गुरुवार, ४ जून, २०२०

कोरोना (COVID 19) जागतिक संकट व ग्रहयोग

||श्री||


कोरोना (COVID 19) जागतिक संकट व ग्रहयोग



खरे तर या वर काही लिहिणार नव्हतो, कारण संकट येण्या आगोदर जर भाकीत केले असते तर त्याला महत्व होते. एक आभ्यास म्हणून मी कुंडलीचे निरीक्षण केले होते व ते लिहून ठेवले होते, पण ब्लॉग वर प्रकाशित केले नव्हते. साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या वर मी काम केले होते तो पर्यंत या संकाटाने जागतीकता धारण केली होती. हा प्रकार मेदनिय ज्योतिष शाखेत येतो आम्ही जातक ज्योतिषात जास्त रमणारे, शिवाय पंचांग कर्ते, ज्योतिष मासिके या वर लेख देत असतात त्या मुळे या वर मी फारसे व्यक्त होत नाही. याला वेळाही खूप द्यावा लागतो. असो लॉकडाऊन मध्ये या वर विचार केला होता. एका समुहात विषय निघाला म्हणून ब्लॉग वर माझे परीक्षण मांडत आहे, भाकीत म्हणून नाही.

Places
Timings
Maximum Obscuration
Varanasi
8:20 am-9:40 am
45.2%
Ujjain
8.09 am-9.26am
61.5%
Amritsar
8.18 am -9:29 am
40.4%
Bhopal
8.10 am-9:29 am
58.8%
Chandigarh
8.31 am-9:32 am
38.1%
Chennai
8.08 am-9:34 am
85.1%
Delhi
8.17 am-9:30 am
44.8%
Dwarka
8.03 am-9:17 am
74.6%
Guwahati
8.39 am-9:17 am
74.6%
Haridwar
8.21 am-9:33 am
74.6%
Jaipur
8.13 am-9:27 am
74.6%
Jammu
8.20 am-9:29 am
74.6%
Kanyakumari
8.07 am-9:31 am
74.6%
Mumbai
8.39 am-9:17 am
74.6%
Mysore
8.04 am-9:21 am
74.6%
Nagpur
8.11 am-9:31 am
74.6%
Patna
8.24 am-9:45 am
74.6%
Pondicherry
8.08 am-9:34 am
74.6%
Pune
8.04 am-9:23 am
78.5%
Rajkot
8.04 am-9:19 am
72.0%
Ranchi
8.22 am-9:45 am
47.2%
Shimla
8.20 am-9:32 am
38.8%
Thiruvanantapuram
8.07 am-9.30 am
87.6%
Tiruchirappalli
8.07 am-9.23 am
93.1%
Ujjain
8.09 am-9:26 am
61.5%
मेदनिय ज्योतिषा मध्ये अमावस्या, संक्रमण, ग्रहण कुंडलीला अनन्य साधारण महत्व आहे. २६ डिसेंबर २०१९ ला सूर्य ग्रहण होते आणि नेमके त्याच वेळी कोविड १९ नावाचा   नवा विषाणू कोरोना विषाणू परिवारात जन्माला आला. (कि घातला गेला?) १० डिसेंबरला पहिला रुग्ण आढळल्याचे समजते. ग्रहणाचे परिणाम मागे पुढे ६/६ महिने असतो असे म्हणतात. त्या मुळे हि ग्रहण कुंडली महत्वाची ठरते. या कुंडली वरून या संकटा बाबत विचार करता येईल. बऱ्याच ज्योतिषांनी असे विश्लेषण केले आहे. मी जेव्हा या वर विचार करू लागलो तेव्हा यात मला एका समस्येला सामोरे जावे लागले ती म्हणजे कोणत्या क्षेत्रकुंडलीचा विचार करावा? कारण कोविड १९ संक्रमणाचे हे संकट जागतिक
आहे हे एव्हान स्पष्ट झाले आहे. हे ग्रहण आशियाखंड, आफ्रिकाखंडातील एथिओपीआ व केनिया आणि ऑस्ट्रेलीयाचा उत्तर प्रदेश या भागात दिसले होते. ग्रहण ही खगोलीय घटना भूकेंद्रित नसून भूपृष्ठीय आहे, त्या मुळे स्थानपरत्वे ग्रहणाच्या वेळा, कालावधी या वेगवेगळया असतात. ग्रहणाचा प्रकारही वेगळा असू शकतो. या मुळे ज्योतिष दृष्टीकोनातून परिणामही भिन्न भिन्न दाखवणार. पश्चिमभागात हे ग्रहण अगोदर लागते. भारताचा विचार केला तर भारताचे सर्वाधिक पश्चिमे कडील राज्य गुजराथ आहे व त्यात पिपर (Pipar) जवळील किनारा पश्चिमटोक म्हणता येईल. भारतातील काही शहरांचे ग्रहण वेळा देत आहे. भारताची राजधानी दिल्ली येथे ग्रहण मध्य सकाळी ९:३० IST ला होते. त्यावेळी तेथे मकर लग्न १४ अंश होते. तर जेथून हा विषाणू प्रसारित झाला त्या चीन ची राजधानी बीजिंग येथे ग्रहणमध्य दुपारी १:४७ CST (११:१७ IST) ला होते, त्या वेळी तेथे मेष लग्न १९ अंश होते. या प्रमाणे ग्रहणकुंडलीचा जरी विचार करायचा ठरवला तरी वेगवेगळ्या देशांची वेगळी कुंडली येवू शकते.  ज्या धनु राशीत सूर्य ग्रहण झाले ती रास भारत ग्रहण कुंडलीत व्ययात तर चीन ग्रहण कुंडलीत नवमात येते. या प्रमाणे विविध देशांच्या कुंडल्या तपासाव्या लागतील कारण कोरोना संकट हे जागतिक संकट आहे. जर ग्रहण कुंडली न पाहता देशाच्या कुंडली वरून पहायचे म्हंटले तर संभ्रम आहेच, कारण अमुक या देशाची रास अमुकच का घेतली? हि शंका. देशाची हीच रास या बाबतही विद्वानांमध्ये एकमत नाही. उदाहरणार्थ भारताच्या धनु/मकर/मीन अस्या तीन  पैकी वेगवेगळ्या राशी मानतात. चीनच्या तूळ/धनु राशी सांगितल्या जातात. म्हणजे खुप वेळखावू व किचकट काम आहे. मला वाटते या मुळे कुंडलीच्या माध्यमातून जागतिक भविष्यवाणी करणे जिकरीचे आहे व असे भविष्य फारसे केले जात नाही किंवा अनुभवास येत नाही. जरी हे संकट चीन मधून सुरु झाले असेल तरी ज्या प्रदेशात हे ग्रहण दिसले फक्त तिथेच या रोगाचा प्रादुर्भाव झाला, प्रभाव आहे असे नाही. कोरोनाचा सर्वाधिक फटका युरोपखंडाला सध्या तरी बसतो आहे. तेथे तर हे ग्रहण दिसलेच नाही. इटलीची सिंह रास सांगितली जाते. तिच्या कोण स्थानी हे ग्रहण झाले होते. जागतिक भाकिता साठी कालपुरुषाची कुंडली विचारात घेणे योग्य ठरेल.

कालपुरुषाची कुंडली मेष लग्नाची घेतली जाते व गोचर ग्रह घेतले जातात. गोचरी साठी एक वेळ लागेल. विविध ठिकाणी ग्रहण वेळा वेगवेगळ्या आहेत हे आपण पूर्वीच पाहिले आहे. ग्रहण हि खगोलीय घटना जरी भूपृष्ठीय असली तरी ग्रहांचे चालन हे भूकेंद्रीय गणन आहे. म्हणून गोचर घेताना रवी चंद्राची अंशात्मक युतीचा विचार करू. भारतीय मानक वेळे नुसार साधारणता सकाळी १०:४४ ला हि युती झाली. २६ डिसेंबर २०१९ चे सूर्य ग्रहण हे धनु राशीत मूळ नक्षत्रात चतुर्थ चरणात झाले. म्हणजे कालपुरुष कुंडलीत नवमात जल नवमांशी. जल नवमांश अनारोग्य कारक असतो. या वेळी धनु राशी मध्ये बुध, रवी, चंद्र, गुरु, केतू, शनी, प्लुटो असे तब्बल सात ग्रह होते. 
कालपुरुष कुंडलीत ग्रहण हे नवम स्थानात झाले. जातकात कुंडलीतील नवमस्थान हे अत्यंत शुभ मानले जाते, मेदानियेत जरी असा विचार करता येत नसला तरी अगदीच शुभत्व नाकारून कसे चालेल. ग्रहण हे त्रिकस्थानात झाले असते तर हे ग्रहण अशुभ आहे एवढे तरी निदान म्हणता आले असते. ज्या स्थानात हे ग्रहण झाले त्या स्थानात बहुग्रही योग आहे. सामान्यात: एकाच स्थानात ग्रह एकवटणे अशुभ मानले जाते. या बाबत वाद असू शकतात. पण असे ग्रह जर राहू/केतू युक्त असतील तर शुभ/अशुभ ठरवतांना अशुभत्वाच्या बाजूने पारडे जड करतो असे समजावयास हरकत नसावी. हा नुसता बहुग्रही योग नाही तर समक्रांती बहुग्रही योग आहे, आणि विशेष म्हणजे सर्वांची दक्षिण क्रांती आहे. त्यामुळे फळात तीव्रता आली. ग्रहण हे केतुच्याच नक्षत्रात झाले. बुध षष्ठेश, गुरु व्ययेश, शनी बाधकेश म्हणून अशुभ फळ देणार.
ग्रह
अंश/कला
क्रांती
स्थिर तारा

बुध
१/१५/०७
-२४
Shaula, Aculeus
धनु ०/४४, -३७, धनु १/५३ 
रवी
१०/००/१९
-२३


चंद्र
१०/००/२६
-२३
Kaus Medius
धनु १०o/४३’, -३०,
गुरु
११/१३/४८
-२३
Kaus Australis
धनु ११o/१४’
केतू
१४/२५/४७
-२३ 
Facis
धनु १४o/२५’
शनी
२६/३६/५४
-२२
Dheneb
धनु २५o/५७’,+१४
प्लुटो
२८/०५/१६
-२२
Sulphat
धनु २८o/०४
ज्या संसर्गजन्य रोगाने हाहाकार माजवला तो बुधाच्या कारकत्वात येतो. व्यापाराचाही विचार बुधा वरून होतो.  बुध षष्ठेश आहे, ग्रहणाशी समक्रांती योगात आहे. असा हा बुध शौला (मूळ नक्षत्र तारा) व अॅक्युलस या दोन स्थिरताऱ्याच्या प्रभावात आहे. शौला स्थिरताऱ्या जवळ बुध अशुभ फलदाता मानला गेला. याची देवता रुद्र आहे जी संहारकारक, उग्र मानली जाते. शौलाच्या अशुभ फळात संकटे. नैराश्य, विष दिले आहे. अॅक्युलस च्या फलिता मधील धर्मांधता/कट्टरता हे अनुभवास येतेय. ग्रहण (रवी चंद्र) हे कास मेडीअस स्थिरताऱ्याच्या प्रभावात आहे. भूकंप, नैसर्गिक आपत्ती, राजकीय संघर्ष यांचा धोका हा तारा दर्शवितो. 

याच बरोबर जगाला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे, जागतिक मंदीचा सामना करावा लागतो आहे. अर्थकारणाचा कारक गुरुही ग्रहणराशीत आहे. तो कास ऑस्ट्रालीस या स्थिरताऱ्याच्या प्रभावात आहे. या ताऱ्या जवळील गुरु शुभ फलदाता मानला गेला आहे. स्वराशीत आहे, पण गुरु केतू समक्रांती युती आहे. त्यामुळे गुरुच्या बलाचे आणि फळाचे अवमूल्यन झाले आहे. गुरु केतूच्या नक्षत्रात आहे. युती असली तरी गुरु उच्च नवमांशी आहे तर केतू शत्रू नवमांशी. जे जे ग्रह ग्रहण स्थित राशीत असतात ते त्यांचे अशुभ फळ देतात किंवा फलात कमतरता येते. पण गुरूची बलवत्ता बघता अपेक्षित अंदाजा पेक्षा लवकर आर्थिक संकटातून बाहेर येईल. 

केतू हा बरोबर फॅसीस या स्थिरताऱ्यावर आहे. याचे फलित हिंसक मृत्यू, अपघात, युद्ध, भूकंप दिले आहे.
मृत्यू कारक शनी व सामुदायिक मृत्यू, नरसंहार, साथीचे रोगराई यांचा कारक मानला गेलेला प्लुटो यांचीही दक्षिण समक्रांती युती ग्रहणराशीत झाली आहे. जागतिक संक्रमण संकटाला कारणीभूत हा प्लुटोच आहे. शनी आणि प्लुटो ज्या स्थिरताऱ्याच्या (डेनेब व शौलफट) प्रभावात आहेत त्यांची मेदनियेत घेता येतील अशी फलिते माझ्या माहितीत नाही. मेदनियेत शनीही आर्थिकनीती चा कारक मानला गेला आहे. गुरु ने निर्माण केलेले आश्वासक वातावरण शनी मुळे निराशजनक होत आहे. बाकी ग्रह ग्रहणस्थित राशीतून लवकर बाहेर येतील पण शनी, प्लुटो दीर्घकाळ वास्तव्य करणारे ग्रह आहेत. २४ जानेवारीलाच शनीने मकरेत प्रवेश केला आहे. ७ मार्चला प्लुटोही मकरेत आला आहे. ग्रहणाचा प्रभाव पुढील ग्रहणा पर्यंत किवा सहा मास (मागे पुढे) मानला जातो. त्या मुळे जास्त घाबरायचे कारण नाही. 

प्रजेचा प्रतिनिधी व शासनाचा प्रतिनिधी यांच्यात शुभयोग नाही. प्रथमात हर्शल व प्रथमेश अष्टमात या मुळे जगभरात प्रजेची मानसिकता काहीशी उन्मादक स्वरूपाची दिसतेय, स्वतास घातक होईल असे आचरण दिसून येतेय. २२ मार्च २०२० ला जनता कर्फू लागला व दुसऱ्या दिवसा पासून लॉकडाऊन लागू झाले. 

एक गंमत:- काही जन कोरोना विषाणू व सूर्याच्या दृश्य पृष्ठभागाबाहेरील अति-तप्त असे आवरण तेजोवलय (corona) यांचे इंग्रजी स्पेलिंग साम्य या वरून ग्रहण आणि या रोगाच संकट यांचा संबंध लावतायेत. इंग्रजी नामसाम्या वरून असा संबंध लावणे हे एकतर अपुरी माहिती किंवा बादरायण संबंध लावायची सवय अश्या मुळे असावे. मित्रांनो २६/१२/२०१९ चे सूर्यग्रहण हे खंडग्रास व काही ठिकाणी कंकणाकृती होते. एरवी सुर्याच्या प्रखरतेमुळे त्याचे न दिसणारे तेजोवलय / भानुकीरीट (corona) हे फक्त खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळीच दिसते. १९९९ मध्ये असे ग्रहण झाले होते. मग त्या वेळी ग्रहणात सूर्याचा corona दिसला म्हणून corona विषाणू प्रादुर्भाव का झाला नाही? या तर्का नुसार त्याच वेळी कोरोना भारतात व्हायला हवा होता.

ग्रंथ साक्ष:- नारद संहितेत वार्षिक भविष्य गुरु ज्या नक्षत्रात उदित होतो त्या वरून सांगितले अर्थात हे भविष्य जातकीय नसून मेदनिय आहे. या वर्षी ७ जानेवारी २०२० ला गुरु पूर्वाषाढ नक्षत्री उदित झाला व ११ फेब्रुवारी २०२१ ला तो श्रवण नक्षत्री उदित होईल. म्हणजे ७/०१/२०२० ते ११/०२/२०२१ हे आषाढनामे बृहस्पत्यवर्ष असेल.



या नुसार आषाढ गुरुमान वर्षात काय होईल? तर काही ठिकाणीच पाऊस होईल त्यामुळे अर्थातच काही ठिकाणी पिक येईल काही ठिकाणी येणार नाही. दुसरी ओळ जरा महत्वाची वाटते. क्षितीश- राजा, अस्य अर- शत्रू असलेले, अन्योन्य- परस्परांत, जयकांक्षी- विजयाची अपेक्षा. वर्तमान अर्थ असा निघतो कि सत्ताधारी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे युद्ध किंवा युद्धसदृस्य स्थिती असेल. यात एक शब्द आलाय स्युर याचा मी असा अर्थ करतोय कि नवीन शत्रुत्व नाही तर जे अगोदरच शत्रू आहेत (अस्य – असणे, अस्यु- असलेले) म्हणजे पारंपारिक शत्रुत युद्ध होण्याचा संभव असेल. जसे कि चीन-अमेरिका, अमेरिका-रशिया, भारत-पाकिस्तान, भारत-चीन हे उदाहरणा साठी दिले. जगभरात असलेल्या अश्या पारंपारिक शत्रु पैकी कुणातही युद्धाची शक्यता हा श्लोक सांगतो. मैदानी युद्धच व्हायला हवे असेही नाही. आता युद्धाची परिभाषा बदलली आहे. या पार्श्वभूमीवर covid 19 (कोरोना परिवार) विषाणूचा विचार करावा.

पुढील लेख:- जन्मवेळ शुद्धीचा गुंता. भाग-१ 


२ टिप्पण्या:

  1. उत्तम लेख !!

    समक्रांती योग म्हणजे काय हे जरा विस्तृतपणे समजवाल का ??

    उत्तर द्याहटवा
  2. ग्रहाचे क्रांती मार्गा वरील स्थाना पासून विषुववृत्तावर टाकलेल्या लंबाचे अंशात्मक अंतर म्हणजे क्रांती. ती दक्षिण व उत्तर असू शकते. जेव्हा दोन ग्रहांचे विषुववृत्ता पासूनचे हे अंतर समान असते तेव्हा समक्रांती योग होतो.

    उत्तर द्याहटवा