||श्री||
मागील लेख :- सारस्वतांच्या कुंडल्या.
आकांक्षा – जन्मवेळ संशोधन.
२८/०३/२०२३,१४:५६,नाशिक :- भोजपुरी तारका आकांक्षा दुबे हिने रविवारी २६/०३/२०२३ ला दुपारच्या सुमारास हॉटेल मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची कथित बातमी आली. जन्मतारीख २१/१०/१९९७, विंध्याचल, मिर्झापूर, उ.प. 25°09'27.8"N, 82°30'13.5"E जन्मवेळ नेहमीप्रमाणे अर्थातच उपलब्ध नाही. म्हणून जन्मवेळ संशोधन करायचे ठरवले. अर्थात जन्मतारीख अचूक दिलेली आहे हे गृहीत धरून.
L - चं, S- मं(रा), R- बु, D- मं(रा)
शासक ग्रहात चंद्र
असल्याने जन्म रात्री झाला असावा. म्हणजे २१ ऑक्टो. पूर्वरात्री १२ ते सूर्योदय व
सूर्यास्त ते रात्री १२ दरम्यान शक्यता आहे. |उदयात् उदयं वार:| असे शास्त्र वचन आहे. पण प्रसूतीगृह शास्त्र मताने नाही तर पाश्चात्य
मताने जन्मनोंद करते म्हणून असा विचार करावा लागतो. जन्मतारखेला चंद्र मिथुनेत
आर्द्रा नक्षत्रात सका.०९:०२ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३३ पर्यंत होता. सूर्योदय
६:०४ तर सूर्यास्त १७:२५ होता. कर्क लग्न २३:०३ ते ०१:२१, सिंह – ३:३५, कन्या – ५:४७,
तूळ – ८:०४ तर मेष – १७:११ ते १८:४९, वृषभ – २०:४६, मिथुन – २२:५९, कर्क – १:१७
अश्या प्रकारे लग्ने उदित होती. यातील कर्क, कन्या, मेष, मिथुन या पैकी लग्न असणार
आहे. कर्क लग्न घ्यायचे झाले तर त्यातील फक्त बुध नक्षत्रस्वामी हजर आहे. जे
०:१९:५८ ते १:२०:५१ दरम्यान आहे. कन्येतील
हस्त व चित्राचा विचार करावा लागेल. जे ४:१८:४५ ते ५:१७:४१ व ५:४७:२२ पर्यंत आहे.
मेषेतील एकही नक्षत्रस्वामी हजर नाही. मिथुनेतील मंगळाचे नक्षत्र २०:४५:३६ ते २१:१४:१४
दरम्यान आहे. मिथुन, कर्क, कन्या या पैकी लग्न असणार आहे. सर्वात बलवान म्हणून
कर्क लग्नाचा विचार करता येईल.
पण दुसरा नियम येथे
लावून पाहू तो म्हणजे जन्मलग्न, जन्मचंद्राचे सहशासक हे प्रश्नचंद्र, प्रश्नलग्नाचे
सहशासक असतात. प्रश्नचंद्राचे सहशासक बुध, मंगळ, रवि, शुक्र आहेत. त्यामुळे कर्क
लग्न बाद झाले. आता मिथुन आणि कन्या लग्न उपांतफेरीत पोहचले आहेत. यातही कन्येचे
हस्त नक्षत्र बाद झाले. म्हणजे जन्मवेळ एकतर पहाटे ५:१७:४१ ते ५:४७:२२ दरम्यान
असावी किंवा रात्री ८:४५:३६ ते ९:१४:१४ दरम्यान असावी. राहू शासक ग्रहात असल्याने
पहाटेची वेळ निश्चित करता येईल. मंगळ शासक ग्रहात दोनदा आहे. मिथुनेत तो दोनदा येणार
नाही म्हणजे मिथुनेत मंगळाच्या नक्षत्रात मंगळाचे उपनक्षत्र नाही, कन्येत ते आहे.
तरीही एक संभ्रम निर्माण होतो तो म्हणजे प्रश्नचंद्राचे सहशासक सुद्धा आपण जन्मलग्नाशी जुळवतो आहोत ते कन्या लग्नात होणार नाही. कन्या
लग्नात मंगळाच्या नक्षत्रात रवि किंवा शुक्र नाही. रवि शासकग्रहातील बुध युक्त आहे
त्यामुळे अतिरीक्त शासक म्हणून त्याचा विचार करता येईल. मंगळ शासकग्रहात दोनदा आला
म्हणून घेतलाच पाहिजे का? सध्या लग्नबिंदू मिथुनेत मंगळाच्या नक्षत्रात रविच्या
उपनक्षत्रात घेवू. जन्मवेळ रात्री ९:०६:३१ ते ९:०९:२४ दरम्यान असावी. जन्मवेळ
संशोधन एवढ्यावरच संपत नाही. आलेली कुंडली चरित्राशी ताडून पहावी लागते.
जातक कलाक्षेत्रात
कार्यरत होती. तृतीयेश रवि पंचमात शुक्राच्या राशीत हा या दृष्टीने पूरकयोग होईल.
तृतीयात राहू आहे. लग्नेश बुध पंचमात शुक्राच्या राशीत, दशमातील शनि पंचमातील
बुधाच्या नक्षत्री आहे. या मुळे कलाक्षेत्राशी संबंध आला. दशमाचा सब शनिच आहे जो
पंचमाचा बलवान कार्येश आहे. विपरीत राजयोग होतो आहे. आत्माकारक रवि व जीवकारक गुरु
दोघेही नीचभंगात आहेत. गुरु अष्टमात आहे तर रविचा निचभंग करणारे ग्रह षष्ठात आहे.
कुंडलीत शुभग्रह बलवान नाहीत. गुरु निचभंग योगात आहे पण अष्टमात आहे, शुक्र षष्ठात
पापग्रह युक्त आहे, वद्य सप्तमीचा चंद्र ८ कला असल्याने तो क्षीण, निर्बली आहे. लग्नेश व
लग्नेशस्थित राशी स्वामी हे शुभग्रह दृष्टी विरहित आहेत. उलट पापग्रह अष्टमेश शनि बलीकेंद्रात
आहे. लग्नेश अस्तंगत आहे, त्यामुळे अष्टमेश बलवान ठरला. हे अल्पायु योग झाले व आयुष्य
विघातक ठरले.
२५ व्या वर्षी
आत्महत्या केली म्हणजे अल्पायु झाली. लग्नाचा सब रवि तारक ५ व मारक २,६ चा बलवान कार्येश
आहे जो मध्यायू दर्शवितो. शनि महादशेत बुध अंतर्दशेत राहू विदशेत जातकाचा मृत्यू
झाला. शनि २ चा तर राहू २,६,१२ या मारक भावांचा बलवान कार्येश आहे. बुध मारक
भावांचा बलवान कार्येश नाही पण भावचलीतात तो व्दितीयेश आहे व त्याचा सब गुरु
सप्तमेश.
आत्महत्येवर संशय
व्यक्त केला जात आहे. अभिनेत्रीच्या आईने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव घेतले आहे.
व्यावसायिक व आर्थिक प्रकरणात त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती असे ती
सांगते. तो फरार आहे. तिच्या कामाचे करोड रुपये तो देणे लागत होता, तसेच तिने
दुसऱ्या सोबत काम करू नये म्हणून दबाव आणत होता. विवाह झाला नव्हता म्हणून
पंचमस्थान विचारात घ्यावे लागेल. आपण संशोधित केलेल्या कुंडलीत पंचमेश शुक्र
षष्ठात मंगळाच्या दिप्तांश युतीत प्लुटोसह आहे. षष्ठात हि युती आल्याने
प्रेमसंबंधातून वैर दर्शविते. तसेच पंचमेश शुक्र हा चंद्रचा ६४ वा नवमांशस्वामी
आहे जो स्वत: क्रूर द्रेष्काणात आहे. अष्टमातील नेपच्यून मृत्यू संबंधी गूढ दर्शवितो.
अनैसर्गिक मृत्यूचे संकेत देणाऱ्या ग्रहांपैकी तीन ग्रह अष्टमाशी संबंधित आहेत. हर्शल,
नेपच्यून अष्टमात असून शनि अष्टमेश आहे. २२ व्या द्रेष्काणाचा स्वामी शनि आहे.
नेपच्यून मुळे गूढत्व आहे तर हर्शल मुळे दाहकता.
आपण केलेले जन्मवेळ संशोधन बरोबर असण्याची शक्यता आजमावण्या साठी मला वाटते इतके परीक्षण ठीक आहे. इतक्या घटना जुळतायेत पण अष्टमभावावर निगल चा प्रभाव आहे हे जरा खटकते आहे. संशय व्यक्त केला जात असला तरी सकृतदर्शनी आत्महत्या म्हणून पुढे आलेल आहे. अष्टमेश व २२ व्या द्रेष्काण स्वामीवर सर्पाचा प्रभाव आहे. खरे तर पाश चा प्रभाव कुठेतरी दिसायला हवा होता. निगल हा दबाव, बंधन दर्शवितो तर सर्प मादकद्रव्य प्रयोग, विषप्रयोग दर्शवितो. सर्पही फास आवळतो पण मग हि आत्महत्या होणार नाही.
पुढील लेख लवकरच.......

केवळ अप्रतिम
उत्तर द्याहटवाजी, धन्यवाद.🙏
हटवा