||श्री||
आमिष भाग -२.
मागील भागात आपण जातकाच्या जीवनात घडलेली
गोष्ट बघितली या भागात आपण कुंडलीचे विश्लेषण करणार आहोत. प्रथम कृष्णमूर्ती पद्धतीने
बघू. सप्तमाचा सब गुरु आहे जो लाभेश आहे पण त्याचा नक्षत्र स्वामी शनि वक्री असून
१०,१२ चा बलवान कार्येश आहे. गुरु रविच्या सब मध्ये असून रवि त्याला अनुकूल
भावांचे कार्येशत्व देत नाही. येथे अपणास KP चा मुलभूत नियम ठळकपणे प्रत्ययास येतो
आहे तो म्हणजे ग्रह त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देतो. सब गुरु लाभाचा
कार्येश असल्याने विवाह व्हायला हवा होता पण नक्षत्रस्वामी विरोधी कार्येश आहे.
वयाच्या २० ते ३८ वर्षे दरम्यान राहू महादशा होती म्हणजे विवाह योग्य काळात होती.
राहू शनीच्या मकरेत चंद्राच्या नक्षत्रात बुधाच्या सब मध्ये आहे. बुध व्दितीयेश
आहे एवढेच बाकी अनुकूल कार्येशत्व नाही, बर बुध चारपदरी कार्येशत्वा नुसार
व्दितीयाचा बलवान कार्येश होत नाही. पण साधारण कार्येशत्वाच्या जोरावर घटना
घडवण्यासाठी केतू २, शुक्र ७, मंगळ ७, हे व गुरु ११, बुध २ आणि चवथ्या पायरीवर २
चे कार्येशत्व लाभणार रवी अशी फौज अंतर्दशा, विदशा देत होती. पण दशेंचे नेतृत्व
करणारा राहू सारखा कमांडरच विरोधात गेल्याने जयमाला काही गळ्यात पडली नाही.
घटना कोणत्या महादशेत अंतर्दशेत घडल्या ते आधी नोंदवून घेवू. येथे कृष्णमुर्ती अयनांशा प्रमाणे दशा घेतल्या आहेत.
१)जुलै ते ऑक्टों २०१७ दरम्यान एजंट महिलेशी
ओळख.
गुरु म.द. शुक्र अ.द. २४/०९/२०१६ ते २६/०५/२०१९,
विदशा चंद्र २३/०४ ते १३/०७/२०१७, मंगळ ०८/०९/२०१७,
राहू ०१/०२/२०१८,
२)ऑक्टों. ते डिसेंबर २०१८ – मुलीची आत्महत्या.
७ ते ८ लाखाचे दागिने. गुरु म.द. शुक्र अ.द. २४/०९/२०१६ ते २६/०५/२०१९, विदशा शनि ११/६
ते १२/११/२०१८, बुध ३०/०३/२०१९
३)जुलै २०१९ – कर्ज- ४८ व्या वर्षी, गुरु म.द.
रवि अ.द. २६/०५/२०१९ ते १३/०३/२०२०
चंद्र वि.द. १०/०६ ते ०४/०७/२०१९, मंगळ २१/०७/२०१९,
राहू ०३/०९/२०१९
४) डिसेंबर २०२१ प्रकरण मिटले. – गुरु म.द.
मंगळ अ.द. शनि वि.द. ०७/११/२०२१ ते ३१/१२/२०२१
त्या नंतर गुरु महादशा १२/११/२०२४ पर्यंत आहे. गुरुचे कार्येशत्व आपण पाहिले आहेच. तो लाभाचा बलवान कार्येश आहे पण पहिल्या पायरीवर, बाकी तीन पायऱ्यांवर विरोध बलवान आहे. वरील फौज आता गुरुच्या नेतृत्वात आहे तरी साखळी जुळवत गाठ काही जुळवली नाही, भलत्याशी गाठ मात्र पडाली. प्रकरणाची सुरुवात, आशा, भिती, दडपण, तणाव, बदनामी, कर्ज, वित्तहानी, पिळवणूक, प्रकरणाचा शेवट सगळ गुरु महादशेत झाले. गुरु ५,६,८,१०,११,१२ या भावांचा बलवान कार्येश आहे व सगळ्यांची फळे मिळाली.
शुक्र भूक्तीत मध्यस्थ महिलेशी परिचय झाला. विवाहकारक
शुक्राला न.स्वा. मंगळ ७ चे बलावन कार्येशत्व बहाल करत असून शुक्र ५ चाही बलवान
कार्येश आहे. या शुक्राने त्याचे कारकत्व व कार्येशत्वाला जागत केतू किंवा बुधाला
हाताशी धरत विवाह घडवावाना, पण नाही १२ चे कार्येशत्वच त्याने जागवले. शुक्राच्याच
अंतर्दशेत त्या मुलीची कथित आत्महत्या झाली आणि पिळवणूकीचे दुष्टचक्र चालू
झाले.
रवि भूक्तीत जातकाने प्रथम कर्ज घेतेले. रवि २,३,५,१२ चा बलवान कार्येश आहे. जातकाने कर्ज जे घेतले ते काही आर्थिक किंवा इतर उन्नती साठी नाही त्यामुळे १२ भाव दिसतोच आहे. १२ भाव मुक्तीचाही कारक आहे. मंगळ भूक्तीत प्रकरण मिटले आहे म्हणजे जातकाची पिळवणूकीतून सुटका झाली. मंगळ स्वनक्षत्री व स्वउपनक्षत्री आहे व ७,९,१२ चा बलवान कार्येश आहे. पण खरी सुटका कर्जाची परतफेड झाल्यावरच होईल.
या प्रकरणा कडे आपण फक्त विवाह विषयी
फसवणूक या दृष्टीनेच पाहिले जरा पंचमाचा व व्ययाच्या सब कडे बघू. बुध हा ५,१२ दोघांचाही
सब आहे व चंद्राच्या नक्षत्रात केतूच्या उपनक्षत्रात आहे. बुध २,३,५,१२ चा बलवान
कार्येश असून त्याची लाभावर दृष्टी आहे. बुध मुख्यभाव ७चा कार्येश नाही पण २ चा तर
आहे, त्या मुळे या प्रकरणा कडे प्रेम प्रकरण म्हणून पाहिले तरी नुकसान दिसतेच आहे.
आजमितीला जातकाने ५० शी ओलांडली आहे.
न चाय पी, ना गिलास तोडा, टेबल बुकिंग
का बाराणा.......
पारंपारिक प्रमाणे या कुंडली वर नजर टाकू. वृषभ
रास वृषभ लग्न असल्याने जे काही योग झालेत ते बलवान झाले असे म्हणता येईल. सप्तमात
गुरु आहे जो विवाह, वैवाहिक सौख्य या साठी शुभ मानला जातो जोडीदार चांगला लाभतो
असे सर्व साधारण फळ आहे. परंतु या कुंडलीला तो त्रिकस्थानाचा स्वामी आहे, दुसरे तो
लाभाचा स्वामी असला तरी लाभ भाव हा नाशकभावही मानला जातो. त्या मुळे वृषभेला गुरु
तितका चांगला नाही, त्यात हा गुरु पापग्रह शनीच्या नक्षत्रात आहे. व शत्रू नवमांशी
आहे. शनी वृषभेला योगकारक असल्याने शुभ आहे तो लग्नी वक्री असल्याने बलवान आहे.
शनी सप्तमावर प्रभाव टाकतो आहे. पण शनी शत्रू चंद्राच्या नक्षत्री असून शत्रू
नवमांशी नवमांशात अष्टमात आहे. हा शनि चंद्र युक्त असल्याने विष योग होत आहे व हा
योग लग्नात झाल्याने सप्तमभाव दुषित होत असून विवाह व वैवाहिक सौख्याला मारक ठरतो
आहे.
सप्तमेश मंगळ भाग्यात उच्चीचा आहे, स्वनक्षत्री आहे. वास्तविक हा योग विवाहा साठी बलवान असायला हवा पण हा मंगळ राहू युतीत आहे आणि इथेच गडबड झाली. मंगळ जरी मित्र नवमांशी असला तरी नवमांशात तो व्ययात आहे. त्यामुळे अश्या प्रकारची फसवणूक झाली. या मंगळाची व्ययावर दृष्टी आहे त्यामुळे वैवाहिक बाबतीतून नुकसान झाले. विवाहकारक शुक्र वर्गोत्तम आहे. एका प्रकारे बघितले तर सप्तमात गुरु मित्र राशीत, सप्तमेश उच्चीचा भाग्यात, सप्तमावर योगकारक शनीची दृष्टी, उच्चीच्या चंद्राची सप्तमावर दृष्टी, कारक शुक्र वर्गोत्तम अशी बलवान परिस्थिती पहता विवाह आणि वैवाहिक जीवन सुखद हवे होते पण मंगळ राहू युती व विषयोग यांनी परिस्थिती पलटवली व विवाह झाला नाही. षष्ठातील शुक्र कर्ज देतो ते प्रामुख्याने विलाशी राहणीमान व शौक यामुळे, तसेच जोडीदारामुळे किंवा जोडीदारा कडून त्रास होतो पण या करता शुक्र सम राशीत पिडीत असायला हवा. या कुंडलीत शुक्र विषम व स्वराशीत आहे पण तो मंगळाच्या नक्षत्रात असून नेपच्यून प्लुटो च्या पापामाध्यात आहे. या मुळे कर्जा साठी वैवाहिक बाब कारणीभूत झाली. विवाह योग्य काली राहू महादशा होती. तसे पाहिले तर राहू मित्र राशीत व मित्र नवमांशी आहे. राहू हा सप्तमेश युतीत असल्याने पराशरीतील नियमा नुसार त्याची महादशा विवाहास अनुकूल होते. राहू महादशेत गोचर हवे तसे मिळाले नसावे. या कुंडलीत शनि गुरुचे गोचरही महत्वाचे आहे कारण त्यांचा सप्तमावर प्रभाव आहे. राहू महादशेत शनि गुरु गोचरीने सप्तम/सप्तमेशाला व परस्परांना शुभयोगात आले नसावेत. सप्तमेशा बरोबर राहू युती मुळे वैवाहिक बाबतीत अशी फसवणूक झाली. जाने. २०१७ ते जाने.२०२० दरम्यान जातकाला पनोती/अडीचकी होती ज्या दरम्यान या प्रकरणातील प्रमुख घटना घडल्या. समजा आईने विवाहास संमती दर्शवली असती व विवाह झाला असता तरी फसवणूक झाली असतीच. विवाह नंतर काही दिवसातच दाग दागिने व हाती लागेल तेवढी रोकड घेवून पोबारा करणाऱ्या ठगसेनांच्या बातम्या येतच असतात.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा