||श्री||
जन्मवेळ शुद्धीचा गुंता. भाग -१
जन्मवेळ शुद्धी वर मी लवकरच पोष्ट लिहील हे मी
एक/दोन ग्रुपवर या संबंधी चर्चे दरम्यान बोललो होतो. मला प्रत्यक्ष उदाहरणाने समीक्षा
करायची होती. या चर्चेच्या नुकतेच काही दिवस अगोदर मी एक कुंडली पाहिली होती जी या
साठी मला योग्य वाटली. तारीख ०२/०६/१९८२, जन्मस्थान-पडघा,ता-भिवंडी,जी-ठाणे. जातकाची
जन्मवेळ पहाटे ५ ते ६ च्या दरम्यान त्याची माता सांगते. म्हणजे हे उदाहरण खरे
शास्त्रोक्त नष्ट जातक आहे. अगदी अलीकडच्या CIL
सारख्या पद्धतीत जे BTR केले जाते ती त्या पद्धतीची गरज आहे त्याला नष्ट
जातक म्हणावे का? सबसब लेवलला गेल्या मुळे मिनिटां / सेकंदा पर्यंत नोंदवलेली अचूक
जन्मवेळ असली तरी शुद्धीकरण त्यांना अपरिहार्य आहे आणि ह्या मुळेच शुद्धी करणात
विसंगतीही कशी निर्माण होते हे दर्शविण्याचा हेतू या पोष्ट मध्ये आहे. याचा विचार
न करता जन्मवेळ चुकीची होती व मीच केलेले शुद्धीकरण (किंवा अमुक पद्धतीने केलेले
शुद्धीकरणच बरोबर आहे) बरोबर असते हे बिंबवणाऱ्या पोष्ट जास्त दिसतात. पारंपारिक
शुद्धी पद्धती कुचकामी आहेत हे तर त्या पद्धतींची यत्किंचितही माहिती नसलेलेही
उच्चरवाने सांगत असतात. शुद्धी करणाची कोणतीही पद्धत पूर्ण खात्रीची नाही या कडे
लक्ष वेधन्याचाही हेतू या लेखा द्वारे आहे. पारंपारिक वर चर्चा होत असतात या भागात
मी कृष्णमुर्ती (होय मिलॉर्ड मी हि पद्धत वापरतो तरीही) वर प्रथम सहोदारण विचार
करून पारंपारीक कडे जाईल. CIL कृष्णमूर्तीचेच अपडेट आहे असे म्हणत असल्याने
त्याचा वेगळा विचार मी करणार नाहीये.
जातकाने दुसऱ्या ज्योतिषाने संशोधित केलेली पहाटे
५:३७:५५ हि जन्मवेळ हि सांगितली. या नुसार लग्नाचा सब
चंद्राशी निगडीत असल्याने जन्मवेळ बरोबर म्हणता येईल. शासक ग्रह घेवून शुद्धीकरण
करणे याच बरोबर दुसरा एक मार्ग कृष्णमुर्ती पद्धतीत आहे, तो म्हणजे विचारणीय
भावाच्या सब वरून शुद्धी करणे. जातकाचा विवाह प्रश्न पहाते वेळी सप्तमाच्या सब
वरून मी पहाटे ४:३९:३८ अशी केली. सप्तम बिंदू वृश्चिकेत ११/३१/४७ वर होता. सप्तमाचा
सब चंद्र त्या वेळच्या शासक ग्रहात नव्हता. मंगळ
वक्री गुरुच्या नक्षत्रात असल्याने बाद. {६/६/२०२० २१:५७ LS-र,
L-श, S-के, R-गु(के), D-श.} पहाटे ५
वाजता वृषभ लग्न १ अंशा वर होते म्हणजे तसे लग्नाचा प्रश्न नाही, पण ५ ते ६ हा
अंदाज आहे म्हणजे ५ च्या थोडे आधी किंवा ६ च्या थोडे नंतर शक्य आहे. या पद्धतीने
सामान्यत: जो सब आहे त्याच्या मागचा पुढचा सब जो रुलिंग मध्ये असेल तो निश्चित
केला जातो. चंद्राच्या अगोदरचा रवी शासक ग्रहात असल्याने तो सब म्हणून घेता येईल.
पण इथे जो सब आहे तो अगोदरच संशोधित जन्मवेळे वरून आहे. एका तासाच्या दरम्यान १०
सब आहेत, शिवाय वेळ थोडी मागे किंवा नंतरची असेल तर? सप्तमात वृश्चिक रास आहे ती
तूळ असू शकते, कारण मंगळ वक्री गुरुच्या नक्षत्रात आहे. शुक्र शासक ग्रहात नाही पण
जातकाने होरारी नंबर १२५ दिला होता जो तुळेत येतो तरीही शुक्र स्वत: वक्री आहे पण
मंगळ वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असल्याने त्याच्या पेक्षा हा बरा. त्या मुळे
तुळेतील गुरुच्या नक्षत्रातील रविचा सब सप्तम बिंदू म्हणून मी निश्चित केला. त्या
नुसार ४:४९:३८ हि वेळ घेतली. या वेळेच्या लग्नाचा
सब मंगळच आहे जो चंद्राशी निगडीत आहे, त्या मुळे हि वेळही बरोबर आहे? जरी मी
जन्मवेळ करेक्शन केले असले तरी जातकाच्या प्रश्नाचे उत्तर होरारी कुंडली वरून
दिले.
लगेचच ५ दिवसांनी जातकाने नोकरी व्यवसाया बाबत
प्रश्न विचारला. आता दशमाच्या सब वरून बघितले तर? जातकाने नोकरी साठी होरारी नंबर
८० दिला त्या वेळी म्हणजे ११/६/२०२० २०:३४ ला शासक ग्रह होते
LS
|
शु
|
L
|
गु(के)
|
S
|
रा
|
R
|
श
|
D
|
गु(के)
|
५:३७:५५ च्या कुंडलीत दशमाचा सब शनी आहे जो वक्री
आहे व ४:४९:३८ च्या कुंडलीतही शनीच आहे. मग आता परत तिसरी वेळ काढायची का?
(वास्तविक मी स्वत:ची पाठ थोपटून घेवू शकतो कारण मी काढलेल्या वेळे नुसार
दुसऱ्यांदा विचारणीय भावाचा सब शासक ग्रहात आला.) शासक ग्रह वक्री ग्रहाच्या
नक्षत्रात नसावा तो स्वत: वक्री असला तर चालेल. असे विधान काही जन करतील पण माझे
या वर असे मत आहे कि आपण येथे दशेचा विचार करत नाहीये कि आत्ता शासक ग्रह वक्री
असला तरी दशा ज्यावेळी असेल त्या वेळी तो मार्गी असला म्हणजे झाले. आपण भावाचा सब तपासत
आहोत ज्याचा परिणाम जन्मवेळेवर होणार आहे. भावाचा सब वक्री नसतो असे हि मला
म्हणायाचे नाही. भावाचा सब वक्री असतो. जन्मवेळी बुध, गुरु, शनी वक्री होते. त्या मुळे
कोणत्या तरी भावाचा सब वक्री येणारच. प्रश्न हा नाही, प्रश्न जन्मवेळ संशोधनाचा
आहे व त्या साठी शासक ग्रह निवड निकसाचा आहे. मी कितीही अचूक जन्मवेळ संशोधनाचा
दावा केला तरी तो चूक ठरू शकतो किंवा चूक ठरवता येतो.
आता दशमाचा सब सुधारायचा म्हटल तर राहू/शुक्राचा विचार करायला लागेल.
म्हणजे ५:३७:५५ च्या कुंडलीत तो मकरेत २९/२६/०९ वरून कुंभेत २/४०/०० वर घ्यावा
लागेल (५:५०:३०) या लग्नाचा सब गुरु चंद्राशी निगडीत नाही किंवा मकरेत २४/०६/४० (५:१७:०५)
या वेळेच्या लग्नाचा सब बुध चंद्राशी निगडीत आहे. या प्रमाणे ४:४९:३८ च्या
कुंडलीतील मकरेत १७/१३/१८ वरून मकरेत ११/५३/२० (४:२८:०२) या वेळेचा लग्नाचा सब शनी
चंद्राच्या युतीत आहे, पण जातकाने सांगितलेल्या टाईम पिरीयेड च्या जरा जास्तच मागे
जातो किंवा मकरेत २०/२६/४० (५:०२:३५) लग्नाचा सब गुरु आहे. या पैकी कोणतीही वेळ
घेतली तरी सप्तम बिंदू चे केलेले संशोधन चुकेल, आणि ते जमवून आणले तरी नंतर परत जर
जातकाने ज्योतिषाला दुसरा काही प्रश्न विचारला तर त्या वेळी परत गडबड.
चंद्र जन्मदिवसाच्या पूर्व रात्री
१:१९ ते जन्मदिनाच्या उत्तर रात्री ३:०२ पर्यंत मंगळाच्या चित्रा नक्षत्रात होता. राहूच्या
सब मध्ये तो पहाटे २:४८:१६ ते सका ६:३८:१३ दरम्यान होता. म्हणजे जो एका तासाचा
कालखंड जन्मवेळे साठी विचारार्थ आहे त्या दरम्यान चंद्र कन्येत मंगळाच्या
नक्षत्रात राहूच्या सब मध्ये होता. या दरम्यान लग्नाचे बुध, मंगळ, राहूचे सब
चंद्राशी निगडीत येतील. (CIL मध्ये चंद्राचा सबसब ग्रह अजून वाढेल.) विचारणीय वेळेत
लग्नाचे साधारण १० सब येतात हे वरती म्हटले आहेच. काटेकोरपणे पहाटे ५ ते ६ हि वेळ
विचारात घेतली तर वृषभ लग्न १ अंश ३५ कला २२ विकला ते १७ अंश ५ कला ३३ विकला होते.
या दरम्यान रविच्या नक्षत्रातील गुरु ते शुक्र हे पाच सब व चंद्राच्या नक्षत्रातील
चंद्र ते शनी हे ५ सब येतात. म्हणजे एका तासात वृषभेतील बुधाचा सब (५:१३:१४ ते ५:२०:२३),
मंगळाचा सब (५:३६:१७ ते ५:३९:१९) व राहूचा सब (५:३९:१९ ते ५:४७:१२) किमान या तीन
वेळा जन्म चंद्राशी संबंधित येणार म्हणजे बरोबर येणार. (सबसब घेतल्यास अजून एक वेळ
वाढू शकते.) जन्मवेळ संशोधनाच्या वेळी मिळालेले शासक ग्रह, नियम व सांगड यानुसार
ज्योतिष वरील पैकी एक वेळ काढणार व ती अचूक आहे
सांगणार तर दुसरा दुसरी वेळ आली तर तो पहिल्याला चूक ठरवणार. म्हणजे जी
गोष्ट पारंपारिक मध्ये होते तीच येथेही होते. क्रमश: ......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा