ज्योतिष विषयी ग्रुपवर वारंवार, सतत
चर्चिल्या जाणाऱ्या विषयां पैकी एक विषय म्हणजे एकानाडी दोष असता रक्तगट तपासण्याचा
सल्ला ज्योतिषी देतात हा असतो. खर तर मला हे असे कुणाला बोलणे योग्य वाटत नाही पण ते
ज्योतिष शास्राशी निगडीत नसलेली गोष्ट सांगतात. असा सल्ला देणारे ज्योतिषी अभ्यासू
नसावेत. मान्य मला कि हा सल्ला व्यवहारिक आहे. पण एकनाडी असता रक्तगट तपासा व तो
एक नसल्यास विवाह करा असा सल्ला देणे चुकीचे वाटते. ज्योतिषातील एकनाडी चा परिहार
भिन्न रक्तगट कसा होवू शकतो? एका ग्रुपवर नुकतीच या विषयावर चर्चा झाली. अनेक
ग्रुपवर होत असते. तर त्या वेळी केलेले भाष्य (comment) इथे चिटकवत
आहे.👇
रक्तगट व नाडीगट यातील परस्पर संबंध (corelation) हे ही संदर्भहीन
वाटते. गुणमिलानातील नाडी व आयुर्वेदीय नाडी यांचा संबंध जोडला गेल्यानंतर त्याही
पेक्षा एकनाडी असता संतती होत नाही हे प्रचलीत झाल्यावर अगदी अलीकडे तो रक्त
गटाशीहि जोडला गेला असावा. एखाद्या अफवे प्रमाणे हे झाले असावे. कारण आधुनिक वैद्यक
शास्रात एक रक्तगट असता संततीत अनुवांशिक आजार संक्रमित होण्याची शक्यता जास्त
मानतात. गुणमिलनाचे अल्पकाळ बाजूला ठेवले तरी वैद्यक शास्रात असे नाडी व रक्तगट
संशोधन झाले आहे का?
मागे यावर चर्चा झाली होती कोणत्या
ग्रुपवर ते आठवत नाही. त्यावेळी अमुक एक रक्तगट असता अमुक एक आयुर्वेदातील नाडी
असते असे काही वैद्यक शास्रात आहे का?
असे मी Dr.
Sushant Revadekar यांना विचारल्याचे स्मरते. त्यावेळी
त्यांनी रक्तगट व आयुर्वेदातील नाडी यांचा असा काही संबंध नसल्याचे बहुतेक
सांगितले होते. मग रक्तगट व गुणमिलनातील नाडी यांचा तरी कसा संबंध येईल?
गुण मेलनातील आदी, मध्य, अंत्य नाडी व
आयुर्वेदातील वात,
पित्त,
कफ प्रकृती नाडी यांचा संबंध कधी पासुन याचा आदमास लागत नाही. गुणमेलन हे
केवळ चंद्र नक्षत्रावर आधारीत असल्याने ते मन, स्वभाव, वृत्ती, कल, आवड याशी निगडीत
आहे हे निर्विवाद. पण स्वभाव व प्रकृती एकमेकांवर प्रभाव टाकतात हे ही आता नविन
संशोधन नाही. उदा. एरवी शांत वाटणारी व्यक्ती आजारपणात चिडचिड, किरकिर करते. तर
अशांत,
चिडचिडया व्यक्तीला विशिष्ट आजार होतात. हे आपण व्यवहारात अनुभवतो. अश्याच
अनुभवांवरून गुणमेलन व आयुर्वेद संबंध जोडला गेला असावा. अमुक एक रक्तगट असता
व्यक्तीचा स्वभाव ढोबळ असा असतो असे कुठे अनुभवात येत नाही किंवा तसे संशोधनही
माझ्या तरी वाचनात नाही.
धन्यवाद शुभरात्र
👆 वरती आयुर्वेदातील नाडी व रक्तगट या वर
प्रामुख्याने विचार व्यक्त केले. आता गुनमेलनातील नाडी व आयुर्वेदातील नाडी या
विषयी. माझ्या स्वत:च्या उदाहरणावरून सांगतो. माझी नक्षत्र नाडी आद्य आहे. प्रचलित
संबंधा नुसार माझी प्रकृती वात हवी. शाळा कॉलेजात असतांना कधीतरी वैद्याकडे नाडी
तपासली होती मला कफाचा त्रास होत होता म्हणून. एका वैद्याने पित्त नाडी
सांगितली पित्ताचाही त्रास आहे. दुसऱ्याने पित्तकफ नाडी सांगितली. काहींची त्रिदोष
प्रकृतीही असते. म्हणजे आयुर्वेदात वात, पित्त, कफ व्यतिरिक्तही इतर संमिस्र नाडी
आहेत. नक्षत्र नाडी चे तर आदी, मध्य, अंत एवढेच प्रकार आहेत जे वात, पित्त, कफ
यांच्याशी क्रमश: जोडले आहेत. मग बाकी प्रकृती गुणमेलनात कश्या ओळखायच्या व त्या
संमिस्र एक नाडी दोषाचे काय?
मी गुणमेलन कुचकामी आहे किंवा नाडीपादवेध
निरुपयोगी आहे या मताचा नाही. गुणमेलानात त्याचा विचार करतोच. मग तुम्ही म्हणाल
ज्याचा वापर करता त्यालाच नावे ठेवून पोलखोलचा दुटप्पीपणा का करता? तर नक्षत्र
नाडीचा आयुर्वेद नाडीशी व आयुर्वेद नाडीचा रक्तगटाशी (माझ्या माहिती प्रमाणे अजून
तरी, माझे अज्ञान असू शकते. त्या बद्दल दिलगिरी) संबंध नसल्याने नक्षत्र नाडी चा
रक्तगटाशी संबंध नाही. ( A is not equal to B, B is not equal to C then A is also not equal
to C) या नक्षत्र नाडीचा
वापर फक्त गुणमेलनातच होतांना दिसतो. पत्रिकेवरून आरोग्य विचार करतांना षष्ठ, षष्ठेश, ग्रहयोग या
बरोबर या नाडीचा विचार का होत नाही हे एक कोडेच आहे? मी सुरवातीला आरोग्य विचार करतांना
नक्षत्र नाडी विचारात घेत, फार नाही आगदी दहा पंधरा वेळा असे तपासले असेल. नक्षत्र
नाडी दर्शवीत असलेली प्रकृती व जातकाचे आजार जुळले नाही, कर्मधर्म संयोगानेही एकातही
नाही. त्यामुळे पुढे ते माझ्या कडून सुटले. वरती म्हटल्या प्रमाणे मला वाटते गुणमेलनात
नक्षत्रशीलात नाडी जी आहे ती स्वभाव, मनाशी संबंधित असावी. मन आणि शरीर प्रकृती
एकमेकांवर प्रभाव टाकत असल्याने वात, पित्त, कफ शी तो जोडला गेला. एखाद्या
रागावलेल्या व्यक्ती बाबत जसा ‘त्याचे पित्त खवळले’ असा वाकप्रचार वापरतो काहीशे
तसे. नक्षत्र नाडी प्रकार तीनच असल्याने मूळ तीन प्रकृतीशी त्याचा संबंध जोडला.
नक्षत्रशिला
मध्ये नाडी प्रमाणेच अजून एक घटक आहे. तो आपल्या कडे प्रचलित नाही. त्याचा उपयोग
कुठे कसा करतात ते मलाही माहित नाही. तो गुजराथ, उत्तर भारतात प्रचलित असावा असे
वाटते. माझे काही गुजराथी जातक कुंडलीत युंजा लिहिण्या विषयी सांगत. रेवती ते
मृगशीर्ष असे सहा नक्षत्रांची पूर्वयुंजा, आर्द्रा ते अनुराधा अस्या १२
नक्षत्रांची मध्ययुंजा तर ज्येष्ठा ते उत्तर भाद्रपद अस्या ९ नक्षत्रांची अंत्ययुंजा
असते. वाटणी सलग असली तरी सामान नाही. आणि सुरवात रेवती नक्षत्रा वरून
असल्याने वसंत संपात रेवतीत आल्यावर केव्हा तरी युंजा अस्तित्वात आली असावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा