||श्री||
विधानसभा - २०२४ नाशिक.
१६/११/२०२४, १८:४०:१७
नाशिक मध्ये भाजपाचे सीट येतील का?
प्रश्न स्थिर
लग्न स्थिर नवमांशावर विचाराला गेला आहे. नाशिक मध्ये एकूण १५ विधानसभा मतदारसंघ
येतात. आपण नाशिक शहरा करता प्रश्न पाहत आहोत. नाशिक शहरात ३ विधानसभेच्या जागा
आहेत. नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम अश्या त्या जागा आहेत. २०१९ मध्ये या
तिन्ही जागा भाजपा कडे होत्या. नाशिक पूर्व – श्री. राहुल ढिकले. नाशिक मध्य – सौ.देवयानी
फरांदे, नाशिक पश्चिम – सौ.सीमा हिरे विजेते झाले होते. या वेळीही महायुती कडून
तिन्ही जागा भाजपाच लढणार आहेत. भाजपाने तिन्ही जागी पूर्व विजते उमेदवारच दिले
आहेत काहीही बदल केलेला नाही. महाविकास आघाडीने नाशिक पूर्व मधून श्री.गणेश गीते (शरद
पवार गट), नाशिक मध्य – श्री.वसंत गीते (ठाकरे गट) तर नाशिक पश्चिम – श्री.सुधाकर
बडगुजर (ठाकरे गट) असे उमेदवार दिले आहेत. प्रश्न स्थिर लग्न स्थिर नवमांशावर
विचारला गेला आहे हे आपण पाहिले आहेच. दशमेश शनि दशमात स्वत:च्या स्थिर राशीत आहे.
नाशिक मध्ये भाकरी फिरणार नसल्याचे संकेत हे योग देत आहे. शनि कालच मार्गी झालेला
आहे. हा शनि महायुतीला मोठे स्मरणीय यश देवू शकतो पण हा शनि पापकर्तरीत असल्याने त्याची
बलवत्ता कमी होत आहे. त्यामुळे सहयोगी पक्षांचा हवा तसा सहयोग मिळणार नाही.
विरोधी पक्ष फारसा
बलवान नाही. रवि मित्र राशीत असला तरी त्याने अगदी नुकताच राशी प्रवेश केला आहे.
राशीस्वामी मंगळाचा निचभंग बलवान चंद्रा कडून व शनि कडून होतो आहे. रविच्या अंशात्मक
प्रतियोगातील वक्री हर्शल मुळे जनतेच्या अचानक फिरलेल्या लहरी चा फटका काही
विरोधकाना बसू शकतो. चतुर्थ स्थानही पापकर्तरीत आहे. दशमाच्या पापकर्तरी पेक्षा
चतुर्थाची पापकर्तरी तर अधिक धारदार आहे. त्यामुळे नाशिक शहरातील लढत दोन्ही
बाजूच्या घटकपक्षांच्या स्वबळावर होण्याची चिन्हे दिसत आहेत. बघुया, पुढच्या
शनिवारी उमेदवारां बरोबर आपल्या भाकीताचाही निकाल लागणार आहे. भाकितात एक उणीव आहे
ती म्हणजे उमेदवारांच्या वैयक्तिक कुंडल्या अभ्यासल्या नाहीयेत.
षष्ठाचा व लाभाचा सब राहू मार्गी शनिच्या नक्षत्री व शुक्राच्या सब मध्ये आहे. शुक्र केतूच्या नक्षत्री. राहू चवथ्या पायरीवर विरोधकांना अनुकूल ५ चा बलवान कार्येश होतो आहे. राहू लाभात असला व त्याचा सब शुक्र षष्ठेश असला तरी हे कार्येशत्व बलवान नाही. सब राहू प्रतिस्पर्धी विजयी होणार असल्याचे संकेत देत आहे. व्ययाचा व पंचमाचा सब गुरु वक्री असला तरी तो मार्गी मंगळाच्या नक्षत्री व राहुच्या सब मध्ये आहे. गुरु विरोधकांना अनुकूल भावांचा तसेच पूर्व निर्वाचित उमेदवारांना अनुकूल भावांचा बलवान कार्येश नाही. गुरुचा नक्षत्रस्वामी मंगळाची षष्ठावर अंशात्मक चतुर्थ दृष्टी असल्याने हि बलवान दृष्टी मानली जाईल. सब गुरु प्रतीस्पर्धींना अनुकूल नाही मात्र पूर्व निर्वाचीतांना सेफ पॅसेज देत आहे. या वरून असे अनुमान काढता येईल कि तुंबळ लढाई होईल व पूर्व निर्वाचित यशस्वी होतील पण चमत्कार वगैरे होणार नाही. दोन्ही बाजूंचे पारंपारिक किंवा अपेक्षीत मतदार दान दुसऱ्याच्या झोळीत टाकतील, पण हे दोन्ही बाजूंनी होणार असल्याने अटीताटीच्या सामन्यात पूर्व निर्वाचित बाजी मारून गड राखण्यात यशस्वी होतील.
पुढील लेख:-लवकरच...........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा