||
श्री ||
मागील लेख:- सोमवार नंतर मंगळवारच का?
Hour आणि
होरा
आपल्या या समुहात मी लिहिलेल्या
वारांचा क्रम असाच का? अश्या स्वरूपाच्या प्रश्नाच्या उत्तरा
दाखल लिहिलेल्या लेखावर एक माहिती वजा प्रश्न केला गेला. तसे तर या प्रश्नावर चार
दोन ओळी लिहिल्या होत्या. पण या वर अजून लिहिता येण्या सारखे आहे असे वाटल्याने ते
भाष्य (comment) पुसून टाकले व स्वतंत्र लेख लिहिला.
प्रथम प्रश्न सांगतो.
“hour हा शब्द होराचा अपभ्रंश
असावा काय?”
= श्रीमान असू शकतो. पण एका होराचा
कालमान हा दिनमानानुसार रोज बदलत असतो, तर
एका Hour चा कालमान नित्य असतो जसे हिंदू घटी
नित्य आहे. पाश्चात्य Hour
व हिंदू घटी यांचे कालमान नित्य असले
तरी यांचे कालभाग भिन्न आहे, तर
पाश्चात्य hour व हिंदू होरा यांचा हि कालभाग भिन्न
आहे. मात्र विषुवदिनी पाश्चात्य hour व
हिंदू होरा यांचा कालभाग समान येतो.
Hour हा शब्द लॅटीन
भाषेतून घेतला आहे. आणि लॅटीन भाषेत Hour हा ग्रीक भाषेतील Hora चे अपभ्रंश आहे.
ग्रीक भाषेत Hora हे HORAI /Horae (होराई) या शब्दा वरून आले आहे. होराई ही निसर्ग न्यायदेवता आहे, आपल्या कडील वनदेवी
प्रमाणे. वनदेवी प्रमाणेच होराई एक संज्ञा आहे. वेग वेगळ्या होराई आहेत. त्यांच्या
संख्या बाबत एक मत नाही पण मुख्य १० सांगतात. तशी थोडी गुंतागुंत हि आहे. होराई हे
नैसर्गिक गुणांचे व्यक्तीकरण(मूर्तीकारण) आहे असेही म्हणतात. यात काही ऋतुंच्या
देवता आहेत. थेरोस(Theros) हि उन्हाळ्याची होराई आहे, ऐर(Eiar) हि पावसाळ्याची.
दिवसातील वेग वेगळ्या भागांवर त्यांचा अधिकार सांगतात. उदा. ऑगे(Auge) ही तांबड फुटण्याची
होराई आहे.(आपल्या कडे सूर्यदेवाचे सारथी अरुण या भागाचे देवता आहे.) अँटोलीया (Anatole or Anatolia) हि सूर्योदया काळाची
होराई आहे. मेसेम्ब्रीया (Mesembria) हि मध्यान्हाची होराई आहे. अश्या १२ होराई आहेत.
हिंदू पुराणा प्रमाणेच ग्रीक पुराण हि रोचक व उत्कंठावर्धक आहे. Hour ची नाळ ग्रीक सभ्यतेशी जोडत असले तरी एका गोष्टी मुळे तो हिंदू होरातून आल्याच्या दाव्याला प्रबळ पुष्टी मिळते. मागील लेखात (सोमवार नंतर मंगळवारच का येतो?) आपण पाहिले कि हिंदू ज्योतिषात होराचे स्वामित्व हे मंदात शिघ्र या क्रमाने दिले आहे. Hour ला हि पाश्चात्यांनी असे स्वामित्व दिले आहे, त्याच बरोबर त्यांनी प्रत्येक Hour चे व्यक्तिमत्वकरण / मूर्तरूपकरणही केले आहे. त्यांनी ग्रहांचा क्रम रवी, शुक्र, बुध, चंद्र, शनि, गुरु, मंगळ असा घेतला आहे. हा क्रम घेण्या मागचा त्यांचा तर्क काय या बाबत माहिती नाही. पण या ग्रहांचा मूर्तरूपकरणात वापर केला आहे. उदा. पहिल्या Hour चे वर्णन पहा. याचा शासक ग्रह सूर्य आहे.
Represented as a young
girl, her head adorned with light flowing hair; she is clad in a short dress of
rose-colour, resembling the tints of the clouds before the rising of the sun;
her wings are like those of a butterfly, and she holds the Sun and a bunch of
full-blown roses.
युवती प्रतीचित्रित आहे. तिचे डोके तलम
मुलायम केशारंभाने सुशोभित झाले आहे. उगवत्या सूर्या समोर पसरलेल्या ढगांवरील
रंगछटे सदृश्य गुलाबी रंगाचा अखूड पेहराव तिने परिधान केला आहे. फुलपाखरा सारखे
तिचे पंख आहेत. तिने सूर्य व पूर्ण उमललेल्या गुलाबांचा गुच्छ धारण केला आहे.
दुसऱ्या Hour चे
वर्णन पहा, याचा शासक ग्रह शुक्र आहे.
Appears to have wings
like the preceding; her hair is of a darker hue, and her dress of a deep gold
colour; she is surrounded by light clouds, indicating the vapours which the sun
exhales from the earth; her attributes are the planet Venus and a sunflower.
मागच्या Hour प्रमाणे पंख असलेली. तिचे केस गडद
रंगाचे आहेत आणि तिचे वस्त्रही गडद सोनेरी रंगाचे आहेत. हलक्या ढगांनी तिला वेढले
आहे जे सूर्याने पृथ्वी वरून शोषलेल्या बाष्पाचे प्रतिक आहे. तिचे गुणधर्म हे
शुक्र ग्रहा प्रमाणे व सूर्यफुला प्रमाणे आहेत.
आपल्या हिंदू होरा प्रमाणे
सात दिवस सूर्योदयी वेग वेगळे होरास्वामी नसून १ ते २४ Hour स्वामी रोज तेच असतात.
आता गंमत बघा पाश्चत्य सभ्यतेत दिवसाची
सुरुवात मध्यरात्री पासून करतात. बरोबर ना? पण पहिला Hour
हा सूर्योदयाचा आहे. जर Hour हा शब्द ग्रीक मधून लॅटीन मार्गे आला
आहे तर ग्रीक कालमापनात दिवसाचे १२ च भाग होते. Hour तर हिंदू होरा प्रमाणे २४ आहेत. आहे कि नाही गंमत? आणि आपल्या कडचे त्यांच्या कडचे शिकून
शहाणे झालेले पुरोगामी आपल्याला प्रतिगामी, गावंढळ, अवैज्ञाणिक, तर्कहीन, अंधश्रद्धाळू संबोधतात. ना इकडचा अभ्यास ना तिकडचा.
पुढील लेख:- गुरु शनि -
ग्रहयुद्ध

छान माहिती.
उत्तर द्याहटवा