|| श्री||
मागील लेख- जन्मवेळ शुद्धीचा गुंता. भाग-२
विवाह झाला का? प्रकरण-२
शिवराम
काजरेकर, प्रशासक, फक्त केपी ॲस्ट्रॉलॉजी समूह, ६ सप्टेंबर रोजी ११:०८ AM वाजता ·
प्रश्न-1, ग्रूपवरील काही सदस्यांच्या
मागणीनुसार-
जातक-पुरुष, जन्मदिनांक-26/04/1984, जन्मवेळ-12:32 दुपारी, जन्मस्थळ- अवळेगाव, ता-कुडाळ, 16°06'54.0"N, 73°45'13.7"E.
या
व्यक्तीचा विवाह झाला आहे का?
उत्तर
‘हो’ असेल तर केव्हा? व विवाहाचे स्वरूप- प्रेम प्रकरण
वगैरे. विवाह वेळ सहा महिने मागेपुढे आली तरी चालेल.
उत्तर
‘नाही’ असेल तर विवाह केव्हा होईल? फक्त
दशा अंतर्दशा विदशा सांगितल्या तरी पुरेसे आहे.
शनी महादशेत बुध अंतर्दशे पासून विवाह
योग्य काल सुरु झाला. बुध ५,११ केतू ७,११ चंद्र ११, मंगळ ११, गुरु ११ असे चारपदरी
बलवान कार्येशत्व आहे. यातील चंद्राची अंतर्दशा मला जास्त योग्य वाटते चंद्र
लाभातील राहूच्या नक्षत्रात आहे (व दशानाथ सप्तमेशाच्या राशीत). शनीच्या महादशेत
चंद्राची अंतर्दशा १०/०२/२०१३ ते ११/०९/२०१४ (वय २८ व ९ मा ते ३० व ४ मा) आहे. ७
महिन्याचा हा कालावधी आहे. विदशा तो अजून कमी करेल. शनि महादशा ७ चे दुय्यम कार्येशत्वाची
आहे. म्हणून ७ चे बलवान कार्येशत्व दर्शवणारी केतूची विदशा जी ०५/०४/२०१४ ते
०९/०५/२०१४ दरम्यान आहे ती निवडू.
अनुमान:- उपलब्ध जन्मटिपणा नुसार
कुंडलीचा सप्तमाचा सब राहू फारसा अनुकूल नाही, त्यातच शनि महादशाही तितकी अनुकूल
नाही. त्या मुळे विवाह होणे अवघड आहे बाबा. प्रयत्नवादाला पूरक, दुय्यम कार्यशत्वाचा
आधार घेत जर विवाह झाला असेल तर ०५/०४/२०१४ ते ०९/०५/२०१४ दरम्यान ३० व्या वर्षी
झाला असावा. 🙏

श्री.शिवराम काजरेकर सरांनी या केस स्टडीचे उत्तर २१/०९/२०२० रोजी दिले ते खालील प्रमाणे
उत्तर द्याहटवाआता या प्रश्नाचे उत्तर - या जातकाचा विवाह आजतागायत झालेला नाही. कोणतेही प्रेम प्रकरण झालेले नाही. विवाह ठरण्याचा किंवा ठरवून मोडण्याचा प्रकारही झालेला नाही. किंबहुना एकही स्थळ प्रत्यक्ष पाहून झालेले नाही.
हा जातक अतिशय उच्च विद्या विभूषित असून धार्मिक वृत्तीचा, कोणतेही शारीरिक व्यंग नसलेला, निर्व्यसनी अशा स्वरूपाचा आहे.
*
यापुढे जर या जातकाचा विवाह झालाच केव्हा तर मी नक्की कळवीन.
विवाह आजही म्हणजे सात एप्रिल 2023 पर्यंत झालेला नाही
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर.
हटवा