गुरुवार, १० जानेवारी, २०१९

ब्रम्हचर्येचे योग - २

||श्री||




ब्रम्हचर्येचे योग - २



            नमस्कार मागील लेखात आपण एका साध्वीची कुंडली पाहिली. हि कुंडली एका ब्रम्हचारी जातकाची आहे जी मागच्या पोष्ट मध्ये दिली आहे. एक व्रत म्हणून ते स्वेच्छेने पालन करणारी परंतु नोकरी व्यवसाय करून रूढ अर्थाने सन्यास न घेता अध्यात्मकार्यातही सहभाग घेणारी, साधना करणारी अशी व्यक्ती आहे. पुढे पूर्णवेळ हेच कार्य करण्याचा जातकाचा मानस आहे. जातकाची हि इच्छा पूर्ण होईल का नाही हे सांगाता येईल. पारंपारिक मध्ये तशी चर्चा होते. ह्या कुंडलीचे विश्लेषण के.पी. पध्दतीने करावे असे वाटले. पण के.पी. मध्ये या संबंधाने नियम माझ्या वाचनात नाही कि अमुक स्थानाचा सब अमुक भावांचा कार्येश असता अमुक भावांच्या कार्येश ग्रहांच्या दशा अंतर्दशेत जातक सर्वसंग परित्याग करतो, सन्यास घेतो, हिमालयाची वाट धरतो, अध्यात्मकार्याला वाहून घेतो इ.इ. के.पी. मध्ये विवाह, वैवाहिक आयुष्या बाबतच जास्त विचारल, बोलल, लिहिल जात.  सध्या जातक ४२ वर्षांचा आहे व अजून अविवाहीत आहे. म्हणून मग के.पी. प्रमाणे जातकाचा सप्तमाचा सब विवाहास अनुकूल नाही का? असेल तर आत्ता पर्यंत दशागोचर अनुकूल आल्या नाहीत का? हे तरी निदान पहावे असे ठरवले. 


१) पुरुष:- ३०/८/१९७६, पहाटे ३:४०, अक्षांश २२°१२' उत्तर, रेखांश ७१°४०' पुर्व.





          सप्तमाचा सब बुध आहे. बुधाचे चौपदरी कार्येशत्व पाहिल्यास तो विवाहास अनुकूल अथवा प्रतिकूल दोन्ही स्थानांचा कार्येश होत नाही. पण चतुर्थ स्थानाचा तो कार्येश आहे व चतुर्थ स्थान हे आता प्रबळ विवाह विरोधी स्थान मानले जावू लागले आहे, या योगावर अविवाहीत रहावे लागते. पण (परत पण आलाच, बर झाल आला. मला वाटल कि हा विषय इथच संपवावा लागतो कि काय. काही लिहिल्या सारख वाटलच नाही. हा पण अजून चार दोन ओळी लिहिल्याचे समाधान तरी देईल.) तर पण हा बुध तृतीयाचाही कार्येश आहे. तृतीय स्थान हे करारनाम्याचे स्थान आहे. Register Marrage साठी विचारात घेतात. ते contract marrage  साठी हे आता विचारात घेतले जावू लागलेय. हा मुद्दा पुढचा, मुळात विवाहयोग असेल तर तो देवाब्राह्मणांच्या साक्षीने कि सरकारी अधिकाऱ्यांच्या साक्षीने की सगेसोयऱ्यांच्या साक्षीने होणार ते पहायचे.




             तर सप्तमाचा सब विवाहासाठी हात वर करून मोकळा झाला आहे. आपल्याला हे कार्य काही जमणार नाही बुवा, दशानाथांनो तुमचे तुम्ही काय ते बघून घ्या. सब ने हात वर केल्यावर दशानाथही हात काढून घेतात. जातकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यावर गुरु महादशेतील मंगळ व राहू अंतर्दशा भोग्य होती. गुरु विवाहास आवश्यक २,७,११ भावांचा कार्येश आहे. पंचम या पूरक भाव व गुरु दृष्टीच्या बळावर अंतर्दशानाथ मंगळाने अविचार केला असता एखादवेळे. चालू दशानाथ शनीचा सप्तमावर प्रभाव पहाता या मंगळाच्या उतावीळपणाला त्याने आवर घालून आपल्या दशेत शुक्र अंतर्दशेत गुरु विदशेत २,७,११ भावांची साखळी जुळवत वयाच्या ३४ व्या वर्षी जातकाला बंधनात अडकवला असता, जर सबने हात दिला असता तर. सप्तमाच्या या सबने जातकाची जन्मवेळ शुध्दीकरणाची आवश्यकता नाही हे निदान सध्यातरी सिध्द केले. कारण आज पर्यंत जातकाने विवाह केला नसला व आजन्म ब्रम्हचर्य पालनाचे व्रत घेतले असले तरी पुढेही तो ते पालन करेल या विषयी लोक शंका उत्तपन्न करणार, ज्योतिषी ही, कारण तृतीयातील मंगल शुक्र संबंध. पण मंगळ या शुक्राच्या नव्हे तर बुधाच्या अंशात्मक युतीत आहे हे लक्षात घ्या. असो.  




          गुरुवर्य श्री.कृष्णमुर्तीच्या निर्देशानुसार कार्यशत्व विचारत घेवून जर पाहिले तर? सब बुध ३,१२ न.स्वा.चं ४,१ सब चंद्रच आहे. म्हणजे तरीही विवाह विरोधी भावांचा कार्येश आहे. या बुधावर गुरु व शनीची दृष्टी असल्याने तो ११ व ७ या भावांचा कार्येश होतो पण हे कार्यशत्व दुय्यम मानले जाते, काय वाटते तुम्हाला?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा