||श्री||
मागील लेख :- चूक भूल देणे घेणे – १
जुळ्यांचे ग्रहयोग
ऐश्वर्या राय,
चंद्रचूड सिंग, शाहरुख खान, प्रिया गील अभिनित ‘जोश’ या चित्रपटात जुळ्या
भाऊ बहिणीची कथा आहे, ज्याचे पोस्टर वर दिले आहे. तसे तर जुळ्यांची कथा असलेले
बरेच चित्रपट आहेत. मग याच चित्रपटाची आज आठवण येण्याचे कारण काय? आज आपण जुळ्या
भावंडांची कुंडली अभ्यासणार आहोत. इतर चित्रपटात जुळे दाखवतांना एकतर दोघे भाऊ
दाखवतात किंवा बहिणी. या चित्रपटात भाऊ बहिण जुळे दाखवले आहेत आणि आजचा विषय
असलेले जुळे हे भाऊ बहिण आहेत म्हणून हा चित्रपट आठवला.
भाऊ -
११/१०/१९९०, सायं ७:३०, बहिण -
११/१०/१९९०, सायं ७:३५, अक्षांश - २०°/३३'/३१" (उ) रेखांश - ७४°/३१'/१७" (पु)
दोघात ५ मिनिटांचे अंतर आहे. भावाच्या सप्तमाचा सब मंगळ
तर बहिणीच्या सप्तमाचा सब गुरु आहे. भावाला बुध महादशा ०३/११/२०३० पर्यंत आहे तर
बहिणीला बुध महादशा १३/१०/२०३० पर्यंत आहे. भावाला मंगळ अंतर्दशा ०२/०५/२०२३
पर्यंत आहे तर बहिणीला मंगळ अंतर्दशा ११/०४/२०२३ पर्यंत आहे. भावाला शुक्र विदशा १३/०१
ते १४/०३/२०२३ पर्यंत आहे तर बहिणीला शुक्र विदशा २३/१२/२०२२ ते २१/०२/२०२३ पर्यंत
होती. महादशानाथ बुध सप्तमेश व कारक शुक्राच्या युतीत आहे. अंतर्दशानाथ मंगळ
व्दितीयात कारक शुक्राच्या राशीत आहे. तर विदशानाथ शुक्र सप्तमेश आहे.
महादशानाथ बुध फोर स्टेप प्रमाणे ७ चा कार्येश आहे.
अंतर्दशानाथ मंगळ २,११ चा तर विदशानाथ शुक्र ७ चा कार्येश होतो आहे पण दुय्यम आहे.
दोघाही भावंडांच्या कुंडलीत कार्येशत्व सारखेच आहे, त्यात बदल नाही. दशेत काही फरक
आहे, पण घटनेच्या वेळी दोघांच्याही दशा विदशे पर्यंत सारख्या आहेत.
भावाचा विवाह वरील दशा काळात १६/०२/२०२३ रोजी ३३ व्या
वर्षी झाला. बहिणीचा विवाह अजून झाला नाही. भावाचा विवाह झाला तो पण उशिराच झाला. पारंपारिक विवाह झाला आहे. व्यवहारातील कारणे काहीही असतील पण ज्योतिष दृष्ट्या काय कारणे आहेत ते पाहू. लग्न
कुंडलीत काही फरक नाही. दोघांचेही बहुतांशी सारखेच योग आहेत. सप्तमेश व कारक शुक्र
नीच अस्तंगत आहे. यात एक जमेची बाजू म्हणजे शुक्राचा नीचभंग बुध व गुरु कडून होत
आहे. गुरु उच्चीचा असल्याने शुक्राचा नीचभंगाला बलवत्ता आहे. सप्तमेश त्याच्या
व्ययात आहे. त्यावर शनीची नजर आहे. या बाबी दोघांच्याही कुंडलीत समान आहेत ज्या
विवाह विरोध किंवा विलंबास कारण आहेत. शुक्राच्या बलवान नीचभंगामुळे विवाह झाला पण
फक्त भावाचा झाला आहे बहिणीचा अजून नाही.
आता फरक पाहू. दोघांच्याही सप्तमात प्लुटो भावारंभा
जवळ आहे. भावचलीत कुंडलीत तुम्ही पहाल तर बहिणीच्या कुंडलीत तो अधिक जवळ आहे. भावाची नवमांश कुंडली कन्यालग्नाची आहे. नवमांश लग्नेश बुध
लग्न कुंडलीत उच्चीचा आहे. नवमांश सप्तमेश गुरु लग्न कुंडलीत उच्चीचा आहे. नवमांश
लग्नेश बुध व कारक शुक्राचा नवमांश परिवर्तन योग आहे जो शुभ स्थानातून होत आहे.
नवमांश लग्नेश नवमांशात भाग्यात आहे. तर बहिणीची
नवमांश कुंडली तूळ लग्नाची आहे. येथेही नवमांश लग्नेश शुक्र नवमांशात भाग्यात आहे.
पण नवमांश लग्नेश शुक्र लग्न कुंडलीत नीचभंगात आहे. नवमांश सप्तमेश मंगळ लग्न
कुंडलीत शत्रूगृही आहे. कारक शुक्राचा येथे बुधाशी जो नवमांश परिवर्तन होत आहे
त्यात अष्टमस्थान आले. नवमांश कुंडलीतही प्लुटो सप्तमात आहे. या मुळे
भावाचा विवाह उशिरा का होईना झाला आहे पण बहिणीचा अजून रखडला आहे.
पुढील लेख:- सारस्वतांच्या कुंडल्या.


Sundar
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
हटवाThanks for sharing 🙏🏼
उत्तर द्याहटवा🙏
हटवाबहिणीचा विवाह २०/११/२०२४ रोजी संपन्न झाला.
उत्तर द्याहटवा