बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

काळवेळेचे गणित चुकते कसे ? - 1


काळवेळेचे गणित चुकते कसे ?

भाग -१ 

"नमस्कार, मी पत्रिका post करतेय. जन्म तारीख 17/4/1983 जन्म वेळ : पहाटे 4:11 स्थान कोल्हापूर. लग्न झाल (१८/२/२०१३) आणि दोन महिन्यात शुगर आहे अस कळल आणि लगेचच पायाला जखम झाली आणि ती बरी झाली नाही 4 वर्ष ती जखम होती आणि मागील महिन्यात 29 सप्टेंबर 2018 ला सायं. 5:15 ते 5:30 च्या दरम्यान हार्ट attack आला आणि death झाली. अस का झाल असाव?"

जातकाचा मृत्यू ३६ व्या वर्षी (३५ वर्षे ५ मास १२ दिवसांनी) गुरु दशा बुध भुक्ती गुरु विदशेत झाला. ३३ ते ७४ दरम्यान मृत्यू हा मध्यायू योग होतो. तर ३३ ते ४६ वर्षे हा अल्पमध्यायू योग होतो. जातक हा अल्पमध्यायू होता.
         
“वरील उदाहरणात घटना घडून गेली आहे त्याची कारणमिमांशा आपण करणार आहोत. प्रत्येकाचा एक अभ्यास, अनुभव व दृष्टीकोन असणार आहे, त्यामुळे मी करत असलेली चिकीत्साच बरोबर आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही.” वरील प्रश्न फेसबुक वरील एका ज्योतिष अभ्यास ग्रुप मध्ये विचारला गेला होता.

           प्रथम आयुर्दायचा विचार करू. कुंडली बलवान आहे. सुखस्थानात मालव्य योग, लग्नेश भाग्यात उच्चीचा. हे योग जातकाचे आयुष्य सुखी, संपन्न, विलासपूर्ण, दाखवतात याचा आयुर्दायाशी काय संबंध? असे वाटत असले तरी कुंडलीची बलवत्ता आयुष्य वर्धक होते, खास करून ज्यावेळी लग्नेश बलवान असतो त्या वेळी तरी. लग्न ते चतुर्था पर्यंत चार पाच ग्रह असता दीर्घायू योग होतो. विचाराधीन कुंडलीत पाच ग्रह आहेत पण काय झाले हे स्पष्टच आहे, ठीक. लग्नेश हा अष्टमेशा पेक्षा बलवान असताही आयुष्यवर्धक होतो. अष्टमेश तृतीयात (अष्टमाच्या अष्टमात) परमशत्रू मंगळाच्या राशीत मंगळ युक्त असल्याने तो बलवान नाही. या झाल्या कुंडली दीर्घायू दर्शवणाऱ्या काही गोष्टी. पण जातक अल्पमध्यायू झाला. आता असे का झाले असावे ते बघू. या कुंडलीला ६,८,१२ व २,७,९ हि मारकस्थाने झालीत. आता याचा परिणाम प्रथम लग्नेशावर काय झाला ते पाहू. या कुंडलीत नवमस्थान हे सदोष झाले. शनी हा नैसर्गिक मृत्युकारक ग्रह आहे जो येथे लग्नेश आहे. पण लग्नेश हा कोणताही ग्रह असला तरी तो पापग्रह धरला जात नाही. आपण आयुर्दायाचा विचार करत असल्याने त्याच्या कारकत्वाची दखल घेतली इतकेच. या कुंडलीत एक अशी ग्रह स्थिती आहे ज्या मुळे ज्योतिषाची सहज फसगत होते जर बाकी विचार केला नाही तर. उडुदाय प्रदीप या ग्रंथातील मारकाध्यातील पाचवा  श्लोक :-


अर्थ:- गुरु शुक्र केंद्रात असल्यास जातक शतायुषी होतो. ग्रहांच्या किंवा चंद्राच्या योगाने सूचित होणारी आरिष्टे नष्ट होतात. येथे गुरु मारकेश तर शुक्र बाधकेश आहे. हा शनी प्लूटोच्या युतीत आहे. लग्नेशाच्या मारकस्थानात छीद्रेश व परमशत्रू आहेत, त्याच्या व्दितीय मारक स्थानात लग्नाचा मारकेश गुरु आहे या मुळे आयुष्ययोग कमी झाला.



एक श्लोक आहे आयुर्दाय विषयी पराशरीत.


अर्थ:- लग्नेश अधिशत्रू / शत्रू राशीत असेल तर जातक अल्पायु, जर तो अधिमित्र / मित्र राशीत असेल तर पुर्णायू आणि जर तो सम राशीत असेल तर जातक मध्यायू होतो.

विचारधीन कुंडलीत लग्नेश समराशीत आहे त्यामुळे मध्यायू आयुर्दाय या श्लोकानुसार होता. रवीला कुंडलीत बलवत्ता नसता आयुष्ययोगास विघातक होतो. या विषयी सर्वार्थ चिन्तामणी मधील श्लोक काय सांगतो ते पाहू पुढील भागात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा