||श्री||
हेडी लॅमर (Hedy Lamarr)
१९ जानेवारी हा या अभिनेत्रीचा
स्मरणदीन. जुलै २०१८ मध्ये फेसबुक समुहात तुकड्या तुकड्यात पोस्ट केली होती. तेच
इथे संकलित करून देत आहे. या संकलनात आजून काही भर जमेल तसे घालेल.
फेसबुक वर या अभिनेत्री विषयी एक
लेख वाचण्यात आला. तिच्या संशोधना विषयी वाचून उत्सुकता निर्माण झाली. एक
अभिनेत्री संशोधन करते हे वाचून आश्चर्य वाटले. अभिनेत्रीने राजकारणात जावे,
नाही जमले तर जुमले करून मागच्या
दराने राज्यसभेत जावे, नसेल चित्रपट मिळत तर फार तर फार शेअर बाजार,
हॉंटेल,
रीअल इस्टेट सारख्या व्यवसायात
गुंतवणूक करावी, गेला
बाजार एखाद्या रियालिटी शो चे होस्ट, जज, महागुरू पद पदरात पाडून घ्यावे.
संशोधन काय अभिनेत्रीने करायचे असते का? पोराबाळांना लाँच करण्यासाठी वजन
वापरायचे किंवा त्यांच्या साठी चित्रपट निर्मिती करायची सोडून हे असे लष्कराच्या
भाकऱ्या भाजायला का गेली? “बघा ओ गुरुजी, काय खूळ डोक्यात घालून घेतलय. काय कराव बाई. बघा तर जरा शनि
भारी झाला की गुरु बिघडला?” एखाद्या ज्योतिषाला कुंडली दाखवत अस तीच कुणी जवळ चे म्हणाले
नाही का? असा
विचार करत जन्म टिपणासाठी आम्ही गुगल गुरुजीच्या वंशावळीच्या वळकट्या उचकायला
सुरवात केली.
मला उत्सुकता तिच्या संशोधनवृत्ती बाबत असल्याने
मी फक्त त्या दृष्टीने कुंडली तपासली. साधारणता संशोधना साठी वायुरास (कुंभे कडे फार आदराने पाहतात हो.),
कालपुरुष कुंडलीतील अष्टमस्थानातील
रास म्हणून वृश्चिकरास, शनि,नेपच्यून, अष्टमस्थान व दशमस्थान सबंध, पाहिले जातात. प्रस्तुत कुंडलीत
लग्नात वायू रास आली. खर तर मिथुनेला फार कुणी गांभीर्याने घेत नाही बडबडी रास
म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. पण इथे शनि सारखा गंभीर ग्रह अष्टमेश बनून आला या
मुळे संशोधनात डोक चालल. राशी स्वामी बुधा मुळे संवाद,
निरोप देवान घेवाण,
संदेशवहन,
माहितीचे वहन करण्यासाठीचे माध्यम
क्षेत्रात संशोधन झाले. या दृष्टीने तृतीयस्थान जर बळकट असते तर अजून लाभ झाला
असता. आवड निवड साठी चंद्र महत्वाचा. करणा संशोधन हि त्यांची आवड होती. चंद्राला
मात्र राशीचा सपोर्ट नाही. कर्क रास तशी चंचलतेमुळे फारशी उपयोगाची नाही. पण यांची
कल्पनाशक्ती भन्नाट चालते. कुल्पत्या चांगल्या लढवतात. (traffic
stoplight सिस्टीम
मध्ये सुधारणा, पाण्यात
विरघळणारी टॅबलेट इ. संशोधनही त्यांच्या नावावर आहेत.) चंद्र नेपच्यून दिप्तांश
युती, शिवाय
या युतीला कन्या नवमांश लाभला. कन्यारास चिकित्सक आहे. यामुळे संशोधनाकडे मन वळाले.
चंद्र नेपच्यून युती जलराशीत आहे. संशोधन त्यांनी नेव्हीला डोळ्या समोर ठेवून केले
होते. उपचय स्थान षष्ठात वृश्चिकेत मंगळ आहे.
त्याने श्रीमती हेडा यांना युध्दात ओढले असावे. त्यांचे संशोधन हे मर्चंड
नेव्ही करता नव्हते. या मंगळाने संरक्षण क्षेत्राकडे खेचले असावे. मंगळाचा सिंह
नवमांश मात्र या दृष्टीने फारसा उपयोगी नाही. दशमेश गुरु अष्टमात आहे परंतु नीच
असल्याने याचा तिला फायदा झाला नाही. हा गुरु नवमांशात कर्कराशीत असल्याने सुधारला
व त्याच निचभंग शनि कडून झाला असल्याने उशिरा का होईना संशोधना बाबत प्रसिध्दी मिळाली
हेडी लॅमर (Hedy
Lamarr) – जन्म
ता. 9/11/1914, वेळ
19:30, स्थान Vienna (Austria) अक्षांश 48/13
उ., रेखांश 16/20पु.,
भाग- १,
हेडी हि किस्लर दांपत्याची एकुलती
एक कन्या होती. १९३० मध्ये तिने Money on the Street मध्ये एक्सट्रा कलाकार म्हणून काम
केले. १९३१ मध्ये तिला Storm in a Water Glass या पिक्चर मध्ये छोटी भूमिका मिळाली,
तर त्याच वर्षी The
Trunks of Mr. O.F. या
मध्ये बऱ्या पैकी मोठी भूमिका मिळाली. १९३२ मध्ये तिला No
Money Needed मध्ये
प्रमुख भूमिका मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी १९३३ च्या सुरवातीला आलेल्या Ecstasy
फिल्मने त्यातील बोल्डसिनने तिला
कुप्रसिध्दी केल. (बदनाम हुये तो क्या हुवा नाम तो हुवा.) यात तिची दिग्दर्शक व
निर्मात्या कडून फसवणूक झाली होती. चित्रपट पदरात पाडून घेण्याच्या नादात तिने न
वाचताच करारावर स्वाक्षरी केली होती. आउटडोअर शुटिंगच्या वेळी जेव्हा दिग्दर्शकाने
सीन सांगितला तेव्हा तिने विरोध केला व फिल्म सोडायची धमकी दिली. तेव्हा
दिग्दर्शकाने अटी नुसार आत्ता पर्यंत झालेल्या शुटिंगचा सारा खर्च द्यावा लागेल
असे सांगितले. १९३८ मध्ये Algiers व्दारे तिचे hollywood मध्ये पदार्पण झाले. चित्रपटाने सनसनी माजवली व तिने आपल्या
सौंदर्याने प्रेक्षकांना शब्दसा घायाळ केले. १९३९ मध्ये तिला "most
promising new actress" of 1938 ने सन्मानित करण्यात आले. १९५८ पर्यंत तिची चित्रपट
कारकीर्द चालली.
भाग-२ दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान National Inventors Council मध्ये काम करण्याची तिला ईच्छा होती. या अश्या परिस्थितीत मी हॉंलीवूड मध्ये ऐशोआरामात राहून पैसा बनवू शकत नाही असे तिचे म्हणणे होते. पण कॉंन्सील मेंबरनी तिला सांगितले की त्या पेक्षा तू तुझे प्रसिध्दी वलय वापरून युद्धात मदत केली तर बरे होईल. ( हि नटवी काय संशोधन करणार? आजून हिच्या नादाने संशोधक बिघडायचे. त्या पेक्षा बये तू नाचगाणी कर. असा विचार त्यांनी केला असावा.) युध्द फंड जमा करण्यासाठी वॉर बाँड विक्री अभियानात ती सहभागी झाली. एका शो दरम्यान तिने प्रेक्षकातून एका नौसैनिकाला स्टेजवर बोलावले व प्रेक्षकांना आव्हान केले की तुम्ही जर मोठ्या प्रमाणात बाँड खरेदी केले तर मी याला सर्वासमक्ष कीस करेन. (आगुचर कुठली!) विक्री तुफान झाली व तिने शब्द पाळला. या तिच्या पराक्रमावर खुश होऊन तिला अभियानात भाग घेण्यापासून रोखण्यात आले. (घ्या “यालाच म्हणतात ज्याच कराव भलं तो म्हणतो माझच खर” अस म्हणत तिने आपल चाफेकळी सारख नाक झणकाऱ्यात मुरडले असेल का हो?) तिच्या संशोधकवृत्ती बाबत ज्या काही थोड्या लोकांना माहित होते त्या पैकी एक म्हणजे विमान उद्योग सम्राट ‘हावर्ड ह्युजेस’. (Aviation tycoon Howard Hughes.) त्याच्याशी असलेल्या संबंधा बाबत एका मुलाखतीत हेडी म्हणते “आमच्या डेटिंग दरम्यान हावर्डने माझ्या छंदाला प्रोत्साहन दिले. त्याने त्याची अभियंताची टीम माझ्या दिमतीला दिली व त्यांना मी सांगेल तसे करण्याचे आदेश दिले.” (बिच्चारा, न करून सांगतोय कुणाला. स्री हट्टा पुढे काय चालणार अन तीही रुपगर्विता असतांना.) तिच्या असे लक्षात आले की संदेश प्रसारणा साठी जे तंत्रज्ञान वापरले जाते त्यात शत्रुपक्षा कडून त्याचे सिग्नल व संच सहजगत्या जाम केले जाऊ शकतात. म्हणून तिने असे तंत्रज्ञान विकसित करायचे ठरवले की ज्याच्या लहरी पकडता व जाम करता येणार नाही. रेडिओ ध्वनिलहरींवर तिने काम सुरू केले. एका मित्राच्या मदतीने तिने असे तंत्रज्ञान विकसित केले (ज्याला आता वाय-फाय नावाने ओळखतात) व ११/८/१९४२ मध्ये त्याचे पेटेंट मिळवले. मात्र पेटंटला ठराविक मुदत असते, हे हेडीला माहीत नव्हते.(मलाही या निमित्ताने कळाले.) पण त्यावेळी ते बसवन्यास खूप अवघड होते व यु.एस. नेव्ही त्याकाळी मिलेट्री बाहेरचे संशोधन स्वीकारत नव्हते. साधारण २५ वर्षांपूर्वी जगभरात हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. तिच्या मैत्रिणीने वायफायच्या संशोधनाबद्दल तिला पैसे मिळावेत यासाठी चिकार प्रयत्न केले, पण तिच्या पेटंटची मुदतच संपल्याने कोणीही तिला पैसे दिलेच नाहीत. (मात्र १९९१ मध्ये तिला Electronic Frontier Foundation's Pioneer Award मिळाले तसेच तिच्या या frequency-hopping spread spectrum technology करीता मरणोत्तर National Inventors Hall of Fame मध्ये समावेश झाला. मृत्यू नंतर का होईना National Inventors मध्ये जाण्याची तिची इच्छा पूर्ण झाली तर. अष्टमेश भाग्येश शनि लग्नी चे फळ.)
भाग-३,
१९४५ मध्ये हेडी परत हॉंलीवूड कडे
वळाली. तिने स्वताची निर्मिती संस्था स्थापन केली व काही चित्रपटांची निर्मितीही
केली पण तिला व्यवसायिक यश लाभले नाही. १९४९ मध्ये तिला मोठे यश चाखायला मिळाले.
पॅरमाउन्ट प्रोडाक्सन ची निर्मिती असलेला Samson and Delilah चित्रपट कमाईचे रेकॉंर्ड तोडत सुपर
डुपर हिट झाला. पण त्यानंतर परत तिची कारकीर्द उतरणीला लागली. १९५८ मध्ये तिला
शेवटचा The Female Animal नावाचा
चित्रपट मिळाला. १९६६ मध्ये लॉंस एंजिल च्या एका दुकानात चोरीच्या गुन्ह्यात तिला
अटक झाली. १९९१ मध्ये फ्लोरिडात एका दुकानात चोरीच्या गुन्ह्यात परत अटक झाली. या
वेळी तिने २१.४८ डॉंलरची काही औषधे चोरली होती. वर्तणूक सुधारण्याच्या व कायदे न
मोडण्याच्या लिखित वचननाम्यावर तिला सोडून देण्यात आले. कारकिर्दीतील अपयशाच्या
विमन्सकतेचा चोरीच्या सवयीशी संबंध जोडून तिला सहानुभूती मिळाली. सौंदर्य हरवण्याच्या
भीतीतून तिने सौंदर्य टिकवण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी केल्या. त्यामुळे ती उलट
कुरूप झाली. तिने स्वत:ला एकांतवासात कोंडून घेतले. बाह्य जगाशी संबंध ठेवला पण
टेलिफोनच्या माध्यमातून, अगदी स्वत:ची मुले व जवळच्या मित्रांशी देखिल. सहा सात तास ती
सलग टेलिफोनवर बोलता असे पण कुणा समोर येत नसे. सहा दादले केलेल्या व दोन मुले एक
मुलगी असलेल्या या अभिनेत्रीचे ३.३ मिलियन डॉंलरची मोठी इस्टेट मागे सोडत वयाच्या
८५ व्या वर्षी १९ जाने.२००० रोजी हृद्य विकाराने निधन झाले.
प्रथम विवाह १९ व्या वर्षी १९३३
मध्ये शस्त्रास्त्रांचा व्यापारी फेडरीच मंडल बरोबर (Friedrich
Mandal' 1933-1937
) चार वर्षाचा संसार.
सप्तमाचा सब चंद्र द्वितीयात आहे.
तो वक्री शनिच्या नक्षत्रात. शनि व्ययात असुन तो नवमेश दशमेश आहे,
शनिवर मंगळाची दृष्टी. मंगळ पंचमात
असुन षष्ठात आहे. चंद्राचा सब शुक्र षष्ठात असुन तो व्ययेश आहे. शुक्र बुधाच्या
नक्षत्रात. बुध पंचमात असुन लग्नेश आहे. फोर स्टेप नुसार चंद्र द्वितीयाचा बलवान
कार्यश नाही. चंद्र विवाहास पुरक पंचम स्थानाचा कार्येश आहे. बाकी विरोधी
स्थानांचा बलवान कार्येश आहे. विवाहास आवश्यक २, ७, ११ ही प्रमुख स्थाने असतात.
१९३३ मध्ये बुध दशेत चंद्र व मंगळ
अंतर्दशा होती. बुध- ५,१ न.स्वा. राहू- ९(श-८,९,१०), सब चंद्र- २,३ सब न.स्वा. शनि- ८,९,१० दशानाथही फोर स्टेप प्रमाणे
विवाहास आवश्यक ९ या पुरक स्थानाचाच कार्येश होता.
मंगळ- ५,
६भावारंभी,
न.स्वा. शनि- ८,९,१०, सब बुध- ५,१ सब न.स्वा. राहू- ९(श-८,९,१०) मंगळही फोर स्टेप प्रमाणे
विवाहास आवश्यक ५,९ या पुरक स्थानाचाच कार्येश होता.
सप्तमाचा सब. दशा स्वामी हे विवाहास
आवश्यक २,५,११ भावांचे बलवान कार्येश नाहीत. विरोधी भावांचे मात्र बलवान कार्येश
होते. चंद्र जरी व्दितीयाचा कार्यश असला तरी तो 'ब' दर्जाचा आहे. त्यामुळे घटस्फोटाचा
योग होता.
१९३७ मध्ये बुध दशेत राहू व गुरू
अंतर्दशा होती. गंमत म्हणजे गुरू चंद्राच्या नक्षत्रात असल्याने व्दितीयाचा बलवान
कार्येश होतो तर राहू गुरूच्या सब मध्ये असल्याने. कायदेशीर घटस्फोट तर या
दोघांपैकी एका अंतर्दशेत झाला.
काही ज्योतिर्विद स्त्री कुंडलीत
रवि पतीकारक मानतात तर काही गुरु. दोघेही या कुंडलीत निचेचे आहे व दोघांचाही
नीचभंग झालेला आहे. गुरु मात्र उच्च नवमांशी असल्याने त्याचा निचभंगाला काहीशी बलवत्ता
आहे. गुरु सप्तमेशहि आहे व नवमांश लग्नेशही. नवमांशात लग्नेश पंचमात उच्चीचा आहे
पण सुखस्थानात केतू हा रवी गुरुच्या मध्यात आहे. चतुर्थावर राहू, शनि या पापग्रहांची
दृष्टी. येथे सप्तमेश बुध लग्नी नीचेचा आहे. दाराकारक मंगळ षष्ठात स्वराशीत शुक्र युक्त. लाभेश मंगळ हा पंचमेश तोही शुक्राने युक्त या जोडीचा प्रताप. राशीकुंडलीतही हि जोडी पंचमेश लाभेश असून पंचमात आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा