असल्याने व
सप्तमाचा सब राहू अनुकूल प्रतिकूल दोन्ही भावांचा कार्येश असल्याने विवाह विलंब
दर्शवित असल्याने राहू ऐवजी तुलनेत बलवान गुरु महादाशेचा विचार योग्य वाटतो.
अनुमान:- गुरु
महादशा शुक्र भुक्ती रवी विदशेत वयाच्या ३२ व्या वर्षी ८ जून ते २७ जुलै २०१२ दरम्यान
विवाह झाला असण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन निष्कंटक नाही.
पुढील लेख:- कोरोना (COVID 19) जागतिक संकट व ग्रहयोग.
पुढील लेख:- कोरोना (COVID 19) जागतिक संकट व ग्रहयोग.

नमस्कार १ जुलै २०२० ला प्रश्नकर्त्याने त्यांचे विश्लेषण दिले, पण विवाहाची तारीख सांगितली नाही. त्यांनी त्यात फक्त खालील उल्लेख केला आहे.
उत्तर द्याहटवा"मी 24 जून ला पाठवलेल्या प्रश्नावर ग्रुपमधील सदस्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार .
यात श्री. योगेश दैठणकर सरांचे उत्तर जास्तीत जास्त जवळ येऊन पोचले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन !"