||श्री||
बेरकी चंद्र आहे साक्षीला.😉
Yogesh Daithankar, Paris Jyotish Karyalay, 9370112655
नमस्कार,
आज मी जी कुंडली देणार आहे त्याचे परिणाम अजून आले
नाही व माझ्या पर्यंत येण्याची शक्यता नाही. त्या मुळे कुंडली संदर्भात मुलभूत
चर्चा करु या.
दोन तरुणी ऑफिस मध्ये आल्या. त्यांना काही प्रश्न
विचारायचे होते. आम्ही दोघी मावस बहिणी आहेत असे त्यांनी सांगितले. जिचे प्रश्न
होते तिची जन्मवेळ नव्हती, त्या मुळे प्रश्नकुंडली मांडणे क्रमप्राप्त होते.
१९/१२/२०२२, १७:२४:०४, नाशिक (७३/४८/१०E, २०/०२/२३N)
प्रश्न कुंडली वरून मी सहसा एकाच प्रश्नाचे उत्तर
देतो. तिचे तीन प्रश्न होते त्यांचे विषय होते १)शिक्षण २)विवाह ३)नोकरी. तर
कोणत्या प्रश्नाचे उत्तर कुंडली वरून द्यायला हवे होते? रविवारी या वरचे माझे
मत मांडेल.
शुभदिन
è १)शिक्षण कोर्स बदला बाबत.
२)विवाह?
३)नोकरी करावी का?
कुंडली वरून कोणत्या प्रश्नाचे उत्तर देता येईल ते पाहू त्यासाठी चंद्राचे
काय म्हणणे आहे ते पाहू.
चंद्र – ५/३,
न.स्वा. राहू – ११ (मं- १२/१२,७)
श – ९/९,१०
आता तीन प्रश्न आहेत. चंद्र त्या पैकी ज्याचा निर्देश करतो तो प्रश्न महत्वाचा. प्रथम प्रत्येक प्रश्नाचे कार्येश बघू. पहिला प्रश्नाचा विषय शिक्षण आहे त्याचे भाव ४,९,११. चंद्र ११ चा कार्येश आहे. दुसरा प्रश्न विवाहाचा आहे त्याचे भाव २,७,११ पैकी चंद्र ७,११ चा कार्येश आहे. तिसरा प्रश्न नोकरीचा त्याचे भाव आहेत २,६,१०,११ पैकी चंद्र १०,११ चा कार्येश आहे. म्हणजे चंद्र तिन्ही प्रश्न निर्देशित करत आहे. मी तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली.
नंतर मनात विचार आला कि जातकाचा खरा प्रश्न काय असावा बर? प्रचलना प्रमाणे आपण चंद्राची साक्ष तर घेतली पण हा चंद्र बेरकी निघाला, राहुच्या नक्षत्रात आहे ना. तो तिघांकडेही बोटे दाखवून मोकळा झाला. अश्या वेळी काय करावे? हे कुठे वाचनात नाही आले व शिकतांनाही कुणी सांगितले नाही. शिक्षणात, वाचनात हेच आले कि विचारलेल्या प्रश्ना संबंधित भाव जर चंद्र दर्शवित असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर त्या प्रश्न कुंडली वरून द्यावे. इथे चंद्र तिन्ही प्रश्न दर्शवित होता म्हणून तिन्ही प्रश्नांची उत्तरे दिली खरे पण त्यातीलही कोणता प्रश्न खरा आहे? हि टिकटिक डोक्यात चालू झाली. जातकाचे म्हणणे होते कि मला या तिन्ही प्रश्नांबाबत जाणून घ्यायचे आहे. जन्मकुंडली असती तर ठीक होते. असो तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे दिली होती.
तिच्या मनातला
प्रबळ प्रश्न कोणता? या वर मी ते गेल्यावर विचार करू लागलो. मी परत चंद्राचे
कार्येशत्व व प्रश्नांचे कार्येश भाव तपासू लागलो. या वेळी मी विरोधी भाव तपासायचे
ठरवले. मी विचार केला कि ज्या विषया संबंधित विरोधी भाव चंद्र दर्शवित नसेल तो
प्रश्न प्रबळ मानू. मला तर हेच सुचले. प्रश्नांचे जे विरोधी भाव आहे त्या पैकी
चंद्र पहिल्या प्रश्नातील ३,१० चा कार्येश आहे. दुसऱ्या प्रश्नातील १० चा कार्येश
आहे तर तिसऱ्या प्रश्नातील ५,९ चा कार्येश आहे. आल लक्षात मी या चंद्राला बेरकी का
म्हणालो ? पण मीही हटलो नाही. तेवढ्यात मला एक सुचले कि प्रश्न विषया संबंधित
मुख्य भावा कडे मोर्चा वळवू या. शिक्षणासाठी ४ मुख्य आहे. चंद्र चतुर्थाचा कार्येश
नाही. विवाहा साठी ७ मुख्य आहे. चंद्र ७ चा कार्येश आहे. नोकरी साठी मी ६ मुख्य
धरला. चंद्र ६ चा कार्येश नाही. अखेर चंद्रा कडून मनात काय आहे ते नेमके समजले तर.
ज्योतिष शास्त्रातील चंद्र हा स्त्री ग्रह आहे गुपित पोटात जास्त वेळ कसा ठेवणार?
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा