||श्री||
बघ माझी आठवण येते का? भाग- १
हि कहानी आहे शशिकांत उर्फ शशी आणि ज्युली. (बदलेली फिल्मी नावे.) अनेक अंतर
जातीय/धर्मीय प्रेम विवाह होतात तर अनेक जणांच्या वाटा काही पावसाळे पाहून वेगळ्या
होतात. कथा तशी नेहमीचीच आहे पण आपण ज्योतिष अंगाने बघणार आहोत. ज्योतिष शास्त्रात
काही गोष्टी निषिद्ध असल्याने मी जातकाच्या कुंडलीतील विवाह सौख्य पहायचे ठरवले.
L – बु(के), S – र, R – बु(के), D – चं. शशीच्या कुंडलीत
सप्तमाचा सब शनि आहे. शनि शासक ग्रहात नाही. तसा तो शासक रविच्या युतीत आहे.
सप्तमाचा सब शनि, सप्तमावर शनिची लग्नातून दृष्टी, शनिचीच महादशा ११/१०/२०१० ते
२०२९ पर्यंत म्हणजे २० ते ३९ व्या वया दरम्यान आहे. शनि त्याचा न.स्वामी रवीच्या
दृष्टी मुळे ५ चा कार्येश होतो आहे. पंचमाचा सब गुरु २ चा बलवान कार्येश आहे तसे तो
सप्तमात आहे. पण शनि किंवा त्याचा न.स्वा रवि स्थिर राशीत नसल्याने प्रेम विवाहास
पुष्टी मिळत नाही. प्रार्थमिक अहवाल सांगतो कि प्रेम विवाहास शशीच्या सबचा नकार
आहे. (अर्थात अश्या कार्येशत्वावर विवाह झाल्याचे उदाहरणे आहेत पण प्रयत्न, तडजोडी
कराव्या लागतात.) सप्तमेश बुध शुक्र युक्त व्दादशात पंचमेश मंगळाच्या दृष्टीत व
शुक्र मंगळ राशी परिवर्तन हे प्रेम विवाहास पोषकयोग ही प्रेमविवाह घडवू शकले नाही.
याच शनिची महादशा आहे. शनि १,२,१०,११ व
दृष्टी संबंधातून ५ चा कार्येश आहे. शनि विवाह अनुकूल व विरोधी दोन्हींचा मिश्र
कार्येश आहे. जातकाची ज्युलीशी ओळख सोशल मिडीयावर जून/जुलै २०१९ मध्ये शुक्र
अंतर्दशेत गुरु विदशेत झाली. शुक्र १,२,६,१०,११ चा
बलवान व दृष्टी संबंधातून ५ चा कार्येश आहे. गुरु १,२,६,९,११ चा बलवान व दृष्टी संबंधातून ४,५,१२ चा
कार्येश आहे. हा फक्त परिचय असावा लगेच प्रेमाची कबुली दोघांपैकी कुणी दिली नसावी.
प्रेमाची कबुली तिने आधी दिली ०३/११/२०१९ रोजी लग्नाचा प्रस्ताव ठेवून.
जैसे सागर में लहर उठती है,
ऐसे किसी चेहेरे पे निगाह रुकती है,
ओsss रोक सके ना इन नजरो को दुनिया भर कि रसमे,
ओss ना कुछ तेर बसमे है ज्युली ना कुछ मेरे बस मे ||
प्रेमी आणि कवी दोघांना कारण मिमांशेची गरज नसली तरी ज्योतिषाला ती करावी लागते. प्रेमाची कबुली तिने आधी दिली लग्नाचा प्रस्ताव ठेवून. त्या वेळी शुक्र भूक्तीत शनि विदशा होती. दोघांचेही कार्येशत्व पाहिले आहेच. हा जो प्रस्ताव आला तो महादशा, विदशानाथ शनिच्या ५ च्या दुय्यम कार्येशत्वा मुळे. अंतर्दशानाथ शुक्र हि ५ चा दुय्यम कार्येश आहे. पंचमेश मंगळ व सप्तमेश बुध यांची दिप्तांश दृष्टादृष्ट असल्याने जातक सांगतो ते खरे असावे कि प्रेमविवाहाचा प्रस्ताव पहिले तिने ठेवला. ज्युलीचे वडील वगळता दोन्ही घरांची विवाहास मान्यता होती. जातक तिच्या पेक्षा उच्चवर्गीय आहे. २४/१०/२०२१ ला विवाह निश्चित करण्या करता बैठक झाली. त्यात तिचे वडील आपमान होईल असे बोलत होते. परिणामी विवाह मोडला. ज्युलीच्या घरचे म्हणत होते वडिलांचा स्वभावच तसा आहे. तुम्ही दुर्लक्ष्य करा. तुमचे प्रेम आहे ना मग भले तुम्ही पळून जाऊन विवाह करा. जातकाच्या घरच्यांनीही पाठिंबा दर्शविला. पण ज्युलीची तयारी नव्हती. ती म्हणाली पळून गेलो तर वडीलांनी शशीचे कुटुंब संपवण्याची धमकी दिली आणि ते तसे करतील. दुय्यम योगांच्या आधारांवर शशीच्या जीवनात प्रेमाचा बहार आला असल्याने हे यशस्वी झाले नाही. चंद्र अंतर्दशेत (१४/०९/२०२१ ते १५/०४/२०२३) शशीचा प्रेमभंग झाला व पारंपारिक विवाह ठरला. चंद्र १,२,६,११ चा बलवान व दृष्टी संबंधातून ५ चा कार्येश आहे. सर्वच ग्रह विवाहा संबंधी मिश्र कार्येशत्व देत आहेत. अश्या वेळी फार प्रयत्नाने अनुकुलत्व आपल्या बाजूला वळवावे लागते. चंद्र विवाह विरोधी प्रमुख ६ चा बलवान कार्येश असल्याने ना प्रेम विवाह झाला ना पारंपारिक विवाह. प्रेम विवाह फिस्कटला तो चंद्र अंतर्दशा विदशेत. तर प्रेम संबंध संपुष्टात आले ते चंद्र अंतर्दशा गुरु विदशेत. गुरु ५ सोबत प्रेमविरोधी ४ चाही दुय्यम कार्येश आहे. शुक्र गुरुत प्रेम जुळले ते चंद्र गुरुत संपुष्टात आले. महादशानाथ व विदशानाथ एकच आहेत फक्त अंतर्दशानाथ बदलले आहेत. शुक्र आणि चंद्र यांचे न.स्वामी वेगळे असले तरी पापग्रह (शनि, राहू) आहेत व १,२ हे समान मिश्र कार्येशत्व दोघेही देत आहेत. मग तरीही फलीतात असा बदल का? गोचरी तर आहेच पण शुक्र चंद्राचे सब बघा. शुक्र शनीच्या तर चंद्र शुक्राच्या सब मध्ये आहेत. शुक्र ६ या प्रमुख विवाह विरोधी भावाचा कार्येश आहे. त्यामुळे शुक्र अंतर्दशेत प्रेम जुळले व चंद्र अंतर्दशेत प्रेम विफल झाले. हे उदाहरण ग्रहांचे फळ देण्याच्या प्रवृत्ती विषयीचे मुलभूत नियम अभ्यासनास उपयुक्त आहे. प्रेम जुळले तेव्हा सप्तमाचा सब शनि लग्नी होता व विफल झाले तेव्हा व्दितीयात. ज्युलीने लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा शनि गुरुच्या सब मध्ये गोचर करत होता. गुरु ११,९ चा बलवान कार्येश आहे. प्रेम विफल झाले तेव्हा शनि राहुच्या नक्षत्रात गोचर करत होता व राहू ११ या अनुकूल बरोबरच १० या विरोधी भावाचा बलवान कार्येश आहे.
आ मै तेरी याद में सब को भुला दु,
दुनिया को तेरी तसबीर बना दु,
मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दु,
ओsss दौड रहा है संग लहू के प्यार तेरा नस नसमें,
ओss ना कुछ तेर बसमे है ज्युली ना कुछ मेरे बस मे ||
अशी काहीशी शशीची अवस्था झाली असावी हे आपण समजू शकतो. “जा सिमरन जी ले अपनी
जिंदगी|” अस म्हणणारा प्रियेशीचा बाप सगळ्यांच्याच नशिबी नसतो.
क्रमश: ........
ज्या गीताची आपण आठवण केली आहे ते किशोर कुमारच्या आवाजातले गीता ऐकू या, लिंक देत आहे. हृतिक रोशन व यामी गौतमी वर 'काबील' मध्ये चित्रांकित केलेल्या या गीताचा रिमिक्स कानाला त्रास देते. तेव्हा हे मूळ गाणच देतो.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा