|| श्री ||
भारत X न्यूझीलंड सामना. वर्ल्डकप
क्रिकेट- २०१९
ज्योतिष ग्रुप वर सामन्याचे भाकीत
चर्चेत चालू होती. “टॉस साठी १ ते २४९ पर्यंतचा नंबर उत्स्फूर्तपणे द्यावा.
भारतासाठी व न्यूझीलंडसाठी वेग वेगळा द्यावा. एकाच व्यक्तीने दोन्ही टीम साठी न
देता एका टीमसाठीच द्यावा. दिलेला नंबर कोणत्या टीम साठी त्याचा उल्लेख करावा.
धन्यवाद.” अशी कमेंट केली होती व नंबर आले.
Dinesh
Javadekar 238 न्यूझीलंड
साठी, Madhvi Jawadekar 156 Bharat. संदर्भ साखळी-
https://www.facebook.com/groups/npastrogroup/permalink/385033972136031/?app=fbl
चला तर बघुया.
https://www.facebook.com/groups/npastrogroup/permalink/385033972136031/?app=fbl
चला तर बघुया.
नाणेफेक हा पूर्णपणे
दैवाधीन भाग आहे म्हणून मागच्या सामनाच्या वेळी पारंपारिक पद्धतीने कुंडली
सोडवतांना ज्या संघाचे भाग्य बलवान तो नाणेफेक जिंकेल असे भाकीत केले पण ते
प्रत्ययास नाही आले. भाग्यबल ठरवतांना काही तरी चुकले माझ्या मते भाग्येश वक्री या
कडे दुर्लक्ष केले हे असावे, असो. म्हणून या वेळेला नक्षत्रपद्धत वापरून पहावी असे
मनात आले. यासाठी गुलबर्गा पद्धतीचा वापर करत आहे. भारता साठी होरारी नंबर- १५६ मिळाला.
हा नंबर वर्चस्व, स्फूर्ती, धोरणीपणा व कुटिलताहि दर्शवितो. न्यूझीलंड साठी होरारी
नंबर – २३८ मिळाला. हा नंबर मर्यादा, ज्ञान, सावधपणा, व धाडस, स्फूर्ती दाखवतो.
म्हणजे तसे तुल्यबळ अंक मिळाले.
आता ८/७/२०१९ सायं.६:५३:२२ वाजताचे शासकग्रह पुढील प्रमाणे आहेत.
ल – गुरु (वक्री), न.स्वा.- चंद्र, रा.स्वा.- बुध (वक्री), दि.स्वा.-
चंद्र, ल.न.स्वा.- शुक्र.
असे आहेत. गुरु बुध आपल्या उपयोगाचे नाहीत ते वक्री आहे. म्हणजे
आपल्या कडे शासक म्हणून दोनच ग्रह आहेत चंद्र व शुक्र. दोन्ही शीघ्रगती आहेत. पण गुरुने
केतू व बुधाने राहू आपले प्रतिनिधी म्हणून मात्र नेमून दिले. पैकी राहू गुरुच्याच
नक्षत्रात असल्याने तो प्रतिनिधी म्हणून कंपनी सरकारला मान्य नाही. परिणामी बुधाचे
शासकत्व खालसा झाले. कुठून कुमक मिळण्यासारखी परिस्थिती नाही. अंतिमत: आपल्याकडे
चंद्र,शुक्र,केतू हे तीन शासकग्रह आहेत.
भारताचा नंबर १५६ चे अधिकारी ग्रह मंगल,
शनी, राहू क्रमश: येतात. यातले कुणी शासक ग्रहात नाही.
न्यूझीलंडचा नंबर २३८ चे अधिकारी ग्रह
गुरु, शनी, मंगळ हे हि शासकग्रहात नाहीत.
याचा अर्थ नाणेफेकीचा उत्सुकताभंग
माझ्या कडून होऊ नये ही नियतीची ईच्छा दिसते तेव्हा हा विषय खरे तर थांबवायला हवा.
दोन्ही संघासाठी प्रथम येणारा नंबर ग्राह्य धरावा व तेही वेगवेगळ्या व्यक्तीन कडून
आलेला हा माझा विचार होता. पण तरीही एकाच व्यक्ती कडून दोन्ही संघासाठी नंबर आलेत.
ते दर्शक होतात का ते तपासून पाहू एक अभ्यास म्हणून. कारण हे सूचनेनुसार आलेले
नंबर नाहीत.
भारतासाठी- ८१- चंद्र, बुध, राहू. पैकी
चंद्र शासक ग्रहात आहे.
न्यूझीलंडसाठी- १३२ – शुक्र, राहू, शनी.
पैकी शुक्र शासक ग्रहात आहे.
झाले इथेही तेच. पण एक चर्चा इथे करता
येईल कि शासकग्रहात चंद्र बलवान कि शुक्र. आपापली मते अवश्य मांडाच. चंद्र हा
चंद्राचा न.स्वा. असल्याने बलवान आहेच पण शुक्र उदिततारा आहे त्यामुळे तो जास्त
बलवान ठरेल. या नुसार न्यूझीलंड नाणेफेक जिंकेल.
नाणेफेक जिंकली म्हणजे
सामना जिंकला असे होत नाही. तसे असते तर सामना खेळवला गेला असता का? ९/७/२०१९,
मंगळवार सका.७/१२/१७ वाजता सामना कोण जिंकेल यावर विचार करतो आहे. या साठी श्री.
जोगळेकरसरांनी या सामना बाबत सदस्यांनी ज्योतिष विवेचन मांडावे अशी जी पोष्ट केली
ती वेळ (Nitin Joglekar Admin · July 6 at 10:50 PM) भावसंधी करीता आधारभूत
धरली आहे.
या साठी ६,११ चा सब व
प्रतिस्पर्धी संघा साठी ५,१२ चा सब विया साठी ६,११ चा सब व
प्रतिस्पर्धी संघा साठी ५,१२ चा सब विचारात घेतात. सब पहाण्यापूर्वी कुंभ हे स्थिर
लग्न आले आहे. त्यामुळे काही व्यत्यय संभवतो. पण लग्नेश जरी वक्री असला तरी तो
लाभात असून त्याची लग्नावर पूर्ण दिप्तांश तृतीय दृष्ठी असल्याने जे काही जन
म्हणतात कि पावसाची शक्यता असल्याने सामना होणारच नाही हे ज्योतिष दृष्ट्या म्हणता
येणार नाही.
विचाराधीन कुंडलीत षष्ठचा सब बुध आहे.
बुध स्वत: वक्री तर आहेच पण तो वक्री शनीच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे
प्रतिस्पर्धी संघाचा टिकवा लागणार नाही, समर्पण करेल व भारत लीलया सामना जिंकेल असे
विधान करण्याचा मार्ग बंद झाला. षष्ठाच्या सबने नकार दिला.
लाभाचा सब राहू आहे. तो ६,११ चा
कार्येश असेल तर प्रश्न कर्त्याची इच्छा पूर्ण होते. (इथे श्री.जोगळेकर सर
प्रश्नकर्ता म्हणून धरावे लागतील.) लाभाचा सब राहू तो वक्री गुरुच्या नक्षत्रात
आहे म्हणजे प्रश्नच मिटला.
भारताच्या वाट्याला आलेले सब निर्विवाद
यश द्यायला तयार नाहीत किंबहुना ते अपयश देण्याकडे अधिक झुकलेले आहेत. आता
प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या वाट्याला काय आले ते पाहू. भारता सारखीच त्यांची
परिस्थिती असेल तर सामना बरोबरीत सुटण्याची शक्यता असेल. व्ययाचा सब शनी व पंचमाचा
सब गुरु आहे. अरे हे काय झाले. इथेही नकारघंटा अगदी खणखणीत वाजतेय. व्ययाचा सब शनी
जरी मार्गी शुक्राच्या नक्षत्रात असला तरी तो स्वत: वक्री आहे आणि त्यांना मार्गी
व्हायला पुष्कळच अवकास आहे. पंचमाचा सब गुरु हि स्वत: वक्री असून वक्री बुधाच्या नक्षत्रात
आहे म्हणजे तोही प्रतीस्पर्धीला विजय मिळवून देण्यास नकार देतोय. आज सामना होतो कि
नाही?
अनुमान:- भारतीय संघ व न्यूझीलंडला
सपशेल नकार हि कुंडली दर्शवित आहे. व्यत्यय येण्याची दाखवलेली शक्यता. सामना होणार
नाही असे अनुमान काढावे लागते. आहे. बघुया अजून तीन तासांनी हा सूर्य हा जयद्रथ
होतो कि नाही. (व्यत्यय हटून सामना होतो का?)
ता.क.- कालची नाणेफेक व आता हि कुंडली मला आज भाकीत करू
नको असे तर सुचवीत नाही? सामना आज दु.३:०० वाजता आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा