शुक्रवार, ५ जुलै, २०१९

वर्ल्डकप क्रिकेट- भारत X श्रीलंका सामना.

॥श्री॥

नक्षत्रप्रकाश ज्योतिष समूह या फेसबुक ग्रुपचा आज व्दितीय वर्धापन दिन. ग्रुपसाठी म्हणून लिहिलेली पोष्ट इथे देत आहे.
अँडमीन श्री. नितीन जोगळेकरसर व सर्व सदस्यांना ग्रुप वर्धापन दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. वर्धापन दिननिमित्त एक भेट म्हणून मेदनिय ज्योतिष आधारीत उदया (६/७/२०१९ दु.३:००) होणाऱ्या भारत x श्रीलंका क्रिकेट सामन्याचा अंदाज वर्तवत आहे. या साठी मी प्रश्नमार्ग निवडला आहे.

प्रश्न कुंडली - ५/७/२०१९, सका.७:२८, नासिक



कर्क लग्न ७ अंश १५ कलावरआहे. चर लग्न आहे म्हणजे सामना कोणतेही व्यवधान न येता होईल असा प्रार्थमिक अंदाज करता येईल. लग्नेश लग्नात आहे.

मेदनियेतही खेळ, खेळाडू पंचमा वरून पाहतात. पंचमात गुरू व पंचमेश लग्नी प्रथम दर्शनी चांगले योग वाटत आहे. प्रतिपक्ष संघाचा विचार लाभावरून करू यात. स्वामी शुक्र त्याच्या मारक स्थानात, पण लाभावर गुरू ची ट्टष्टी आहे. गुरूची दृष्टी लग्नावरही आहे. तुलनात्मक दृष्टया भारताचे भाग्य बलवान आहे. या वरून मला असे वाटते की भारत टॉस जिंकेल. भारताचे प्रतिनिधित्व मंगळा सारखा आक्रमक, आत्मविश्वासू ग्रह करत असल्याने व तो निच असल्याने भारत प्रथम गोलंदाजी करेल.

भारतीय संघाचा विचार करता पंचमात गुरू व पंचमेश लग्नी प्रथम दर्शनी चांगले योग वाटत असले तरी मंगळ निच आहे तो भारतीय संघाचा अव्यवहार्य आत्मविश्वास दर्शवितो. त्यामुळे प्रथम गेलंदाजीचा निर्णय सुरवातीला टिकेचा धनी होण्याचा संभव असला तरी निचभंग होत असल्याने पराभवा कडे जाता जाता मात करेल पण दमछाक होण्याचा संभव असेल.

मंगळ बुध युती धडाकेबाज खेळाच्या दृष्टीने चांगली नाही याची प्रचिती मागील काही सामन्यात आली आहे. अवसान घात होतो. ही युती बाहूबल जरी कमी करत असली तरी बुद्धीबलाला चांगली ही एक जमेची बाजू, त्यात बुधाला पराक्रमाचे स्वामीत्व लाभले आहे तर मंगळ योगकारक आहे. चंद्र,बुध,मंगळ हे त्रिकूट गुरूच्या पारंपारिक ट्टष्टीत तर चंद्र दिप्तांश पुर्ण नवम दृष्टीत आहे. शिवाय मंगळ पापग्रह संबंध विरहीत आहे. चंद्र,मंगळ व गुरू या नैसर्गीक मित्र ग्रहात नवपंचम हा अत्यंत शुभयोग होत आहे जो सहज यश देणारा आहे. यामुळे निचमंगळ दोषावर मात हाईल.

आता प्रतीपक्ष संघांचे बलाबल पाहू. शुक्र त्याच्या मारकस्थानात पापग्रह राहू रवि युक्त आहे. प्रतिपक्ष संघांचा लग्नेश शनि केतु युतीत त्याच्या व्ययात आहे. त्याचा अष्टमेश रवि समसप्तक योगात व प्रत्यक्ष वैर दृष्टीत तीही दिप्तांशात आहे. प्रतिपक्षाला शुभग्रहाचे पाठबळ नाही. शुक्र हा कला, क्रिडा यांचा नैसर्गीक कारक तो त्यांचा खेळाडूंचा प्रतिनिधी हीच काय जमेची बाजू पण तो आक्रमक, धाडशी मैदानी खेळ दर्शवीत नाही. त्या मुळे प्रतीपक्ष खेळातील सौदंर्याचे प्रदर्शन काही काळ करेल येवढेच पण मिळालेली संधी साधत विजय मिळवणार नाहीत.

सामन्यावर शनिचाही प्रभाव आहे. प्रतिपक्षावरील प्रभाव वरती पाहीला आहेच. भारतीय खेळाडूंचा प्रतिनिधी मंगळ शनिच्या नक्षत्रात कन्या नवमांशी. पंचमातील गुरू बुधा च्या नक्षत्रात मकर नवमांशी. शनीची दशम दृष्टी भारताच्या पराक्रमावर. या मुळे सामना काहीसा संथ, रटाळ होण्याचा संभव असेल. कोणी काही महत्वाचा विक्रम नोंदवेल असे वाटत नाही.

अनुमान:- व्यत्यय येण्याचा संभव कमी असेल. भारतीय संघाची ताकद किंचीत कमी झालेली असली तरी प्रतीपक्ष बलवान नाही व 'नरम लोहे पे मार दो हतोडा' म्हणत संधी साधत सामना वळवण्याच्या स्थितीत नाही. तर भ्रमीत आत्मविश्वासावर रणनीती आखूनही भारतीय खेळाडू धापाटाकत सामना सावरेल. खेळ संथ असेल.

निष्कर्ष:- भारतीय संघ सामना जिंकेल.

पुढील लेख लवकरच.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा