||श्री||
मागील लेख:- हेडी लॅमर (Hedy Lamarr)
मकर संक्रमण २०२३
यंदा रविचा मकरेत प्रवेश मंदवासरे, पौष
कृ. सप्तमी शके १९४४ ला ३३ घटी ४० पळे समयी होता. काहींना नाही समजलेना? म्हणजे
शनिवारी १४ जानेवारी २०२३ ला रात्री ०८:४४ वाजता होता. मी महाराष्ट्र राज्याच्या
दृष्टीने संक्रमण कुंडली तपासणार आहे. त्यामुळे कुंडलीची निर्मिती विधान भवन, मुंबई
(१८°/५५’/३४.६३”,
७२°/४९’/२७.९१”)
या स्थळाची करणार आहे. याचे परिणाम मी पौष कृ. सप्तमी ते माघ कृ. सप्तमी दरम्यान
गृहीत धरणार आहे. जागतिक
दिनदर्शिके नुसार याचे परिणाम १४ जाने. ते १३ फेब्रु. दरम्यान गृहीत धरत आहे. बरेचजन
मकर संक्रांतीचा परिणाम तीन मास धरतात. लेख लिहित असे पर्यंत म्हणजे १ फेब्रु.
पर्यंत अर्धा महिना संपला आहे. पण आज एका माजी विद्यार्थिनीने या विषयी विचारणा
केली म्हणून मी हा लेख लिहित आहे त्यामुळे इतक्या उशिरा लिहिला गेला. एक अभ्यास
म्हणून लिहित आहे. लाहिरी अयनांश २४°/०९’/४७” घेतले आहेत.
३°/७’ सिंह लग्न मेष नवमांशाची कुंडली आहे. महाराष्ट्राच्या धनु राशीच्या भाग्यात हे संक्रमण लग्न आलेले आहे. महाराष्ट्रासाठी मकर संक्रांती शुभ आहे असे म्हणता येईल. दशमात मंगळ आहे. मंगळ, त्याचा राशी स्वामी व नक्षत्र स्वामी हे तिघेही त्रिकोणात आहेत. त्यामुळे सत्ता पालटाची जी भीती काही ज्योतिर्विदांनी व्यक्त केली आहे ती निदान महाराष्ट्रासाठी तरी फलित होईल असे वाटत नाही. उलट विरोधी पक्षातील काही महिला नेत्या सत्तापक्षला बळ देण्याची शक्यता आहे. प्रशासनाची पकड चांगली असेल. लग्नेश रवि षष्ठात शनि, शुक्र युक्त आहे. अंशात्मक योग नाहीयेत किंवा होण्याचा संभवही नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील कुण्याही सक्रीय राजकारणी व्यक्तीच्या आरोग्या विषयी काही फार मोठे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. १४ जाने. ते १३ फेब्रु. या दरम्यान महाराष्ट्रातील चाकरमाने नोकरदार वर्गासाठी काही चांगले निर्णय घेतले जाऊ शकतात. नोकरभर्ती होऊ शकते. संरक्षण क्षेत्रातील व्यक्तींचे राजकीय व्यक्ती/ प्रजेशी काही संघर्ष, तणाव निर्माण होऊ शकतो. व्ययेश चंद्र धनात असल्याने या काळात परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पंचमेश गुरु अष्टमात स्वराशीत आहे. शेअर मार्केट सध्या अडचणीत आहे. ८ तारखेला मार्केट मध्ये सुधारणा होईल असे वाटते. तत्पूर्वी ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान शेअर मार्केट क्रॅश होऊ शकते, निदान मंदी राहू शकते. याचा विचार करता अदानी प्रकरणात ६ फेब्रु. पर्यंत दिलासा मिळणार नाही असे वाटते.
.png)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा