|| श्री ||
साठी उत्तरकांड भाग -२
दुसरा विवाह होईल व तो हि प्रेम विवाह असे
घटना पूर्व भाकीत कुंडली पाहून केले असते? पारंपारिक नुसार कुंडली पाहता क्षणी असे
भाकीत केले असते? दुसऱ्या विवाहाचे सोडा पहिला विवाह प्रेम विवाह होईल असे भाकीत
केले असते? “दोन्ही ही प्रेम विवाहच केले. ते कसे?” या विचारलेल्या प्रश्नावर ‘ज्योतिर्विदांचा
प्रश्न नेमका आहे’ यावर मी पहिला भाग खर्ची (पाल्हाळ लावून लावून) घातला तो या
साठी. हा भाग ब्लॉगवर प्रकाशित करून आठवडा उलटला माझे दुसरा भाग लिहिणे लाबंत गेले
पण दरम्यान या प्रश्नाचे उत्तर समुहावर इतर कुणीही दिले नाही हे आश्चर्य.
नक्षत्रप्रकाश ज्योतिष समुहावर हा प्रश्न
विचाराला गेला आहे.
या स्री जातकाने वयाच्या ६१
व्या वर्षी घटस्फोट घेतला लगेच दुसरा विवाह केला ७५ वर्षाच्या
व्यक्तींशी. दोन ही प्रेम विवाहच केले. ते कसे?
स्त्री :- २६/३/१९५४, सायं ७:३०, डहाणू रोड
स्त्री :- २६/३/१९५४, सायं ७:३०, डहाणू रोड
स्थानांश:- ७२/४४/५० पूर्व, १९/५९/२१ उत्तर घेतले आहे. अयनांश:- २३/१२/०९ (चित्रापक्ष).
तर सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे, समाजमान्य
विवाहाचे. पंचमस्थान हे प्रेमाचे, प्रणयाचे स्थान हि झाली प्रार्थमिक माहिती. या
सप्तम स्थानाचे पंचामाशी संबंध आल्यास प्रेमविवाहाची शक्यता वर्तवली जाते. प्रस्तुत
कुंडलीत प्रथमदर्शनी असा संबंध येत नाही. शनी व गुरु मध्ये योग नाही. पंचमेश
सप्तमेश राशी परिवर्तन अथवा नक्षत्र परिवर्तन नाही, ना या दोघात दृष्टी संबंध. पंचम
सप्तमाशी येनेकेने प्रकरणे संबंधित मंगळ शुक्र युती नाही. तरीही दोन प्रेम विवाह
झाले? उलट सप्तमेश धर्मेश राशी परिवर्तन, विवाह कारक शुक्र सप्तमात उच्चीचा, पावित्र्य,
नैतिकता, शुचिर्भूतता यांचा गुरुच्या खालोखाल कारक मानला गेलेल्या रवी युक्त हा
शुक्र आहे. हे योग खचीतच प्रेम विवाह दर्शवित नाही. पण प्रेम विवाह तर झालाय. आकाशस्थ
कोणत्या ग्रहयोगाने हि गाठ बांधली? चला शोधू या.
याचे खरे उत्तर मला चंद्र कुंडलीत
सापडले. प्रेम निर्व्याज्य असते, प्रेम म्हणजे आत्ममिलन, प्रेम हे निर्विकार असते इ.इ.
पण असे लाखात एखादे आढळते. प्रेम हि भावना आहे, चंचल, विकारलब्ध आहे व ती मनाशी
निगडीत असते त्यामुळे असेल कि याचे उत्तर चंद्र कुंडलीत सापडले. वृश्चिक चंद्रलग्न
असलेली हि कुंडली. वृश्चिक रास बऱ्याच प्रमाणात विकारवशही मानली जाते. येथे पंचमेश
गुरु व सप्तमेश शुक्र राशी परिवर्तनाने पंचम सप्तम स्थान संबंध प्रस्थापित झाला.
गुरु शुक्र दिप्तांशात त्रीरेकादशयोग, उच्चांशा जवळील शुक्र यामुळे याला बल
प्राप्त झाले. नवमांशात गुरु शुक्र समसप्तकयोग आहे. कलत्र कुंडलीचा लग्नेश चंद्रच
आहे व आपसूकच जन्मचंद्र रास तेथे पंचमात आली. जन्मपंचमेश व सप्तमेश गुरु शनी कलत्र
कुंडलीत समसप्तमात आहेत. मंगळाच्या सहाय्या शिवाय हे धाडस कसे होणार? चंद्र मंगळ
अंशकलात्मक युती आहे. शिवाय चंद्र पंचमेश गुरुशी या युतीचा दिप्तांश समसप्तक, त्या
मुळे प्रेमाचे आकर्षण, मनात प्रेमांकुर पल्लवित झाला तर नवल का? कृतीशील मंगळा मुळे
हि मनोराज्यातील लीला न राहता भौतिकात आली व गुरु मुळे यशस्वी झाली. यासाठी
जन्मलग्न कुंडलीतील सप्तमेशावर या युतीचा प्रभावही पूरक झाला. सप्तमातील व्ययेश
रवी हा पंचमेशाच्या नक्षत्रातील एकमेव ग्रह आहे हे हि लक्षात घ्या.
मंडळी आजून एक भाग लिहावा लागणार आहे. जमेल तितक्या लवकर पुढचा भाग प्रस्तुत करतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा