शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

हार पळवला.

||श्री||

मागील लेख:- लाटेवर स्वार किलाटेवर मात?


हार पळवला



१९/०८/२०२४ ला सोमवारी रक्षाबंधन निमित्ताने साधारण २ तोळ्याची माळ गळ्यात घातली होती. घरी आलेले पाहुणे वगैरे गेल्यावर रात्री ८:३० ला घरच्यां बरोबर फोटो काढला त्यात ती माळ होती. दुसऱ्या दिवशी (२०/०८/२०२४) संध्या ४:०० वाजता बाहेर जातांना गळ्यात माल नसल्याचे लक्षात आले. बाहेर जायची घाई असल्याने असेल घरात, ठेवली असेल कुठे असा विचार करून निघून गेले. झोपतांना उशासी ठेवते पण सोमवारी रात्री झोपताना काढून ठेवली कि नाही ते आठवत नाही. बेडखाली, बेडमध्ये सर्व ठिकाणी तपासले. घरात सगळीकडे तपासले.  

è २० तारखेला मंगळवारी पहाटे ०५:३५ ते बुधवारी पहाटे ०३:०० पर्यंत शततारका नक्षत्र होते. वस्तू नसल्याचे लक्षात तर याच नक्षत्रात आले. याच नक्षत्रात वस्तू हरवली असावी. शततारका नक्षत्र मंद लोचनी असल्याने वस्तू दक्षिनेकडे सापडते. शततारका ऊर्ध्वमुखी आहे.

माझ्या कडे जातक २१/०८/२०२४ ला दुपारी १२:००:३४ वाजता आल्या होत्या. लग्नेश शुक्र लाभात लाभेश रवि व भाग्येश बुध युक्त आहे. लग्नेश तर उत्तम स्थितीत आहे. धनेश सप्तमेश मंगळ अष्टमात असल्याने वस्तू चोरीला गेली असावी अशी शक्यता आहे. मंगळ तृतीयेश/षष्ठेश गुरु युतीत आहे. जातक बाहेर वा शेजारी पाजारी गेली नाही असे म्हणत होती. फक्त दुध आणायला गेली होती. षष्ठेश गुरुचा विचार करता मग नोकरांच्या ताब्यात वस्तू असावी असे म्हणावे लागेल. मंगळ अष्टमात असल्याने कचरा वगैर विचारले असता तो तपासला असे म्हणाल्या. त्यांचे स्वच्छतागृह दक्षिनेस असल्याने तिथे तपास करायला सांगितले.

L शु,  S गु(रा), R ,  D बु(के).  लाभाचा सब रवि केतूच्या नक्षत्री आहे.

रवि – १०, न.स्वा. के- ११(बु-१०/९,१२), सब चं- ५, न.स्वा. गु- ८/३,६

गुरूची व्दितीयावर अंशात्मक दृष्टी आहे. तसेच व्दितीयाचा बलवान कार्येश मंगळाच्या युतीत गुरु आहे. त्यामुळे रवि बऱ्यापैकी २ चा कार्येश होतो आहे. चंद्राचीही लाभावर दिप्तांश दृष्टी आहे. त्यामुळे दागिना सापडेल अशी आशा करायला हरकत नाही. रवि जातकास अनुकूल असलेल्या १,२,३,६,१०,११ पैकी ३,६,१०,११ चा बलवान कार्येश आहे तर ४,५,७,८,९,१२ या दुसऱ्या किंवा चोरास अनुकूल असलेल्या भावांपैकी ५,८,९,१२ चा कार्येश आहे. त्यामुळे लाभाचा सब स्पष्ट काही सांगत नाही.



वस्तू हरवली कि चोरीला गेली ते पाहू? दागिना असल्याने व्दितीयाचा सब घेवू या. व्दितीयाचा सब चंद्र आहे. चंद्र ८ चा कार्येश असल्याने दागिना चोरीस गेलेला असण्याची शक्यता आहे. चंद्र २,३,६,१०,११ या अनुकूल तर ४,५,८,९,१२ या प्रतिकूल भावांचा कार्येश आहे.



सप्तमाचा सब शनि असल्याने वृद्ध किंवा जास्त वय असलेली व्यक्ती असू शकते. ६ भाव नोकर तर ८ भाव सफाई कर्मचारी दर्शवितो. २ भाव कुटुंबातील व्यक्ती तर ३ भाव लहान भावंडे किंवा निरोप्याचे काम करणारी व्यक्ती. ४ भाव घरातील व्यक्ती किंवा घराच्या आवारात राहणारी व्यक्ती. पाहुणे गेल्या नंतरच्या फोटोत हार होता. त्यामुळे घरातीलच एखाद्या व्यक्तीला किंवा सफाई कामगाराला हार मिळाला असावा असे वाटते. शनि ५,९,११ चा कार्येश नसल्याने संतती, सून/जावाई, नातवंड यांचा विचार करता येणार नाही. मंगळ ८/२,७    चा कार्येश आहे. जातकाचे पती अर्धांगवायुने पिडीत असून त्यांच्या हालचाली मर्यादित आहेत. त्यामुळे संशयाची सुई सफाई कामगारावर येते आहे. परंतु घरात कोणी सफाई कामगार किंवा मोलकरीण वगैरे नाही. व्दितीयाचा सब हार चोरीस गेल्याचे दर्शवित आहे पण आपल्याला कुंडली वरून चोर शोधता येत नाहीये. वस्तू तर मिळणार आहे तेव्हा पूर्ण घराची दक्षिण दिशेस परत एकदा शोध घ्यावा असे सांगितले.

चर लग्न असून बहुतेक ग्रह २,६,११ पैकी कार्येश आहेत. वस्तू लवकर मिळायला हवी. चंद्र २३ ऑग. १९:४४ ते २५ ऑग. २२:२० दरम्यान मेषेत म्हणजे सप्तम केंद्रात असणार आहे. या दरम्यान दागिना मिळायला हवा. शनि बुध वक्री आहेत तर राहू शनीच्या नक्षत्री. गुरु, शुक्र केतू हे शासक राहतात. तुळेत गुरुचे नक्षत्र व धनुत केतू, शुक्राचे नक्षत्र यांचा विचार करावा लागेल. तुळेत गुरुच्या नक्षत्री चंद्र ८ सप्टें दु. ०३:२० ते ९ सप्टें दु. ०५:५३ दरम्यान असणार आहे. १८ दिवसांनी हे गोचर सापडणार आहे. तर धनुत केतूच्या नक्षत्री ११ सप्टें रात्री ०९:११ ते १२ सप्टें रात्री ०९:४२ दरम्यान म्हणजे २१ दिवसांनी. हा तसा उशीर होईल. मेषेचा मंगळ शासकात नाही पण गुरुच्या युतीत असल्याने त्याचा विचार करू.  चंद्र मेषेत केतूच्या नक्षत्री २३ ऑग. साय.०७:४५ ते २४ ऑग. साय. ०५:५८ दरम्यान वस्तू मिळायला हवी. व्दितीयावर गुरूची दृष्टी असल्याने वस्तू मिळायला हवी.



              २१/०८/२०२४,१८:२३ ता.क. – तुमच्या कडून आल्यावर लगेच तुम्ही सांगितल्या प्रमाणे शोध सुरु केला. दक्षिणेस हॉल व किचन आहे. प्रत्येक वस्तू काढून शोध घेत होते. साधारण ६ च्या आसपास हार सापडला. किचन ओट्यावर गॅसखाली होता. उंदराने ओढून नेला होता. घरात एक उंदीर घुसलेला होता. त्याचा बंदोबस्तासाठी उपाय केला होता पण सापडत नव्हता. हार थोडा कुरतडला आहे.

पुढील लेख लवकरच.......

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा