|| श्री ||
यक्षिणीची
कांडी - १
ज्योतिष विषयक काही ग्रुप
वर एका ज्योतीर्विदाने एक पोष्ट शेअर केली. ती अशी :-
“चला, सांगा पाहू लग्न कोणते असेल?
नुकतीच एक पत्रिका तयार
करायला आली होती. त्यांनी दिलेल्या वेळेवरून मेष लग्न 00.08.08 वर आहे. म्हणजे
अगदी त्याच मिनिटाला मेष लग्नाची सुरुवात आहे. मी चेक करण्यासाठी कुंडली एका
मिनिटाने मागे घेतली तर लग्न होत मीन 29.49.28. कुणाच्याही जन्मवेळेत एका मिनिटाचा
फरक अगदी सहजपणे पडू शकतो. यात चूक अशी कोणाचीच नसते. एरवी ते ठीक असतं. पण ह्या
केस मध्ये लग्नच बदलत होतं. आता प्रश्न हा आहे कि या जातकाच नेमकं लग्न कोणतं असेल?
लग्न कन्फर्म करण्यासाठी
मी खालील प्रमाणे रुलिंग प्लॅनेट घेतले.
दिनांक 17.07.2019 वेळ
23.04
L/S-शनी
L - मीन -गुरु
s - श्रवण-चंद्र
R- मकर-शनी
D-बुधवार-बुध
आता तुम्ही सांगा लग्न
मीन असेल कि मेष. उत्तर स्पष्टीकरणा सहित द्यावे. हि विनंती. चुकलं तरी हरकत नाही.
मी अर्थातच उत्तर
काढलेलं आहे. ते रविवारी सकाळी ह्याच पोस्ट ला एडिट करेन किंवा कंमेंट बॉक्स ला
लिहेन.
पहा तुम्ही पण प्रयत्न
करून.”
आता इथे आपल्याला काही भाकीत करायचे
नाहीये तर तांत्रिक बाब हाताळायची आहे. ग्रुपवर मी माझ्या परीने विश्लेषण केले आहे
तेच इथे देतो आहे.
मांडलेला सराव प्रश्न
प्रथमदर्शनी खूपच सोपा वाटतो. जातकाने दिलेल्या जन्मटिपणा नुसार जन्मलग्न मीन-मेष
संधीवर आहे. फलितासाठी लग्न निश्चित करणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी जन्मवेळ
शुद्धीकरणाचा निर्णय घेतलेला दिसतो. त्यासाठी त्यांनी जे रुलिंग घेतले ते टिपण
त्यांनी दिले आहे. त्या प्रमाणे त्यांनी लग्न निश्चित केलेले आहे. त्याचे विश्लेषण
ते येत्या रविवारी देणार आहेतच. या वर इतर कसा विचार करतात हे त्यांना पहायचे आहे.
रुलिंग मध्ये गुरु आहे शिवाय बुधही आहे. त्यामुळे मीन लग्न रेवती नक्षत्रात शनिचा
सब हा जन्मबिंदू येईल ‘हाय काय अन नाय काय’, नाही का? अजून सूक्ष्म विचार करायचाच झाले तर शनीच्या सब मध्ये चंद्राचा सबसब घेवून
त्यात शनिचाच सबसबसब घेतला कि झाले. म्हणजे मीन लग्न २९ अंश १० कला ४० विकला २ सूक्ष्मकलेच्या आसपास येईल. या मुळे जातकाची
जन्मवेळ साधारण ३ मी. ८.४ सें. ने मागे जाईल. पSSSSSण...........
पSSSSSण, हा पण जो आलाय तो काही के.पी. अभ्यासका साठी नवीन नाही. तो
म्हणजे जे चार शासक ग्रह मिळालेत त्या पैकी बुध, गुरु, शनी हे वक्री आहेत. गुरु,
बुध वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असल्याने त्यांचा विचारच करता येणार नाही. केवळ
चंद्राच्या जोरावर लग्नबिंदू पर्यायाने जन्मवेळ निश्चित करता येणार नाही. लग्नबिंदू
राहूद्या पण नुसती लग्नरासही निश्चित होणार नाही. कारण संभ्रम मीन की मेष असा आहे,
चंद्र कर्करास दाखवेल. मीनेत किंवा मेषेत चंद्राचे नक्षत्र नाही, त्यामुळे
इथेही तो निरुपयोगी ठरतो.
जन्मवेळ
सेकंदा पर्यंत गेला बाजार मिनिटां पर्यंत तरी काढता येईल असा लग्नबिंदू अपणाला हे
रुलिंग काही मिळवून देणार नाहीत. अगदी लग्नरास हि सांगत नाहीयेत. कदाचित या मुळेच
अजून पर्यंत म्हणजे हा दुसरा भाग लिहायला घेई पर्यंत तरी (रात्री ८:३८) कुणी लग्न
कोणते ते या ग्रुपवर सांगितले नसावे. (अन्य ग्रुपवर सांगितले असल्यास मी अनभिज्ञ
असल्याने क्षमस्व.) जन्मलग्न, जन्मचंद्र व रुलिंग लग्न, रुलिंगचंद्र यांच्या कोरुलरर्स
वरून निश्चिती करण्याचीही पद्धत वापरता येणार नाहीये कारण जातकाचे डिटेल पुरवण्यात
आलेले नाहीत. जे काही करायचे आहे ते फक्त यक्षिणीची कांडी वापरून, अन तिच्यात तर
नावापुरतीच जादुईशक्ती दिसते. मग आता आपणही हात झटकून शांत बसावे कि काय?
नाही, खरोखरच
रुलिंग काहीच दाखवायला तयार नाहीत का? नाही अजून हार मानता येणार नाही. आहे, अजून
एक प्रावधान आहे. ते वापरू या की. ओपनर नाही खेळले म्हणून काय झाले पुढची फळी आहे
की. रुलिंग मधील ग्रहांच्या युतीतील किंवा रुलिंग लग्नावर दृष्टी असाणाऱ्या
ग्रहांना फलंदाजीला पाठवता येते. पण हे प्रावधान गुरुवर्य श्री.कृष्ण्मुर्तीचे कि
त्या नंतरचे या बाबत माझ्या कडे माहिती नाही. या साठी रुलिंग घेतेले त्याचे स्थानांश
लागतील ते मी पोष्टकर्त्यांना विचारले होते त्यांनी
माहिती दिली ती अशी “Yogesh
Daithankar R.P. Chiplun,
17.53.12.
73.52.” आता हे स्थानांश त्यांनी दशमान पद्धतीचे दिले कि षष्ठमान पद्धतीचे ते
स्पष्ट केले नाही. त्यांना त्रास तरी किती देणार. त्यामुळे मीच गुगली करून
स्थानांश काढले ते असे चिपळून – १७/३१/५२N, ७३/३१/१४E.
पण याचा उपयोग झाला नाही कारण लग्नावर अंशात्मक किंवा दिप्तांश दृष्टी कुणाचीच नाही. रुलिंग मधील शनीच्या युतीत केतू आहे तोच काय तो हाताला लागला. लग्न कोणते याचा निकाल त्याने दिला. मेषेत केतूचे नक्षत्र आहे. जातकाने दिलेल्या वेळे नुसार मेष ००.०८.०८ लग्न येते हि जी माहिती आपल्याला पुरवण्यात आली निदान ती बरोबर असल्याचा निर्वाळा हा केतू देतोय. होय मंगळ रुलीग मध्ये नाही पण चंद्र १० अंश ८ कला व मंगळ १५ अंश ५९ कला वर समसप्तकात असल्याने दृष्टी संबंधातून रुलिंग मध्ये ओढता येईल. सामना ओपनर ने नाही तर मधल्या फळीने निर्णायक केला तर.
या नंतर हे लग्न घेवून जातकाच्या जीवनातील घडलेल्या घटनांशी पडताळून पहायचे असते ती माहिती आपल्या कडे नाही, त्यामुळे हा टप्पा घेत नाही.
पण याचा उपयोग झाला नाही कारण लग्नावर अंशात्मक किंवा दिप्तांश दृष्टी कुणाचीच नाही. रुलिंग मधील शनीच्या युतीत केतू आहे तोच काय तो हाताला लागला. लग्न कोणते याचा निकाल त्याने दिला. मेषेत केतूचे नक्षत्र आहे. जातकाने दिलेल्या वेळे नुसार मेष ००.०८.०८ लग्न येते हि जी माहिती आपल्याला पुरवण्यात आली निदान ती बरोबर असल्याचा निर्वाळा हा केतू देतोय. होय मंगळ रुलीग मध्ये नाही पण चंद्र १० अंश ८ कला व मंगळ १५ अंश ५९ कला वर समसप्तकात असल्याने दृष्टी संबंधातून रुलिंग मध्ये ओढता येईल. सामना ओपनर ने नाही तर मधल्या फळीने निर्णायक केला तर.
या नंतर हे लग्न घेवून जातकाच्या जीवनातील घडलेल्या घटनांशी पडताळून पहायचे असते ती माहिती आपल्या कडे नाही, त्यामुळे हा टप्पा घेत नाही.
निष्कर्ष
:- जातकाने सांगितलेली जन्मवेळ बरोबर आहे म्हणजे जन्मलग्न मेष रास अश्विनी नक्षत्र
प्रथम चरणात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा