||श्री||
मागील लेख:- विधानसभा - २०२४ नाशिक.
काका पुतणे लढत.
१९/११/२०२४, २०:३८, केपी
नं-५८. अजित पवार VS योगेंद्र पवार लढतीत श्री. अजित पवार यशस्वी होतील का?
जातकाने एक उत्सुकता म्हणून प्रश्न विचारलेला
आहे. जातक ना त्यांच्या मतदार संघात आहे ना काही हितसंबंध आहेत. काही दिवसा पूर्वीही
त्यांनी या बाबत पृच्छा केली होती. मी घरी निघायच्या बेतात असतांना त्यांनी पुन्हा
एकवार फोन केला. हा प्रश्न मेदनिय पद्धतीने बघता येणार नाही. कारण जातकाने प्रश्न
विचारतांना या दोघांच्या लढतीत कोण विजयी होईल अश्या स्वरूपाचा विचारला होता.
त्यामुळे हा वैयक्तिक प्रश्न झाला. पण भावातभाव पध्दतीने हि पाहायला गोंधळ होत
होता कारण जातकाचे त्यांच्याशी काही नाते संबंधही नाही. अनेक केपी ज्योतिर्विद क्रिकेट
सामने, निवडणुका आदी प्रश्न पाहत. मला उशीर हि होत होता म्हणून पूर्व ज्योतीर्विदांच्या
पाऊलावर पाऊल ठेवून सब वरून झटपट परिक्षण करून त्यांना त्रोटक उत्तर कळवले. आज
सवडीने जरा विस्तृत विश्लेषण करून सगळ्यांसाठी अनुमान जाहीर करत आहे. त्यांना
खाजगीत उत्तर पाठऊन जर खरे ठरले तर मग स्क्रीनशॉट टाकून मी आधीच सांगितले होते असे
म्हणजे “जंगल मे मोर नाचा किसने देखा” अस
म्हणण्याची अलोचकांना संधी देणे. जर भाकीत केले आहेच तर वर्तुळातील दोनचार जणांना पाठवण्यात
व खरे झाले तर अचूकतेचा दावा करण्यात काय अर्थ नाही का? म्हणून आज इतर कामे बाजूला
ठेवून पोष्ट करत आहे उद्याच्या निकाला पूर्वी. अनेक ज्योतिर्विद भाकीत आधीच जाहीर
करत आहे भाकीत खरे ठरो अथवा चुको त्यांचे अभिनंदन. असो मुद्द्या कडे वळूया.
शासकग्रह – बु, गु, बु, मं. शासक ग्रहात गुरु
असल्याने जातकास अपेक्षीत उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. षष्ठाचा सब मंगळ
आहे. मंगळ ६ चा बलवान कार्येश आहे. लाभाचा सब गुरु ११ चा बलवान कार्येश आहे. सब
श्री. अजित पवार विजयी होतील हे दर्शवित आहे. व्ययाचा सब मंगळ व पंचमाचा सब गुरु
आहे. गुरु ११ व १२ दोन्हीचा कार्येश असल्याने तो निर्णायक मत देत नाहीये. व्ययाचा
सब मात्र श्री. योगेंद्र पवार यांना अपयश देतो आहे. या लढतीत अजून कोणी आहे का? ते
माहित नाही. जातकाने हि दोनच नावे सांगितली. काका-पुतणे असल्याने हि प्रतिष्ठेची
लढाई आहे. लग्नेश बुध व सप्तमेश गुरु यांच्यात असलेला अंशात्मक प्रतियोग याचे
प्रतिक आहे. बुध शत्रू राशीत तर गुरु परमशत्रू राशीत आहे. पण गुरु शुक्र
राशीपरिवर्तनाचे बळ व दुसरे वक्रत्वाचे बळ गुरूला प्राप्त आहे. त्यामुळे मुरलेल्या
श्री.अजित पवारांना हि लढत तितकी सहज जाईल असे वाटत नाही. या जागेचा वाद कोर्टात
जाण्याची शक्यता आहे. बुध, गुरु, शनि हे तीन ग्रह भावारंभी आहेत. भाग्येश शनिची लाभ
व तृतीया वरील दृष्टी बलवान आहे. शनि हा श्री.अजित पवारांचा भाग्येश असला तरी तो
श्री.योगेंद्र पवारांचा पराक्रमेश आहे. श्री.अजित पवारांचा पराक्रमेश रवि मित्र
राशीत असला तरी शत्रूच्या नक्षत्री आहे. तर श्री.योगेंद्र पवारांचा पराक्रमेश शनि
स्वराशीत असून मित्र राहुच्या नक्षत्री आहे. श्री.योगेंद्र पवार चांगले प्रदर्शन
करतील असे वाटत आहे. पण भाग्याची साथ श्री.अजित पवारांना मिळणार आहे.
अनुमान:- श्री. अजित पवार यशस्वी होतील.
पुढील लेख लवकरच.......
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा