|| श्री||
प्लॉट खरेदी १/१
ज्योतिष कुटप्रश्न ग्रुपवर बोलणी चालू
असलेली जमीन खरेदी होईल का? असा एक प्रश्न विचारला होता. जातकाने मला प्रश्न विचारला
तेव्हा त्यावर खूप काही काम मला करावे लागले नाही. जातकाला हवा त्या पेक्षा प्लॉट
काहीशा कमी आकाराचा होता पण सध्या राहत असलेल्या परिसरातच असल्याने या बाबतीत तडजोडीची
जातकाची तयारी होती. कागदपत्रांची तपासणी झाली होती. आता एवढे सगळे झाले होते म्हणजे
जातकाची आर्थिक तजवीज असाणार हे उघड आहे आणि त्या प्रमाणे होते. खरे तर अश्या वेळी
कुणी ज्योतिषाला प्रश्न विचारात नाही. पण प्रश्न आला होता आणि खोल विचार करण्याची
आवशक्यता न पडता हा प्लॉट खरीदी होणार नाही हे मी दिलेले उत्तर बरोबर आले होते. नेहमी
प्रमाणे ग्रुपवर उत्तर द्यायचा फारासा कुणी प्रयत्न केला नाही. श्री.संदीप काळे हे
एकमेव प्रतिसाद देणारे ठरले. असो.
ग्रुप चे संस्थापक श्री. सुहास गोखालेसर
यांनीही या प्रश्नावर विचार केला होता पण मुदतीत त्यांच्या कडून पोष्ट करायचे राहून गेले.
त्यांनी ते मला वैयक्तिक पाठवले. त्यांनी पाश्च्यात्य व के.पी. दोन्ही पद्धतीने
विस्तृत विवेचन केले. ते ग्रुप मध्ये तोडून तोडून द्यावे लागले असते. ब्लॉग वर
देण्यास त्यांची हरकत नसल्याने सलग वाचण्या कराता मी ते येथे देत आहे त्यांच्याच शब्दात.
भाग -१
जागा खरेदी होईल का?
ज्या प्लॉट बाबत
बोलणे चालू आहे तो खरेदी होईल का?
१४/१०/२०१९
वेळ-१६:४१:३६
प्रश्न पाहिला- १४/१०/२०१९, वेळ-१८:२८:११
के.पी.
अयनांश:-२४/०२/१३, स्थानांश-७३/४८/१० पु. २०/०२/२३ उ.
प्रश्न: जातक एक
जागा (प्लॉट) खरेदी करु ईच्छीतो आणि त्या संदर्भात त्याची जागा मालकाशी (विक्रेता)
बोलणी चालू आहेत. हा व्यवहार होईल का, जागा खरेदी करता
येईल का?
प्रथम या प्रश्नाची
उकल आपण पाश्चात्त्य होरारी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करु:
जातकाने ज्या क्षणी
प्रश्न विचारल्या त्या क्षणाची आणि ठिकाणाची सायन, भावचलीत , प्लॅसीडस पद्धतीची
पत्रिका शेजारी दिली आहे.
14 Oct 2019 , 16:41:36 ,
Nasik 73e48'00 19n59'00
Geocentric, Tropical, Placidus, True Node
काही प्रारंभिक
तपासण्या;
१) जन्मलग्न २२ मीन
४६ आहे त्यामुळे ‘अर्ली असेंडं’ट किंवा ’लेट
असेंडंट’ नाही.
२) शनि दशमात आहे (
म्हणजे तो लग्नी किंवा सप्तमात नाही !)
३) चंद्र व्हॉईड ऑफ
कोर्स आहे का?
चंद्र २७ मेष २१ वर
आहे आणि हा चंद्र त्याच्या सध्याच्या स्थितीतून मेष रास ओलांडे पर्यंत कोणत्याही
ग्रहाशी कसलाही योग करत नाही म्हणजेच हा चंद्र व्हॉईड ऑफ कोर्स आहे.
चंद्र व्हॉईड ऑफ
कोर्स आहे याचा सरळ अर्थ परिस्थिती जातका च्या हाता बाहेर गेली आहे, या परिस्थितीत
जातका कडून करण्यास सारखे काहीही राहलेले नाही किंवा प्रश्नाचे उत्तर नकारार्थी
मिळण्याची शक्यता जास्त आहे.
आता जातकाच्या
प्रश्नाच्या अनुरोधाने पत्रिका अभ्यासू :
प्रश्न जागेच्या
खरेदीचा आहे म्हणजे यात जातक (खरेदीदार) , विक्रता आणि जागा
असे तीन तरी घटक विचारत घ्यावेच लागतील.
जातकाने “जागा
खरेदी होईल का” हा प्रश्न विचारला आहे हे लक्षात घ्या म्हणजे ही जागा घेण्याचे
जातकाने जवळजवळ निश्चितच केले आहे आणि आता फक्त हा व्यवहार होईल का नाही हे त्याला
जाणून घ्यायचे आहे. काही वेळा जातक “ ही जागा विकत घेऊ का?’ असा प्रश्न विचारतो
त्या वेळी जातकाच्या मनात त्या जागे बद्दल साशंकता असते, त्या धोका वाटत
असतो म्हणजे जागा चांगली नसणे, जागे बाबत मह्त्त्वाची माहिती दडवलेली
असणे,
जागेचे मूल्य
बाजारभावा पेक्षा जास्त असणे, जागेच्या कागदपत्रांत गडबड असणे असे अनेक
बारकावे असू शकतात, त्यावेळी आपल्याला खरेदीदार , विक्रेता आणि जागा
या बरोबर वर उल्लेख केलेले घटक पण विचारात घ्यावे लागतात. पण सध्या तरी आपल्याला
त्याची आवश्यकता नाही, व्यवहार होणार का नाही इतकेच आपल्याला तपासायचे
आहे,
आता आपण हया खेळात
कोण कोण सहभागी आहेत याची एक यादी तयार करु.
प्रश्नकर्ता:
(खरेदीदार)
प्रश्नकर्ता नेहमीच
लग्न स्थानावरुन पाहतात, लग्नेश आणि लग्नातले ग्रह प्रश्नकर्त्याचे
प्रतिनिधीत्व करतात. त्याच बरोबर चंद्र हा जात्याच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक
प्रतिनिधी म्हणून काम करतो. इथे जन्म लग्न
‘मीन’ आहे त्यामुळे मीनेचा स्वामी ‘गुरु’
हा प्रश्नकर्त्याचे म्हणजेच जातकाचे प्रतिनिधित्व करेल. लग्नात ‘चंद्र’ आहे
त्यामुळे तो ही जातकाचे प्रतिनिधीत्व करणार आहे, तसा ही चंद्र
जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून येणार आहेच. लग्नात चंद्रा खेरीज इतर कोणताही
ग्रह नाही. म्हणजेच लग्नेश गुरु आणि चंद्र हे दोघे जातकाचे प्रतिनिधत्व करतील.
जागा मालक
(विकेता):
जागा विकत
घेण्याच्या दृष्टीने जातक सध्या ज्या व्यक्तीशी बोलणी करत आहे ती व्यक्ती म्हणजेच
विक्रेता,
हा नेहमीच सप्तम
(७) स्थाना वरुन पाहतात. सप्तमेश आणि
सप्तमातले सर्व ग्रह विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करतील. इथे सप्तम स्थानावर बुधाची
कन्या रास आहे म्हणजे सप्तमेश ‘बुध’ विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करेल. सप्तमात
‘मंगळ’ आणि ‘रवी’ पण आहेत म्हणजे
ते दोघे ही विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करु शकतील. म्हणजे इथे विक्रेत्यासाठी बुध , रवी आणि मंगळ असे तीन प्रतिनिधी झाले आहेत. या
पैकी एकाची निवड आपल्याला करावी लागेल.
इथे आपल्याला काही
तारतम्य भाव वापरावा लागेल. विक्रेत्या बद्दल जर काही माहीती उपलब्ध असेल तर तिचा
उपयोग इथे करता येईल. म्हणजे विक्रेत्या कोण आहे, कसा आहे, त्याचे व्यक्तीमत्व
कसे आहे, त्याचा नोकरी व्यवसाय काय आहे हे जर कळले तर या
तीन ग्रहां पैकी कोणत्या ग्रहाचे वर्णन आणि विक्रेत्याचे वर्णन जास्त जुळते ते
पाहून आपल्याला या तीन पैकी नेमका एक ग्रह विक्रेत्याचा प्रतिनिधी म्हणून निवडता
येईल. उदाहरणार्थ : विक्रेता प्रत्यक्षात सरकारी नोकरीतला, सरकारी कंत्राटदार, उच्चपदस्थ, राजकारणातला, धनाढ्य, सुखवस्तु असा असेल
तर स्वाभाविकच ‘रवी’ त्या विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व अधिक समर्पक रित्या करु शकेल, जर विक्रेता साधारण मंगळाच्या गुणधर्माचा, व्यक्तीमत्वाचा असेल म्हणजे काहीसा दांडगट, क्रुर, गुंड प्रवृत्तीचा
किंवा पोलीस, लष्कर, तुरुंग, मशीनरी अशा क्षेत्राशी संबंध असलेला किंवा जमीन
खरेदी-विक्री , लँड डेव्हलपमेंट
अशा क्षेत्रात काम करणार असेल, शेतकरी असेल, मुकादम, डॉक्टर , पशुवैद्यक असेल तर इथे ‘मंगळ’ जास्त समर्पक राहील.
विक्रेता जर व्यापारात असेल किंवा लेखन , प्रकाशन , व्यवस्थापन, मार्केटींग अशा
क्षेत्राशी संबधीत म्हणजेच ज्याला आपण बुद्धीजीवी वर्ग समजतो अशा क्षेत्रातला असेल
तर असेल तर ‘बुध’ जास्त समर्पक होईल. पण विक्रेता कसा आहे याची माहीती उपलब्ध
नाही. त्यामुळे या मार्गाने प्रतिनिधी निश्चित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे
सध्या हे तीनही प्रतिनिधी आहेत असे समजू , याबाबतचा अंतिम
निर्णय आपण पत्रिकेतली इतर ग्रहस्थिती आणि ग्रहयोग पाहून काही काळाने घेऊ.
जागा:
जातक जी जागा विकत
घेऊ ईच्छितो ती चतुर्थ (४) स्थानावरुन पाहतात, चतुर्थेश आणि
चतुर्थातले ग्रह या जागेचे प्रतिनिधीत्व करतील. इथे चतुर्था वर मिथुन राशी आहे
त्यामुळे मिथुनेचा स्वामी’ बुध’ जमीनीचे प्रतिनिधीत्व करेल. चतुर्थात राहू आहे पण
पाश्चात्त्य होरारी अॅनालायसीस मध्ये
राहू आणि केतू या छाया ग्रहांचा वापर फारसा होत नसल्याने राहू ला जागेचा
प्रतिनिधी मानता येत नाही. म्हणजे फक्त चतुर्थेश ‘बुध’ हा एकमेव ग्रह जागेचा
प्रतिनिधी म्हणून येईल.
आता बुध हा जागेचा
प्रतिनिधी झाल्यामुळे त्याला आता विक्रेत्याच्या प्रतिनिधी मंडळातले स्थान गमवावे
लागेल. म्हणजेच आता मंगळ आणि रवी हे दोनच ग्रह विक्रेत्याचे प्रतिनिधीत्व करतील.
आता जरा या जातका
कडे पाहा, गुरु आणि चंद्र हे जातकाचे प्रतिनिधीत्व करणार
आहेत, पत्रिकेकडे निट पाहीले तर लक्षात येते की जातकाचा
प्रतिनिधी गुरु आणि विक्रेत्याचा एक प्रतिनिधी रवी यांच्यात अगदी नुकताच लाभ योग
होऊन गेला आहे. विक्रेत्याचा दुसरा प्रतिनिधी मंगळ आणि जातकाचा प्रतिनिधी गुरु
यांच्यात असे काही योग झालेले नाहीत. याचा अर्थ ‘रवी’ हाच ग्रह विक्रेत्याचे
प्रतिनिधीत्व करेल. कारण जागेच्या बाबतीत जातकाचे आणि विक्रेत्याचे बोलणे नुकतेच
झाले आहे, गुरु आणि रवी यांच्यात होऊन गेलेला लाभ योग हे
त्याचेच द्योतक आहे. जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी चंद्र २७ मीनेवर आहे पण हा चंद्र
२० मीने वर असताना त्याचा प्रतियोग विक्रेत्याचा प्रतिनिधी रवी शी झाला होता, म्हणजेच जातक आणि विक्रेता यांच्यामध्ये काहीतरी
संवाद , वाटाघाटी झाल्या असाव्यात. रवी हाच विक्रेत्याचा
प्रतिनिधी कसा यासाठीचे हे आणखी एक समर्थन.
आता जर ही जागा
जातकाला खरेदी करता येणार असेल म्हणजे जागेचा व्यवहार होणार असेल तर जातकाचा
प्रतिनिधी आणि जागेचा प्रतिनिधी यांच्यात कोणता न कोणता योग होणे आवश्यक आहे.
जातकाचे दोन
प्रतिनिधी आहेत, गुरु आणि चंद्र या
पैकी चंद्र हा व्हॉईड ऑफ कोर्स आहे म्हणजे चंद्र त्याची सध्याची मेष रास ओलांडे
पर्यंत कोणत्याच ग्रहाशी कसलाही योग करत नाही त्यामुळे आपण फक्त जातकाचा दुसरा प्रतिनिधी
गुरु आणि जमीनीचा एकमेव प्रतिनिधी बुध यांच्यात काही योग होत आहेत का तपासायचे .
हा योग हे दोन्ही ग्रह आपापल्या राशीत असतानाच
होणे महत्त्वाचे.
जातकाचा प्रतिनिधी
गुरु हा २० धनू १३ वर आहे तर जमीनीचा प्रतिनिधी बुध हा १४ वृश्चिक ४० वर आहे, या दोन ग्रहात फक्त एका राशीचे अंतर आहे, बुध जलद गतीचा ग्रह असल्याने तो लौकरच २० वृश्चिक १३ वर येईल आणि तेव्हा तेव्हा या दोन
ग्रहांत ३० अंशाचा योग होईल पण हा अगदी क्षुल्लक योग असल्याने होरारी मध्ये या
योगाची दखल घेतली जात नाही म्हणजेच जातकाचा प्रतिनिधी गुरु आणि जमीनीचा प्रतिनिधी
बुध यांच्यात कोणताही योग होत नाही. योग नाहीत म्हणजेच जातक व विक्रेता यांच्यात
व्यवहार होणार नाही, जातकाला ही जागा
खरेदी करता येणार नाही.
या प्रश्ना कडे
आणखी एका अंदाजाने बघता येईल. समजा जातक ही जागा खरेदी करेल तर जातकाला त्या
विक्रेत्याला पैसे मोजावे लागतील. म्हणजेच जातकाच्या पैशाचा प्रतिनिधी आणि
विक्रेत्याच्या पैशाच्या प्रतिनिधी यांच्यात योग होतो आहे का असेही पहाता येईल.
इथे द्वितीय स्थानावरुन जातकाचा पैसा आणि अष्टम स्थानावरुन विक्रेत्याचा पैसा
बघायचा, द्वितिशेय मंगळ जातकाचा पैसा दाखवेल तर अष्टमेश
शुक्र विक्रेत्याच्या पैशाचे प्रतिनिधीत्व करेल. मंगळ ६ तूळेवर आणि शुक्र ७
वृश्चिकेवर आहे त्यामुळे या दोघांत कोणताही योग होत नाही. म्हणजे या मार्गानेही
आपल्याला नकारार्थी उत्तर मिळत आहे.
जातकाला
दिलेला निर्णय: जागा खरेदी होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा