||श्री||
मागील लेख:- खंडग्रास सूर्यग्रहण, नाशिक – २०२२
लाभ हानी
नमस्कार🙏
२८/११/२०२२, दु.३:२७:२५ नाशिक (२०°/०२'/२३" N, ७३°/४७'/१०" E) ला खालील प्रश्न विचारला गेला.
"२९/९/२०२२ ला एका Vendor website कडून फोन आला. आमच्या कडे ग्राहक असून तुम्ही सदस्यत्व घेतल्यास
तुम्हाला ग्राहक देवू. असे अनेक फोन येत असतात त्यामुळे स्वारस्य दाखवले नाही.
साधारण दोन महिने झाले त्यांचे मधून मधून फोन येतात. मीही त्यांच्या वेबसाईटवर
दोनतीन वेळा डोकावून बघीतले. वेबसाईट बऱ्या पैकी आश्वासक वाटली. तर व्यवहार
फायदाचा होईल का?"
è मेष लग्न, लाभेश दशमेश शनि दशमात, लग्नेश वक्री मंगल धनात, धनेश अष्टमात रवि युक्त बुध युतीत लग्नेश मंगळाच्या दृष्टीत. भाग्येश व्ययेश गुरु व्ययात. कुंडली तर उत्तम आहे. मं,चं,श,चं या शासकग्राहात गुरु मात्र नाही. चंद्र गुरु लाभ योग, चंद्र मंगळ नवपंचम योग आहे. केमदृम होतो आहे पण चंद्र हा शनि युक्त असल्याने केमदृम भंग होतो आहे. आता एखादा दुसरा कुयोग असायचाच. Think Positive. व्यवहार करायला हरकत नाही.
..... ..०४/१२/२०२२, १७:३६:२६ ता.क.à
चंद्राचा दशमेश, लाभेश शनिशी इत्थशाल योग दशमात आहे. लग्नेश दशमेश अंशात्मक
नवपंचमयोग धन दशमातून आहे. इतके चांगले योग असल्याने कुंडली पाहून मग पैसे भरले.
पण फसवणूकच झाली आहे. आता पर्यंत तरी त्यांच्या कडून व्यवसाय मिळाला नाही. उडवाउडवीची
उत्तरे देतात. दोनच ग्राहक दिले तेही नकली. फोन बंद, whatsApp
chat, इमेल ला
उत्तर नाही. या बाबत Vendor website ला सांगितले पण त्यांनी ग्राहकांचा पाठपुरावा केलेला
दिसला नाही. वेबसाईटने स्वत:हून रोज ग्राहाकांचा डेटा देने अपेक्षित असतांना त्यांना
फोन केल्या शिवाय ते डेटा देत नसत. त्यांची सेवा निराशजनक असल्याचे त्यांना सांगून
खडसावले असता. दुसऱ्या दिवशी ५/६ ग्राहक दिले पण अगोदर प्रमाणेच ग्राहक whatsApp
chat, इमेल ला
उत्तरे देत नसत. बरेच जन फोन उचलत नसत किंवा फोन बंद असे. दोनचार जनांशी संपर्क
झाला तर आम्ही अशी कोणती मागनी नोंदवली नव्हती. आम्हाला वेबसाईट माहित नाही
म्हणाले. वेबसाईट वाले आता फोन टाळायला लागले. माझे सदस्यत्व रद्द करा व परतावा
द्या असा मेसेज वेबसाईटवर केला. अर्थात याला उत्तर आले नाही. फोन केल्यावर उचलला नाही
पण उद्या डेटा देतो असा मेसेज केला. दुसऱ्या दिवशी ७ एक ग्राहक दिले पण पहिल्या
सारखाच अनुभव. एक दोघांनी स्वारस्य दाखवले पण त्यांना अगोदर पैसे भरायला सांगितले
तर गायब झाले. याचा अर्थ वेबसाईट नकली ग्राहक देत आहे. Vendor
website कडे
पैसे परत मागितले तर त्यांनी देण्यास नकार दिला.
उपचय स्थानांपैकी ३,६ ची मालकी बुधा
कडे तर १०,११ ची मालकी शनी कडे आहे. शनि उत्तम परिस्थितीत आहे. बुध अस्तंगत आहे तो
दुसऱ्या दिवशी उदित होणार होता. चूक सापडली
प्रश्न व्यवसायाचा होता. उपचय स्थानांचा स्वामी व व्यवसायाचा एक कारक बुध अष्टमात
अस्तंगत आणि रवि पंचमेश आहे. हा विचार त्यावेळी करून पैसे भरायला
नको होते. लग्नेश धनात आहे व धनेश धनाला पाहतो आहे हा चांगला योग वाटला. पण
व्यवसायाचा कारक बुध हा उपचयस्थानांचे व्ययेशांनी युक्त अष्टमात आहे, पैकी तृतीयाचा
व्ययेश शुक्र युतीत आहे. धनेश अष्टमेश राशी परिवर्तन हा दैन्य योग झाला. लग्नेश
धनात असण्या पेक्षा हा प्रभावी ठरला म्हणायचे तर. व्ययातील भाग्येश, व्ययेश गुरूची
अष्टमावरील दृष्टी देखील तारक ठरली नाही कारण अष्टमातील त्रिकूटावर दिप्तांश
दृष्टी नाही. व्ययेश गुरु व्ययात हा गुंतवणुकीस चांगला योग वाटला होता. गुरु
असल्याने गुंतवणूक सुरक्षीत वाटली. एकतर हा गुरु मांदी युक्त आहे व मांदी बुध दिप्तांश
नवपंचमयोग आहे. बुध हा विपत नक्षत्रात आहे. व्यवसायाचे स्थान सप्तम हे ही निर्दोष
नाही. सप्तमात केतू आहे, व्यवसाय मिळणारच नव्हता. हंsssss हा विचार त्यावेळी
करायला हवा होता. (Think
positive ना! मग घ्या आता.) दशमेश, लाभेश
बलवान शनिच्या सप्तमावरील दृष्टीला भाळलो. आणि हि दृष्टी तरी कुठे दिप्तांश आहे,
ना सप्तम बिंदू वर ना सप्तमस्थ केतू वर. बलवान असला तरी शेवटी तो पापग्रह आहे.
सप्तमावर शुभ ग्रहांची दृष्टी नाही हि खचितच चांगली गोष्ट नाही. दुर्लक्ष करायला
नको होते. आता बसा हात चोळीत. बैल गेला नि झोपा केला.
१०/१२/२०२२, १५:२० ता.क.à वेबसाईट
ने पेमेंट एका payment solution app च्या माध्यमातून घेतले होते. ४ डिसे.२०२२, १४:३४ ला Razorpay
या payment app ला मेल करून ‘सदर वेबसाईट ने तुमचे
app वापरून पेमेंट स्वीकारले होते आणि ती ठरल्या प्रमाणे सर्विस देत नाही.’ अशी
तक्रार केली होती. सोबत वेबसाईट बरोबर झालेल्या चॅटिंगचे स्क्रीन शॉट व
व्यवहाराच्या वेळी Razorpay कडून पावती मिळाली होती त्याचा नंबर सुद्धा दिला. चक्क याची Razorpay कंपनीने दखल घेतली. त्यांनी लगेच
१५:५३ ला मेलला उत्तर दिले कि “Greetings from Razorpay. We request you to kindly
provide us with your contact number and a convenient time when we may call you
regarding your query raised and assist you further. We are getting this checked
with our concerned team and would request you kindly provide us with some time. We have raised a dispute with the
merchant and we’re checking this at our end and would request you provide us 21
days to provide the best resolution from our end.” हे उत्तर जातकाने ७ तारखेला
पाहिले त्यांना नंबर दिला. त्यांनी ७ तारखेला दु. २:५२ ला फोन केला. फोन उचलल्यावर
समोरून काही बोलणे ऐकू आले नाही. तांत्रिक दोष असेल म्हणून जातकाने दोन तीन वेळा
फोन केले पण समोरून कुणी बोलले नाही. मात्र १० तारखेला दु.३:२० ला परत त्यांचा फोन
आला व तुमच्या खात्यात आम्ही परतावा जमा करत आहोत असे सांगितले. दहा दिवसात तो
तुमच्या खात्यात जमा होईल. ४/५ दिवसांनी बघितले तर परतावा १० तारखेलाच जमा झाला
होता. एकंदर गुंतवणूक सुरक्षित
राहिली. व्यवसायीक लाभ झाला नाही पण आर्थिक नुकसान झाले नाही.
हलक में हाथ डालके निकाला...... असा
काही डायलॉग असतो ना बॉलीवूड
चित्रपटात तसे हे झाले. Vendor website ने पैसे घस्यात घातले होते पण थर्ड पार्टी पेमेंट अॅप ने
त्यांची प्रतिष्ठा, विश्वासाहर्ता जपण्यासाठी ते त्यांच्या कडून काढून दिले. पेमेंट
अॅप म्हणू शकले असते कि तुमचा व्यवहार आहे. आमचे काम तुमच्या खात्यातून पैसे
त्यांच्या खात्यात जमा करणे आहे. Vendor website हे पैसे का पचवू शकली नाही? तर
त्यांचा लग्नेश शुक्र जरी लाभेश रवि युक्त असला व शुक्र अस्तंगत नसला तरी ते
व्ययेश बुधाने युक्त आहे. या उलट जातकाचा लाभेश हा दशमात स्वगृही आहे. वास्तविक
असा अनुभव या प्रकरणात यायला नको होता, कारण परस्परांच्या धनेशांचे राशी परिवर्तन
आहे. शिवाय दुसरी गोष्ट अशी कि एकाचा धनस्वामी हा दुसऱ्याचा लग्नेश आहे. या उपर Vendor
website
चा दशमेश हा जातकाच्या दशमेशाशी युती करायला जात आहे. हे दोन्ही योग हे परस्परांना
परस्परां कडून अर्थप्राप्ती व व्यवसाय मिळणे दर्शवितात. दोघांचे लग्नेश, धनेश
राशिपरीवर्तन, दृष्टीपरिवर्तनात आहे, मात्र तरीही असे घडले नाही ?
दशा म्हणाल तर चंद्र महादशेत राहू
अंतर्दशेत केतू विदशा १३ नोव्हें. ते १५ डिसें. २०२२ दरम्यान होती ज्यात या
घडामोडी घडल्या. चंद्र दशमात स्वनक्षत्री असून दशमेश युक्त आहे, म्हणजे तो
व्यवसायास अनुकूल आहे. राहू चा राशीस्वामी मंगळ धनस्थानात असून राहू धनेश
शुक्राच्या नक्षत्रात आहे, म्हणजे राहू धनार्जनास पोषक आहे. केतू चा राशीस्वामी
अष्टमात आहे मात्र नक्षत्रस्वामी राहू असल्याने तसा तो धनार्जनास अनुकूल म्हणता
येईल नाही का? ठीक आहे जावूद्या केतू सोडून देवू. पुढील विदशानाथ शुक्र अष्टमात
असला तरी धनेश धनाला पाहतो आहे, हा संरक्षक योग झाला. त्याचा नक्षत्रस्वामी बुध हा
उपचयस्थानांचा स्वामी आहे. शुक्रही अनुकूल आहे. मग जातक जर केतू विदशा संपे पर्यंत
म्हणजे १५ डिसेंबर पर्यंत थांबला असता तर त्या नंतर Vendor
website
कडून जातकाला व्यवसाय मिळाला असता?......
पुढील लेख:- बेरकी चंद्र आहे साक्षिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा