शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

स्कीझोफ्रेनिया आणि कुंडली भाग-१.

 || श्री ||

स्कीझोफ्रेनिया आणि कुंडली भाग-१.

मागील लेख :- कोविड उपचार केंद्र सुरु होईल का?



प्रतिमा इंटरनेट वरून साभार.

ज्योतिष समुहावर एक पोष्ट आली आणि त्या विषया संबंधी अभ्यासा साठी काही कुंडल्या समोर येवू लागल्या. पोस्ट व कमेंट खाली कॉपी पेष्ट करून मग विवेचन करतो.

प्रसाद कुलकर्णी,  २७/११/२०२०, ७:३१ AM वाजता·

Shezophreniya  मानसिक आजर दिवसेंदिवस पसरत आहे या मध्ये व्यक्तीला भास होणे /कानात आवाज ऐकू येणे इत्यादी गोष्टी दिसून येतात.

आजारासाठी पत्रिकेत कोणते योग असू शकतात.

शास्त्रात हा आजार controll करण्यासाठी काय उपाय असतात का?


१)Vikas Kulkarni:- mazya bhavachi patrika pathu ka. Tyala 1978 pasun tras aahe.

Yogesh Daithankar हा जुळ्या पैकी एक आहे. जन्मतारीख ११_१२june १९६१ मध्यरात्री  उजाडता सोमवार १२:४५ जन्म वेळ. जन्म स्थळ म्हसवड. रास वृषभ लग्न कुंभ. मानसिक रुग्ण या मध्ये चिडणे सगळ्या घराला त्रास देणे टीव्ही फोडणे. कपडे कागद पत्रे जाळणे. Smoking. सतत लक्ष वेधून घेण्यासाठी घरातल्यांना त्रास देणे.


è वरील जन्मटिपणानुसार म्हसवड, ता-दहीवाडी, जी-सातारा (स्थानांश-17°38'17.0"N 74°47'06.2"E), लाहिरी अयनांश २३/१८/१२ घेवून कुंभ लग्न २८/२३/२४ वर येते. जुळ्या भावंडापैकी एकाची असल्याने दोघांचीही कुंडली नजरे खाली असावी. एका कमेंट मध्ये श्री.विकास कुलकर्णी यांनी दुसऱ्या जुळ्या भावंडाचे मीन लग्न असल्याचे म्हटले आहे. जुळ्या मधील लहानाचे मीन लग्न येण्या साठी कमीत कमी दोघात ६ मी. अंतर हवे. (आत्ताच त्यांनी कमेंट करून जुळ्यातील लहाण्याची जन्मवेळ १:३० सांगितली आहे.) जुळ्या भावंडांचा षष्ठांशकुंडली वरून विचार केला जातो. पण येथे मुळात दोघांचे जन्मलग्न वेगळे आल्याने. प्रथम त्यावर नजर टाकतो.  त्या अगोदर श्री.प्रसादजींच्या पोष्ट वर माझे मांडलेले मत डकवतो.

श्री.प्रसाद कुलकर्णी जी

आपल्या कडे हा विषय अतिंद्रिय शक्तींशी जोडला गेला आहे. याला आपण आजार समजत नाही. त्यामुळे पुरातन कुंडली शास्त्रात या वर चर्चा असेल असे वाटत नाही.

अघोरी विद्या/ स्मशान विद्या यात याची चर्चा दिमून येते. कर्ण पिशाच वश करून त्याच्या कडून एखादया व्यक्तीची इतंभूत माहिती घेणे या भविष्य प्रकाराच्या रसाळ कथा पसरलेल्या दिसतात. हि साधना करतांना अर्धवट माहिती आधारे किंवा काही चुक झाल्याने किंवा कालांतराने वयोमानाने किंवा इतर कारणाने साधकाची शक्ती हीन झाल्यावर हे कर्ण पिशाच त्याच्या कानात निरंतर बडबड करत राहते जे सहन न होऊन साधक मनोरूग्न होतो. साधारण अस्या आशयाची चर्चा रंगत असते. आता या गोष्टी अंधश्रद्धेत गणल्या जातात .

हा आजार धरून जर कुंडलीत विश्लेषण करायचे असेल तर मला वाटते राहूचI विचार सर्व प्रथम व्हावा. भास याचे कारकत्व राहू कडे जाते. मानसिक विकार असल्याने अर्थातच चंद्र आला. षष्ट, अष्टम स्थान संबंध, त्याच बरोबर गुढत्वाचा दुसरा कारक नेपच्यून यात आलाच. अधुनिक शास्त्राच्या दृष्टीने मेंदूतील केमीकल लोच्या मुळे हे घडते त्यामुळे प्रथम स्थान व मंगळ विचारत घ्यावेत.

वरिल ग्रहयोगाचे ग्रंथ संदर्भ नाहीत कारण विचाराअंती तर्काने जे सुचले ते मांडले आहे. असो अशी एखादी केस आहे का ? असेल तर डिटेल्स द्या. तपासून पाहू. 

शुभरात्र


मी जे मत मांडले आहे त्या अनुसंगानेच पत्रिकेचे परीक्षण करणार आहे. हि केस जुळ्या भावंडा पैकी एकाची असल्याने नाही म्हटले तरी माझीच संभ्रमावस्था झाली होती. त्याचे कारण वरती दिलेच आहे. पण दोघांचे जन्मलग्न वेगळे आल्याने निवांत झालो. जातकाचे कुंभ लग्न वृषभ रास रोहिणी नक्षत्र प्रथम चरण आहे. जन्मकुंडलीने ठळक पणे जातक मानसिक कि परामानस समस्येने ग्रस्त आहे ते चटकन दाखवले. बघा वरती मी जे मत मांडले त्या संदर्भाने. कुंभ लग्न असून राहू सप्तमात आहे. राहूचा षष्ठ स्थानाशी, लग्नेशाशी, षष्ठेश चंद्राशी दृष्टी वा नक्षत्राने संबंध नाही. त्या मुळे हि कुंडली परामानस समस्येची नाही, तर षष्ठात मंगळ नीच राशीत नीच भागा जवळ हर्शल ने युक्त आहे. मंगळाचा उच्चीच्या चंद्रा कडून निचभंग होतो आहे पण चंद्र अमावाश्ये जवळचा असल्याने चंद्र क्षीण,निर्बली आहे व निचभंग परिणामकारकरीत्या झाला नाही. अस्या ह्या मंगळाची अष्टम घातक दृष्टी उदित लग्नांशावर दिप्तांशात आहे, शिवाय लग्नी केतू आहे. त्यामुळे मानसिक अंगाने जाणारा हा आजार वाटत असाल तरी तो प्रकृती बिघाडाचा आहे, म्हणजे मेंदुरोग म्हणता येईल. मेंदूतील द्रव्याच्या असंतुलना मुळे हे घडत असावे. हे असंतुलन कश्या मुळे घडले असावे. भावनिक आघाताने (जुळ्या भावंडात असे होते. जुळ्या भावंडा संबंधी काही अप्रिय, दुर्दैवी घटनेने दुसऱ्या भावावर धक्क्याने परिणाम होतो. जुळ्या भावंडात भावानाबंध मजबूत असतात म्हणतात.), मेंदूला अपघाताने मार बसने किंवा व्यसनानेही मेंदूतील द्रव्य असंतुलित होते. पत्रिका काय म्हणते, तर लग्नेश व्ययात व्दितीयेश नीच गुरु युक्त आहे. हा योग व्यसन दर्शवितो. श्री.विकास कुलकर्णींनी जातकास व्यसन असल्याचे सांगितले आहेच. स्कीझोफ्रेनिया होण्याची जी काही कारणे सांगितली जातात त्या पैकी एक म्हणजे मेंदूतील डोपामाईन द्रव्याचे असंतुलन आहे. जन्मकुंडलीतील मंगळाची स्थिती या कडे निर्देश करते आहे. हा मंगळ लग्नेश शनीच्या सप्तमात आहे. 

स्कीझोफ्रेनिया उतारवयात होत असला तरी या आजाराची सुरवात वयाच्या तिशीत होते असे निरीक्षण आहे. जातकास हा अजार तर १९७८ पासून म्हणजे १७ व्या वर्षा पासूनच  आहे. राहू महादशा,भूक्तीत गुरु विदशेत १६/४/१९७८ ते २६/०८/१९७८ दरम्यान झाला असावा असा कयास आहे. या कालावधीत किंवा याच्या आसपास एखाद्या कौटुंबिक घटनेच्या आघाताने असे झाले असावे असे वाटते. श्री.विकास कुलकर्णीं या वर टिपण्णी करतीलच. जमल्यास दुसऱ्या भागात सौ.पल्लवी देशमुख अय्यर यांनी दिलेल्या जन्मटिपणावर परीक्षण करायचा विचार आहे. बघू कसे जमते ते. धन्यवाद.🙏

पुढील लेख लवकरच......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा