गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

मंगलाचरण

।। श्री. ।।

।। श्री. गणेशाय नम: ।।                        ।। श्री. कुलदेवताय नम: ।।



श्रीदं सदाहं हृदयारविन्दे पादारविन्दं वरदस्य वन्दे।
मंदोSपि यस्य स्मरणेन सद्यो गीर्वाणवन्द्योपमतां समेति ।।

जातकभरण, श्लोक १ - माझ्या हृद्यरुपी कमळात मी सदैव रिध्दी सिध्दी दाता श्री.गणेशाचे चरणकमलाचे वंदन करतो. ज्यांचे स्मरण करण्याने मंदबुद्धी सुद्धा लवकरच बृहस्पती समान होतो. 

होरापाथोनिधे: पारं दुष्पारं तर्त्तुमिच्छत: ।
महागणपते: शुण्डोSवलम्बाय प्रजायताम् ।।

होरारत्न श्लोक १ - पार करण्यास कठीण असा होराशास्र रुपी समुद्र पार करण्याची इच्छा असणाऱ्यांनी श्री. महागणपतीच्या सोंडेचा आधार घ्यावा. 

                       प्रथमपूजीत श्री.महागणपतीला व श्री.कुलदैवतांना वंदन करून मी आज आश्विन शुद्ध नवमी शके १९४०, विलंबीनाम संवत्सरे विजयादशमीच्या मुहूर्तावर या ब्लॉग चा शुभारंभ करत आहे. हा ब्लॉग प्रामुख्याने ज्योतिष, मुहूर्त, व्रत उत्सव इ. निर्णय या साठी असेल. आशा करतो कि मी वाचकांच्या पसंतीस उतरेल. वाचकांचे भरभरून प्रेम मला मिळेल. आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. 


।। शुभं  भवतु ।।






२ टिप्पण्या: